मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १ ला| अध्याय १४ वा स्कंध १ ला अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध १ ला - अध्याय १४ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १ ला - अध्याय १४ वा Translation - भाषांतर ९२पुढती धर्मानें श्रीकृष्णभेटीसी । धाडिलें पार्थासी कुशल वृत्ता ॥१॥तत्र पार्थाप्रति गेले बहुमास । धर्माच्या चित्तास चिंता बहु ॥२॥गजपुरीं होती दुश्चिन्हें त्या काळीं । मर्यादा सोडिली षड्ऋतूंनीं ॥३॥मतिभ्रष्टजनवृत्ति अनावर । असत्य सर्वत्र भरुनि जाई ॥४॥व्यवहार वक्र, मैत्री शाठ्ययुक्त । कलह सर्वत्र आप्तांमाजी ॥५॥कन्याविक्रय तैं मातृपितृद्वेष । ब्रह्मवादी शूद्र, विप्र मूढ ॥६॥वासुदेव म्हणे भीमाप्रति धर्म । बोलला वचन पाहूनि हें ॥७॥९३भीमा, सप्तमास जाहले पार्थासी । येई न अद्यापि, भय वाटे ॥१॥नारदोक्त घोर प्रसंग पातला । वाटतें या काला अंतरांत ॥२॥श्रीकृष्णप्रसादें आम्हां सर्व लाभ । पहा हे उत्पात घोर होती ॥३॥भौम, दिव्य तेंवी शारीरदुश्चिन्हें । पाहूनियां श्वानें रडली मज ॥४॥घोर घूकशब्दें हृदय विदीर्ण । अचल चलन पावती हे ॥५॥क्षोभल्या सरिता कांपली धरणी । धेनूंच्या नयनीं अश्रू येती ॥६॥वासुदेव म्हणे धेनु न देवता । रडताती ऐसा घोर काळ ॥७॥९४पाहूनि हे घोर उत्पात श्रीकृष्ण । आम्हांसी त्यजून गेला वाटे ॥१॥सौभाग्यविहीन वाटे वसुंधरा । कोठें शार्ड्गधरा पाहूं आतां ॥२॥इतुक्यांत पार्थ पातला त्या ठाईं । अश्रुपूर येई नयनीं त्याच्या ॥३॥ठेविलें मस्तक धर्माच्या चरणीं । शब्द न वदनीं उमटे कांहीं ॥४॥वासुदेव म्हणे पाहूनि तें धर्म । बोलला वचन धरुनि धीर ॥५॥९५पार्था, मधु, भोज, दाशार्ह सात्वत । वृष्णि तैं अंधक आप्त सर्व ॥१॥क्षेम असती कीं शूर पितामह । मातुल, वसुदेव देवक्यादि ॥२॥उग्रसेन वृद्ध असे कीं सुखरुप । अक्रूर जय्म्त सारणादि ॥३॥यादवप्रभु तो श्रेष्ठ बलराम । वसे कीं रे क्षेम सांगें मज ॥४॥प्रद्युम्न, अनिरुद्ध तैसे ते सांबादि । तेंवी उद्धवादि यादववीर ॥५॥गोब्राह्मणांचा प्रतिपालकर्ता । गोविंद भक्तांचा साह्यकर्ता ॥६॥‘सुधर्मासभेसी’ शोभवी कीं नित्य । यादवां महत्त्व जया योगें ॥७॥वासुदेव म्हणे धर्म ऐशापरी । अर्जुनासी करी प्रश्न बहु ॥८॥९६धर्म म्हणे पार्था, कां रे न बोलसी । अस्वस्थ कां ऐसी वृत्ति तव ॥१॥काय अपमान यादवांनीं केला । कठोर बोलला काय कोणी ॥२॥याचकांची इच्छा न करवे कीं पूर्ण । शरणार्थी रक्षण करवेना कीं ॥३॥अगम्यगमन अथवा पराभव । क्षुद्रवीरें काय केला तुझा ॥४॥योग्ग्यांसी त्यागूनि एकाकी भोजन । घडलें, कीं अन्य घडलें कांहीं ॥५॥अर्जुना, न कांरे बोलसी तूं कांहीं । प्राण सर्वांचाही श्रीकृष्ण जो ॥६॥ध्यातोसी तूं नित्य जयासी अर्जुना । तेणें काय आम्हां त्यागियेलें ॥७॥वासुदेव म्हणे पार्थाचा उद्वेग । पाहूनि धर्मास खेद वाटे ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP