मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती|
श्रीगुरुचरित्र-वाचकांना प्रेमाच्या विशिष्ट सूचना

गुरूचरित्र - श्रीगुरुचरित्र-वाचकांना प्रेमाच्या विशिष्ट सूचना

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.


(१) श्रीगुरुचरित्र - सप्ताह करतांना शक्य तो आरंभ शनिवारी करून शुक्रवारी संपवावा. कारण शुक्रवार हा श्रीनरसिंहसरस्वतींचा निजानंदकालाचा दिवस आहे. हे सात दिवस तरी प्रातःकाळी काकड आरती, संध्याकाळीं प्रदोषारति व रात्रीं शेजारति करावी. दोनप्रहरच्या महापूजेत (म्हणजे वाचन संपल्यानंतर पोथीची पूजा करतांना) शक्य तर शमीपत्रें व महानैवेद्यांत शक्य तेव्हां घेवड्याची भाजी असावी. प्रभूस गानभजनाची फार आवड आहे हेंही विसरू नये.
(२) श्रीदत्तजयंती म्हणजे मूळ दत्तावताराचा जन्मोत्सव आहे. हें लक्षांत आणून त्यांच्या चरित्राचा सप्ताह करणें असेल तर श्रीमद्वासुदेवानंद-सरस्वतीकृत प्राकृत 'श्रीदत्तमाहात्म्य' ग्रंथाचा करावा किंवा अनंतसुत कृत 'श्रीदत्तप्रबोध' ग्रंथाचे पारायण (सवडीप्रमाणें सात किंवा पंधरा दिवसांचे) करावे. श्रीगुरुचरित्राशिवाय दत्तावतारकथांचा दुसरा ग्रंथ जवळ नसेलच तर गुरुचरित्र सप्ताहाची समाप्ति जयंतीच्या आधल्या दिवशीं करून जयंतीच्या दिवशीं केवळ चौथ्याचें अध्यायाचे पारायण करून पुष्पवृष्टिआनंद करावा. त्या आनंदाच्या दिवशीं गुरुचरित्रांतील श्रीनरसिंहसरस्वतींची निर्याणीची खेदकारक कथा वाचणे अयोग्य आहे.
(३) सप्ताहाच्या सात दिवसांचा व्रतस्थपणा पदरांत पडण्यासाठी समाराधना आठव्या दिवशीं करणें चांगलें. भागवत सप्ताहाची साङ्गता अशीच करतात.
(४) उपासना शास्त्रांतील अगदीं उच्च तत्त्व म्हणजे, एकनाथी भागवतांत सांगितल्याप्रमाणे
"जळीं जळाची जळगार। जळामाजीं भासली साकार तैसें मजमाजीं चराचर । अभिन्न साचार मद्रूपीं ॥
मीच एक सर्वांठायीं । हेंचि दृढ धरिल्या पाहीं । मग साधनाचें कार्य नाहीं । ठायींच पाहीं नित्ययुक्त ॥"
हें आहे. सर्व चराचरांत-शुद्धाशुद्ध, प्रियाप्रिय वस्तूंतही आपले उपास्यस्वरूप पाहाणें ही उच्चकोटीची भक्ति आहे, पण एवढी मनाची धारणा शक्य नसेल तर उपासनाकार्यात ज्या ज्या आपल्या ऋणानुबंधी विभूतीकडून मंत्रग्रहण, श्रवणमननादि लाभ झाला असेल, ती ती विभूति दत्तरूप वाटून घेण्याच्या अभ्यासाची आवड ठेवावी. दें महन्द्राग्य होय.
“न गुरोरधिकं न गुरोरधिकं, न गुरोरधिकं न गुरोरधिकम् । शिवशासनतः शिवशासनतः, शिवशासनतः शिवशासनतः  ॥" - (स्कंदपुराण)
हें गुरुभक्तीचे भाग्य व हरिभक्तीचें गोड रहस्यमुख घोटावयाची इच्छा असेल त्यानें श्रीदत्तगुरूंच्या आज्ञेमुळेंच तयार झालेला 'श्रीएकनाथी भागवत’ ग्रंथ नित्य व्यासंगांत ठेवून प्रतीति घ्यावी.

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP