मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
काम्यव्रत

प्रथम परिच्छेद - काम्यव्रत

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अथकाम्यव्रतविधिः लघुनारदीये दशम्यादिमहीपालत्रिदिनंपरिवर्जयेत् ‍ गंधतांबूलपुष्पादिस्त्रीसंभोगंमहायशाः तत्रदशम्यांविधिःकौर्मे कांस्यंमांसंमसूरांश्चचणकान् ‍ कोरदूषकान् ‍ शाकंमधुपरान्नंच त्यजेदुपवसन् ‍ स्त्रियम् ‍ तथा शाकंमांसंमसूरांश्चपुनर्भोजनमैथुने द्यूतमत्यंबुपानंचदशम्यांवैष्णवस्त्यजेत् ‍ मदनरत्ने नारदीये अक्षारलवणाः सर्वेहविष्यान्ननिषेविणः अवनीतल्पशयनाः प्रियासंगमवर्जिताः ।

आतां काम्यव्रताचा विधि सांगतो .

लघुनारदीयांत - " दशमी , एकादशी , द्वादशी ह्या तीन दिवशीं सुगंधि द्रव्यें , तांबूल , पुष्पें , स्त्रीसंभोग हीं वर्ज्य करावीं . " दशमीस विधि - कौर्मांत - " कांस्यपात्र , मांस , मसूरा , चणे , कोद्रव , शाक , मधु ( मध ), परान्न , स्त्री हीं वर्ज्य करावीं . " तसेंच " शाक , मांस , मसूरा , पुनर्भोजन , मैथुन , द्यूत , अति उदकपान हीं दशमीचे ठायीं वैष्णवानें वर्ज्य करावीं . " मदनरत्नांत - नारदीयांत - " क्षार - लवणविवर्जित , हविष्यान्नभोजी , भूमिशायी , स्त्रीसंगविरहित असें असावें . "

व्रतघ्नान्याहहेमाद्रौदेवलः असकृज्जलपानाच्चसकृत्तांबूलचर्वणात् ‍ उपवासः प्रणश्येतदिवास्वापाच्चमैर्थुनात् ‍ अशक्तौतुमदनरत्नेदेवलः अत्ययेचांबुपानेननोपवासः प्रणश्यति अत्ययेकष्टे विष्णुरहस्ये गात्राभ्यंगंशिरोभ्यंगंतांबूलंचानुलेपनं व्रतस्थोवर्जयेत्सर्वंयच्चान्यत्रनिराकृतं ।

व्रतघ्नें सांगतो - हेमाद्रींत देवल - " वारंवार उदकपान करणें , एकवार तांबूल चर्वण करणें , दिवानिद्रा , मैथुन , यांहींकरुन उपोषणाचा नाश होतो . " येथें मैथुनशब्देंकरुन अष्टांगमैथुन . तें असें : - स्त्रीसंभोगाचें स्मरण करणें विषयाच्यागोष्टी सांगणें , स्त्रीशीं क्रीडा करणें , स्त्रीकडे विषयदृष्टीनें पाहाणें , स्त्रीशीं गुप्त गोष्टी करणें , मी विषयोपभोग करीन असा संकल्प करणें , उपभोगाचा निश्चय करणें , व प्रत्यक्ष मैथुन करणें ; याप्रकारें अष्टविध मैथुनांतून कोणतेंही आचरण करुं नये . उपोषणानें व्याकुळ असतां मदनरत्नांत देवल सांगतो - " महासंकटकालीं वारंवार उदक प्राशन केलें असतां उपवास व्यर्थ होत नाहीं . " विष्णुरहस्यांत - " शरीरास अभ्यंग , मस्तकास अभ्यंग , तांबूल , गंधाची उटी , आणि अन्यत्र ठिकाणीं निषिद्ध कर्मै सांगितलीं तीं व्रतस्थानें सर्व वर्ज्य करावीं . "

एषुप्रायश्चित्तमुक्तंनिर्णयामृते संग्रहे स्तेनहिंसकयोः सख्यंकृत्वास्तैन्यंचहिंसनम् ‍ प्रायश्चित्तं व्रतीकुर्याज्जपेन्नामशतत्रयं मिथ्यावादेदिवास्वापेबहुशोंबुनिषेवणे अष्टाक्षरंव्रतीजप्त्वाशतमष्टोत्तरंशुचिः ॐनमो नारायणायेत्यष्टाक्षरः तत्रैव पैठीनसिः तांबूलचर्वणेस्त्रीसंभोगेमांसनिषेवणे व्रतलोपोनचेत्कुर्यात्कृष्णावद्भुजिवर्जनमिति कृष्णैकादशीवद्भोजननिषेधमात्रपरिपालनेतुतांबूलचर्वणादावपिनदोष इत्यर्थः संभोगोऋतुकालादन्यत्र रेतः सेकात्मसंभोगमृतेऽन्यत्रक्षयः स्मृत इतिकात्यायनोक्तेः हेमाद्रौवसिष्ठः उपवासेतथाश्राद्धेनकुर्याद्दंतधावनं दंतानांकाष्ठसंयोगोदहत्यासप्तमंकुलं काष्ठग्रहणान्मृल्लोष्ठाद्यनिषेध इतिहेमाद्रिः विष्णुरहस्ये श्राद्धोपवासदिवसेखादित्वादंतधावनं गायत्र्याशतसंपूतमंबुप्राश्यविशुद्ध्यति निर्णयामृतेव्यासः वर्जयेत्पारणेमांसंव्रताहेप्यौषधंसदेति ।

याविषयीं प्रायश्चित्त सांगतो - निर्णयामृतांत - संग्रहांत - " चोर , हिंसक यांशीं सख्य केलें असतां किंवा अल्प चोरी , कीटादिक प्राण्यांची हिंसा केली असतां व्रती यानें विष्णूच्या नामाचा तीनशें जप करावा . मिथ्या भाषण , दिवानिद्रा , बहुत वेळां उदकपान करणें , यांतून कोणतेंही एक करील तर त्यानें अष्टाक्षर मंत्राचा अष्टोत्तरशत जप करावा , म्हणजे तो शुद्ध होतो . " " ॐनमो नारायणाय " हा अष्टाक्षर मंत्र होय . त्याच ठिकाणीं पैठीनसि - " जर कृष्णैकादशीप्रमाणें केवळ भोजननिषेध मात्र पालन करीत असेल तर त्यानें तांबूलचर्वण , स्त्रीसंभोग , मांससेवन यांतून कोणतेंही केल्यानें व्रतलोप होत नाहीं . " स्त्रीसंभोग म्हणजे ऋतुकालाहून अन्य कालीं संभोग होय . कारण " रेतःसेकरुप संभोग ऋतुकालीं होतो , त्यावांचून अन्यकालीं संभोग तो केवळ रेतःक्षयरुप म्हटला आहे . " असें कात्यायन आहे . हेमाद्रींत वसिष्ठ - " उपवासदिवस , श्राद्धदिवस , यांचे ठायीं दंतधावन करुं नये ; कारण , त्या दिवशीं दंत व काष्ठ यांचा संयोग होईल तर तो सात कुलांचा नाशक होतो . " ह्या वचनांत केवल काष्ठाचें ग्रहण आहे . म्हणून मृत्तिका , ढेकूळ इत्यादिकांनीं दंतधावन करण्यास निषेध नाहीं असें हेमाद्रि सांगतो . विष्णुरहस्यांत - " श्राद्धदिवशीं व उपवासदिवशीं काष्ठानें दंतधावन केलें असतां गायत्रीमंत्रानें शतवार अभिमंत्रित केलेलें उदक प्राशन करुन शुद्ध होतो . " निर्णयामृतांत व्यास - " पारणेच्या दिवशीं व व्रतदिवशीं मांस व औषधी हीं नित्य वर्ज्य करावीं " असें म्हणतो .

एकादश्यां श्राद्धप्राप्तौमाधवीये कात्यायन आह उपवासोयदानित्यः श्राद्धंनैमित्तिकंभवेत् ‍ उपवासंतदाकुर्यादाघ्रायपितृसेवितं मातापित्रोःक्षयेप्राप्तेभवेदेकादशीयदि अभ्यर्च्यपितृदेवांश्च आजिघ्रेत्पितृसेवितमिति हेमाद्यादिसर्वनिबंधेष्वेवं एतेनएकादशीनिमित्तकंश्राद्धंद्वादश्यांकार्यमितिवदंतः परास्ताः किंच महालये सपक्षः सकलः पूज्यः श्राद्धषोडशकंप्रतीतिश्रुतंषोडशत्वं पौषेकादश्यांचमन्वादिश्राद्धं क्षयाहापरिज्ञानेचतत्पक्षैकादश्यांविहितंश्राद्धंबाधितमेवस्यात् ‍ यदपि स्मृतिचंद्रिकास्थंपठंति अन्नाश्रितानिपापानितद्भोक्तुर्दातुरेवच मज्जंतिपितरस्तस्यनरकेशाश्वतीः समाइति तस्यापिरागप्राप्तभुजिगोचरस्यवैधंश्राद्धंगोचरयतांमहत्साहसमित्यलम् ‍ योपि अकृतश्राद्धनिचयाजलपिंडविनाकृताइतिलघुनारदीयेएकादश्यांश्राद्धादिनिषेधः समातापितृभिन्नविषयः पूर्ववाक्येतद्गहणात् ‍ निचयः प्रतिग्रहः ।

एकादशीचे दिवशीं श्राद्ध प्राप्त असतां माधवीयांत कत्यायन सांगतो - " जेव्हां उपवास नित्य असून त्या दिवशीं नैमित्तिक श्राद्ध प्राप्त होईल तेव्हां श्राद्ध करुन श्राद्धशेष सर्व प्रकारचें अन्न एका पात्रावर वाढवून तें सर्व अन्न अवघ्राण करुन उपवास करावा . मातापितरांच्या श्राद्धदिवशीं एकादशी प्राप्त होईल तर यथाविधि श्राद्ध करुन श्राद्धशेषान्नाचें अवघ्राण करावें . " असें हेमाद्रि इत्यादि सर्व निबंधग्रंथांत सांगितलें आहे . येणेंकरुन , एकादशीनिमित्तक श्राद्ध द्वादशीचे दिवशीं करावें , असें जे म्हणतात ते खंडित झाले . आणि असें कीं , जर एकादशीस श्राद्ध नाहीं तर महालयांत " षोडश श्राद्धाविषयीं तो सर्व पक्ष पूज्य होय " अशा वचनानें सांगितलेंली सोळा महालयश्राद्धें , पौषैकादशीचे ठायीं करावयाचें मन्वादि श्राद्ध , आणि क्षयाहाचें अज्ञान असतां त्या पक्षांतील एकादशीचे ठायीं विहित श्राद्ध हीं बाधितच होतील असें जाणावें . आतां जें स्मृतिचंद्रिकेंतील वचन सांगतात कीं , " पापें अन्नाश्रित आहेत तीं अन्नदाता व भोक्ता या उभयतांस प्राप्त होतात , आणि त्यांचे पितर नरकांत शाश्वत कालपर्यंत वास करितात " असें वचन तें इच्छाप्राप्तभोजनविषयक असतां विधिप्राप्त श्राद्धंभोजनविषयक मानितात , तस्मात् ‍ त्यांचें मोठें साहस होय . एथें इतका विचार पुरे आहे . आतां जो " एकादशीस श्राद्ध व प्रतिग्रह न करणारे व उदकदान , पिंडदानविरहित श्राद्ध करणारे ते उत्तम लोकास जातात " असा लघुनारदीयांत एकादशीचे दिवशीं श्राद्धादिकांचा निषेध आहे , तो मातापितृव्यतिरिक्तविषयक होय ; कारण , पूर्ववांक्यांत मातापितरांचें श्राद्ध करण्याविषयीं उक्त आहे .

अव्रतघ्नान्याह मदनरत्नेदेवलः सर्वभूतभयंव्याधिः प्रमादोगुरुशासनं अव्रतघ्नानिपठ्यंतेसकृदेतानिशास्त्रतः स्कांदेपि अष्टौतान्यव्रतघ्नानिआपोमूलंफलंपयः हविर्ब्राह्मणकाम्याचगुरोर्वचनमौषधं इदंचातिसंकटविषयम् ‍ नारदीये अनुकल्पोनृणांप्रोक्तः क्षीणानांवरवर्णिनि मूलंफलंपयस्तोयमुपभोग्यंभवेच्छुभे नत्वेवभोजनंकैश्चिदेकादश्यांबुधैः स्मृतमिति अस्यापवादः शयनेचमदुत्थानेमत्पार्श्वपरिवर्तने नरोमूलफलाहारीह्रदिशल्यंममार्पयेत् ‍ एतेचाविरोधिनोनिर्णयाः सर्वव्रतेषुज्ञेयाः ।

अव्रतघ्नें सांगतो - मदनरत्नांत देवल - " सर्व भूतांपासून भय , व्याधि , प्रमाद , गुरुची आज्ञा यांतून व्रतनाशक एकादी गोष्ट एकवार झाली असतां व्रत नष्ट होत नाहीं . " स्कंदपुराणांतही - " उदक , मुळें , फळें , दूध , हवि , ब्राह्मणकामना , गुरुवचन , औषध , हीं आठ व्रतघ्न होत नाहींत . " हें वचन अतिसंकटविषयक जाणावें . नारदीयांत - " शक्तिहीन मनुष्यांना गौणपक्ष उक्त आहे तो असा - मूल , फल , दूध , उदक , हीं शक्तिहीनास उपभोग्य होत ; परंतु एकादशीस भोजन करण्याविषयीं कोणत्याही विद्वानांनीं सांगितलें नाहीं . " वरील वचनाचा अपवाद - " शयनी , बोधिनी आणि परिवर्तिनी ह्या एकादशींचे ठायीं मूलफलाहारी जो मनुष्य तो माझ्या ह्रदयांत शल्य करणारा होतो . अर्थात् ‍ ह्या एकादशींस मूलफलाहारही करुं नये . " हे पूर्वोक्त निर्णय अविरुद्ध असल्यामुळें सर्व व्रतांविषयीं जाणावे .

तत्रैकादश्यांसंकल्पः गृहीत्वौदुंबरंपात्रंवारिपूर्णमुदड्मुखः उपवासंतुगृह्णीयाद्यद्वावार्येवधारयेदिति माधवीये वाराहोक्तेः मंत्रस्तुविष्णूक्तः एकादश्यांनिराहारः स्थित्वाहमपरेहनि भोक्ष्यामिपुंडरीकाक्षशरणंमेभवाच्युतेति शैवादीनांतु हेमाद्रौसौरपुराणे सावित्र्याप्यथवानाम्नासंकल्पंतुसमाचरेत् ‍ शिवादि गायत्र्योयजुर्वेदेप्रसिद्धाः वाराहे इत्युच्चार्यततोविद्वान् ‍ पुष्पांजलिमथार्पयेत् ‍ ततस्तज्जलंपिबेत् ‍ अष्टाक्षरेणमंत्रेणत्रिर्जप्तेनाभिमंत्रितं उपवासफलंप्रेप्सुः पिबेत्पात्रगतंजलमितिकात्यायनोक्तेः मध्यरात्रेउदयेवादशमीवेधेरात्रौसंकल्प इतिमाधवः दशम्याःसंगदोषेण अर्धरात्रात्परेणतु वर्जयेच्चतुरोयामान् ‍ संकल्पार्चनयोस्तदा विद्धोपवासेनश्नंस्तुदिनंत्यक्त्वासमाहितः रात्रौसंपूजयेद्विष्णुंसंकल्पंचतदाचरेदितिनारदीयोक्तेः तत्रैवपूजामभिधाय देवस्यपुरतः कुर्याज्जागरंनियतोव्रती ।

" एकादशीव्रताचा संकल्प उदकपूर्व ताम्रपात्र हातांत घेऊन उत्तराभिमुख होत्साता उपवासाचा संकल्प करुन उपवास ग्रहण करावा , अथवा हातांत उदक धारण करावें . " असें माधवीयांत वराहपुराण वचन आहे . संकल्पाचा मंत्र - विष्णु सांगतो - " एकादश्यां निराहारः स्थित्वाहमपरेऽहनि । भोक्ष्यामि पुंडरीकाक्ष शरणं मे भवाच्युत . " शैव , सूर्योपासक इत्यादिकांविषयीं सांगतो -

हेमाद्रींत - सौरपुराणांत - " शिवादि गायत्रीमंत्रानें अथवा नाममंत्रानें संकल्प करावा . " शिवादि गायत्रीमंत्र यजुर्वेदांत प्रसिद्ध आहेत .

वराहपुराणांत " याप्रमाणें संकल्पमंत्र म्हणून विष्णूला पुष्पांजलि समर्पण करावी " नंतर तें पात्रस्थ उदक प्राशन करावें . कारण , " उपवासफलेच्छूनें पात्रगत उदक अष्टाक्षर मंत्रानें तीन वेळ अभिमंत्रित करुन प्राशन करावें " असें कात्यायनवचन आहे . मध्यरात्रीं किंवा उदयकालीं दशमीचा वेध असेल तर व्रताचा संकल्प एकादशीचे रात्रीं करावा , असें माधव सांगतो . कारण , " मध्यरात्रीनंतर दशमीचा वेध असेल तर संकल्प , पूजा यांविषयीं चार प्रहर ( दिवसाचे चार प्रहर ) वर्ज्य करावे . विद्धैकादशीचें उपोषण करीत असेल तर त्यानें तो दिवस वर्ज्य करुन रात्रीं विष्णुपूजन व संकल्पही त्याच वेळीं करावा " असें नारदीयवचन आहे . त्याच ठिकाणीं पूजा सांगून " व्रती यानें नियमेंकरुन देवाच्या अग्रभागीं जागर करावा " असें सांगितलें आहे .

द्वादश्यांनिवेदनमंत्रउक्तः कात्यायनेन अज्ञानतिमिरांधस्यव्रतेनानेनकेशव प्रसीदसुमुखोनाथज्ञानदृष्टिप्रदोभवेति नारदीये ब्राह्मणान् ‍ भोजयेच्छक्त्यादद्याद्वैदक्षिणांततः स्कांदेपि कृत्वाचैवोपवासंतुयोश्नीयाद्द्वदशीदिने नैवेद्यंतुलसीमिश्रंहत्याकोटिविनाशनम् ‍ द्वादश्यांचवर्ज्यान्याह बृहस्पतिः दिवानिद्रापरान्नं चपुनर्भोजनमैथुने क्षौद्रंकांस्यामिषंतैलंद्वादश्यामष्टवर्जयेत् ‍ हेमाद्रौ ब्रह्मांडपुराणे पुनर्भोजनमध्यायोभार आयासमैथुने उपवासफलंहन्युर्दिवानिद्राचपंचमी स्कांदे परान्नंकांस्यतांबूलेलोभंवितथभाषणम् ‍ वर्जयेदितिशेषः विष्णुधर्मे असंभाष्यान् ‍ हिसंभाष्यतुलस्यतसिकादलम् ‍ आमलक्याः फलंवापिपारणेप्राश्यशुद्ध्यति बृहन्नारदीये रजस्वलांचचांडालंमहापातकिनंतथा सूतिकांपतितंचैव उच्छिष्टंरजकादिकं व्रतादिमध्येश्रृणुयाद्यद्येषांध्वनिमुत्तमः अष्टोत्तरसहस्त्रंतुजपेद्वैवेदमातरम् ‍ ।

द्वादशीचे दिवशीं प्रातःकालीं भगवंताला व्रत समर्पण करण्याचा मंत्र कात्यायन सांगतो . तो असा " अज्ञानतिमिरांधस्व व्रतेनानेन केशव । प्रसीद सुमुखो नाथ ज्ञानदृष्टिप्रदो भव . " नारदीयांत - " यथाशक्ति ब्राह्मणांस भोजन घालून नंतर दक्षिणा द्यावी . "

स्कंदपुराणांतही - " एकादशीचे दिवशीं उपवास करुन द्वादशीचे दिवशीं जो मनुष्य विष्णुनैवेद्य तुलसीमिश्रित भक्षण करील त्याच्या कोटिहत्यांचा नाश होईल . " द्वादशीचे दिवशीं वर्ज्य सांगतो - बृहस्पति - " दिवा निद्रा , परान्नभोजन , पुनर्भोजन , मैथुन , मध , कांस्यपात्रभोजन , आमिष , तैल हे आठ प्रकार द्वादशीचे दिवशीं वर्ज्य करावे . " हेमाद्रींत ब्रह्मांडपुराणांत - " पुनर्भोजन , स्वाध्याय , भार वाहणें , आयास , मैथुन , व पांचवी दिवानिद्रा हीं उपवासफलाचा नाश करितात . " स्कंदपुराणांत - " परान्न , कांस्यपात्रांत भोजन , तांबूल , लोभ , व्यर्थ भाषण , हीं वर्ज्य करावीं . " विष्णुधर्मांत - " असंभाष्य ( चांडालादिक ) यांच्याशीं संभाषण केलें असतां तुलसीपत्र किंवा आंवळा पारणाभोजनांत भक्षण . केल्यानें शुद्ध होतो . " बृहन्नारदीयांत - " रजस्वला स्त्री , चांडाल , महापातकी , सूतिका , पतित , उच्छिष्ट , रजक इत्यादिकांचा शब्द व्रतादिकांमध्यें श्रुत होईल तर एक हजार आठ ( १००८ ) गायत्रीजप करावा . "

एतद्व्रतंसूतकेपिकार्यं सूतकेमृतकेचैवनत्याज्यंद्वादशीव्रतमितिविष्णूक्तेः तत्रत्यक्तंदानादिसूतकांतेकार्य सूतकांतेनरः स्नात्वापूजयित्वाजनार्दनं दानंदत्वाविधानेनव्रतस्यफलमश्नुत इतिमात्स्योक्तेः रजोदर्शनेपिकार्यम् ‍ एकादश्यांनभुंजीतनारीदुष्टरजस्यपीति पुलस्त्योक्तेः यदा द्वादश्यांश्रवणर्क्षंतदाशुद्धामप्येकादशींत्यक्त्वातत्रैवोपवासः कार्यः शुक्लावायदिवाकृष्णाद्वादशीश्रवणान्विता तयोरेवोपवासश्चत्रयोदश्यांचपारणमिति नारदीयोक्तेः एतेचनियमाः काम्यव्रतेनियताः नित्यव्रतेसतिसंभवेकार्याः शक्तिमांस्तुपुमान्कुर्यान्नियमंस विशेषणमितिकात्यायनोक्तेः अशक्तौतुमाधवीयेब्रह्मवैवर्ते इतिविज्ञायकुर्वीतावश्यमेकादशीव्रतम् ‍ विशेषनियमाशक्तोऽहोरात्रंभुजिवर्जित इति ।

हें व्रत सूतकांतहीं करावें ; कारण , " जननाशौच व मृताशौच यांमध्येंही द्वादशीव्रत ( एकादशीव्रत ) टाकूं नये " असें विष्णुवचन आहे . त्या आशौचांत वर्ज्य केलेलें दानादिक सूतकांतीं करावें ; कारण , " सूतकांतीं मनुष्यानें स्नान करुन जनार्दनाची पूजा करुन यथाविधि दान करावें , म्हणजे व्रताचें फल मिळतें " असें मत्स्यपुराणवचन आहे . रजस्वलावस्थेमध्येंही हें एकादशीव्रत करावें ; कारणं , " स्त्री रजस्वला असतांही तिनें एकादशीचे दिवशीं भोजन करुं नये " असें पुलस्त्यवचन आहे . ज्या कालीं द्वादशीचे ठायीं श्रवणनक्षत्राचा योग असेल त्या कालीं शुद्धा जरी एकादशी असेल , तरी ती टाकून द्वादशीसच उपोषण करावें ; कारण , " शुक्लपक्षांतील किंवा कृष्णपक्षांतील द्वादशी श्रवणयुक्त असेल तर त्या दोघांचा ( श्रवण व द्वादशी यांचा ) च उपवास करुन त्रयोदशीस पारणा करावी " असें नारदीयवचन आहे . हे सर्व नियम काम्यव्रताचे ठायीं अवश्य पाळावे . नित्यव्रताचे ठायीं संभव असतां पाळावे ; कारण , शक्तिमान् ‍ पुरुषानें तर विशेषेंकरुन नियम पाळावे " असें कात्यायनवचन आहे . अशक्त असेल तर त्याविषयीं माधवीयांत ब्रह्मवैवर्तांत - " असें जाणून अवश्य एकादशीव्रत करावें . विशेष नियम पाळण्याविषयीं जर अशक्त असेल तर त्यानें अहोरात्र भोजन वर्ज्य करावें . "

N/A

References : N/A
Last Updated : May 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP