TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
विष्णुपदादिकांचें स्वरुप

प्रथम परिच्छेद - विष्णुपदादिकांचें स्वरुप

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


विष्णुपदादिकांचें स्वरुप

विष्णुपदादिस्वरुपंचदीपिकायामुक्तम् ‍ हर्यंघ्रिर्वृषसिंहवृश्चिकघटेष्वर्कस्ययः संक्रमः कन्यामीनधनुर्नृयुक्षुषडशीत्याख्यंतुलामेषयोः प्रोक्तंतद्विषुवंझषेयनमुदक्कर्काटकेदक्षिणमिति हर्यंघ्रिर्विष्णुपदम् ‍ नृयुकमिथुनं अत्रचपिंडरहितंश्राद्धंकुर्यात् ‍ तथाचापरार्केमात्स्ये अयनद्वितयेश्राद्धंविषुवद्वितयेतथा संक्रांतिषुचसर्वासु पिंडनिर्वपनादृत इति श्राद्धशूलपाणिस्त्वस्यनिर्मूलत्वात् ‍ समूलत्वेपि ततःप्रभृतिसंक्रांतावुपरागादिपर्वसु त्रिपिंडमाचरेच्छ्राद्धमेकोद्दिष्टंमृताहनीतिमात्स्योक्तेर्ग्रहणाग्रहणवद्विकल्पएवेत्याह तन्न अस्यपार्वणानुवादकत्वेनपिंडाविधायकत्वात् ‍ पिंडोव्यक्तिः अन्यथैकपदेपिंडानुवादेत्रित्वविधौवषटर्तुः प्रथमभक्षवद्वैरुप्यापत्तेः तथाचोभयसमूलत्वेपिंडरहितंपार्वणंकर्तव्यमित्युभयवचनयोरर्थः त्रिपिंडशब्देनैकोद्दिष्टव्यावर्तनमात्रम् ‍ ।

विष्णुपदादिकांचें स्वरुप सांगतो - दीपिका - वृषभ , सिंह , वृश्चिक , कुंभ , ह्या संक्रांतींला विष्णुपदसंज्ञा . मिथुन , कन्या , धनु , मीन ह्या संक्रांतींला षडशीतिसंज्ञा . मेष , तुला ह्यांना विषुवसंज्ञा . मकरसंक्रांतील उदगयन , आणि कर्कसंक्रांतीला दक्षिणायन अशा संज्ञा आहेत . श्लोकांत ‘ नृयुक् ‍ ’ पदाचा मिथुन हा अर्थ समजावा . ह्या संक्रांतीचे ठायीं पिंडरहित श्राद्ध करावें तेंच अपरार्कात - मात्स्यांत सांगतो - " दोन अयनें , दोन विषुवें , आणि सर्व संक्रांती यांचे ठायीं पिंडरहित श्राद्ध करावे . " श्राद्धशूलपाणि तर असें म्हणतो कीं , हें वचन निर्मूळ आहे म्हणून पिंडनिषेध नाहीं . कदाचित् ‍ तें वचन समूल जरी असेल तथापि " सपिंडीच्या पुढें संक्रांति , ग्रहण इत्यादि पर्वणीचे ठायीं त्रिपिंडश्राद्ध करावें , आणि मृतदिवशीं एकोद्दिष्ट करावें " असें मात्स्यवचन असल्यामुळें षोडशीपात्राच्या ग्रहणाचा जसा विकल्प आहे तसा पिंडनिर्वपणाचाही विकल्पच होतो , असें सांगतो ; तें बरोबर नाहीं ; कारण , " ततःप्रभृति " हें वचन पार्वणाचें अनुवादक आहे , म्हणजे इतर वचनानें जें पार्वण प्राप्त झालें , त्याचाच या वाक्यानें ‘ त्रिपिंड ’ या पदानें अनुवाद केला , त्रिपिंड म्हणजे तीन व्यक्ति ( तीन पितर ) यांचें करावें , अशा रीतीनें पार्वणाचा अनुवाद करणारें असल्यामुळें तें वचन पिंडविधायक होत नाहीं . असें न मानितां जर पिंडविधायक आहे असें मानिलें तर , श्राद्धशब्दाचा अर्थच पिंडदान व ब्राह्मणभोजन हा असल्यामुळें पिंड सिद्धच आहे म्हणून त्याचें विधान होत नाहीं . आतां पिंडाचा अनुवाद न करुन त्रित्वाचें विधान केलें तर जसा - ‘ वषट् ‍ कर्तुः प्रथमभक्षः ’ असें वाक्य आहे , त्या वाक्यानें वषट् ‍ कर्ता म्हणजे होता त्याला हविःशेषाचें प्रथम भक्षण सांगितलें आहे , त्या ठिकाणीं इतर ऋत्विजांबरोबर होत्यालाही प्राप्त झालें जें भक्षण त्या भक्षणाला प्राथम्याचें विधान करावें , असें पूर्वपक्षी म्हणतो , परंतु तसें करणें म्हणजे ‘ प्रथमभक्ष ’ ह्या समास केलेल्या पदाचा ‘ जो प्राप्त झालेला भक्ष तो प्रथम ’ असा विच्छेद करुन संबंध केला पाहिजे , तो केला तर , प्रथमभक्ष या पदाला विरुपता म्हणजे विच्छिन्नरुपता प्राप्त होईल , हें दूषण दिलें आहे , त्याचप्रमाणें एथें ‘ जे पिंड ते तीन ’ असा ‘ त्रिपिंड ’ याचा विच्छेद करुन अन्वय केला असतां वैरुप्यता म्हणजे विच्छिन्नरुपतारुप दोष प्राप्त होईल हें तात्पर्य . ( " अयनद्वितये श्राद्धं० ; " " ततःप्रभृति संक्रांतौ " ० ) हीं दोनही वचनें समूल होत असें मानून पिंडरहित व पार्वणरुप असें श्राद्ध करावें , याप्रमाणें दोन वचनांचा व्यवस्थित अर्थ समजावा . आतां वरील ‘ त्रिपिंड ’ शब्दानें पार्वणाचा जो अनुवाद केला आहे तेणेंकरुन एकोद्दिष्ट करुं नये इतकेंच सूचित होतें .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-05-09T23:20:09.5000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शामत

  • स्त्री. हिंमत ; धैर्य . शहामत पहा . 
  • ना. ताकद , धाडस , पराक्रम , साहस , हिंमत ; 
  • ना. करामत , चातुर्य . 
RANDOM WORD

Did you know?

pl. kartiksnanache ani kakadariche mahatva sangave ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.