मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १ ला| अध्याय १७ वा स्कंध १ ला अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध १ ला - अध्याय १७ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १ ला - अध्याय १७ वा Translation - भाषांतर ११५सरस्वतीतीरीं धर्म-पृथ्वीचा हा । संवाद चालतां तया स्थानीं ॥१॥परीक्षिति येतां राजचिन्हांकित । ताडी एक शूद्र तयां पाही ॥२॥शुभ्रवर्ण वृष थरथरां कांपे । मूत्र उर्त्सगातें करी भयें ॥३॥लत्ताप्रहारें ती दीन होई गाय । अश्रुधारा हाय नेत्रीं तिच्या ॥४॥पाहूनि तें राव ओढी निज चाप । कोण रे तूं शूद्र राजवेषें ॥५॥दुर्बलां ताडन करिसी क्रूरपणें । नृपाळवेषानें छळिसी जनां ॥६॥वासुदेव म्हणे अन्याया शासन । करी तोचि जाण क्षत्रिय खरा ॥७॥११६बोलूनि कलीसी वृषभासी राव । म्हणे मज देव भाससी तूं ॥१॥एकाचि चरणें चालसी तूं कैसा । लवहीन आतां करीं दु:ख ॥२॥रक्षिलें पृथ्वीसी पौरववीरांनीं । तेथ अन्य कोणी दु:खी नसे ॥३॥धेनूतें नृपाळ म्हणे वध याचा । तुम्हांस्तव आतां करीन मी ॥४॥अपराधहीन जनां दु:ख जेथ । ऐश्वर्यविनाश नरक नृपा ॥५॥कोणी हे वृषभा, दुखविलें तुज । निग्रहानुग्रह धर्म माझा ॥६॥वासुदेव म्हणे परीक्षितीप्रति । उत्तरें धर्माचीं ऐका आतां ॥७॥११७कुलोचित राया, भाषण हें तव । कोण दु:खमूळ समजेनाचि ॥१॥वितंडवादानें मोह पडे आम्हां । म्हणती कोणी आत्मा मित्र-शत्रु ॥२॥वर्णिती ग्रहांसी कोणी, कोणी कर्मा । स्वभावचि अन्यां मूळ वाटे ॥३॥लीला ईश्वराची कथिताती कोणी । स्वयेंचि तूं मनीं चिंती राया ॥४॥वासुदेव म्हणे ऐकूनि ते वाणी । आश्चर्यचि मनीं नृपाळासी ॥५॥११८परीक्षिती म्हणे वृषभा, तू धर्म । वाटे हें वचन ऐकूनियां ॥१॥सर्वज्ञ असूनि कथिसी न नाम । शास्त्रातें स्मरुन निश्चय हा ॥२॥पापी तेवीं नाम उच्चारी जो त्याचें । होई उभयांतें अघोगति ॥३॥शास्त्रवचन हें धर्मा जाणतोसी । अगाध हरिची अथवा माया ॥४॥विस्मयानें तप, कुसंगाने शौच । दयेचा विनाश उन्मादानें ॥५॥पाद तव तीन नामशेष झाले । चतुर्थ उरलें सत्य मात्र ॥६॥वासुदेव म्हणे सत्यही असत्यें । नष्ट करुं ऐसें इच्छी कली ॥७॥११९अवतरुनियां दुष्टांचा विनाश । करुनि पृथ्वीस तोषविलें ॥१॥गोमुखें तें अद्य ऐकुनि भविष्य । दु:ख अंतरांत वाटे बहु ॥२॥बोलूनियां ऐसें कलिविनाशार्थ । उपसूनि शस्त्र सिद्ध राव ॥३॥कलि तदा येई शरण विप्रासी । यास्तव तयासी अभय लाभे ॥४॥परी कलीप्रति आज्ञा करी राव । न करीं वास्तव्या मम राज्यांत ॥५॥वासुदेव म्हणे कलीचा प्रभाव । कथीतसे राव श्रवण करा ॥६॥१२०राजदेहामाजी प्रवेशतां कलि । लोभ असत्यहि, येई तेथ ॥१॥चौर्य, दुर्जनत्व, कापट्य, कलह । ढोंग, अवैभव, धर्मत्याग ॥२॥मागोमाग त्याच्या गोळा होती, तेथ । प्रजा धर्मभ्रष्ट होई तेणें ॥३॥ब्रह्मावर्तदेशीं यास्तव कलीचा ॥ संचार न कदा व्हावा म्हणे ॥४॥कलि म्हणे राया, करिसील आज्ञा । करीन त्या स्थाना वास्तव्य मी ॥५॥वासुदेव म्हणे द्यूत, मद्य, स्त्रिया । हिंसा, हेम तया स्थानें दावी ॥६॥१२१अनृत, उन्माद, काम, तैं क्रूरत्व । सर्वही एकत्र कनकामाजी ॥१॥यास्तव ऋषीहो, आसक्ति या ठाईं । ठेवूं नये पाहीं कदा सुज्ञें ॥२॥राजा, गुरु आदि श्रेष्ठांनिं कदापि । न धरावी आसक्ति सुवर्णांची ॥३॥रायानें पुढती धर्म चतुष्पाद । करितां पृथ्वीस मोद वाटे ॥४॥सूत म्हणे त्याचि राज्यामाजी तुम्ही । सत्र आरंभूनि बैसलांती ॥५॥वासुदेव म्हणे चतुष्पाद धर्म । जाणूनियां मर्म आचरावा ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP