मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे| द्रौपदी वस्त्रहरण चरित्रे नृसिंहअवतारचरित्र प्रल्हादचरित्र श्रीवामन अवतारचरित्र परशुराम अवतारचरित्र श्रीरामजन्म श्रीरामचरित्र सीताशोक श्रीकृष्णजन्म कृष्णचरित्र १ कृष्णचरित्र २ कल्की अवतार कालयवनवध रुक्मांगद राजाचें चरित्र अंबऋषी राजाचें चरित्र भानुदास चरित्र श्रीयाळ चरित्र धांवा द्रौपदीचा मयुरध्वज चरित्र सुदाम चरित्र दामाजीपंताचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र दुसरें द्रौपदी वस्त्रहरण सांवतामाळीचरित्र हरिपाळचरित्र ८२४१ ते ८२५० ८२५१ ते ८२६० ८२६१ ते ८२७१ ८२७२ ते ८२८० ८२८१ ते ८२९० द्रौपदी वस्त्रहरण तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगचरित्रतुक्राराममराठीसंत द्रौपदी वस्त्रहरण Translation - भाषांतर ॥८२१४॥अघटीत झालें नवल वर्तलें । सतीसी गांजीलें दुष्टाही तें ॥१॥सत्वाचा सागर असे धर्मराज । वहातसे चोज बोलवेना ॥२॥याज्ञसेनी बोले राया भीष्म द्रोणा । कां तुह्मी सांगाना कौरवांसी ॥३॥गुरु द्रोण ह्मणे दुष्टासी संबंध । काय त्यासी बोध तुका ह्मणे ॥४॥॥८२१५॥द्रुपदतनया आणिली सभेसी । धरोनियां केशीं उभी राहे ॥१॥दु:शासन चांडाळ महाक्रोधी खळ । पापाचें तें मूळ तेथें वसे ॥२॥द्रौपदीमातेसी देखुनि मेदिनी । कांपली धरणी थर थरां ॥३॥सुरवर देव मनीं चिंतावले । अघटित झालें तुका ह्मणे ॥४॥॥८२१६॥दुर्योधन रावो तृप्त झाला भारी । बैसे मांडीवरी द्रौपदी तूं ॥१॥समस्त जिंकीले कोटि ऐरावत । ठाव अरण्यांत नेमियला ॥२॥आतां तुझी दशा अती अवदशा । भोगवीन क्लेशां पांडवांसीं ॥३॥कुमारे तुझी येतसे करुणा । नको जाऊं बना सुलक्षणे ॥४॥पट्टराणी माझी होय तूं अस्तरी । बोले दुराचारी तुका ह्मणे ॥५॥॥८२१७॥पट्टराणी होय माझी निश्चयेसी । देईन सेवेसी भानुमती ॥१॥आणिक ही दासी देईन तुजसी । वरावें मजसी प्राणसखे ॥२॥मी हो असें तुझा सेवकचि जाण । करि विचारणा मना माजि ॥३॥माझिये संगती सुख आहे फार । बोले तो उत्तर तुका ह्मणे ॥४॥॥८२१८॥द्रौपदीसी क्रोध आला । काय बोले पापिष्टाला ॥१॥जळो तुझी जिव्हा झडो । तुझा प्राणरे बिघडो ॥२॥नाश होईल तुझी काया । नरका जाशील तूं राया ॥३॥बोले द्रौपदी निधना । तुका ह्मणे सत्य जाणा ॥४॥॥८२१९॥करुं नको चिंता । तुझी नवरी नेमिली आतां ॥१॥गदा मांडीवरी । बैसे ते तुझी नोवरी ॥२॥मंडप रणांगणी । फळ साडे शंख ध्वनी ॥३॥वर्हाड मिळेल्क तें फार । विधवांतील सुंदर ॥४॥मंगलसूत्र नाहीं । तुका ह्मणे सत्य पाही ॥५॥॥८२२०॥ऐकोनियां शब्द क्रोधावला भारी । पतिव्रता नारी ह्मणविसी ॥१॥पांच पती तुला असती भ्रतार । बोलसि बडिवार सभेमाजि ॥२॥वेश्येचे जातीची अससी कामिनी । चंचळता मनीं फार तुझ्या ॥३॥द्रौपदीतें बोले नष्ट दुर्योधनु । सध्या मृत्यु जाण तुका ह्मणे ॥४॥॥८२२१॥बंधुराया आतां काय पाहतोसि । फेडावें वस्त्रासी करी नग्न ॥१॥इची लज्जा सर्व दाखवी जनासी । सुहृद नयनासी सर्वाचिया ॥२॥शब्द ऐकोनियां केला असे धांवा । धांवे तूं माधवा दीनबंधू ॥३॥गोविंदा केशवा मुकुंदा ये हरी ॥ संकट निवारी तुका ह्मणे ॥४॥॥८२२२॥अनंता केशवा यावें वासुदेवा । देवाधीदेवा जगत्पती ॥१॥नारायणा यावें पावे तूं श्रीधरा । यावें दामोदरा बंधुराया ॥२॥आदीमूर्ती यावें पावे बा श्रीपती । धन्य तुझी कीर्ति त्रिभुवनीं ॥३॥कृष्णारामा यावें पाहे बा हृषीकेशी । सांभाळी ब्रिदासी तुका ह्मणे ॥४॥॥८२२३॥येई आत्मारामा येई मेघश्यामा । सृष्टीकर्ता ब्रह्मा बाळ तुझें ॥१॥सहस्त्रवदन शेष तो भागला । नाहीं त्या कळला अंत तुझा ॥२॥संख्या नाहीं इंद्रा संख्या नाहीं चंद्रा । कोण गणी रुद्रा संख्या तुझी ॥३॥ऐसे ते भागले माझी मती सान । येई तूं धांवोन तुका ह्मणे ॥४॥॥८२२४॥ऐसी ऐकोनी करुणा । धांवे वैकुंठीचा राणा ॥१॥वायु पाठीसी लागला । तोही दुरी अंतरला ॥२॥लगबगां येवोनियां । उभा राहे तो कान्हया ॥३॥बहिणीचें समाधान । करी तेव्हां तुका ह्मणे ॥४॥॥८२२५॥आला हृषीकेशी न दिसे कोणासी । संतसज्जनांसी दृष्टी पडे ॥१॥अभक्तां शोधितां कोटी वर्षे झालीं । नाहीं त्या देखिलें कृष्णाजीसी ॥२॥द्रौपदीच्या भावा पावलासे देख । देखुनी धर्मराव संतोषला ॥३॥आतां नाहीं आह्मा भय कदाकाळीं । रक्षी वनमाळी तुका ह्मणे ॥४॥॥८२२६॥दुर्योधन ह्मणे काय दु:शासना । पहासी नयना असोनियां ॥१॥निरी आसडुनी वस्त्र तें फेडावें । जगी दाखवावे इचें ढोंग ॥२॥आज्ञा होतां त्यास फेडियेलें वस्त्र । दुजा पितांबर देखियेला ॥३॥हांसे तो चांडाळ इनें केलें ढोंग । सभेचा बेरंग तुका ह्मणे ॥४॥॥८२२७॥वदे दुर्योधन स्त्रियाचे चरित्र । वस्त्रामाजी वस्त्र नेसलीसे ॥१॥कितीक निघती पाहूं हो तमाशा । नको धरुं आशा ममता ईची ॥२॥त्यासी हो फेडितां निघालें पातळ । सोनें तें केवळ जाणिवेचें ॥३॥देखिलें पाटाव अमोलचि साचें । मोल नव्हे त्याचें तुका ह्मणे ॥४॥॥८२२८॥सोनतपेंठीची साडी हो देखिली । सुवर्णी गुंफिली मोतियानें ॥१॥मोतीचूर वस्त्र अमोल तें मोतीं । फांकलीसे दीप्ती सभेवरी ॥२॥सूर्यप्रभा तेथें खद्योताप्रमाणें । ऐसें वस्त्र जाणे देखियेलें ॥३॥नारायण पेठ आणिली भरणी । चाटी चक्रपाणी तुका ह्मणे ॥४॥॥८२२९॥खान्देश वर्हाड माळवा गुर्जर । कर्नाटक फार वस्त्रें देखा ॥१॥छपन्न देशींची वस्त्रें नेसविलीं । वर मुद्रा केली अवतारांची ॥२॥अठयायशी सहस्त्र होते ऋषेश्वर । प्रतिमा सुंदर रेखियेल्या ॥३॥तेहतीस कोटी इंद्रादिक देव । रेखिले गंधर्व तुका ह्मणे ॥४॥॥८२३०॥चवदा भुवनें रेखिलींशी जाण । आकृती करुन ठसे दिले ॥१॥ब्रम्हा विष्णु रुद्र अष्टवसु तेथें । तैसे मूर्तीमंत रेखियेले ॥२॥आतळ वितळ सप्तही पाताळें । वरी नागकुळें रेखियेलीं ॥३॥नवनाग कुळें वस्त्रावरी मुर्ती कटींगु प्रगती तुका म्हणे ॥४॥॥८२३१॥नवखंड सारी काशी वाराणसी । ठसे त्या वस्त्रासी दिले असती ॥१॥गंगा ते यमुना सरस्वती गोदा । मूर्तीमंत सदा वस्त्रावरी ॥२॥कावेरी त्रिवेणी भद्रावती जाण । ठसे हे रेखून केली मुद्रा ॥३॥द्रौपदी मातेचा न दिसे अंगुष्ठ । तुका म्हणे स्पष्ट उभा हरी ॥४॥॥८२३२॥जळांतल्या मुर्ती काढी नवलक्ष । परिवार मत्यक्ष्य रेखियेल्या ॥१॥पक्षाची आकृती ठसे दहा लक्ष । रेखिलें प्रत्यक्ष वस्त्रावरी ॥२॥श्वापदांचे ठसे वीस लक्ष कोटी । वीस लक्ष झाडें काढियेलीं ॥३॥गिरी द्रोण ठसे साडीवरी दिले । दुजे नवविले तुका ह्मणे ॥४॥॥८२३३॥वैकुंठ कैलास काढी ब्रह्मसभा । रेखिला पद्मनाभा वैकुंठीचा ॥१॥वरुण सभेची काढिली आकृती । पतिव्रता सती रेखियेली ॥२॥सती तारामती सती अनुसुया । धन्य कृष्णराया तुका ह्मणे ॥३॥॥८२३४॥वैकुंठीची वाटी आणिली भरणी । केली पाठवणी बहिणीची ॥१॥वस्त्रांचे ढिगार पर्वताप्रकार । घडले अपार कोण गणी ॥२॥देवपितांबर शेवटीं नेसली । हात कोण घाली पितांबरा ॥३॥लावितांची कर सुदर्शन मुक्त । करील नि:पात तुका ह्मणे ॥४॥॥८२३५॥दुर्योधनराव बहु कष्टी झाला । बोले त्या बंधुला पुरे करी ॥१॥भागलासी बारे शिणलासी थोर । न कळे चरित्र ईश्वराचें ॥२॥पुरे करीं आतां वस्त्रें हीं ठेवावीं । भांडारीं रक्षावीं बहु प्रयत्नें ॥३॥दु:शासन गेला वस्त्रें झालीं गुप्त । कांहीं नाहीं तेथें तुका ह्मणे ॥४॥॥८२३६॥धन्य धन्य महाराज । केलें बहिणीचें काज ॥१॥सभा विसर्जन झाली । सती एकांतीं बैसली ॥२॥तुज सारिखा रे बंधु । तुका ह्मणे कृपासिंधु ॥३॥॥८२३७॥तुज नाहीं गांजियेलें । देवकीसे छळीयेलें ॥१॥याचें उसनें घेईन । पांच वर्षे झालीं पूर्ण ॥२॥धर्म वचना गुंतला । मौन्य धरोनी बैसला ॥३॥अहो करितों कुळक्षय । तुका ह्मणे हो निश्चयें ॥४॥॥८२३८॥बाई करुं नको चिंता । त्यासी निर्दाळितों आतां ॥१॥मज उशीर लागला । फट फावलीसे याला ॥२॥जरी मी असतों येथें । खेळूं न देतों दुष्टा तेथें ॥३॥तुज गांजियेलें बाई । तुका ह्मणे सुख नाहीं ॥४॥ N/A References : N/A Last Updated : July 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP