मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
भक्ती प्रेमें करुनी आरती ...

देवीची आरती - भक्ती प्रेमें करुनी आरती ...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.

भक्ती प्रेमें करुनी आरती ओंवाळी ।
शक्ती दासालागीं तारक सांभाळी ॥
करवीरीं वास तुझ देवी महाकाळी ।
दत्तात्रेयस्वामी असतो तुजजवळी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय जय महाशक्ती ।
आरती करितां अखिलहि पापें संहरती ॥ धृ. ॥
शक्ती तुझी आहे भक्ता आधार ।
यातुनि गोडी काढुनि देई हो सार ॥
धांवें धांवें पावें भक्तां सत्वर ।
देई स्वकीय भक्तांलागीं तूं वर ॥ जय. ॥ २ ॥
तारी तारी अंबे भवभय नीवारीं ।
शरणागत मी आहे तव चरणावरी ॥
सुकुमारी दास तुझा धरि मजला करिं ।
संकटी भक्तां तारी जैसा श्रीहरी ॥ जय. ॥ ३ ॥
शक्तीचा उत्साह भक्त जे करिती ।
धूप दिप नैवेद्य तुजला अर्पीति ॥
त्यांची विघ्ने पळती भवताप हरती ।
तव गुण गाया मोरेश्वर मागे सुमती ॥ जय. ॥ ४ ॥

N/A

Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP