TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
जगतारिणी दु : खहारिण...

देवीची आरती - जगतारिणी दु : खहारिण...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.

देवीची आरती
जगतारिणी दु:खहारिणीं कुळस्वामिणी माते ।
नाना विघ्ने वेष्ठुनी कष्टविती माते ॥
करुणा करिं शांकरि तूं अनाथ जगनाथे ।
भवभय सर्वहि हरिसी हें तों तव नाते ॥ १ ॥
जय अंबे जगदंबे जय जय महाकाली ।
आरती ओंवाळूं पंचारति ओंवाळूं वंदू पद भाळी ॥ धृ. ॥
बौद्धरूप दैवत या कलिमाजी आले ।
न मिळे फल मनवांच्छित शंकित मन झालें ॥
तूं एक जागृत ऎकुनि माझें धाले ।
जडले दृढ मम मानस निश्चळ नाहालें ॥ जय. ॥ २ ॥
तव गुणप्रताप अद्‌भुत ऎकुनिया कानी ।
ध्यानी मनि दिनरजनि स्तवितो निर्वाणी ॥
लज्जा राखीं माते हे शुभकल्याणी ।
कृपाकटाक्षें लक्षीं रक्षी तव चरणी ॥ जय. ॥ ३ ॥
निर्जर मुनिवर सर्वहि तुजलागी ध्याती ।
केली त्यां कैवारें दैत्यावर ख्याती ॥
मर्दुनि शुंभनिशुंभा महिषासुरजाती ।
सप्तशतीचा महिमा मृकडुसुत गाती ॥ जय. ॥ ४ ॥
जिवजंतुमनकिंतू जाणसि सर्वांचा ।
अंतरसाक्षी हेतू कां न कळे अमुचा ॥
संचितक्रियमाणा जरि मानूं मुळसंचा ।
तरि मग काय परक्रम वदला मुनि त्याचा ॥ जय. ॥ ५ ॥
विज्ञप्ती श्रुत व्हावी सादर सुख शाली ।
बद्धांजुळि विनवीतों विनतीच्या चाली ॥
सुंदरपदपंकजींरखमा मिठी भाली ।
षट्‌पदवत गुंजारव करितो भोंताली ॥ जय. ॥ ६ ॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अहाळणी

  • स्त्री. 
  • उष्ण वा‍र्‍यांनीं भाजणें , पोळणें . 
  • धाप ; दम ; उसासा . 
  • ( ल . ) उत्कंठा ; लालसा ; हांव ; वासना ( क्रि , देणें ). [ म . अहार ; का . होळकु - पु = तेज ] अहाळणी , अहाळण्या कहाळण्या टाकणें , देणें - द्वेष , राग इत्यादि मनोविकारांना वाव देणें . दु : खोदगार , शोकोद्गार काढणें . 
RANDOM WORD

Did you know?

अशुभ कार्य करून आल्यावर, घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय कां धुवावेत?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Total Pages: 46,537
  • Hindi Pages: 4,555
  • Dictionaries: 44
  • Words in Dictionary: 302,181
  • Marathi Pages: 27,517
  • Tags: 2,685
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,230
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.