TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
कपिकुळीं हनुमंत । तया माझ...

संत तुकाराम - कपिकुळीं हनुमंत । तया माझ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


अभंग २५१.

कपिकुळीं हनुमंत । तया माझें दंडवत ॥१॥

स्वामी माझा ब्रह्मचारी । मातेसमान अवघ्या नारी ॥२॥

उपजतां बाळपणीं । ग्रासूं पाहे वासरमणी ॥३॥

अंगीं सेंदुराची उटी । शोभे सुवर्ण कांसुटी ॥४॥

अखया पुत्र तो मारिला । जंबु माळी त्राहाटिला ॥५॥

काम धातला बांदोडी । काळ केला देशोधडी ॥६॥

बम्हगोळ पुच्छें कवळी । ऐसा महारुद्र बळी ॥७॥

जाउनी पाताळा । केली देवीची अवकळा ॥८॥

रामरायाच्या सेवका । शरण आलों म्हणे तुका ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-21T05:40:41.8170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वकाई

  • स्त्री. बातमी ; वृत्तांत . पासा वकायाच्या फर्दा रोजच्या पाठविल्या . - दिमरा १ . १२४ . [ अर . वकिआ - वकाइअ ] वकाई - नवीस - पु . बातमीदार . वकायनिगार , वकायेनिगार - पु . वृत्तांत लेखक ; वाकनीस ; अखबारनीस . सर्व वकायनिगार चहूंकडे खबरी लिहितात . - रा ६ . ४१९ ; गुलाम अहमद वकायेनिगार .... कर्जदारांनी अटकाऊन ठेविले होते . - दिमश २ . ८५ . [ फा . वकाइअ - निगार ] 
RANDOM WORD

Did you know?

What is the difference between Smarta & Bhagwata Ekadashi?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.