TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
आनंदे उदो बोलणें भवानीचा ...

देवीची आरती - आनंदे उदो बोलणें भवानीचा ...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess.

देवीची आरती
आनंदे उदो बोलणें भवानीचा ॥ धृ. ॥
नवरात्री घट मांडू । दिवे ओवाळूनी सांहूं ॥
कळिकाळा संगे भांडूं । वर देई वंशाचा ॥ १ ॥
नाचूं अंबेचे अंगणी । गोंधळ घालूं वो साजणी ॥
शरण येऊ लोटांगणी । कायावाचामनेसाचा ॥ २ ॥
अंबा नांदे सर्वां ठायी । अशी सर्वत्राची घाई ॥
मध्वनाथ म्हणे आई । वर देई वंशाचा ॥ ३ ॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दाणा

  • पु. १ धान्य . २ धान्याच्या समुदायापैकी , कणांपैकी प्रत्येक कण , नग , व्यक्ति . ३ धान्यकणाप्रमाणे असणारे मोत्ये , मणि , बीज , डाळिंबाचे बी इ० . ४ बरफी इ० काच्या ठिकाणी साखर जमून जे कण होतात त्यापैकी प्रत्येक . ५ ( कागद , चामडे इ० काच्या गुळगुळीत पृष्ठभागावर येणारी बारीक कणासारखी फुगोटी , टेंगूळ , नक्षी . खरार्‍याच्या आकाराच्या एका हत्याराने कातडे उभे , आडवे , किंवा चोहोकडून घासतात ; म्हणजे त्याव्र दाणा उमटतो . - ज्ञाको क २६३ . ६ ( कापड इ० कांच्या गांठीतील ) प्रत्येक नग . ७ उत्कृष्ट व एकेक नगाने विकले जाणार्‍या आंब्यांपैकी प्रत्येक नग . आम्बे मुरण्यास दाणे शुमार पन्नास . - रा २२ . १०५ . ८ किरमिजी रंगाचा कण . ९ सीताफळाच्या सालीवरील डोळ्यांपैकी प्रत्येक . १० एक प्रकारची जाडी साखर . [ सं . धान्यक - दाणअ - दाणा . तुल० फा . दाना ] ( वाप्र . ) दाणे टाकून कोंबडे झुंजविणे - पदरचे खर्चून मुद्दाम भांडणे लावणे . म्ह ०उतरंडीला नसेना दाणा पण दादला असावा पाटील राणा . सामाशब्द - 
  • वि. १ धूर्त ; शहाणा ; चतुर ; दूरदर्शी ; चाणाक्ष . २ ( व्यापक . ) उत्कृष्ट ; गुणवान ; उत्तम ; फार चांगला ( मनुष्य , जनावर ). मुलगा दाणा आहे . पादशाहीस वर्तमान कळले तेव्हां बोलिले की दुस्मान दाणा गेला . - मराचिथोशा ८५ . [ फा . दाना ] दाणावणे - अक्रि . ( घोड्याने ) फार दाणा खाल्यामुळे ( तो ) कांही विकाराने , आजाराने युक्त होणे . [ दाणा ] 
  • प . ( ग्राम्य .) मदनछत्र . 
  • ०गल्ला पु. धान्य ; धान्याचा सांठा , कोठार . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

आत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.