मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १ ला| अध्याय २ रा स्कंध १ ला अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध १ ला - अध्याय २ रा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १ ला - अध्याय २ रा Translation - भाषांतर १०ऐकूनियां प्रश्न आनंदित सूत । म्हणे व्यासां शुक त्यजूनि जाई ॥१॥सर्वसंगपरित्यागी योगिश्रेष्ठ । व्यासांसी वियोग न सहे त्याचा ॥२॥पुत्रा, पुत्रा, ऐशा मारिती ते हांका । वृक्ष तदा व्यासां म्हणती ओ, ओ ॥३॥सर्वत्र मी ऐसें सुचविलें शुकें । सर्वांतर्यामीतें नमन तया ॥४॥संसृतिसागरीं बुडत्या जनांसी । शुकें भागवती श्रेष्ठ कथा - ॥५॥कथिली, तें सार सर्व पुराणांचें । गाढ तमीं यातें दीप जाणा ॥६॥वासुदेव म्हणे प्रज्वाळिला जेणें । दीप त्या शुकातें सूत नमी ॥७॥११बदरीवनींचे नरनारायण । शारदाचरण तेंवी वंदू ॥१॥भगवान् व्यासां वंदूनि या ग्रंथा । आरंभीन आतां सूत म्हणे ॥२॥कथा जे अंतरीं ऐकावी हा हेतु । तेणें भवसिंधु तरती जन ॥३॥वासुदेव म्हणे कृष्णकथासेतु । नेई भवसिंधुपार लोकां ॥४॥१२निष्काम निश्चळ अधोक्षजीं भक्ति । करी जे चित्तासी सुप्रसन्न ॥१॥उपजवी ऐसी भक्ति तोचि धर्म । कथेवरी प्रेम उपजो धर्मे ॥२॥उपजे न भक्ति तरी धर्म व्यर्थ । धर्मार्थचि अर्थ, कामार्थ न ॥३॥मोक्षार्थचि धर्म, नव्हे अर्थास्तव । अर्थ धर्मास्तव, भोगार्थ न ॥४॥प्राणरक्षणार्थ विषय सेवावे । कोड न पुरवावे इंद्रियांचे ॥५॥चित्तशुद्धिद्वारा व्हावें तत्वज्ञान । यास्तवचि प्राण संरक्षावे ॥६॥वासुदेव म्हणे सर्वकाल ध्येय । ध्यानीं धरी होय कृतार्थ तो ॥७॥१३सर्वत्र सर्वचि ईश्वर हें तत्व । ब्रह्म भगवंत परमात्मा तें ॥१॥अनासक्तकर्म, वेदान्तश्रवण । घडतां होई ज्ञान सवैराग्य ॥२॥तेणें दृढभक्ति वसे अंतरांत । तदाचि हें तत्व प्रगटे तेथें ॥३॥यास्तव विहित कर्मे ईशप्रेम । उपजे तैं धर्म घडला जाणा ॥४॥जाणूनि स्वधर्म आचरुनि सदा । भजावें गोविंदा, घ्यावें गावें ॥५॥वासुदेव म्हणे तुटतां बंधन । हरिगुणगान सकलां रुचे ॥६॥१४तीर्थयात्रा, संतशुश्रूषा विश्वास । वेदशास्त्रीं नित्य वसे जरी ॥१॥तरीच उपजे हरिकथा प्रेम । जेणें नारायण हृदयीं वसे ॥२॥समूळ उच्छेद करी तो रिपूंचा । भक्तीसी दृढता येई तेणें ॥३॥ऐसा विशुदात्मा सर्वसंगत्यागें । अंतर्बाह्य रंगे आत्मरंगीं ॥४॥अहंवृत्तिरुप तुटे हृदयग्रंथि । सर्व नष्ट होती संशय ते ॥५॥सहजचि सर्व कर्मांचा तैं क्षय । करिती यास्तव भक्ति ज्ञाते ॥६॥वासुदेव म्हणे भक्तीचा महिमा । सयुक्तिक जाणा ऐशापरी ॥७॥१५त्रिगुणातीत पर पुरुष सांख्यांचा । आश्रयें मायेच्या सृष्टि रची ॥१॥सत्व, रज, तमें विष्णु, ब्रह्मा, शिव । विष्णु सत्वमय मोक्षकारी ॥२॥काष्ठाहूनि धूम, धूमाहूनि वन्हि । जेंवी श्रेष्ठ जनीं तैसेचि हें ॥३॥सत्वगुणें घडे ब्रह्मसाक्षात्कार । तेणेंचि तो थोर गुणांमाजी ॥४॥यास्तव तामस राजस देवांत । सात्विक तो श्रेष्ठ अधोक्षज ॥५॥धनार्थ पितर, भूतें ऐश्वर्यार्थ । जनीं सुपुत्रार्थ प्रजापती ॥६॥वासुदेव म्हणे कृष्णभक्ति श्रेष्ठ । जाणा मुक्तिप्रद निर्हेतुकी ॥७॥१६वेदें वासुदेवप्राप्ति । यज्ञ वासुदेवार्थचि ॥१॥तप, योग, क्रिया सर्व । करणें वासुदेवास्तव ॥२॥वासुदेवास्तव ज्ञान । वासुदेवास्तव धर्म ॥३॥परमगति वासुदेव । अन्य नुरे ‘वासुदेव’ ॥४॥१७व्यक्ताव्यक्तरुप मायेचा आश्रय । करुनियां, विश्व रचिलें ईशें ॥१॥त्रिविध निर्मूनि वस्तु त्यांत शिरे । त्रिविध भासलें रुप तेणें ॥२॥गुणामाजी लिप्त नसे तो अनंत । काष्ठासम रुप अग्नीचें जैं ॥३॥प्रवेशूनि भूतांमाजी तो भूतात्मा । स्वयेंचि आपणा उपभोगी तो ॥४॥सत्वाभिवृद्धीनें संरक्षावे जन । ऐसें नारायण इच्छी स्वयें ॥५॥इंद्र राम कृष्ण तेंवी वराहादि । रुपें, स्वभक्तांसी रक्षीतसे ॥६॥वासुदेव म्हणे भिन्न भिन्न रुपें । धरुनि अनंतें खेळ केला ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP