मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती|
समवृत्त भाषांतर

गुरूचरित्र - समवृत्त भाषांतर

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.


चिंतामण आप्पाराव उर्फ राघवदास रामनामे, ह. मु. शहापूर ( जि. बेळगाव )

पद पहिले " कंडेनिंदु भक्त जन० " -- राग श्रीराग, पूर्वी किंवा जोगी

पाहिलें म्यां आजि भक्तभाग्यनिधीला । भू-भूमंडलामधिं नारसिंह-सरस्वतीला ॥धृ०॥
पाहिलें म्या भरूनि डोळां । वारिजदळ पादयुगुलां ॥
हृदयकमलामाजि धरिल्या । सौख्यदायक जगत्पतिला ॥ पाहिलें म्यां० ॥१॥
भोगिजनमन-कामना क्रम । पूर्ण करूनी पालनक्षम ॥
होऊनी भोगिने-करार्चित । दिव्य नरहरि-पादकमला ॥ पाहिलें म्यां० ॥२॥
'वाक्यकारण' होऊनि जनिं । धरूनि दंडकमंडलू मुनि- ॥
वेष सगुणस्वरूप सुजनी । सुप्रसन्न गुरूवराला ॥ पाहिलें म्यां आजि० ॥
गाणगाकैलासपुरि तीं । राहि जेथें गौप्यमूर्ती ॥
स्वामि हरिदासांसि सांप्रति । मोक्षपद चिंतामणीला ॥ पाहिलें म्यां० ॥
 
पद दुसरे -- " कंडेनम्मा । इंदु कंडेनम्मा ॥"-- राग श्रीराग, पूर्वी किंवा जोगी

पाहिलें ग बाई, पाहिलें गे । मंडलामधिं यतिवर मुखचंद्रिकेला ॥धृ०॥
तत्वबोधाचिया उपनिषत्तत्व-चरिताला । व्यक्त मूर्त परब्रह्म सगुणरूपाला ॥ पाहिलें ग बाई० ॥
शेषशायी असुनि वरयति-वेषधर गुरूला । कृपाकटाक्षनिमेषनामक-वाक्यपाळाला ॥ पाहिलें ग बाई० ॥
गंधपरिमळ शोभितांगानंद-सिंधूला । छंद निष्ठायुक्त गोपीवल्लभाख्याला ॥ पाहिलें ग बाई० ॥
मंत्रकूटामाजिं मिरवुनि स्वतंत्र बनल्याला । सकल निगमागम सुकांती तेजयुक्ताला ॥ पाहिलें ग बाई० ॥
गजेंद्रासि मोक्षदाता वरद गुरूराजा । ' नार-सिंहसरस्वति ' या नारिपुरूषनामकाला ॥ पाहिलें ग बाई, पाहिलें ग० ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 20, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP