मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि| वचन १२१ ते १४० महाभारतसुभाषितानि प्रस्तावना अठरा पर्वांची नांवें वचन १ ते २० वचन २१ ते ४० वचन ४१ ते ६० वचन ६१ ते ८० वचन ८१ ते १०० वचन १०१ ते १२० वचन १२१ ते १४० वचन १४१ ते १६० वचन १६१ ते १८० वचन १८१ ते २०० वचन २०१ ते २२० वचन २२१ ते २४० वचन २४१ ते २६० वचन २६१ ते २८० वचन २८१ ते ३०० वचन ३०१ ते ३२० वचन ३२१ ते ३४० वचन ३४१ ते ३६० वचन ३६१ ते ३८० वचन ३८१ ते ४०० वचन ४०१ ते ४२० वचन ४२१ ते ४४० वचन ४४१ ते ४६० वचन ४६१ ते ४८० वचन ४८१ ते ५०० वचन ५०१ ते ५२० वचन ५२१ ते ५४० वचन ५४१ ते ५६० वचन ५६१ ते ५८० वचन ५८१ ते ६०० वचन ६०१ ते ६२० वचन ६२१ ते ६४० वचन ६४१ ते ६६० वचन ६६१ ते ६८० वचन ६८१ ते ७०० वचन ७०१ ते ७२० वचन ७२१ ते ७४० वचन ७४१ ते ७६० वचन ७६१ ते ७८० वचन ७८१ ते ८०० वचन ८०१ ते ८२० वचन ८२१ ते ८४० वचन ८४१ ते ८६० वचन ८६१ ते ८८० वचन ८८१ ते ९०० वचन ९०१ ते ९२० वचन ९२१ ते ९४० वचन ९४१ ते ९६० वचन ९६१ ते ९८० वचन ९८१ ते १००८ सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन १२१ ते १४० लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला. Tags : mahabharatमहाभारतसुभाषित सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन १२१ ते १४० Translation - भाषांतर १२१अहं वो रक्षितेत्युक्त्वा यो न रक्षति भूमिप: ।स संहत्य निहन्तव्य: श्वेव सोन्माद आतुर: ॥१३।६१।३३॥‘मी तुमचें रक्षण करीन’ असें म्हणून जो राजा त्याप्रमाणें प्रजेचें रक्षण करीत नाहीं त्याला, सर्वांनीं एक होऊन, सडक्या पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणें ठार करावें.१२२अहन्यहनि भूतानि गच्छन्तीह यमालयम् ।शेषा: स्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यमत:परम् ॥३।३१३।११६॥रोजच्यारोज मृत्युलोकांतील प्राणी यमसदनास जात असूनही बाकीचे लोक चिरंजीव आहों असें समजतात, ह्यापरतें आश्चर्य तें कोणतें ! १२३अहिंसो परमो धर्म: ॥३।२०७।७४॥अहिंसा हा परमश्रेष्ठ धर्म होय.१२४अहिंसायां तु निरता यतयो द्विजसत्तम ।कुर्वन्त्येव हि हिंसां ते यत्नादल्पतरा भवेत् ॥३।३०८।३४॥(धर्मव्याध ब्राह्मणाला म्हणला) हे द्विजश्रेष्ठा, अहिंसेकरितां झटणार्या यतींच्या हातून देखील हिंसा घडतेच; मात्र ती टाळण्याचा त्यांचा प्रयत्न असल्यामुळें फार थोडी घडते. १२५अहिंसार्थाय भूतानां धर्मप्रवचनं कृतम् ।य: स्यादहिंसासंयुक्त: स धर्म इति निश्चय: ॥१२।१०९।१२॥प्राण्यांना पीडा होऊं नये एवढयासाठींच धर्म सांगितला आहे. जो अहिंसेनें युक्त असेल तोच धर्म, हा सिध्दान्त आह. १२६अहिंसा सत्यवचनं सर्वभूतेषु चार्जवम् ।क्षमा चैवाप्रमादश्च यस्यैते स सुखी भवेत् ॥१२।२१५।६॥अहिंसा, सत्य भाषण, सर्वांशीं सरळपणाची वागणूक, क्षमा व सावधानता हे गुण ज्याच्यापाशीं असतील तो सुखी होईल. १२७अहो बत महत्कष्टं विपरीतमिदं जगत् ।येनापत्रते साधु: असाधुस्तेन तुष्यति ॥३।२।६४॥अरेरे ! मोठी दु:खाची गोष्ट कीं, ह्या जगाची रीत विपरीत आहे. ज्याच्या योगानें सज्जनाला खेद होतो त्यानेंच दुर्जनाला संतोष वाटतो. १२८अहो ह्यनित्यं मानुष्यं जलबुब्दुदचञ्चलम् ॥७।७८।१७॥पाण्यावरील बुडबुडयाप्रमाणें मनुष्याचें जीवित किती क्षणभंगुर आहें ! १२९आकिंचन्ये न मोक्षोऽस्ति किंचन्ये नास्ति बन्धनम् ।किंचन्ये चेतरे चैव जन्तुर्ज्ञानेन मुच्यते ॥१२।३२०।५०॥दारिद्र्यांत मोक्ष नाहीं किंवा श्रीमंतीत बंधन नाहीं. श्रीमंतीत काय आणि गरिबींत काय, मनुष्य ज्ञानानें मुक्त होत असतो. १३०आगमानां हि सर्वेषाम् आचार: श्रेष्ठ उच्यते ।आचारप्रभवो धर्मो धर्मादायुर्विवर्धते ॥१३।१०४।१५६॥सर्व शास्त्रांत आचार हाच श्रेष्ठ म्हटला आहे. आचारापासून धर्माची उत्पत्ति होते. धर्माचरणानें आयुष्य वाढतें. १३१आत्मदोपैर्नियच्छन्ति सर्वे दु:खसुखे जना: ॥१।७८।३०॥सर्व लोकांना स्वत:च्या कर्मामुळेंच सुख किंवा दु:ख प्राप्त होत असतें. १३२आत्मनो बलमज्ञाय धर्मार्थपरिवर्जितम् ।अलभ्यमिच्छन् नैष्कर्म्यात् मूढबुध्दिरिहोच्यते ॥५।३३।४३॥आपलें सामर्थ्य न जाणून धर्म व अर्थ ह्यांना सोडून असलेली न मिळण्याजोगी वस्तु उद्योग न करितां मिळविण्याची इच्छा करणारा मूर्ख होय. १३३आत्मा जेय: सदा राज्ञा ततो जेयाश्च शत्रव: ।अजितात्मा नरपतिर् विजयेत कथं रिपून् ॥१२।६९।४॥राजानें नेहमीं प्रथम आपलें मन जिंकावें म्हणजे मग त्याला शत्रूंवर जय मिळवितां येईल. ज्यानें स्वत:चें मन जिंकलें नाहीं तो राजा शत्रूंना कसा जिंकणार ?१३४आत्मानं क: समुब्दध्य कण्ठे बध्दा महाशिलम् ।समुद्रं तरते दोर्भ्यां तत्र किं नाम पौरुषम् ॥४।४९।१६॥स्वत:स जखडून घेऊन आणि गळ्यांत मोठी धोंड बांधून नुसत्या बाहूच्या जोरावर समुद्र तरुन जाण्याच्या भरीस कोण पडेल ! असलें साहस करण्यांत पुरुषार्थ कसला ?१३५आत्मानमसमाधाय समाधित्सति य: परान् ।विषयेष्विन्द्रियवशं मानवा: प्रहसन्ति तम् ॥१२।२६७।२७॥आपलें मन स्वाधीन न ठेवतां जो दुसर्यांना आपल्या ताब्यांत ठेवूं पाहतो, अशा विषयासक्त इंद्रियाधीन पुरुषाचा लोक उपहास करतात. १३६आत्मा पुत्र: सखा भार्या ।कृच्छ्रं तु दुहिता किल ॥१।१५९।११॥(बकासुराकडे मी जातें असें म्हणणार्या मुलीचे उद्गार) पुत्र म्हणजे आपला आत्माच होय. भार्या हा मित्र होय. परंतु मुलगी म्हणजे मात्र खरोखर संकट होय !१३७आत्मार्थे संततिस्ताज्या ।राज्यं रत्नं धनानि च ॥१२।१३८।१७९॥स्वत:करितां संततीचा, राज्याचा, रत्नांचा व सर्व प्रकारच्या द्रव्याचा त्याग करावा. १३८आत्मा सर्वस्य भाजनम् ॥९।४।४२॥जीव हाच सर्व गोष्टींचा आधार आहे. (आधीं जीव जगेल तर सर्व कांहीं अनुकूल होईल.) १३९आत्मैव ह्यात्मन: साक्षी ।कृतस्यापकृतस्य च ॥१३।६।२७॥आपला आत्माच आपल्या बर्या वाईट कृत्यांचा साक्षी आहे. १४०आत्मैवादौ नियन्तव्यो ।दुष्कृतं संनियच्छता ॥१२।२६७।२९॥दुष्टांचें नियम करुं इच्छिणार्यानें प्रथम आपल्या मनाचें नियमन केलें पाहिजे. N/A References : N/A Last Updated : March 16, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP