मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १ ला| अध्याय ३ रा स्कंध १ ला अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध १ ला - अध्याय ३ रा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १ ला - अध्याय ३ रा Translation - भाषांतर १८विश्वोत्पत्तिहेतु धरुनि विराट । स्वरुपें भगवंत प्रगटला ॥१॥महतत्व अहंकार तैं तन्मात्रा । रुप त्याचें कला षोडशही ॥२॥प्रलयांत सर्वं होता जलमय । करी वासुदेव शयन तेथें ॥३॥नाभींतूनि त्याच्या प्रगटला ब्रह्मा । निर्मी जो भुवना चतुर्दश ॥४॥सहस्त्रशीर्षादि वर्णन तयाचें । सकलावतारांचे मूळ तेंचि ॥५॥याचिरुपीं होती अवतार लीन । पातला होऊन कुमार हा ॥६॥नैष्ठिक पाळिलें ब्रह्मचर्य यांनीं । सन्मार्ग हा जनीं स्थापावया ॥७॥वासुदेव म्हणे अवतार प्रथम । कुमार होऊन आला देव ॥८॥१९रसातळीं जातां भूमि नारायण । वराह होऊन पुढती आला ॥१॥पंचरात्रागम कथिला नारदें । तृतीय हें साचें भगवद्रूप ॥२॥नारायणरुपें चतुर्थावतार । केलें तप घोर शांतीस्तव ॥३॥सांख्यशास्त्र लुप्त होतांचि कपिल । होऊनि उद्धार करी त्याचा ॥४॥अत्रि-अनसूयापुत्र दत्तात्रेय । होऊनि केशव पुढती येई ॥५॥अलर्कादिकांचा तोचि ज्ञानदाता । वासुदेव त्याचा दीन दास ॥६॥२०ऋचि आकूतीचा यज्ञ नामें पुत्र । सप्तम अवतार यज्ञार्थ तो ॥१॥परमहंसाश्रम दाविला ऋषभें । झाला नृप स्वांगे नवम पृथु ॥२॥औषधिदोहनें अवतार हा श्रेष्ठ । पुढती मत्स्यरुप चाक्षुषांत ॥३॥समुद्रमंथनीं घेई कूर्मरुप । धन्वंतरी देख द्वादश तो ॥४॥त्याचिवेळीं मोह पाडाया दैत्यांसी । मोहिनी रुपेंसी प्रगटे देव ॥५॥पुढती नृसिंहरुपें प्रगटला । वामन जाहला देवांस्तव ॥६॥वासुदेव म्हणे विप्ररक्षणार्थ । जमदग्निपुत्र रुप घेई ॥७॥२१पराशर - सत्यवतीसुत व्यास । दावीतसे मार्ग मंदांप्रति ॥१॥राजकुळामाजी पुढती रामचंद्र । कृष्ण बलभद्र पुढती होई ॥२॥एकोनविंशति विंशतिसंख्यांक । अवतार श्रेष्ठ जाहले हे ॥३॥बुद्धिविभ्रमार्थ असुरांची तो बुद्ध । होईल हें वाक्य ध्यानीं असो ॥४॥कलीमाजी नृप तस्करांसमान । प्रजेसी लुटून धन घेतां - ॥५॥कल्किरुपधारी होईल केशव । वंदी वासुदेव तयाप्रति ॥६॥२२सरोवरांतूनि पाट जे असंख्य । तैसेचि बहुत अवतार हे ॥१॥वसिष्ठ, मनु तैं इंद्रादिक देव । जाणावे ते सर्व अवतारचि ॥अंशावतार ते, श्रीकृष्ण तो पूर्ण । करिती रक्षण सज्जनांचें ॥३॥प्रात:सायंकाळीं अवताररहस्य । गातील तयांस मोक्षलाभ ॥४॥वासुदेव म्हणे अवतारलीला । प्रिय श्रीहरीला सर्वकाल ॥५॥२३अरुप आत्म्याचें पृथक् पृथक्रुप । भासतसे देख मायागुणें ॥१॥सर्वद्रष्टा आत्मा रुपादि विहीन । भासवी अज्ञान रुप तया ॥२॥वायुस्थ तो मेघ नभामाजी भासे । अथवा वायूतें सुगंध जैं ॥३॥आरोप हे जैसे तैसा आत्म्यावरी । आरोप अंतरीं जाणा सर्व ॥४॥आत्म्याहुनी जीव गुणसंगें भिन्न । भक्तिज्ञानहीन भ्रमतो भवीं ॥५॥वासुदेव ह्मणे जीवात्मस्वरुप । जाणूनियां बोध घ्यावा मनीं ॥६॥२४एकमेव ब्रह्मज्ञानें मुक्त जीव । नसे जीव-शिवभेद सत्य ॥१॥स्थूल-सूक्ष्म मायामय देह दोन । तादात्म्यें बंधनकारक ते ॥२॥ब्रह्मज्ञानें त्यांचा सुटतां संबंध । तुटे भवबंध तत्काळचि ॥३॥ज्ञानलाभार्थ ते कवी थोर थोर । वर्णिती चरित्र ईश्वराचें ॥४॥सत्यरुपें तया नसे जन्म कर्म । हितार्थ वर्णन करिती कवी ॥५॥वासुदेव म्हणे सुटतां आसक्ति । नसे बंधशक्ति कर्मामाजी ॥६॥२५अलिप्तभावेंचि अकर्तृत्व तया । जन्म स्थिती लया असूनि मूळ ॥१॥सर्वांतर्यामी तो असूनि स्वतंत्र । साक्षी सर्वकाळ अकर्ताचि ॥२॥अभिनयमर्म रसिकासी ज्ञात । ईशमायाबोध ज्ञात्यांसी तैं ॥३॥वासुदेव म्हणे ज्ञाता महा भक्त । श्रीकृष्णपदाब्जमिलिंद जो ॥४॥२६ऋषींलागीं सूत म्हणे तुम्ही धन्य । तराल श्रीकृष्ण कथामृतें ॥१॥वेदाचें गव्हर शास्त्रांचें हें सार । भागवत थोर पुराण हें ॥२॥सर्व मंगलांचें मंगल माहेर । जाणावें साचार वेदांसम ॥३॥रचिलें व्यासांनीं जनउद्धारार्थ । प्रथम शुकास कथिलें प्रेमें ॥४॥परीक्षितासी तें कथितां शुकानें । ऐकिलें भाग्यानें मीही तदा ॥५॥यथामति तेंचि कथितों मी तुम्हां । गेले निजधामा भगवंत ॥६॥कलीप्रादुर्भूत अज्ञानांधकार । भागवतसूर्य नाशील तो ॥७॥वासुदेव म्हणे कली मत्त झाला । सद्भावें गोपाला गावें नित्य ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP