मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद| ऋतु प्रथम परिच्छेद मंगलारंभ काळाचे भेद ऋतु मास संक्रांतिनिर्णय मेषादिसंक्रांतींची दानें विष्णुपदादिकांचें स्वरुप मंगलकार्यांचेठायीं विशेष चांद्रमास मलमासनिर्णय मलमासांतील कर्में मलमासांत वर्ज्य कर्मै श्राद्धाचा निर्णय बाल्यादि लक्षण मलमाससंबंधी विशेषव्रत तिथिनिर्णय एकभक्तव्रताचा निर्णय नक्तव्रताचा निर्णय हरिनक्त व्रतपरिभाषा व्रताचे आरंभ स्त्रीव्रताविषयीं निर्णय सूतकादिक उपोषणें असतां निर्णय प्रतिपदादिक तिथींचा निर्णय वेधाचा निर्णय एकादशीव्रत काम्यव्रत आठ महाद्वादशी पौर्णिमा व अमावास्या इष्टिकालाचा निर्णय पौर्णमासीविषयीं विशेष इष्टिविषयीं विकृतीष्टींच्या कालाचा निर्णय सोमाविषयीं श्राद्धाविषयीं अमावास्येचा निर्णय ग्रहणाचा निर्णय ग्रहणांत भोजन ग्रहणांत भोजन ग्रहणस्नानाविषयीं तीर्थैं जन्मराशीस ग्रहण समुद्रस्नानाविषयीं निर्णय प्रथम परिच्छेद - ऋतु निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे. Tags : nirnay sindhupustakग्रंथनिर्णयसिंधु ऋतु Translation - भाषांतर ऋतुर्मासद्वयात्मा मलमासेतुमासद्वयात्मकएकोमासस्तेनमासद्वयात्मकत्वमविरुद्धम् सद्वेधा चांद्रःसौरश्च चैत्रारंभोवसंतादिश्चांद्रः मीनारंभोमेषारंभोवासौरः मीनमेषयोर्मेषवृषयोर्वावसंत इतिबौधायनोक्तेः अनयोर्विनियोगमाहत्रिकांडमंडनः श्रौतस्मार्तक्रियाः सर्वाः कुर्याच्चांद्रमसर्तुषु तदभावेतुसौरर्तुष्वितिज्योतिर्विदांमतम् सद्विविधोपिषोढा वसंतोग्रीष्मोवर्षाः शरद्धेमंतः शिशिरः इत्यृतुः ।आतां ऋतु सांगतो- दोन मास म्हणजे एक ऋतु होतो. मलमास असतां शुद्ध व मलमास मिळून एक मास होतो, म्हणून दोन मास म्हणजे एक ऋतु असें जें सांगितलें तें विरुद्ध नाहीं. तो ऋतु दोन प्रकारचा - चांद्र आणि सौर चैत्रापासून आरंभ करुन दोन दोन महिन्यांचा एकेक ऋतु असा मासपरत्वें जो वसंतादिक ऋतु तो चांद्र ऋतु. मीन संक्रांतीपासून किंवा मेषसंक्रांतीपासून दोन दोन राशींस सूर्य असतां एकेक ऋतु होतो, असा जो संक्रांतिपरत्वें ऋतु तो सौर ऋतु. कारण, " मीन व मेष मिळून वसंत ऋतु; किंवा मेष व वृषभ मिळून वसंत ऋतु होतो " अशी बौधायनाची उक्ति आहे. ह्या सौर व चांद्र ऋतूंचा विनियोग त्रिकांडमंडन सांगतो - " श्रौत, स्मार्त इत्यादिक सर्व कर्मांचेठायीं संकल्पांत उच्चार करणें तों चांद्र ऋतूचा करावा, हें प्रशस्त. चांद्र ऋतूच्या अभावीं सौर ऋतूचा उच्चार करावा असें ज्योतिःशास्त्रज्ञांचें मत आहे. " तो दोन्ही प्रकारचा ऋतु प्रत्येक सहा प्रकारचा आहे, ते प्रकार असे - वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद्, हेमंत आणि शिशिर. याप्रमाणें ऋतुनिर्णय जाणावा. N/A References : N/A Last Updated : May 09, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP