TransLiteral Foundation

स्कंध १ ला - अध्याय १० वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


स्कंध १ ला - अध्याय १० वा
७१
राज्यलोभी दुर्योधनादि वधूनि । राज्य केंवी जनीं केले धर्मे ॥१॥
ऐसें पुशितां त्या कथीतसे सूत । दावाग्नींत वंश रक्षूनियां ॥२॥
उत्तरेचा गर्भ संरक्षूनि, राज्य । अर्पूनि धर्मास तोषे कृष्ण ॥३॥
ईश्वराधीन हें विश्व न स्वतंत्र । भीष्म - कृष्णबोध धरुनि ध्यानीं ॥४॥
राज्य करी धर्म इंद्रासम लोकीं । त्रिविध तापांची भीति गेली ॥५॥
कामवृष्टियोगें धनधान्यपशुवृद्धि । धेनु वनस्पति सफल होती ॥६॥
आधि व्याधि तेथें न बाधती कोणा । संतोष जनांना सर्वकाल ॥७॥
वासुदेव म्हणे वैरी न धर्मासी । राजनीति त्याची निष्कलंक ॥८॥

७२
पांडवहितार्थ हस्तिनापुरांत । वसे कांहीं मास कृष्ण ऐसा ॥१॥
पुढती द्वारकागमनार्थ सिद्ध । होतांचि मुकुंद सकलां दु:ख ॥२॥
धर्मादिक तया प्रेमें आलिंगिती । नकुलादि वंदिती अत्यादरें ॥३॥
दर्शनेंहि ज्याच्या होई भवभंग । तयाचा वियोग कैसा साहे ॥४॥
परी मंगलार्थ अश्रु आंवरिती । सुभद्रा, द्रौपदी आदि स्त्रिया ॥५॥
वासुदेव म्हणे कृष्णासी निरोप । द्यावया समस्त नगर सज्ज ॥६॥

७३
वणवे न थाट श्रीकृष्णस्वारीचा । जन सर्व धंदा त्यजूनि येती ॥१॥
निनादुनि जाई वाद्यनादें नभ । सुशोभित मार्ग फुलूनि जाती ॥२॥
मुक्तामालायुक्त छत्र हरीवरी । धरुनियां करीं पार्थ उभा ॥३॥
उद्धव, सात्यकि चवर्‍या ढाळिती । सुमनें वर्षती नारीगण ॥४॥
द्वारावरुनि ज्या रथ श्रीहरीचा । जाई, प्राण त्यांचा कासावीस ॥५॥
भक्तकार्यास्तव जाहला साकार । आशीर्वाद विप्र तया देती ॥६॥
वासुदेव म्हणे स्त्रियांचा संवाद । प्रसंगीं त्या गोड केंवी ऐका ॥७॥

७४
सखीजनांप्रति बोलली स्त्री एक । कृष्ण गुणातीत आदि अंतीं ॥१॥
आधारें जयाच्या माया करी खेळ । प्रेरक ते कालशक्ति त्याची ॥२॥
निजांशेची जीव होऊनि जो राहे । योगियांसी पावे दर्शनानें ॥३॥
तोचि आम्हीं अद्य पाहिला भाग्यानें । व्यर्थ भक्तीविणें सर्व यत्न ॥४॥
वेदगुह्य हाचि राहूनि अलिप्त । अवतरे मत्त होतां राजे ॥५॥
अहो भाग्य मोठें मथुरापुरीचें । तेंवी यादवांचें भाग्य थोर ॥६॥
धन्य ते द्वारका धन्य कृष्णस्त्रिया । लाभे नित्य जयां सहवास हा ॥७॥
सूत म्हणे ऐसें बोलताती स्त्रिया । निरोप यादवा सकल देती ॥८॥
वासुदेव म्हणे सांत्वन करुनि । आनंदें निघूनि जाई कृष्ण ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-11-01T21:19:15.0430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तरफ

  • स्त्री. १ ( पदार्थ ) जड पदार्थ उचलण्यासाठी , हलविण्यासाठी त्याच्या खाली पहार इ० सारखा घातलेला दांडा ; उच्चालक ; उत्तोलनदंड ; ( इं . ) सारखा घातलेला दांडा ; लिव्हर . २ दार बंद करण्याकरितां दाराच्या फळ्यांमागे घातलेला , गाडीच्या चाकाच्या गतीस प्रतिबंध करण्यासाठी घातलेला अडसर ; अवरोधक . [ हिं . तरक = तुळई , वासा ? ] 
  • स्त्री. वाद्याची तार . सारंगी , सतार इ० वाद्यास स्वर भरण्यासाठी मुख्य तारांच्या खालच्या बाजूस लाविलेली तार . 
  • स्त्री. १ दिशा ; बाजू ; कड . २ ( भांडण , कज्जा इ० तील ) पक्ष ; बाजू ; कड . त्याच्या तरफेचे भाषण हा बोलतो . ३ ताबा ; जिम्मा ; राखण ; निसबत . हा दागिना तुमच्या तरफेस असू द्या . ४ हुकमत ; अंमल ; ताबा . तुमच्या तरफेच्या स्वारांची हजिरी घ्यावयाची आहे . ५ देशाचा एक लहान भाग ; कांही विशिष्ट संख्याक गांवांचा गट ; महाल . अशा कांही तरफा मिळून परगणा होतो . देश पहा . मराठेशाहीत साठ गावे मिळून तरफ . - गांगा ४२ . महालाचा संबंध दाखवायचा असल्यास गांवामार्गे हा शब्द योजतात . उदा० मौजे ओण , तरफ राजापूर . ६ तरफबंदी - पद्धतीखालील जमीनीचा एक वर्ग . [ अर . तर्फ , तरफ ] सामाशब्द - 
  • ०दार पु. १ तरफेत असलेल्या गांवांचा वसूल करणारा , त्यावर हुकमत चालविणारा अधिकारी ; महालकरी . हा मामलतदाराच्या हाताखाली असतो . - वाडमा १ . ३ . २ तरफ म्हणून जो जमीनीचा विशिष्ट विभाग तिचा मालक - वि . पक्षपाती ; कैवारी ; दोस्त . [ तरफ + दार ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

सौभाग्यवती स्त्रियांनी कुंकू का लावावे ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.