मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती|
सरस्वती-गंगाधरकृत दोन पदें

गुरूचरित्र - सरस्वती-गंगाधरकृत दोन पदें

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.


श्रीगुरुचरित्रकार सरस्वती-गंगाधरकृत दोन पदें

श्रीगुरु औदुंबरीं । पाहिले, नरहरि औदुंबरीं ॥ध्रु०॥
दंड कमंडलु करीं विराजित । मुख इंदूचे१ परी ॥ पाहिले ॥१॥
धर्मरक्षणं करावयास्तव । मानवत्रषु आदरी ॥ पाहिले० ॥२॥
गंगाधरात्मज तव पदकमलीं। लागला भ्रमरापरी । पाहिले नरहरि औदुंबरीं ॥३॥
(पद दुसरें) देखियला हो, आम्ही पाहियला हो । पूर्णानंदकंद विबुधवंद्यं गुरु हो ॥ आम्हीं० ॥ध्रु०॥
सदय-हृदय अत्रितनय कलिकृत बहु पाहुनि अनय ॥ सुजन अवनिं अवनिं सदय । यतिरूपें प्रगटला हो ॥१॥
कोटिमदन-विहित वदन । मंदहसित कुंदरदनं ॥ अमल-कमलदल-सुनयन । लसिते९ सतत माळ गळां हो ॥२॥
भस्मभुषित सकळ अंग । दुकुल अरुणसम सुरंग ॥ पदनत-अघ करुनि मंग१३ अर्पि सुखद आत्मकला हो ॥३॥
श्रीनृसिंहसरस्वती- । स्तवनिं चकित वेदमति ॥ गंगाधरतनय प्रीतिं । हृत्कमलिं पूजियला हो ॥ आम्हीं० ॥४॥
---------------------------------------------
१ चंद्राप्रमाणे २ इंद्रादि देवांनाही बंध. ३ अन्याय, अनीति, ४ सज्जनरक्षणार्थ, ५ पृथ्वीवर. ६ रचित. ७ शुभ्र दंत. ८ निर्मल कमलपत्राप्रमाणें ज्याचे सुंदर नेत्र आहेत असा. ९ विलसते, शोभते. १० रेशमी वस्त्र (छोटी), ११ तांबूस रंगाचें. १२ पायीं नम्र झालेल्यांचे पातक. १३ नाश. (हें दुसरें पद श्री. नीळकंठ कृष्ण नाफडे, गगनबावडा यांनी मुद्दाम पाठविलें याबद्दल त्यांचे आभार आहेत.)

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP