मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १ ला| अध्याय ११ वा स्कंध १ ला अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध १ ला - अध्याय ११ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १ ला - अध्याय ११ वा Translation - भाषांतर ७५द्वारावतीमाजी प्रवेशतां हरि । पांचजन्य फुंकी दिव्य शुभ्र ॥१॥आरक्त ओष्ठ ते कमळें भासती । हंसचि अंबुजीं पांचजन्य ॥२॥नादें त्या द्वारकानिवासी यादव । स्वागतार्थ धांव घेती वेगें ॥३॥सन्मानार्थ रत्नपात्रें वस्त्रें देती । दीप ते भासती सूर्यासम ॥४॥म्हणती तूं देवा काळाचाही काळ । आमुचे सकळ आप्त तूंचि ॥५॥कृपाकटाक्षें तूं पाहसी आम्हांतें । भाग्य तें आमुचें अंबुजाक्षा ॥६॥देवा त्वद्वियोग न सहे आम्हांसी । एकेक क्षणही युग भासे ॥७॥वासुदेव म्हणे प्रसन्न माधव । नगरीं अपूर्व प्रवेशला ॥८॥७६गुढया तोरणें विचित्र । उभारिती घरोघर ॥१॥ध्वज असंख्य आकाशीं । आच्छादिती भास्करासी ॥२॥सडा कुंकुमाचा मार्गी । अंगणीं तैं जागोजागीं ॥३॥फुलें रांगोळ्या अक्षता । दूर्वा पल्लवांची शोभा ॥४॥इक्षुदंड पुष्पें फळें । उदक कलश द्वारीं ठेले ॥५॥धूपदीपें सुगंधित । नगर अवघें सुशोभित ॥६॥वासुदेव म्हणे ज्ञाते । जाती सामोरे प्रभूतें ॥७॥७७उग्रसेन वसुदेव बलराम । अक्रूर प्रद्युम्न सांबादिक ॥१॥हर्षभरें एक सालंकृत गज । घेऊनियां रथ करिती सिद्ध ॥२॥वारांगना नट-नर्तक मागध । कृष्णलीला गात पुढती जाती ॥३॥वंदनालिंगन करस्पर्श कोणा । अवलोकूनि कोणा, कोणा हास्य ॥४॥कोणा वरदान, कोणासी भाषण । करुनि श्रीकृष्ण तोष देई ॥५॥वसुदेवादि ते अंत्यजापर्यंत । भेट यथायोग्य घेती सुखें ॥६॥वासुदेव म्हणे वंदूनि विप्रांसी । श्रीकृष्ण प्रासादीं प्रवेशला ॥७॥७८यादवांसी घडे दर्शन हें नित्य । परी ते अतृप्त सर्वकाल ॥१॥सर्वदा श्री वसे जयाच्या सन्निध । मदनलज्जित रुपें ज्याच्या ॥२॥अवयवीं ज्याच्या देवांची बसती । कैसी होई तृप्ती दर्शनें त्या ॥३॥सभोंवार पुष्पें तेंचि तारांगण । वनमाला दोन इंद्रचापें ॥४॥चामरें ते जणु पूर्णचंद्र । छत्र दीप्तिमान सूर्यचि तें ॥५॥विद्युल्लतेसम शोभे पीतांबर । मेघ-कृष्णचंद्र, सम ऐसे ॥६॥वासुदेव म्हणे ऐसा दीप्तिमंत । वंदी सदनांत मातांप्रति ॥७॥७९अंत:पुरामाजी पुढती प्रवेशे । सहस्त्रांवधि ते प्रासादचि ॥१॥सतीधर्मे स्त्रिया विलासविहीन । स्वागत उठूनि करितीं प्रेमें ॥२॥सानंद सलज्ज भेटल्या हरीसी । आनंदाश्रु नेत्रीं भरले त्यांच्या ॥३॥नववसूहूनी श्रीकृष्णचरण । नित्य त्यांचें मन आकर्षिती ॥४॥चंचलही लक्ष्मी स्थिर होई जेथें । स्थैर्य इतरांतें सहज कां न ॥५॥भूभाहरण केलें परस्पर । आसक्त अंतर नव्हतें कोठें ॥६॥सु:ख-दु:ख होतां बुद्धीसी न आत्मा । विकृत श्रीकृष्णा विषय तेंवी ॥७॥वासुदेव म्हणे अज्ञानें त्या स्त्रिया । मानिती माधवा विषयाधीन ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP