मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती| अष्टकाचें समवृत्त भाषांतर विशेष माहिती समवृत्त भाषांतर अष्टकाचें समवृत्त भाषांतर चतुर्थावृत्तीची प्रस्तावना पुष्पांजलि (पुरस्कार) अपूर्व वैशिष्ट्य श्रीगुरुचरित्र ग्रंथप्रवेश सामग्री व इतिहास गुरूचरित्राचा महिमा व कारण सिद्धमंत्र संशोधन म्हणजे काय? नजरचुका व जावईशोध भयंकर चूक 'बहुमत' म्हणून प्रमाण धरतां येत नाही जांवईशोधाचा दाखला कोणाच्या घरचें अन्न घ्यावें ! एक मोठाच गमतीचा प्रसंग छत्तिसाव्या अध्यायांतील एक मोठें न्यून अध्याय ३७ मधील एक अत्यंत महत्त्वाचे गूढ तत्त्व अडतिसाव्या अध्यायांतील एक शंका संस्कृत श्लोकाष्टकें श्रीसरस्वती-गंगाधराच्या भाषेचे नमुने जुन्या लेखकांच्या हस्तप्रमादांचे चमत्कार सहाव्या अध्यायातील रावणाचे गायन कानडी पदांचे शुद्धीकरण व भाषांतर हस्तलिखितांची यादी सप्ताहाचा अध्यायानुक्रम शास्त्रोक्त 'संकल्प' नियम धर्मसिंधूंत सांगितलेले हविष्यान्नाचे पदार्थ अग्निपुराणांत सांगितलेले हविष्यान्नाचे जिन्नस छत्तिसाव्या अध्यायांतील गायत्रीच्या चोवीस मुद्रांची माहिती सप्ताह कसा करावा ? सरस्वती-गंगाधरकृत दोन पदें सभाग्य रसिक दत्तभक्तांसाठीं प्रेमाच्या दोन सूचना श्रीगुरुचरित्र-वाचकांना प्रेमाच्या विशिष्ट सूचना श्रीगुरुचरित्र ग्रंथांतील कांहीं अध्यायांचें विशेष माहात्म्य श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतीकृत तीन संस्कृत श्लोकात्मक मंत्र सोवळ्या-ओवळ्याचे निर्बंध कुठल्या देवाला लागतात ? श्रीटेंभेस्वामीमहाराजांचे मत श्रीनृसिंहसरस्वतींनी सांगितलेली प्रीतीची 'एक खूण' गायनी विद्या आभार व प्रार्थना गायत्रीमंत्राच्या न्यासादिकाचा तक्ता सप्तस्वरादिकांचा तक्ता सप्ताहाचा अध्यायानुक्रम व ओवीसंख्या गुरूचरित्र - अष्टकाचें समवृत्त भाषांतर श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi. Tags : gurucharitrapothipuranगुरूचरित्रपुराणपोथी गु. च. अ. ४१ मधील दत्तवंदनाष्टक अर्थात् ‘आदौब्रह्मा०’ अष्टकाचें समवृत्त भाषांतर Translation - भाषांतर (रचनाकार-पं. ज्योति:काव्यालंकारभूषण विष्णु बाळकृष्ण जोशी, कन्नडकर)ब्रह्मादप्रणवादिरूप-मय तूं वेदात्ममूर्ती, जनीं । घेसी सत्य दशावतार असुरां देवार्थ संहारुनी ॥धर्मग्लानि हरुनियां प्रगटसी, श्रीदत्त अत्र्यात्मज । वंदी मी, नरकेसरी-गुरुयति-गुरुयति-श्रीपादयुग्मांबुज ॥१॥धर्माचार-विचार जाउनि महा भूभागर माजे कलीं । शास्त्रें, वैदिक-कर्ममार्ग-पथही, आस्तिक्यता लोपली ॥लोकीं अज्ञ-तम-भ्रमापहरण-ज्ञान-प्रकाश-ध्वज ! । वंदीं मी नरकेसरी गुरुयती श्रीपादयुग्मांबुज ॥२॥संन्यासाश्रम-योग मार्ग सकल-त्यागार्थ नि:संशय । कल्याणप्रद लोकसंग्रह-कला संस्थापिसी अव्यय ॥ध्यातां जम अनेक जाउनि अजी हा जाहलोंसे द्विज । वंदीं मी नरकेसरी गुरुयति श्रीपादयुग्मांबुज ॥३॥दैवीचित्र-चरित्र-कीर्ति पसरे व्यापूनि भूमंडळीं । मूकां वाणि दिवांधकासि नयनां वंध्यांसि पुत्राऽवली ॥सौभाग्या विधवांसि, इच्छितफलां आर्तोसि कामार्थ-ज । वंदीं मी नरकेसरी गुरुयती श्रापदयुग्मांबुज ॥४॥पाप-त्रास-दरिद्र-दु:ख-तिमिर-भ्रांति-श्रमां हारक । पुण्य-श्री-सुख-कल्पवृक्ष भजकां औदार्य-धा-कारक ॥अंबा-माधव-पुत्र ! भक्त-करुणा ! आचार्य ! देवा ! अज ! । वंदीं मी नरकेसरी गुरुयति श्रीपादयुग्मांबुज ॥५॥दिव्य श्रीगुरुराजपादकमल-ध्यानें मनीं निर्मल । द्वीपाब्धी सरितादितीर्थ घडतें भागीरथीचें फल ॥ज्ञान-क्षेत्र-सहस्रयज्ञ मिळती सत्कर्म-दान-व्रज । वंदीं मी नरकेसरी गुरुयती श्रीपादयुग्मांबुज ॥६॥त्वन्नाम-स्तव मंगलाचरण हें वेदागमाऽगोचर । धन्य ग्राम ‘करंज’ शुक्लयजु ही पातालगंगा वर ॥वारंवार मना स्मरुनि गुरुला सद्भावरूपें भज । वंदीं मीं नरकेसरी गुरुयति श्रीपादयुग्मांबुज ॥७॥प्रेमें दावुनि भक्ति-मार्ग जनता राष्ट्रोदया तारिली । क्षेत्र श्रीसुरगाणगापुर-गुणें स्वातंत्र्यता बोधिली ॥देशोद्धारक आर्यधर्म कथिला चैतन्य-भा-कर्म-ज । वंदीं मीं नरकेसरी गुरुयति श्रीपादयुग्मांबुज ॥८॥ऐसें श्रीगुरुनाथ अष्टक सदा सद्भक्त जो गाइल । श्रद्ध-श्री-प्रतिभा-बलोन्नतियशें सानंद-धी होइल ॥ब्रह्माविष्णुशिव-त्रिमूर्ति चरणीं होऊनि आहे रज । वंदीं मीं नरकेसरी गुरुयति श्रीपादयुग्मांबुज ॥९॥ N/A References : N/A Last Updated : June 20, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP