मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे| ८२५१ ते ८२६० चरित्रे नृसिंहअवतारचरित्र प्रल्हादचरित्र श्रीवामन अवतारचरित्र परशुराम अवतारचरित्र श्रीरामजन्म श्रीरामचरित्र सीताशोक श्रीकृष्णजन्म कृष्णचरित्र १ कृष्णचरित्र २ कल्की अवतार कालयवनवध रुक्मांगद राजाचें चरित्र अंबऋषी राजाचें चरित्र भानुदास चरित्र श्रीयाळ चरित्र धांवा द्रौपदीचा मयुरध्वज चरित्र सुदाम चरित्र दामाजीपंताचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र दुसरें द्रौपदी वस्त्रहरण सांवतामाळीचरित्र हरिपाळचरित्र ८२४१ ते ८२५० ८२५१ ते ८२६० ८२६१ ते ८२७१ ८२७२ ते ८२८० ८२८१ ते ८२९० पदें - ८२५१ ते ८२६० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत पदें - ८२५१ ते ८२६० Translation - भाषांतर ॥८२५१॥आज लढूं निरबान । गुरुजी ॥ध्रु०॥तुमारे चरनपर दुरवा राखूं । सीस करुं कुरबान ॥१॥पांचपचीस हत्ती सवारुं । उपर लाल निशान ॥२॥एकवीस हजार सब घोडे । हाथ लिये नव बान ॥३॥चारो महालमे धुम मचाई । किया मुलुख मैदान ॥४॥दास तुका कहे सल्ला हमारा । लगा उन्मनी ध्यान ॥गुरुजी०॥५॥॥८२५२॥विठ्ठल विठ्ठल बोल मना । कर साधन सोपें ॥ होइ जागा आवची झोंप ॥ध्रु०॥ प्रपंच विषयीं झोंप आली । केली तिणें गर्दी ॥ हालविली मर्दाची मर्दी ॥स्वहित आपुले नेणोनियां । होसि तिचा वर्जी ॥ऐसा कैसा बेदरदी ॥ कन्यादाराधनपुत्रीं । विषयावरि लोलुप ॥होइ जागा आवरीं झोंप ॥१॥भ्रांति तुजला कशि पडली । जडली क्रिया आधि ॥नाना परिची उपाधी । रामराम हा घ्या मंत्र ॥हो तारक सिद्धी । मुख्य साधन हें तूं साधी ॥घडिघडि पळपळ । विसरुं नको लागोदें चोप ॥होइ जागा आ०॥२॥झोंप नव्हे हा काळ तुजला ग्रासाया पाहतो । आयुष्य घेउनियां जातो ॥ नाशवंत हा नरदेह क्षणभंगुर मूर्ती । पडशिल काळाचे हातीं ॥ हरि भजनाविण तुजवरता काळ करिल कोप ।होइ जागा आवरी झोंप ॥ विठ्ठ०॥३॥मृगजळवत संसार सख्या झोंप किती घेशी । आतां तूं सावध कधिं होशी ॥वीस पंचवीस्स साठींचा आला आकारासी । उघडी डोळा ध्याइ हरीशीं ॥तुकारामाशी हरिभजनीं नित्य नामजप । होई जागा आवरी झोंप ॥विठ्ठल विठ्ठल बोल० ॥४॥॥८२५३॥जगजीवन दिनदयाळारे । नित्य निरंजन सज्जन रंजन भक्तप्रतिपाळारे ॥जगजीव० ॥१॥दीन तुझे नुमजे मज साधन । अंगीकारी निज बाळारे ॥२॥दुस्तर हा भवसागर पामर । दंशितसे यमकाळा रे ॥३॥दीन तुका विनवी कर जोडूनी । नामसार जगपाळारे ॥ जगजी०॥४॥॥८२५४॥शामसुंदर सांवळी । उभी जणूं असे राउळीं ॥ती आकाश ब्रम्हांड गिळी ॥ध्रु०॥दादानो ठकडी बायको आली । भल्याभल्यासी ठकवून गेली ।दादानोठ०॥१॥चारी शून्याचे वरती । ज्ञानदृष्टीनें न्याहळती । चारी सूत्रें तिचे हातीं ॥दादनो०॥२॥बायको नव्हे पुरुष नव्हे दावी नाना रंग नटभाव । जैसा आकाशी विज वालवे ॥दादानो०॥३॥जे जे पाहूम गेले तिसीं । तिनें झोडपिलें तयांसी । तुकाराम शरण तिसीं ॥ दादानो ठ०॥४॥॥८२५५॥आनुंदुरे किं परमानंदुरे । जया श्रुती नेती ह्मणती गोविंदू ॥ध्रु०॥आह्मा विठोबाची वेढी आनंदू सदा ॥ गाऊं नाचूं वाजवूं टाळी रिझवूं गोविंदा ॥१॥सदा सण सात आह्मा नित्य दिवाळी । आनंदे निर्भर आमुचा कैवारी बळी ॥२॥तुका म्हणे नाहीं जन्म मरणाचा धाक । संत सनकादिक हे आमुचें कौतुक ॥३॥॥८२५६॥पहा गे याच्या चरणासाठीं । सोसिली म्यां आटाआटी ॥शाकी मज वाजाटी । ह्मणे गोवळा ॥१॥प्रथमचि सोनारें । मोडुनी राजअक्षरें ॥अग्निचिया सवकारें । आटिलें मज ॥२॥तेथें तीवर घनघाई । सोसिली मी सांगूं काई ॥वारोवार कुतराई । तापलें सई ॥३॥ऐसी तेथें जाचणी । सोसिली मी साजणी ॥ह्मणुनी अतिथी चरणीं । राहिले कृष्णा ॥४॥ऐसा ऐकुनी त्याचा शब्द । वांकी चरण झालें बंद ।झाला तुकयासी मोद । न माये गगनीं ॥५॥॥८२५७॥वेगें व्हावें सावधान गुरुपाय जोडा ॥ध्रु०॥कशासाठीं तानमान । हालउनी गातां मान ॥नका फार ब्रह्मज्ञान । अभिमान सोडा ॥१॥घोका घोका पोथी पान । सारासार कार्यज्ञान ॥होऊनियां समाधान । मग डोई बोडा ॥२॥पांघरुनी भगवी शाटी । गुरुपदीं कटांकटी ॥मोठी द्यावी हातवटी । बैसुनियां लोडा ॥३॥दास तुका सांगे कानीं । गोपाळभट उमजा मनीं ॥गोपाळनाथ ध्यानीं मनीं । बरे डोळे उघडा ॥४॥॥८२५८॥कोण कसी बनेल घटका । काळ करील क्षणांत मुटका ॥हा अभिमान लटका । संगें येईना मणी फुटका । कोण०ध्रु०॥प्राण्या गोष्ट ऐक थोडी । कोणाची महाल माडी ॥हे येथेंच राहील कुडी । शेवटीं निघेल स्वारी सडी ॥ कोण०॥१॥कांहीं कीर्ति करुनी पहा कीं । कोणाचे लेंक लेंकी ॥ ह्या उगवून नेती बाकी । कोणी नाहीं जिवाची सखी । कोण०।॥२॥शुकानें टाकला काय । धन्य वाणी तुकाराम ॥तेणें जोडीला घनश्याम । देहासुद्धां गेले वैकुंठा ॥ कोण कसी बनेल घटका ॥३॥॥८२५९॥आतां तरी जाय जाय । धरी सद्गुरुचे पाय ॥ध्रु०॥नामस्मरण ज्या मुखीं नाहीं । व्यर्थ त्याची काय ॥१॥कोटी पाप त्वां जरि केलें । चुकविले सद्गुरुराय ॥२॥नामस्मरणीं तुका ह्मणे । भिक्षा मागुनी खाय ॥३॥॥८२६०॥मन मोहन मुरलीवाला रे । नंदाचा अलबेला ॥ध्रु०॥विदुराघरच्या भक्षुनी कण्या । सृष्टीपालनवालारे ॥१॥भक्तासाठीं तो जगजेठी । कुब्जेसी रत झाला रे ॥२॥ तुका ह्मणे भीमातिरीं । पुंडलिकें उभा केला रे ॥३॥ N/A References : N/A Last Updated : August 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP