मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि| वचन ६२१ ते ६४० महाभारतसुभाषितानि प्रस्तावना अठरा पर्वांची नांवें वचन १ ते २० वचन २१ ते ४० वचन ४१ ते ६० वचन ६१ ते ८० वचन ८१ ते १०० वचन १०१ ते १२० वचन १२१ ते १४० वचन १४१ ते १६० वचन १६१ ते १८० वचन १८१ ते २०० वचन २०१ ते २२० वचन २२१ ते २४० वचन २४१ ते २६० वचन २६१ ते २८० वचन २८१ ते ३०० वचन ३०१ ते ३२० वचन ३२१ ते ३४० वचन ३४१ ते ३६० वचन ३६१ ते ३८० वचन ३८१ ते ४०० वचन ४०१ ते ४२० वचन ४२१ ते ४४० वचन ४४१ ते ४६० वचन ४६१ ते ४८० वचन ४८१ ते ५०० वचन ५०१ ते ५२० वचन ५२१ ते ५४० वचन ५४१ ते ५६० वचन ५६१ ते ५८० वचन ५८१ ते ६०० वचन ६०१ ते ६२० वचन ६२१ ते ६४० वचन ६४१ ते ६६० वचन ६६१ ते ६८० वचन ६८१ ते ७०० वचन ७०१ ते ७२० वचन ७२१ ते ७४० वचन ७४१ ते ७६० वचन ७६१ ते ७८० वचन ७८१ ते ८०० वचन ८०१ ते ८२० वचन ८२१ ते ८४० वचन ८४१ ते ८६० वचन ८६१ ते ८८० वचन ८८१ ते ९०० वचन ९०१ ते ९२० वचन ९२१ ते ९४० वचन ९४१ ते ९६० वचन ९६१ ते ९८० वचन ९८१ ते १००८ सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ६२१ ते ६४० लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला. Tags : mahabharatमहाभारतसुभाषित वचन ६२१ ते ६४० Translation - भाषांतर ६२१बहव: पण्डिता मूर्खा लुब्धा मायोपजीविन: ।कुर्युर्दोषमदोषस्य बृहस्पतिमतेरपि ॥१२।१११।६३॥पुष्कळ पंडित, मूर्ख, लोभी, कपटानें उपजीविका चालविणारे लोक बुध्दीनें बृहस्पतीसारख्या असलेल्या निर्दोष मनुष्यालाही दोष लावितात. ६२२बालो युवा च वृध्दश्च यत्करोति शुभाशुभम् ।तस्यां तस्यामवस्थायां तत्फलं प्रतिपध्यते ॥१२।१८१।१५॥बाल, तरुण आणि वृध्द पुरुष जें जें कांहीं शुभ अथवा अशुभ कर्म करतो, त्याचें फळ त्या त्या अवस्थेंत त्याला अवश्य मिळतें. ६२३बुध्दिमान्वृध्दसेवया ॥३३१३।४८॥वृध्दांचा समागम केल्यानें चातुर्य येतें. ६२४बुध्दिश्च हीयते पुंसां नीचै: सह समागमात् ।मध्यमैर्मध्यतां याति श्रेष्ठतां याति चोत्तमै: ॥३।१।३०॥नीच लोकांच्या संगतीनें मनुष्यांची बुध्दि भ्रष्ट होते, मध्यम लोकांच्या संगतीनें ती मध्यम होते आणि उत्तम लोकांशीं सहवास ठेविल्यानें उत्तम होते. ६२५बुध्दौ कलुषभूतायां विनाशे प्रत्युपस्थिते ।अनयो नयसंकाशो हृदयान्नापसर्पति ॥५।३४।८२॥बुध्दि मलिन झाली व विनाशकाल जवळ येऊन ठेपला म्हणजे नीतीसारखी दिसणारी अनीति मनुष्याच्या हृदयांत ठाणें देऊन बसते. ६२६बुभुक्षां जयते यस्तु स स्वर्गं जयते ध्रुवम् ॥१४।९०।९१॥ज्यानें क्षुधा जिंकली त्यानें स्वर्ग खचित जिंकला. ६२७ब्रह्मक्षत्रं हि सर्वेषां वर्णानां मूलमुच्यते ॥१२।७३।५॥ब्राह्मण आणि क्षत्रिय हेंच सर्व वर्णांचें मूळ होय. ६२८ब्रह्म क्षत्र्त्रेण सहितं क्षत्र्त्रं च ब्रह्मणा सह ।संयुक्तौ दहत: शत्रून् वनानीवाग्निमारुतौ ॥३।१८५।२५॥ब्राह्मणानें क्षत्रियाशीं व क्षत्रियानें ब्राह्मणाशीं सहकार्य केलें म्हणजे ते दोघे मिळून वनेंच्या वनें जाळून फस्त करणार्या अग्निवायूंप्रमाणें, शत्रूंना जाळून टाकतील. ६३३ब्राह्मणस्य तु देहोऽयं न कामार्थाय जायते ।इह क्लेशाय तपसे प्रेत्य त्वनुपमं सुखम् ॥१२।३२१।२३॥ब्राह्मणाचा देह हा सुखोपभोगासाठीं निर्माण झालेला नाहीं, इहलोकीं क्लेश भोगून तपाचरण करण्यासाठीं ब्राह्मण जन्मला आहे. असें केलें तरच परलोकीं त्याला निरुपम सुख मिळेल. ६२४ब्राह्मण्यं बहुभिरवाप्यते तपोभिम् तल्लब्ध्वा न रतिपरेण हेलितव्यम् ।स्वाध्याये तपसि दमे च नित्ययुक्त: क्षेमार्थी कुशलपर: सदा यतस्व ॥१२।३२१।२४॥(व्यासमुनि शुकाला सांगतात) पुष्कळ प्रकारें तप करावें तेव्हांच ब्राह्मणत्व प्राप्त होत असतें. तें लाभल्यावर विषयांच्या नादीं लागून व्यर्थ दवडूं नये. आत्मकल्याण साधून घेण्याची इच्छा असेल तर वेदाभ्यास, तप व इंद्रियदमन ह्यांमध्ये नेहमीं दक्ष राहून सत्कर्म करुन झटून प्रयत्न कर. ६३५भक्ष्योत्तमप्रतिच्छन्नं मत्स्यो बडिशमायसम् ।लोभाभिपाती ग्रसते नानुबन्धमवेक्षते ॥५।३४।१३॥उत्तम प्रकारच्या खाद्य पदार्थानें आच्छादलेला लोखंडाचा गळ मासा लोभानेम झडप घालून गिळून टाकतो, (असें करितांना) पाठीमागून परिणाम काय होईल इकडे त्याचें लक्ष नसतें. ६३६भज्येतापि न संनमेत् ॥९।५।१४॥(भीमसेनाचें मत) तुटून जावें पण वाकूं नये. ६३७भयेन भेदयेभ्दीरुं शूरमञ्जलिकर्मणा ।लुब्धमर्थप्रदानेन समं न्यूनं तथौजसा ॥१।१४०।५०॥भित्रा असेल त्याला भीति दाखवून फितूर करावें, शूराला हात जोडून, लोभी असेल त्याला द्रव्य देऊन आणि बरोबरीचा किंवा दुर्बळ असेल त्याला पराक्रमानें वश करावें. ६३८भर्तव्या रक्षणीया च पत्नी हि पतिना सदा ॥३।६९।४१॥पतीनें पत्नीचें पोषण व रक्षण निरंतर केलें पाहिजे. ६३९भवितव्यं सदा राज्ञा गर्भिणीसहधर्मिणा ॥१२।५६।४४॥ज्याप्रमाणें गर्भिणी स्त्री गर्भाचें संगोपन करते, त्याप्रमाणें राजानें प्रजाननांचें निरंतर रक्षण करावें. ६४०भारं स वहते तस्य ग्रन्थस्यार्थं न वेत्ति य: ।यस्तु ग्रन्थार्थतत्त्वज्ञो नास्य ग्रन्थागमो वृथा ।१२।३०५।१४॥ज्याला ग्रंथाचा अर्थ कळत नाहीं (पण जो नुसती घोकंपट्टी करतो) तो त्या ग्रंथाचा केवळ भार वाहतो. परंतु ज्यानें ग्रंथाच्या अर्थाचें रहस्य जाणलें त्याचाच अभ्यास सार्थकीं लागला. N/A References : N/A Last Updated : April 01, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP