मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे| ८२७२ ते ८२८० चरित्रे नृसिंहअवतारचरित्र प्रल्हादचरित्र श्रीवामन अवतारचरित्र परशुराम अवतारचरित्र श्रीरामजन्म श्रीरामचरित्र सीताशोक श्रीकृष्णजन्म कृष्णचरित्र १ कृष्णचरित्र २ कल्की अवतार कालयवनवध रुक्मांगद राजाचें चरित्र अंबऋषी राजाचें चरित्र भानुदास चरित्र श्रीयाळ चरित्र धांवा द्रौपदीचा मयुरध्वज चरित्र सुदाम चरित्र दामाजीपंताचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र दुसरें द्रौपदी वस्त्रहरण सांवतामाळीचरित्र हरिपाळचरित्र ८२४१ ते ८२५० ८२५१ ते ८२६० ८२६१ ते ८२७१ ८२७२ ते ८२८० ८२८१ ते ८२९० आरत्या - ८२७२ ते ८२८० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत आरत्या - ८२७२ ते ८२८० Translation - भाषांतर ॥८२७२॥आपुल्या आवडी । उभा दोन्ही कर जोडी ॥१॥आजि पुरविसी आर्त । धन्य मानिलें संचित ॥२॥निरांजन हे आरती । वारंवार करुं स्तुती ॥३॥तुका ह्मणे जिवें भावें । नव्हें उत्तीर्ण गौरवें ॥४॥॥८२७३॥कर्पुर आरती । ओंवाळीन लक्ष्मीपती ॥१॥भावाभाव हारपले । मन हेत पारुषले ॥२॥झाली जिवासी विश्रांति । स्थिरावली चित्तवृत्ती ॥३॥तुका ह्मणे एक भक्ति । नाहीं जीव दशा चित्तीं ॥४॥॥८२७४॥करुं आरती सप्रेम । ओंवाळीला सर्वोत्तम ॥१॥आनंदीआनंद । सर्व भरला गोविंद ॥२॥दावियले पाय । स्तब्ध झालीं हीं इंद्रियें ॥३॥तुका ह्मणे मन । कृत्य झाले हे लोचन ॥४॥॥८२७५॥दैत्यभारें पीडिली पृथ्वी बाळा । ह्मणोनि तुज येणें झालें गोपाळा ॥भक्तप्रतिपाळक उत्सव सोहला । मंगळें तुज गाती आबळा बाळा ॥१॥जयदेव जयदेव जयगरुडध्वजा । श्रीगरुडध्वजा ॥ आरती ओंवाळूं तुज भक्तिकाजा ॥ध्रु०॥गुण रुप नाम नाहीं जयासी । चिंतिता तैसाचि होसी तयांसी ॥मत्स्य कूर्म वराह नरसिंह झालासी । असुरां काळ म्हूण ठाके ध्यानासी ॥२॥सहस्त्र रुपें नाम सांवळा ना गोरा । श्रुति नेती ह्मणती तुज विश्वंभरा ॥जीवनां जीवन तूंचि होसी दातारा । न कळे पार ब्रह्मादिकां सुरवरां ॥३॥संतां महंतां घरीं ह्मणवी ह्मणियारा । शंखचक्र गदा आयुधांचा भारा ॥सुदर्शन घरटी फिरे अवश्वरा । सकुमार ना स्थूळ होसी गोजिरा ॥४॥भावेंविण तुझें न घडे पूजन । सकळही गंगा झाल्या तुजपासून ॥उत्पत्ति प्रळय तूंचि करिसी पाळण । धरुनि राहिला तुका निश्चयीं चरण ॥५॥॥८२७६॥काय तुझा महिमा वर्णू मी किती । नाममात्रें भवपाश तुटती ॥पाहतां पाऊलें हे विष्णुमूर्ती । कोटिकुळांसहित जग उद्धरती ॥१॥जयदेव जयदेव जयपंढरीराया । श्रीपंढरीराया ॥ करुनियां कुरवंडी । सांडीन काया ॥ध्रु०॥मंगळ आरतीचा थोर महिमा । आणीक द्यावया नाहीं उपमा ॥श्रीमुखासहित देखे जो कर्मा । पासुन सुटे जैसा रवि नासी तमा ॥२॥धन्य व्रतकाळ हे एकादशी । जागरण उपवास घडे जयांसी । विष्णूचें पूजन एका भावेंसी । नित्य मुक्त पूज्य तिहीं लोकांसी ॥३॥न वजे वायां काळ जे तुज ध्याती । असे तुझा वास तयांच्या चित्तीं ॥धाले सुखें सदा प्रेमें डुल्लती । तीर्थे मळिण वास तयांचा पाहती ॥४॥देवभक्त तूंचि झालासी दोन्ही । वाढावया सुख भक्ति हे जनीं ॥जड जीवां उद्धार होय लागोनी । शरण तुका वंदी पाऊलें दोन्ही ॥५॥॥८२७७॥पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिणवाहिनी । तीर्थ चंद्रभागा महापातकां धुनी । उतरलें वैकुंठ महा सुख मेदिनी ॥१॥जयदेवा पांडुरंगा जय अनाथनाथा । आरती ओंवाळीन तुह्मां लक्ष्मीकांता ॥ध्रु०॥नित्य नवा सोहळा हो महावाद्यांचा गजर । सन्मुख गरुड पारीं उभा जोडुनि कर ।मंडितचतुर्भुजा कटीं मिरवती कर ॥२॥हरिनामकीर्तन हो आनंद महाद्वारीं । नाचती प्रेमसुखें नर तेथींच्या नारी ।जीवन्मुक्त लोक नित्य पहाती हरी ॥३॥आषाढी कार्तिकी ही गरुडटक यांचा भार । गर्जती नामघोषें महावैष्णववीर ।पापासी रीग नाहीं असुर कांपती सुर ॥५॥हे सुख पुंडलिकें कसें आणिलें बापें । निर्गुण साकारलें आह्मालागिं हें सोपें । ह्मणोनि चरण धरोनि तुका राहिला सुखें ॥६॥॥८२७८॥अवतार गोकुळीं हो जन तरावयासी । लावण्य रुपडें हें तेज:पुंजाळरासी ॥उगवतां कोटि बिंबें रवि लोपले शशी । उत्साव सुरवरा मही थोर मानसीं ॥१॥जय देवा कृष्णनाथा जय रखुमाई कांता । आरति ओंवाळीन तुह्मां देवकीसुता ॥जय देवा कृष्ण्नाथा ॥ध्रु०॥वसुदेवदेवकीची बंद फोडिली शाळ । होउनि विश्वजनिता तया पोटीचा बाळ ॥दैत्य हे त्रासियेले समूळ कंसासी काळ । राजया उग्रसेना केला मथुरापाळ ॥२॥राखितां गोधनें हो इंद्र कोपला भारी । मेघ जो कडाडिला शिळा वर्षतां धारीं ॥राखिलें गोकुळ हें नखीं धरिला गिरी । निर्भय लोकपाळ अवतरले हरी ॥३॥कौतुक पहावया माव ब्रम्हानें केली । वत्सेंही चोरुनियां सत्य लोकासीं नेलीं ॥गोपाळ गाई वत्सें दोहीं ठायीं राखिलीं । सुखाचा प्रेमसिंधु अनाथांची माऊली ॥४॥तारिलें भक्तजना दैत्य निर्दाळूनि । पांडवा साहकारी आडल्या निर्वाणीं ॥गुण मी काय वर्णू मति केवढी वाणी । विनवितो दास तुका ठाव देई चरणीं ॥५॥॥८२७९॥सुंदर अंगकांतीं सुख भाळ सुरेख । बाणली उटी अंगीं टिळा साजिरा रेख ॥मस्तकीं मुगुट कानीं कुंडलें तेज फांके । आरक्त दंत हिरे कैसे शोभले निके ॥१॥जय देवा चतुर्भुजा जय लावण्य तेजा । आरति ओंवाळीन भवतारिया हा वोजा ।जय० ॥ध्रु०॥ उदार जुंझार हा जया वाणी श्रुति । परतल्या नेति ह्मणती तयां नकळे गति ॥भाट हा चतुर्मुखें अनुवाद करिती । पांगली साही अठरा रुप न गति ॥२॥ऐकोनि रुप ऐसें तुजलागीं धुंडिती । बोडके नग्न एक निराहार यती ॥साधन योग नाना तपें दारुण किती । सांडिलें सुख दिली संसारा शांती ॥३॥भरुनि माजी लोकां तिहीं नांदसि एक । कामिनी मनमोहना रुप नाम अनेक ॥नासती नाममात्रें भवपातकें शोक । पाउलें वंदिताती सिद्ध आणि साधक ॥४॥उपमा द्यावयासी दुजें काय हें तुज । तत्वासी तत्वसार मूळ झालासी बीज ॥खेळसी बाळलीला अवतार सहज । विनवितो दास तुका कर जोडुनि तुज ॥५॥॥८२८०॥महाजी महादेवा महाकाळमर्दना । मांडियेलें उग्र तप महादीप्त दारुणा ॥परिधान व्याघ्रांबर चिताभस्मलेपना । स्मशान क्रिडा स्थळ तुह्मां जी त्रिनयना ॥१॥जय देवा हरेश्वरा जय पार्वतीवरा । आरती ओंवाळीन कैवल्यदातारा । जय०॥ध्रु०॥रुद्र हें नाम तुह्मां उग्र संहारासी । शंकर शिव भोळा उदार सर्वस्वीं ॥उदक बेलपत्र टाळी वाहिल्या देसी । आपुले पद दासां ठाव देई कैलासीं ॥२॥त्रैलोक्यपाळका हो जन आणि विजन । विराटस्वरुप हें तुझें साजिरें ध्यान ॥करिती वेद स्तुती कीर्ती मुखें आपण । जाणतां नेणवे हो तुमचें महिमान ॥३॥बोलतां नाम महिमा असे आश्चर्य जगीं । उपदेश केल्यानंतर पापें पळती वेगीं ॥हर हर वाणी गर्जे प्रेम संचरे अंगीं । राहिली दृष्टि चरणीं रंग मीनला रंगीं ॥४॥पूजूनि लिंग उभा तुका जोडोनि हात । करितो विज्ञापना परिसावी हे मात ॥ अखंड राहूं द्यावें माझें चरणीं चित्त । घातलें साष्टांग मागे मस्तकीं हात ॥५॥ N/A References : N/A Last Updated : August 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP