मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद| मास प्रथम परिच्छेद मंगलारंभ काळाचे भेद ऋतु मास संक्रांतिनिर्णय मेषादिसंक्रांतींची दानें विष्णुपदादिकांचें स्वरुप मंगलकार्यांचेठायीं विशेष चांद्रमास मलमासनिर्णय मलमासांतील कर्में मलमासांत वर्ज्य कर्मै श्राद्धाचा निर्णय बाल्यादि लक्षण मलमाससंबंधी विशेषव्रत तिथिनिर्णय एकभक्तव्रताचा निर्णय नक्तव्रताचा निर्णय हरिनक्त व्रतपरिभाषा व्रताचे आरंभ स्त्रीव्रताविषयीं निर्णय सूतकादिक उपोषणें असतां निर्णय प्रतिपदादिक तिथींचा निर्णय वेधाचा निर्णय एकादशीव्रत काम्यव्रत आठ महाद्वादशी पौर्णिमा व अमावास्या इष्टिकालाचा निर्णय पौर्णमासीविषयीं विशेष इष्टिविषयीं विकृतीष्टींच्या कालाचा निर्णय सोमाविषयीं श्राद्धाविषयीं अमावास्येचा निर्णय ग्रहणाचा निर्णय ग्रहणांत भोजन ग्रहणांत भोजन ग्रहणस्नानाविषयीं तीर्थैं जन्मराशीस ग्रहण समुद्रस्नानाविषयीं निर्णय प्रथम परिच्छेद - मास निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे. Tags : nirnay sindhupustakग्रंथनिर्णयसिंधु मास Translation - भाषांतर मासश्चतुर्धा सावनःसौरश्चांद्रोनाक्षत्र इति त्रिंशद्दिनःसावनःअर्कसंक्रांतेःसंक्रांत्यवधिःसौरःयद्यपि हेमाद्रिमाधवकालादर्शा द्यालोचनेनमेषसंक्रांत्यांसमाप्तामावास्यकत्वंचैत्रत्वमितिलक्षणाच्चमेषसंक्रांतेश्चैत्रत्वंप्रतीयते तथापि मेषसंक्रमेदर्शद्वयेसतिवैशाखस्यैवाधिक्यात्तत्पूर्वभावित्वेनमीनस्यैवचैत्रत्वंयुक्तं एवंमेषादयो वै शाखाद्याः अतोमीनसंक्रांत्यामधिगतपौर्णमासिकत्वम् आद्यतिथिकत्वंवाचैत्रत्वमितिलक्षणात् मीनएवसौरश्चैत्रः एवंवैशाखादयोपिमेषाद्याज्ञेयाः ।आतां मास सांगतो-मास चार प्रकारचा- सावनमास, सौरमास, चांद्रमास आणि नाक्षत्रमास. तीस दिवसांचा तो सावनमास. सूर्यसंक्रांतीला आरंभ करुन पुढच्या सूर्यसंक्रांतीच्या आरंभापर्यंत जो मास तो सौरमास. जरी हेमाद्रि, माधव, कालादर्श इत्यादि ग्रंथांचें आलोचन ( विचार ) केल्यानें, आणि मेष संक्रांतींत समाप्त आहे अमावास्या ज्याची तो चैत्र, अशा लक्षणावरुनही मेष संक्रांतीला चैत्रत्व आहे, असें समजतें, तथापि मेषसंक्रांतींत दोन अमावास्या आल्या असतां, मेषसंक्रांतींत दुसरी अमावास्या आलेला जो मास तो अधिक वैशाखच आहे, म्हणून त्याच्या पूर्वींचा मीनसंक्रांति असलेला तो चैत्र आहे, म्हणून मीनाला चैत्र म्हणणें युक्त आहे. याचप्रमाणें मेषादिक ते वैशाखादि समजावे. आतां वरील लक्षणाला दोष येतो म्हणून, असें लक्षण करावें कीं, मीनसंक्रांतींत प्राप्त आह्हे पौर्णिमा ज्याची तो चैत्र -असें केलें तरी शुक्लपक्षांत मेषसंक्रांति झाली असतां, त्या ठिकाणीं हें लक्षण येणार नाहीं म्हणून निर्दोष लक्षण सांगतो-मीनसंक्रांतींत प्राप्त आहे आद्यतिथि ज्याची तो चैत्र, असें लक्षण केलें आहे म्हणून मीनच सौर चैत्र होतो, याप्रमाणें वैशाखादिकही मेषादिक जाणावे. N/A References : N/A Last Updated : May 09, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP