मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
श्राद्धाचा निर्णय

प्रथम परिच्छेद - श्राद्धाचा निर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


क्षयमासमृतानांप्रत्याब्दिकेविशेषोहेमाद्रौ तिथ्यर्धेप्रथमेपूर्वोद्वितीयेर्धेतथोत्तरः मासावितिबुधैश्चिंत्यौक्षयमासस्यमध्यगौ ।

आब्दिकवर्धापनेपिज्ञेयं यन्मलमासेवर्ज्यमुक्तंतच्छुक्रगुर्वोरस्तादिष्वपिज्ञेयं तदाहबृहस्पतिः बालेवायदिवावृद्धेशुक्रेवास्तंगतेगुरौ मलमास इवैतानिवर्जयेद्देवदर्शनमिति अनादिदेवतांदृष्ट्वाशुचःस्युर्नष्टभार्गवे मलमासेप्यनावृत्ततीर्थयात्रांविवर्जयेत्‍ आवृत्ततीर्थेदोषाभावमात्रंनतुफलमिति वाचस्पतिमिश्राः तन्न असतिबाधकेफलहेतुत्वाक्षतेः ।


क्षयमासमृतांच्या प्रतिसांवत्सरिक श्राद्धाचा निर्णय सांगतो.
हेमाद्रींत सांगतो - " क्षयमासाच्या प्रतिपदादिक ज्या तिथि त्यांच्या पूर्वार्धीं मृत असेल तर पूर्वमास व उत्तरार्धीं मृत असेल तर पुढचा मास, याप्रमाणें त्या क्षयमासाच्या सर्व तिथि दोन मासांच्या आहेत, यास्तव क्षयमासांत तिथींच्या पूर्वाधीं मृत झाला असेल तर त्याचें प्रतिसांवत्सरिक श्राद्ध पूर्वमासांत व तिथींच्या उत्तरार्धीं मृत असेल तर त्याचें प्रतिसांवत्सरिक श्राद्ध पुढच्या मासांत करावें. "

गुरुशुक्रास्तांचा निर्णय - याप्रमाणें जन्म झाला असतां वाढदिवसाविषयींही असाच निर्णय जाणावा. मलमासांत जो वर्ज्यावर्ज्य निर्णय ( वर ) सांगितला तो गुरुशुक्रांचे अस्तादिविषयींही जाणावा. तेंच बृहस्पति सांगतो - " मलमासांत जें वर्ज्य सांगितलें तें व देवदर्शन हें, गुरु किंवा शुक्र यांचें अस्त, बाल्य किंवा वार्धक्य असतां वर्ज्य करावें. " शुक्र अस्तंगत असतां अपूर्व देवतेचें दर्शन केलें तर शोक होतो; मलमासांतही अपूर्व तीर्थयात्रा करुं नये. " पूर्वी ज्या तीर्थाची यात्रा केली असेल त्याची पुनः यात्रा मलमासांत केली असतां दोष मात्र नाहीं, परंतु फल नाहीं, असें वाचस्पतिमिश्र म्हणतात; तें बरोबर नाहीं; कारण, ज्यापेक्षां बाधक नाहीं त्यापेक्षां फल होणें निर्विवाद आहे.

लल्लोपि नीचस्थेवक्रसंस्थेप्यतिचरणगतेबालवृद्धास्तगेवासंन्यासोदेवयात्राव्रतनियमविधिः कर्णवेधस्तुदीक्षा मौंजीबंधोड्गनानांपरिणयनविधिर्वास्तुदेवप्रतिष्ठावर्ज्याः सद्भिः प्रयत्नात्रिदशपतिगुरौसिंहराशिस्थितेचेति दीक्षायागदीक्षाआगमदीक्षाच तथा उद्यानचूडाव्रतबंधदीक्षाविवाहयात्राचवधूप्रवेशः तडागकूपत्रिदशप्रतिष्ठाबृहस्पतौसिंहगतेनकुर्यात् दिवोदासीये गुर्वादित्येगुरौसिंहेनष्टेशुक्रेमलिम्लुचे गृहकर्मव्रतंयात्रांमनसापिनचिंतयेत् ।

लल्लही सांगतो - " नीचस्थ ( मकरस्थ ), वक्रस्थ, किंवा अतिचारगत, अथवा बाल, वृद्ध, अस्तंगत असा गुरु असतां किंवा सिंहस्थ गुरु असतां संन्यास, देवयात्रा, व्रतें, नियमविधि, कर्णवेध, दीक्षा ( यज्ञदीक्षा व आगमदीक्षा ), मौंजीबंधन स्त्रियांचा विवाह, गृह बांधणें, देवाची अर्चा हीं सर्व कर्मै ज्ञात्या पुरुषांनीं वर्ज्य करावीं - " दीक्षा म्हणजे यज्ञदीक्षा व मंत्रदीक्षा. तसेंच " सिंहस्थ गुरु असतां उद्यान, चौल, उपनयन, दीक्षा, विवाह, यात्रा, वधूप्रवेश, तडाग, कूप, देव, यांची अर्चा, हीं कर्मैं करुं नयेत. " दिवोदासीयांत सांगतो - " अस्तंगत गुरु, सिंहस्थ गुरु, अस्तंगत शुक्र, मलमास यांचे ठायीं गृह बांधणें, व्रत, यात्रा हीं करण्याविषयीं मनांतही आणूं नये. "

अस्यापवादः तत्रैवब्राह्मे मुंडनंचोपवासश्चगौतम्यांसिंहगेगुरौ कन्यागतेतुकृष्णायांनतुतत्तीरवासिनां तथा आद्यासौगौतमीगंगाद्वितीयाजाह्नवीस्मृता सर्वतीर्थफलंस्नानाद्गौतम्यांसिंहगेगुरौ ।

याचा अपवाद - तेथेंच ब्राह्मांत सांगतो - सिंहस्थ गुरु असतांही गोदावरीचे ठायीं आणि कन्यागत गुरु असतां कृष्णेचे ठायीं यात्रा करणार्‍यांस क्षौर, उपवास आहेत; तीरवासी जनांस नाहींत. " तसेंच " गौतमी पहिली गंगा व दुसरी जाह्नवी गंगा होय, यास्तव सिंहस्थ गुरु असतां गोदावरीचे ठायीं स्नान केल्यानें सर्वतीर्थस्नानाचें फल प्राप्त होतें. "

संहिताप्रदीपे स्यात्सप्तरात्रंगुरुशुक्रयोश्चबालत्वमह्नांदशकंचवार्धम् वृद्धौसितेज्यावशुभौशिशुत्वेशस्तौ यतस्तावुपचीयमानौ वसिष्ठः अतिचारगतेजीवेवर्जयेत्तदनंतरं व्रतोद्वाहादिकार्येषुअष्टाविंशतिवासरान् ।

संहिताप्रदीपांत सांगतो - " गुरु व शुक्र यांचे उदयानंतर सात दिवस बाल्य आणि अस्ताचे पूर्वी दहा दिवस वार्धक्य; वार्धक्याचे अधिक दिवस सांगण्याचें कारण, गुरुशुक्रांचें वार्धक्य अशुभ व बाल्य शुभ होय, ते गुरु व शुक्र बाल्यापासून पुढें वृद्धिंगत होणारे आहेत " वसिष्ठ म्हणतो - " अतिचारगत ( म्हणजे शीघ्र गतीनें पूर्वराशींचे शेष उल्लंघून दुसर्‍या राशींचे ठायीं जो संचार तो अतिचार, त्या अतिचाराप्रत गेलेला ) गुरु असतां उपनयन, विवाह इत्यादि शुभ कार्यांचे ठायीं अठ्ठावीस दिवस टाकावे. "

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP