मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १ ला| अध्याय ९ वा स्कंध १ ला अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध १ ला - अध्याय ९ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १ ला - अध्याय ९ वा Translation - भाषांतर ६४धर्माचें रहस्य जाणावें म्हणूनि । भीष्मांच्या चरणीं लीन झाला ॥१सकल बांधव तैसाचि माधव । तेंवी ऋषिवर्य बहुत होते ॥२॥सर्वज्ञ भीष्मांनी पाहूनी कृष्णासी । मनेंचि तयासी पूजियेलें ॥३॥धर्मार्जुनांप्रति पाहूनि नयन । होती अश्रुपूर्ण प्रेमभावें ॥४॥वासुदेव म्हणे धर्मादिकां भीष्म । बोलले वचन ऐका काय ॥५॥६५धार्मिकांही तुम्हां कष्ट बहु झाले । काळाचे हे सारे खेळ जाणें ॥१॥मेघसमुदाय कालाधीन जेंवी । तेंवी काल ठेवी तैसे जन ॥२॥नीतिमंत धर्म, गदायोद्धा भीम । सर्वास्त्रनिपुण पार्थ जेथें ॥३॥गांडीव धनुष्य सखा यदुनाथ । तेथें ऐसे क्लेश आश्चर्य हें ॥४॥परि अनिवार्य गति या कालाची । लीला श्रीकृष्णाची अगाध या ॥५॥परब्रह्मचि हा परमात्मा कृष्ण । द्यावया दर्शन आला मातें ॥६॥अंतकाळीं ज्यातें स्मरतां मुक्तिलाभ । स्वयंभ सन्निध तोचि माझ्या ॥७॥वासुदेव म्हणे विनविती भीष्म । सर्वदा श्रीकृष्ण कृपा करो ॥८॥पुशितां पुढती भीष्म धर्माप्रती । विविध कथिती श्रेष्ठ धर्म ॥१॥सामान्यधर्म तैं वर्णाश्रमधर्म । प्रवृत्तिलक्षण निवृत्तिही ॥२॥राजधर्म तेंवी स्त्रीधर्म कथिले । विविध दाविले दानमार्ग ॥३॥भागवतधर्म तेंवी मोक्षमार्ग । पुरुषार्थ साड्ग निवेदिले ॥४॥उत्तरायण जैं पातले पुढती । भीष्म तैं मरणासी सिद्ध झाले ॥५॥वासुदेव म्हणे तापदैन्यनाश । करी यदुनाथ सद्भक्तांचा ॥६॥६७सद्गतित कंठें भीष्म श्रीकृष्णांची । करिताती स्तुति तया वेळीं ॥१॥एकाग्र निष्काम निश्चल मन्मन । असो कृष्णार्पण सर्वकाल ॥२॥आनंदस्वरुप श्रीकृष्ण मायेतें । कदा लीलामात्रें अंगिकारी ॥३॥परी तो मायेच्या आधीन न होई । अनुपम पाहीं रुप याचें ॥४॥तमालवर्ण जो पीतांबरधारी । कांती विराजली सूर्यासम ॥५॥पार्थसारथी जो कमलवदन । पादपद्मीं मन जडो त्याच्या ॥६॥वासुदेव म्हणे भक्तसखा हरि । वसावा अंतरीं म्हणती भीष्म ॥७॥६८अवलोकनेंचि आयुष्य वैर्यांचें । हरी रणामध्यें रथ स्थापी ॥१॥तेंवी मोहमग्न पार्थालागीं ज्ञान । कथूनि स्वधर्मनिरत करी ॥२॥तया श्रीकृष्णाचे चरणीं मन्मन । असो रममाण सर्वकाल ॥३॥‘न धरीं शस्त्र’ हे प्रतिज्ञा तयाची । मोडीन मी ऐसी वदलों वाणी ॥४॥सत्य तें कराया धांवला जो रणीं । देव चक्रपाणी नमन तया ॥५॥वासुदेव म्हणे भक्तांचें महत्त्व । वाढवी अच्युत सर्वकाळ ॥६॥६९जगत्पालक तो संरक्षी पार्थासी । तोत्ररज्जु हस्तीं मोक्षदाता ॥१॥दर्शनें जयाच्या मृत तोचि मुक्त । त्याच्या पदीं चित्त जडो माझें ॥२॥रुपगुणलुब्धा गोपी ज्या स्वरुपीं । मिळाल्या तयासी नमन असो ॥३॥जयाच्या प्रभावें अग्रपूजामान । अर्पूनि मुनिगण तुष्ट झाले ॥४॥सन्निध तो माझ्या असे हें मद्भाग्य । असूनियां एक विविध दिसे ॥५॥वासुदेव म्हणे तया श्रीहरीतें । ऐक्य झालें मातें म्हणती भीष्म ॥६॥७०सूत कथिती ऋषिजनां । वृत्ति अर्पूनि श्रीकृष्णा ॥१॥चरणीं लावियेली दृष्टि । लीन भीष्म स्वस्वरुपीं ॥२॥लीन होतां पंचप्राण । वदती मुनि धन्य धन्य ॥३॥पुष्पवृष्टि करिती देव । भीष्मस्तवन करिती सर्व ॥४॥दु:खाकुल धर्मादिक । करिती क्रिया शास्त्रोचित्त ॥५॥येती हस्तिनापुरासी । करिती शांत सकलांसी ॥६॥पुढती थोर आशीर्वादें । धर्म सिंहासनीं बैसे ॥७॥वासुदेव म्हणे वृत्त । कथिलें संक्षेपें समस्त ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP