मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे| श्रीकृष्णजन्म चरित्रे नृसिंहअवतारचरित्र प्रल्हादचरित्र श्रीवामन अवतारचरित्र परशुराम अवतारचरित्र श्रीरामजन्म श्रीरामचरित्र सीताशोक श्रीकृष्णजन्म कृष्णचरित्र १ कृष्णचरित्र २ कल्की अवतार कालयवनवध रुक्मांगद राजाचें चरित्र अंबऋषी राजाचें चरित्र भानुदास चरित्र श्रीयाळ चरित्र धांवा द्रौपदीचा मयुरध्वज चरित्र सुदाम चरित्र दामाजीपंताचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र दुसरें द्रौपदी वस्त्रहरण सांवतामाळीचरित्र हरिपाळचरित्र ८२४१ ते ८२५० ८२५१ ते ८२६० ८२६१ ते ८२७१ ८२७२ ते ८२८० ८२८१ ते ८२९० श्रीकृष्णजन्म तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगचरित्रतुक्राराममराठीसंत श्रीकृष्णजन्म Translation - भाषांतर ॥८००८॥धन्य धन्य नारी । नांदताती घराचारी ॥१॥ऐशा सुखा पात्र झाल्या । भक्तिप्रेमासी भुलल्या ॥२॥ज्यासी जैसा भाव । तयालागीं प्राप्ती देव ॥३॥तुका ह्मणे सांटी जिवा । भेट द्यावी वासुदेवा ॥४॥॥८००९॥दुष्टाचिये घरीं दुश्चिन्हें उदेलीं । नक्षत्रें निघालीं शेंडियेसी ॥१॥विजेचा कल्लोळ वायु झुंजाभार । पर्जन्य अपार दृष्टी केली ॥२॥दिवसा भुंके भालू भुंक गंधर्वाची । मार्जारें भांडती द्वारापुढें ॥३॥उलुक ते गृध्र घरामाजी जाती । कावळे करिती कीरकीर ॥४॥तुका ह्मणे भय दुष्टा धरी मनीं । भक्तांचे सदनीं सुख झालें ॥५॥॥८०१०॥आनक दुंदूभी यशोदे सुंदरी । कंसाचिया घरीं बंदिखानी ॥१॥याचे पोटीं पुत्र होईल आठवा । कंसालागीं तेव्हां मारील तो ॥२॥तयाचिये धाकें राही जिवापरी । रक्षपाळ द्वारीं ठेवियले ॥३॥जेव्हां होय सूत येउनियां मारी । आठवा श्रीहरी जन्मकाळ ॥४॥स्तब्ध होई सर्व ही आधीं पृथिवी । ठायीं ठायीं गोंवी मौनमुद्रा ॥५॥सात पुत्र त्याचे कंसानें मारीले । श्रीकृष्ण जन्मले वंशधारी ॥६॥अजन्म्यासी जन्म कैसा घदो शके । दावी भक्तसुख भक्तां लागीं ॥७॥तुका ह्मणे उभा भक्तिचिया पुढें । दावी वाडें कोडें कवतुक ॥८॥॥८०११॥पांडुरंगा तुह्मा भक्तांची करुणा । येती नारायणा दया बहू ॥१॥जिवाबरोबर आवडती भक्त । ऐसा कृपावंत नाहीं कोठें ॥२॥करुणेचा सिंधू सिमा नाहीं दये । भक्तांसी अभय पूर्ण तूझें ॥३॥तुका ह्मणे तुह्मी सर्वस्वें उदार । बळीचें हें द्वार राखीतसां ॥४॥॥८०१२॥अनाथ दुर्बल नाहीं कोणी दीन । वाचकाचा मान राखियला ॥१॥गाईचें पाळण दया सर्वाभूतीं । वैराची हे जाती नाहीं केली ॥२॥अज वृक व्याघ्र शशक कुरंगें । निर्वैर ते संगें क्रिडताती ॥३॥नाहीं कोणा भय विचारती मही । आनंद सर्वही जिवांप्रती ॥४॥तुका ह्मणे काळ आज्ञा वाहे शिरीं । जेथें नाहीं उरी यमभया ॥५॥॥८०१३॥यथा काळीं मेघ वर्षती सांगतां । आज्ञा वाहे माथां इंद्रराणा ॥१॥नाहीं उरीं रोग दैन्य दरिद्रासी । कळी काळ पीशीं झालीं ठेवा ॥२॥यातीच्या आचारें वर्तती स्वधर्म । क्रिया नित्य नेम राहटती ॥३॥तुका ह्मणे प्रजा पाळिता हे कैसा । पुत्र स्नेह जैसा लडिवाळ ॥४॥॥८०१४॥वेद आज्ञा वर्ण धर्माचें पाळण । संरक्षी ब्राम्हण पूजानेमें ॥१॥जया जें पाहिजे तयासी ते काळीं । देवूनी सांभाळी द्विजवृंदें ॥२॥दिधलीं वेतनें बैसलिया ठायीं । मागावें हें नाहीं पुन्हा ऐसें ॥३॥पातलिया जरी पर्व पितृतीथी । न मिळे अतीथि धुंडीतांही ॥४॥तुका म्हणे महीमंडळ शोधीतां । नाहींच मागता ऐसें केलें ॥५॥॥८०१५॥दिससी मुरारी । प्रौढ डोळिया माझारी ॥१॥ऐसें धरुं नको रुप । होय सुंदर स्वरुप ॥२॥मायावेष दिसे स्वप्न । साच न देखे नयन ॥३॥माता बोले ऐके कानीं । बाळ आला जगदानी ॥४॥तुका ह्मणे भक्ति श्रेष्ठ । देव चोखितो अंगुष्ठ ॥५॥॥८०१६॥देवकीचे पुढें उभा होता हरी । त्यासी नानापरी विनवितसे ॥१॥बाळ होई आतां वैकुंठीच्या राया । सखया माझिया ऐसें ह्मणे ॥२॥माझिया उदरीं जन्मलासी ऐसा । जगामाजि ठसा करी ऐसा ॥३॥लेंकरुं होईन गोकुळासीं न्यावें । ऐसें हें केशवें सांगितलें ॥४॥तुका ह्मणें ऐसें सांगोनियां हरी । बाळवेष धरी बंदिशाळे ॥५॥॥८०१७॥देवकी जंव पाहे हरी झाला बाळ । विसरली सकळ सांगितलें ॥१॥वसुदेवाप्रती देवकी बोलत । गोकुळा त्वरित यासीं न्यावें ॥२॥वसुदेव म्हणे सांग गे मजसी । कैसा गोकुळासी जाऊं आतां ॥३॥गोकुळासी जाऊं कोणत्या रितीनें । रक्षण कंसानें केलें आहे ॥४॥ऐसा काकुळीत पाहे हरीकडे । उघडी कवाडें क्षणामाजि ॥५॥बिडी होती पायीं तुटली तात्काळ । राक्षस सकळ झोंपियले ॥६॥ऐसें पाहोनियां चालिला घेवोनि । देवकी येवोनि मुख पाहे ॥७॥ह्मणे आतां बाळा कधीं भेटि देसी । बोलतां नेत्रांसीं पाणी आलें ॥८॥ऐसा तुझा महिमा स्वामी पंढरिनाथा । तारी मज आतां तुका ह्मणे ॥९॥॥८०१८॥बंदिशाळे बाहेर जातां वसुदेव । मेघ तो वर्षाव करितसे ॥१॥ऐसें विलोकुनि धांवें फणिवर । हरीवरी छत्र धरियेलें ॥२॥पुढें जंव चालिला आडवी यमुना । आतां नारायणा काय करुं ॥३॥ऐसें ह्मणोनियां उदकीं प्रवेशत । यमुना चढत वरवर ॥४॥आकंठ उदक झालें वासुदेवा । करितसे धांवा तुझा हरी ॥५॥तये काळीं चरणीं स्पर्शली यमुना । दोन भाग जाणा झाली तेव्हां ॥६॥ऐसा तुझा महिमा स्वामी पंढरिराया । लागतसें पाया तुका ह्मणे ॥७॥॥८०१९॥उतरुन यमुना वसुदेव चालिला । आला गोकुळाला लवलाहे ॥१॥नंदाचिये गृहीं जाऊन उभा राहे । चहुंकडे पाहे विलोकुनि ॥२॥झोंपेंत निमग्न यशोदा सुंदरी । ठेवोनियां हरी घेत माये ॥३॥मायेसीं घेऊनि आला मथुरेंत । बिडीहो त्वरीत पडे पायीं ॥४॥ऐसा हो ठकला मायेसीं घेवोन । मागुती बंधन पावला तो ॥५॥बंदिशाळे आंत रडतसे माया । जाणविती राया तेव्हां दूत ॥६॥देवकी प्रसृत झाली म्हणोनियां । आला धांवोनियां कंस तेथें ॥७॥देवकीस ह्मणे कोठें तुझा बाळ । देई हो तत्काळ मजपाशीं ॥८॥तये काळीं तया देवकी बोलत । सोडा एवढा सूत कंसराया ॥९॥रात्रिमध्यें त्यानें नाहीं ओळखिलें । पाय ते धरिले बाळकाचे ॥१०॥तिसी आपटितां गेली निसटून । वरती जाऊन काय बोले ॥११॥कैसा तुझा काळ वाढे पृथ्वीवरी । अवतरले हरी तुझ्या वधा ॥१२॥तुजला वधुनी मथुरा घेईल । राज्य हें देईल उग्रसेना ॥१३॥ऐसें ह्मणोनियां तेव्हां गुप्त झाली । कंसास लागली चिंता फार ॥१४॥प्रधान कारभारी बोलावी तयासी । तो म्हणे मजसी मारुं पहातां ॥१५॥ऐसा बा तूं धाक लावियेला तया । तुका ह्मणे राया पंढरीच्या ॥१६॥॥८०२०॥नंदाचे सदनीं निजलासे हरी । यशोदा सुंदरी जागी झाली ॥१॥पुढें जंव पाहे वैकुंठनाथासी । आनंद मानसीं न समाये ॥२॥यशोदेचे उदरीं जन्मला ह्मणोनी । धांवती गौळणी गोकुळींच्या ॥३॥गोकुळीचें द्विज धांवतच आले । नंदें उभारिलें मंडण द्वारीं ॥४॥गर्गमुनी तेव्हां नंदासी म्हणत । उठ हो त्वरित स्नानालागी ॥५॥उठोनियां नंद स्नानासी चालिला । म्हणे सेवकांला आणा पाणी ॥६॥स्नान करुनियां पुण्य़वाचन करी । पहावया हरी जात वेगीं ॥७॥बाळ विलोकुनी नंद आनंदला । मधु तो घातला मुखामाजि ॥८॥हरीचें हें रुप पाहुनियां डोळां । वाटितो द्विजाला रत्नें तेव्हां ॥९॥गौळी आले तेव्हां आहेर घेऊनी । नंदासी पुजोनी आनंदले ॥१०॥यशोदेसी हळदीकुंकुम लावोनी । बोलती गौळणी एकमेकां ॥११॥एक म्हणे हा गे दिसतो हा बाळ । त्रिभुवन घालील पालथें हें ॥१२॥एक म्हणे तेव्हां तुझ्या नखावरुनी । जाऊं ओंवाळुने बाळकारे ॥१३॥हरीचें हें रुप दिसतें सुंदर । उणा दिनकर वाटे मज ॥१४॥एक म्हणे ऐसी नको बोलूं गोष्टी । बैसलीसे राणी नंदाची ही ॥१६॥॥८०२१॥ज्याचिये मंदिरीं उपजला श्रीपति । केशरानें भिंती लिंपियेल्या ॥१॥वरताचा दिवा मोत्यें जडलीं त्यासी । खालीं हृषीकेशी निजलासे ॥२॥पलंगाचे पुढें चौरंग मांडिला । यशोदा हरीला घेऊन बैसे ॥३॥दोघी विडे देती त्रयोदशगुणी । पीकपात्र धरुनी उभी एक ॥४॥कनकांबराची बुंथी घेऊनी बैसत । आनंद चित्तांत न समाये ॥५॥भोंवते मिळाले ब्राम्हण बहुत । गर्गमुनी होता पुढें उभा ॥६॥नंद ही बैसत आनंदेकरुनी । तुका म्हणे धुणी पापाची ही ॥॥८०२२॥हात पाहोनियां म्हणे हा श्रीरंग । धन्य तुझें भाग्य वर्णवेना ॥१॥यशोदेसी म्हणे जगाचा जीवन । कमलनयन पुत्र तुझा ॥२॥जियेच्या उदरीं उपजला श्रीपती । बहु जपताती वैरी यासी ॥३॥महाविषें स्तन भरुनी कामिनी । तिसी चक्रपाणी मारील हा ॥४॥चंडवायू यातें घेऊनी जाईल । विजयी होईल तरी तेथें ॥५॥अंगावरी गाडा हरीच्या येईल । त्यासी रगडील पायांतळी ॥६॥दोन वृक्ष यावरी पडती मोडुनी । त्यांसी चक्रपाणी उद्धरील ॥७॥चोरी करोनियां गोरस भक्षील । गवळणी मोहील गोकुळींच्या ॥८॥तुका म्हणे यासी असे सर्पभय तेथें हरी जय पावेल हा ॥९॥॥८०२३॥गौळियाचे कुळीं जन्मला वनमाळी । माझा वनामाळी परब्रम्ह ॥१॥काय पुण्य माझ्या वसुदेवनंदांचें । रत्न वैकुंठीचें पोटीं आलें ॥२॥जन्मतांचि कान्ह्या वाजवी गाई पान्हा । भाकडा खडाणा त्याही वळत्या ॥४॥गर्गऋषेश्वरें लिहिली पत्रिका । कृष्ण तिहीं लोकां मुकुटमणी ॥५॥दुष्ट भावें आली पुतना सोशिली । कृष्णस्पर्शे गेली मोक्षपदा ॥६॥तुका म्हणे हेंचि भक्तींचे निज गुज । निर्गुण हें सहज गुणा आलें ॥७॥॥८०२४॥आनंदी आनंद । यशुमती घरी नंद ॥१॥घरोघरीं ब्रह्मज्ञान । कथा पुराण कीर्तन ॥२॥केलें संतर्पण । दिलें ब्राह्मणासीं दान ॥३॥तुका ह्मणे देव । स्वर्गी पाहती उत्सव ॥४॥॥८०२५॥विश्वाचा जनिता घातला पाळणा । केलें नामकर्णा संदीपानें ॥१॥श्रीकृष्ण गोंवळा भक्तप्रतिपाळ । दुष्ट दैत्यां काळ जन्मलासे ॥२॥गाई ब्राह्मणांसी गोपाळांसी रक्षी । चित्ताचा हा साक्षी नारायण ॥३॥गोपिकांची प्रीति कामभोग रती । योगियांसी प्राप्ती नाहीं ऐसी ॥४॥कंसादि असुर मारील समरीं । सोन्याची नगरी सिंधुपोटीं ॥५॥धर्मासी संरक्षी पार्थाचा सारथी । त्रिभुवनीं कीर्ति रुढ ज्याची ॥६॥तुका ह्मणे जें जें बोलावें वचन । तें तें नारायणा शोभा दिसे ॥७॥॥८०२६॥तुजविण मज न कंठवे हरी । उचलुनी करीं कडीयेसी ॥१॥देखोनि राधिका हरिखला देव । रांगतचि जाय हांसोनीयां ॥२॥चुंबोनियां मुख दिलें आलिंगन । जीवें निंबलोण करुं पाहे ॥३॥नेऊनियां घरीं भोगिले अनंता । जैसें होतें चित्ता तैसेपरी ॥४॥पूर्व तपाची या दीधली जी भाक । लाधली तें सुख धणीवरी ॥५॥नित्यानित्य त्याचा विसर न पडे । उभी द्वारापुढें प्रात:काळी ॥६॥तुका ह्मणे ज्याचा भाव जैसा चित्तीं । तैसा तो श्रीपति त्या लागीं ॥७॥॥८०२७॥ऋण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासीं ॥१॥शिण झाला वसुदेवदेवकीसी । वधी बाळकांसी दुराचारी ॥२॥दुराचारी यासी नाहीं भुतदया । आपपर तया पापपुण्य ॥३॥पुण्यकाळ त्याचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥४॥गर्भी तियेचिया आले नारायण । तुटती बंधनें आपें आप ॥५॥आपें आप बेडया तुटती सांखळ्या । बंधाच्या आगळ्या कडिया कोडें ॥६॥कोंडमार केला होता बहुत दिवस । सोडवी निमिष न लागतां ॥७॥न कळता त्यांसी सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ॥८॥नंदाघरीं जातां येतां वसुदेवा । नाहीं झाला गोंवा सवें देव ॥९॥सवें देव तया आड नये कांहीं । तुका ह्मणे नाहीं भय चिंता ॥१०॥॥८०२८॥फिरविलीं दोनीं । कन्या आणि चक्रपाणी ॥१॥झाला आनंदें आनंद । अवतरले गोविंद ॥२॥तुटलीं बंधनें । वसुदेव देवकीचीं दर्शनें ॥३॥गोकुळासी आलें । ब्रह्म अव्यक्त चांगलें ॥४॥नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपति ॥५॥निशीं जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥६॥आनंदली मही । भार गेला सकळही ॥७॥तुका म्हणे कंसा । आट भोंविला वळसा ॥८॥॥८०२९॥सोडियेल्या गांठी । दरुषणें कृष्णभेटी ॥१॥करिती नारी अक्षवाणें । जीवभाव देती दानें ॥२॥उपजल्या काळें । रुपें मोहिलीं सकळें ॥३॥तुका ह्मणे तेथें बारी । एकी आडोनी दुसरी ॥४॥॥८०३०॥मुख डोळां पाहे । तैशीच ते उभी राहे ॥१॥केल्याविण नव्हे हातीं । धरोनी आरती परती ॥२॥न धरिती मनीं । कांहीं संकोच दाटणी ॥३॥तुका ह्मणे देवें । ओस केल्या देहभावें ॥४॥॥८०३१॥गोकुळींच्या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥१॥बाळकृष्ण नंदा घरीं । आनंदल्या नरनारी ॥२॥गुढिया तोरणें । करिती कथा गाती गाणें ॥३॥तुका ह्मणे छंदें । येणें वेधिलीं गोविंदें ॥४॥॥८०३२॥विटंबिलें भट । दिला पाठीवरी पाट ॥१॥खोटें जाणोनी अंतर । न साहेचि विश्वंभर ॥२॥तेंचि करी दान । जैसें आइके वचन ॥३॥तुका ह्मणे देवें । पूतना शोषिली जीवें ॥४॥ N/A References : N/A Last Updated : July 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP