मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि| वचन ४२१ ते ४४० महाभारतसुभाषितानि प्रस्तावना अठरा पर्वांची नांवें वचन १ ते २० वचन २१ ते ४० वचन ४१ ते ६० वचन ६१ ते ८० वचन ८१ ते १०० वचन १०१ ते १२० वचन १२१ ते १४० वचन १४१ ते १६० वचन १६१ ते १८० वचन १८१ ते २०० वचन २०१ ते २२० वचन २२१ ते २४० वचन २४१ ते २६० वचन २६१ ते २८० वचन २८१ ते ३०० वचन ३०१ ते ३२० वचन ३२१ ते ३४० वचन ३४१ ते ३६० वचन ३६१ ते ३८० वचन ३८१ ते ४०० वचन ४०१ ते ४२० वचन ४२१ ते ४४० वचन ४४१ ते ४६० वचन ४६१ ते ४८० वचन ४८१ ते ५०० वचन ५०१ ते ५२० वचन ५२१ ते ५४० वचन ५४१ ते ५६० वचन ५६१ ते ५८० वचन ५८१ ते ६०० वचन ६०१ ते ६२० वचन ६२१ ते ६४० वचन ६४१ ते ६६० वचन ६६१ ते ६८० वचन ६८१ ते ७०० वचन ७०१ ते ७२० वचन ७२१ ते ७४० वचन ७४१ ते ७६० वचन ७६१ ते ७८० वचन ७८१ ते ८०० वचन ८०१ ते ८२० वचन ८२१ ते ८४० वचन ८४१ ते ८६० वचन ८६१ ते ८८० वचन ८८१ ते ९०० वचन ९०१ ते ९२० वचन ९२१ ते ९४० वचन ९४१ ते ९६० वचन ९६१ ते ९८० वचन ९८१ ते १००८ सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ४२१ ते ४४० लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला. Tags : mahabharatमहाभारतसुभाषित वचन ४२१ ते ४४० Translation - भाषांतर ४२१न गृहं गृहमित्याहुर् गृहिणी गृहमुच्यते ।गृहं तु गृहिणीहीनम् अरण्यसदृशं मतम् ॥१२।१४४।६॥नुसत्या घराला घर म्हणत नाहींत. गृहिणी हेंच घर. गृहिणी नसलेलें घर अरण्यासमान होय. ४२२न च कश्चित्कृते कार्ये कर्तारं समवेक्षते ॥१२।१३८।११२॥कार्य होऊन गेल्यावर कर्त्याकडे कोणाचें लक्ष जात नाहीं. ४२३न च शत्रुरवज्ञेयो दुर्बलोऽपि बलीयसा ।अल्पोऽपि हि दहत्यग्रिर् विषमल्यं हिनस्ति च ॥१२।५८।१७॥स्वत: बलाढय असलेल्यानेंसुध्दां दुर्बळ अशाही शत्रूला तुच्छ समजूं नये. कां कीं, अग्नि लहान असला तरी जाळल्यावांचून राहत नाहीं आणि विष थोडें असलें तरी प्राणनाश करतेंच. ४२४न च शुध्दानृशंसेन शक्यं राज्यमुपासितुम् ॥१२।७५।१८॥निर्भेळ दयाळूपणानें राज्य चालविणें शक्य नाहीं. ४२५न चैव पुरुषो द्रष्टा स्वर्गस्य नरकस्य च ।आगमस्तु सतां चक्षुर्नृपते तमिहाचर ॥१२।२८।५४॥(अश्म नामक ब्राह्मण जनक राजाला सांगतो) हे राजा, स्वर्ग आणि नरक मनुष्याला दिसत नाहींत. परंतु त्यांना अवलोकन करण्याचे सज्जनांचे नेत्र (दृष्टिकोन) म्हणजे शास्त्र होय. म्हणून तूं शास्त्राप्रमाणें वाग. ४२६न जातु काम: कामानाम् उपभोगेन शाम्यति ।हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते ॥१।७५।५०॥इच्छित वस्तूंच्या उपभोगानें भोगेच्छेची तृप्ति कधींच होत नसते. आहुतींच्या योगानें अधिक पेट घेणार्या अग्नीप्रमाणें ती उलट अधिकच वाढते. ४२७न जातु त्वमिति ब्रूयात् आपन्नोऽपि महत्तरम् ।त्वंकारो नये. विद्वानाला तूं असें म्हणणें आणि त्याचा वध करणें सारखेंच. ४२८न जातु विवृत: कार्य: शत्रु: सुनयमिच्छता ॥१२।१०५।१४॥उत्कृष्ट प्रकारच्या नीतीप्रमाणें वागूं इच्छिणार्या पुरुषानें केव्हांही आपला शत्रु उघड करुं नये. ४२९न जानपदिकं दु:खम् एक: शोचितुमर्हति ।अशोचन् प्रतिकुर्वीत यदि पश्येदुपक्रमम् ॥१२।३३०।१५॥सर्व देशाच्या दु:खाचा एकट्यानें शोक करणें युक्त नव्हे. शोक न करितां प्रतिकाराचा जर कांहीं उपाय सुचला तर तो मात्र अमलांत आणावा. ४३०न तत् तरेत् यस्य न पारमुत्तरेत् न तध्दरेत् यत् पुनराहरेत् पर: ।न तत् खनेत् यस्य न मूलमुध्दरेत् न तं हन्यात् यस्य शिरो न पातयेत् ॥१२।१४०।६९॥ज्याच्या पैलतीराला पोचतां येणार नाहीं तें तरुन जाण्याच्या भरीस पडूं नये. जें फिरुन कोणी आपल्यापासून हिरावून घेईल त्याचें हरण करुं नये. ज्याचें मूळ उपटून टाकतां येत नाहीं तें खणूं नये. ज्याचें शीर खालीं पाडतां येत नाहीं त्याच्यावर प्रहार करुं नये. ४३१न तत्परस्य संदध्यात् प्रतिकूलं यदात्मन: ।एष संक्षेपतो धर्म: कामादन्य: प्रवर्तते ॥१३।११३।६९॥ज्याच्या पैलतीराला पोचतां येणार नाहीं तें तरुन जाण्याच्या भरीस पडूं नये. जें फिरुन कोणी आपल्यापासून हिरावून घेईल त्याचें हरण करुं नये. ज्याचे मूळ उपटून टाकतां येत नाहीं तें खणूं नये. ज्याचें शीर खालीं पाडतां येत नाहीं त्याच्यावर प्रहार करुं नये. ४३१न तत्परस्य संदध्यात् प्रतिकूलं यदात्मन: ।एष संक्षेपतो धर्म: कामादन्य: प्रवर्तते ॥१३।११३।८॥आपल्याला अनिष्ट अशी जी गोष्ट ती दुसर्याच्या संबंधानें करुं नये. धर्माचें संक्षिप्त स्वरुप हें असें आहे. ह्याला सोडून असलेला तो निव्वळ स्वेच्छाचार होय. ४३२न तथा बाध्यते कृष्ण प्रकृत्या निर्धनो जन: ।यथा भद्रां श्रियं प्राप्य तया हीन: सुखैधित: ॥५।७२।२९॥(युधिष्ठिर श्रीकृष्णांना म्हणतो) उत्तम प्रकारचें वैभव प्राप्त होऊन सुखांत वाढलेल्या मनुष्याला तें वैभव नष्ट झालें असतां जेवढें दु:ख होतें, तेवढें मुळांतच दरिद्री असलेल्या मनुष्याला होत नाहीं. ४३३न तथेच्छन्ति कल्याणान् परेषां वेदितुं गुणान् ।यथैषां ज्ञातुमिच्छन्ति नैर्गुण्यं पापचेतस: ॥५।३७।४७॥दुष्ट मनुष्यांना दुसर्यांचे दोष जाणण्याची जशी इच्छा असते, तशी त्यांचे चांगले गुण समजून घेण्याची इच्छा नसते.४३४न तल्लोके द्रव्यमस्ति यल्लोकं प्रतिपूरयेत् ।समुद्रकल्प: पुरुषो न कदाचन पूर्यते ॥१३।९३।४६॥जगांत असें कोणतेंच द्रव्य नाहीं कीं, जे लोकांना पुरुन उरेल. मनुष्य हा समुद्रासारखा आहे. त्याला कधींच कांहीं पुरत नाहीं. ४३५न तृप्ति: प्रियलाभेऽस्ति तृष्णा नाभ्दि: प्रशाम्यति ।संप्रज्वलति सा भूय: समिभ्दिरिव पावक: ॥१२।१८०।२६॥प्रिय वस्तूचा लाभ झाल्यानें तृप्ति होते असें नाहीं. तृष्णा (हाव, लोभ) ही पाण्यानें शांत होत नाही. समिधांनीं जसा अग्नि, तशी ती (इष्टप्राप्तीनें) अधिकच प्रज्वलित होते.४३६न तेन स्थविरो भवति येनास्य पलितं शिर: ।बालोऽपि य: प्रजानाति तं देवा: स्थविरं विदु: ॥३।१३३।११॥एकाद्याचे डोक्यावरील केस पांढरे झाले म्हणजे तो वृध्द झाला असें नाहीं. वयानें लहान असला तरी, जो ज्ञानी आहे त्यालाच देव वृध्द समजतात. ४३७न त्वेवात्मावमन्तव्य: पुरुषेण कदाचन ।न ह्यात्मपरिभूतस्य भूतिर्भवति शोभना ॥३।३२।५८॥पुरुषानें स्वत:स केव्हांही हीन लेखूं नये. कारण स्वत:स हीन मानणार्याला उत्तम प्रकारचें ऐश्वर्य प्राप्त होत नाहीं. ४३८न दरिद्रो वसुमतो नाविद्वान् विदुष: सखा ।न शूरस्य सखा क्लीब: सखिपूर्वं किमिष्यते ॥१।१३१।९॥दरिद्री हा श्रीमंताचा अथवा मूर्ख हा विद्वानाचा मित्र नसतो. शूराची नामर्दाशीं मैत्री असणें शक्य नाहीं. तर पूर्वीची मैत्री आतां सांगून काय मागतोस ? (गुरुबंधु असलेल्या द्रुपदराजाशीं पूर्वीची मैत्री लक्षांत आणून द्रोणाचार्य त्याजकडे गाव मागण्यासाठीं गेलें असतां द्रुपदराजानें दिलेलें उत्तर)४३९न दृष्टपूर्व प्रत्यक्षं परलोकं विदुर्बुधा: ।आगमांस्त्वनतिक्रम्य श्रध्दातव्यं बुभूषता ॥१२।२८।४२॥परलोक हा पूर्वीं कोणीं प्रत्यक्ष पाहिला आहे असें शहाणे लोक समजत नाहींत. परंतु शास्त्रमार्गाचें उल्लंघन न करितां उत्कर्षेच्छु पुरुषानें त्याविषयीं श्रध्दा ठेवावी. ४४०न देवा दण्डमादाय रक्षन्ति पशुपालवत् ।यं तु रक्षितुमिच्छन्ति बुध्दया संविभजन्ति तम् ॥५।३५।४०॥देव कांही एकाद्या गुराख्याप्रमाणें हातांत दंड घेऊन कोणाचें रक्षण करीत नाहींत. तर ज्याचें रक्षण करण्याची ते इच्छा करितात, त्याला ते उत्तम प्रकारची बुध्दि देतात. N/A References : N/A Last Updated : March 27, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP