मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद| हरिनक्त प्रथम परिच्छेद मंगलारंभ काळाचे भेद ऋतु मास संक्रांतिनिर्णय मेषादिसंक्रांतींची दानें विष्णुपदादिकांचें स्वरुप मंगलकार्यांचेठायीं विशेष चांद्रमास मलमासनिर्णय मलमासांतील कर्में मलमासांत वर्ज्य कर्मै श्राद्धाचा निर्णय बाल्यादि लक्षण मलमाससंबंधी विशेषव्रत तिथिनिर्णय एकभक्तव्रताचा निर्णय नक्तव्रताचा निर्णय हरिनक्त व्रतपरिभाषा व्रताचे आरंभ स्त्रीव्रताविषयीं निर्णय सूतकादिक उपोषणें असतां निर्णय प्रतिपदादिक तिथींचा निर्णय वेधाचा निर्णय एकादशीव्रत काम्यव्रत आठ महाद्वादशी पौर्णिमा व अमावास्या इष्टिकालाचा निर्णय पौर्णमासीविषयीं विशेष इष्टिविषयीं विकृतीष्टींच्या कालाचा निर्णय सोमाविषयीं श्राद्धाविषयीं अमावास्येचा निर्णय ग्रहणाचा निर्णय ग्रहणांत भोजन ग्रहणांत भोजन ग्रहणस्नानाविषयीं तीर्थैं जन्मराशीस ग्रहण समुद्रस्नानाविषयीं निर्णय प्रथम परिच्छेद - हरिनक्त निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे. Tags : nirnay sindhupustakग्रंथनिर्णयसिंधु हरिनक्त Translation - भाषांतर हरिनक्तेविशेषः कलादर्शेस्कांदे उदयस्थासदापूज्याहरिनक्तव्रतेतिथिरिति अन्यनक्तंतुसंक्रांत्यादावपिरात्रावेव निषेधस्यरागप्राप्तभोजनगोचरत्वेनवैधाबाधकत्वात् दिनद्वयव्याप्तौपरा उभयोर्यदिवातिथ्योःप्रदोषव्यापिनीतिथिः तत्रोत्तरत्रनक्तंस्यादुभयत्रापिसायत इतिकालादर्शेजाबालिवचनात् अन्यपक्षेषुएकभक्तवन्निर्णयः ।हरिनक्ताविषयीं विशेष सांगतो.कालादर्शांत स्कंदपुराणांत - " हरिनक्तव्रताविषयीं उदयकालव्यापिनी तिथि ग्रहण करावी. " इतर नक्तव्रत तर, संक्रांति वगैरे असली तरी रात्रींच करावें. संक्रांति, रविवार इत्यादि दिवशीं रात्रिभोजनाचा जो निषेध, तो इच्छाप्राप्त भोजनविषयक असल्यामुळें त्यानें विधिप्राप्त भोजनाचा बाध होत नाहीं. दोन दिवशीं प्रदोषव्यापिनी असेल तर दुसर्या दिवसाची घ्यावी. कारण, " दोनदिवशीं प्रदोषव्यापिनी तिथि असेल तर उत्तरदिवशीं नक्त करावें. कारण, परदिवशीं सूर्यास्तापूर्वी व प्रदोषकालीं ती तिथि आहे " असें कालादर्शात जाबालिवचन आहे. इतर पांच पक्षांविषयीं ( पूर्वदिवशींच व्याप्ति, परदिवशीं व्याप्ति, दोनीं दिवशीं व्याप्ति नसणें, अंशानें एकदेशव्याप्ति, सारखी एकदेशव्याप्ति, यांविषयीं ) एकभक्ताप्रमाणें निर्णय जाणावा. अत्रविशेषोमदनरत्नेगारुडे हविष्यभोजनंस्नानंसत्यमाहारलाघवं अग्निकार्यमधःशय्यांनक्तभोजीषडाचरेत् अग्निकार्यव्याह्रतिहोमः इतिनक्तं अयाचितेतुविशेषवचनाभावात्पक्षेउपवासेप्राप्तेउपवासवन्निर्णयः ।ह्या नक्तव्रताविषयीं विशेष सांगतो.मदनरत्नांत गरुडपुराणांत - " हविष्यभोजन, स्नान, सत्यभाषण, अल्पाहार, अग्निकार्य ( व्याह्रत्तिहोम ), भूमिशय्या, हे सहा नियम नक्तव्रती यानें पाळावे. " याप्रमाणें नक्तव्रताचा निर्णय समाप्त झाला. अयाचितव्रताविषयीं विशेषवचन नसल्यामुळें व अयाचित अन्न न मिळेल त्या दिवशीं उपवास प्राप्त असल्यामुळें त्याचा निर्णय उपवासाप्रमाणें समजावा.अथनक्षत्रव्रतकालनिर्णयः विष्णुधर्मे उपोषितव्यंनक्षत्रंयस्मिन्नस्तमियाद्रविः युज्यतेयत्रवातारानिशीथेशनिनासहेति माधवीयेस्कांदे तत्रैवोपवसेदृक्षेयन्निशीथादधोभवेत् उपवासेयदृक्षंस्यात्तद्धिनक्तैकभक्तयोः ।आतां नक्षत्रव्रताच्या कालाचा निर्णय सांगतो.विष्णुधर्मांत - " ज्या नक्षत्रीं सूर्याचें अस्त होतें तें नक्षत्र उपोषणास घ्यावें, अथवा अर्धरात्रीं चंद्राचा ज्या नक्षत्रास योग होतो तें नक्षत्र उपोषणास घ्यावें " माधवीयांत - स्कंदपुराणांत " जें नक्षत्र अर्धरात्रीच्यापूर्वी असेल त्याच नक्षत्रीं उपवास करावा. उपवासाविषयीं जें नक्षत्र तेंच नक्तव्रत व एकभक्तव्रत यांविषयीं ग्रहण करावें. N/A References : N/A Last Updated : May 11, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP