TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
मंडित चतुर्भुज दिव्य कर्ण...

संत तुकाराम - मंडित चतुर्भुज दिव्य कर्ण...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


अभंग २४७.

मंडित चतुर्भुज दिव्य कर्णीं कुंडलें । श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकलें ॥१॥

ओंवाळूं गे माय विठ्ठल सवाई साजिरा । राई रखुमाबाई सत्यभामेच्या वरा ॥ध्रु०॥

वैजयंती माळ गळां शोभे सीमंत । शंख चक्र गदा पद्म आयुधमंडित ॥२॥

सांवळा सकुमार जैसा कर्दळी गाभा । चरणींचीं नेपुरें वांकी गर्जती नभा ॥३॥

वोवाळितां मन उन्मन जाहलें ठायीं । समदृष्टी समाधि तुकया लागला पायीं ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-21T05:34:57.9930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चौधरी

  • m  A public officer of a village The headman of a trade or caste. 
  • पु. १ गांवचा एक सरकारी अधिकारी ; पाटलाचा मदतनीस ; कांहीं प्रांतांत यालाच सरदेशमुख आणि सर्वसामान्यपणें चौगुला म्हणतात . सेटया ना चौधरी । पांडेपण वाहे शिरीं । - तुगा ३० . ५९ . भक्ति नाहीं राजाप्रधानाचे घरीं । भक्ति नाहीं पारीं चौधरीच्या । - ब ३९५ २ श्रेष्ठ ; मुख्य मनुष्य ; पुढारी . अवघ्या शिंदळांचा चौधरी । नवाजी आणिल बायका । - अमृत १२९ . ३ एखाद्या समाजांतील , जातींतील , धंद्यांतील मुख्य मनुष्य ; वजनदार माणूस ; पुढारी . ४ बैलगाडी हांकणारा कामगार . चांदीची बंगलागाडी स्वारींत कोतल चालण्यास नेण्याकरितां ... एक बैलजोडी ... द्यावी आणि ... चौधर्‍याचीहि नेमणूक करावी . - ऐरापुप्र ९ . ५११ . [ हिं . चौधरी ] चौधरीण - स्त्री . चौधरीची पत्नी . 
RANDOM WORD

Did you know?

देव्हार्‍यात कोणत्या दिशेला दिव्याची वात असावी, त्याचे फायदे तोटे काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site