॥मान॥ १२०

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


॥श्रीरामसमर्थ॥

॥पद॥ (राग धनाश्री ॥ धाट जप रे मना) अभ्यासें पाविजे देवा ॥धृ०॥
श्रवणमनननिजध्यासें समाधान । भक्ति आत्मनिवेदन ॥१॥
आत्मप्रचिती जाण शास्त्रनिरुपण हें चि साधु सांगे खूण ॥२॥
ज्ञाननिरुपण वस्तुसि पावणें । रामीरामदास म्हणे ॥३॥

॥वोवी॥ वानिता जयाची न लागे धाक । अंतरींच निवाले शेष ब्रह्मादिक । तो देव सनातन जगन्नायक । अभ्यासें तया पावाव ॥१॥
तरि असे संसारिका बहु अभ्यास । सोस विषयाचा कामीं अध्यास । युक्ति सर्व जाणती वादती भल्यास । देवप्राप्तीखूण हे नव्हे हो ॥२॥
तंव श्रोते पुसती जन आणि सज्जन । करिती तें हें येक चि साधन । फळप्राप्ती कां सांगावी भिन्न । परिश्रम दिसे समची ॥३॥
वक्ता करी तैं समजाविसी । अवघे आहे हें क्रियापासीं । पुरुषसुख वाटे पराव्यापासी । परि संततीसह युवती अमान्य ॥४॥

॥श्लोक॥ अ० संतासरी युक्तिकळास दावितीं । संसारिकीं कामफळासि इत्छिती । कपर्दिकाला करि रत्न साटवा । थोरीवलाभू न मिळोच साचवा ॥१॥
चांडाळा धरिं ब्राह्मणा विटविता मान्यत्व कीं होइना । दुग्धामाजिं इलूस मद्य मिळतां अर्पू भल्या येइना ॥
तैस साधन थोर सार परि तें कामाकुळीं नासती । धन्य तो परमार्थ भाव धरुनी सायुज्यता पावती ॥२॥

॥अभंग॥ दावो करामती मिळवो संपती । कळो बहु युक्ति संसारिक ॥१॥
करो अनुष्ठान भविष्य सांगण । लोका रिझवोन पूजा घेवो ॥२॥
रणांत विभांडो निचेष्टीत पडो । सुख तें विघडो स्वर्गद्वार ॥३॥
आत्मारामप्राप्तीसाधन हें नव्हे । सकृपेचि सोय वेगळीच ॥४॥

॥वोवी॥ ऐकिल मनन तें करि धरी ध्यास । देवास पाऊं हा थोर अभ्यास । म्हणाल श्रोते हो सर्वत्रास । साधन घडतें हें परी नव्हे ॥५॥

॥अभंग॥ नानाप्रकारिची खबरी ऐकती । मनास आणिती जडे ध्यास ॥१॥
होती समाधान वेचुं पाहती प्राण । दाविती वचनें आधाराची ॥२॥
पुस्तक वाचिती साधूसी झटती । वदती वस्तुप्राप्ती हें चि ज्ञान ॥३॥
यया अभ्यासानें केवीं पावे देव । दाविता लाघव संदेहीक ॥४॥
सद्गुरुकृपेनें साधन वैभव । लाहतां स्वमेव आत्माराम ॥५॥

॥वोवी॥ अध्यात्म अद्वैत ज्ञानश्रवण । पुन्हां तयाच घडाव मनन । निजध्यासें पाविजे समाधान । भक्ति निवेदन घडावी ॥६॥
आणावे आपुल्या भावी प्रत्यय । श्रृतीशास्त्रसारांशीं जाणोन प्रमये । साक्षी वदावें महानुभाव । देवराव तेव्हां स्वतसित्ध ॥७॥
ज्ञाननिरुपणावाचुन कांहीं । साध्येसि वस्तु ते येणार नाहीं । अभ्यास वर्म हें ठेऊन हृदईं । देवाधिदेवा पावावें ॥८॥

॥अभंग॥ देवासि शोधितां स्वयें होय आंग । न साहे चि संग मग कांहीं ॥१॥
चिन्हें उमटती फाके क्रीया कळा । घेता सुधा प्याला जयापरी ॥२॥
आपणासारीखें करिती आनासी । खेळे या अभ्यासीं आत्माराम ॥३॥

॥वोवी॥ ऐसियापरी करीत प्रबोध । सद्भक्तलोका दावीत छंद । चालिले सद्गुरुब्रह्मानंद । दीनवछळु दयानिधी ॥९॥
मागील कथेचे पादप अग्र । रामचंद्रस्वामी अपचंदकर । पावोन सद्भावें साक्षात्कार । राहिले सज्जनगडांत ॥१०॥
करवोन तेथें महानैवेद्य । रात्रौ कीर्तन केलें आनंदे । मिळाले होते जे भक्त संतवृंद । परमोल्हास मानिले ॥११॥

॥पद॥ साधु देखतां मानस निवे सप्रेम दुणावे । सहज नासती भवभ्रमयावे । निजपदवी फावे ॥धृ॥
मिथ्यामायेचा विचार सारा । कळला ऊपचारा । जैसा जळधीचा मृगांबु सारा । हा दृश्य पसारा ॥१॥
ऐसा सद्गुरु योगिराजा तो स्वामि माझा । स्मरतां कल्याणें तरला सहजा । शिव घाली पैंजा ॥२॥

॥पद॥ सो नर नहिं बा रे नहिं बा रे । सब दुनियासे न्यारे ॥धृ०॥
कांचन मोतीए उकर देखे । वो तो खाक बराबर लेखे ॥१॥
प्रीत नजरसे कामिनी देखे । वो तो मात बरोबर लेखे ॥२॥
कोई मान करे कोई मूपर मारे । दोनो उनकु प्यारे ॥३॥
उत्धवचिद्धन गावत जी ये । भिस्त निशान लगाये ॥४॥

॥श्लोक॥ अज्ञाना ज्ञानभर्ता स्वजनवनि वसे श्रीगुरु मोक्षदाता । सामर्थ्या पार नाहीं अघटित करणी वेदवेदांतवक्ता । नानापंथें पहाता अगणित गणिता दूसरा नाहिं त्राता । कृपेचा सिंधु मोठा सकळ जनपदीं तारणें हे चि सत्ता ॥१॥

॥पद॥ धाट कुट ॥ संगति साधूची मज जाली । निश्चळ पदवी आली ॥धृ०॥
सर्वी मी सर्वात्मा ऐसी अंतरी दृढ मति जाली । जागृतिसहित अवस्छा तुर्या स्वरुपीं समुळ निमाली ॥१॥
बहु जन्माची जपतपसंपती । विमळ फळेसीं आली । मी माझें हे सरली ममता समुळी भ्रांति विराली ॥२॥
रामी अभिन्न दास असि हे जाणीव समुळीं गेली । न चळे न कळे अढळ कृपा हे श्रीगुरुरायें केली ॥३॥

॥वोवी॥ मग चाफळास आले पांच दिन । यात्रा संपादिलें सांग विधान । सप्रेमभरें केलें कीर्तन । येक दोन वचन अवधारा ॥१२॥

॥पद॥ देखिला रे राम देखिला रे । जन्ममरण घोर सर्व तुटला रे ॥धृ॥
चराचरीं राम निजात्मदृष्टीं । पाहतां भवसिंधु आटला रे ॥१॥
श्रीराम व्यापक जिवीं जिवाचा । जीवशिव भिन्नभाव खुंटला रे ॥२॥
जो नित्य शाश्वत कल्याणदानी आपरुप आपणासि भेटला रे ॥३॥

॥पद॥ ज्याके ज्यानकिनाथ न प्यारे । ताके मातापिता और सुहृदजन वाको मुखही काले ॥धृ॥
येक बुंद गंगाजल नीको धीग थिर्लको पानी । हरिदासनके चेरी उपर वारो राजाजीकी रानी ॥१॥
भरथ तजी जननी आपनी पिटा तज्यो प्रहरादा । बंधु तज्यो ते ऋषीपतनी जग पुरुष जोदीष ॥३॥
अभगतको धर दधी घृत कुकरमुत समान । हरिदासके भाजी उपर वारो वारो डारो पकवान ॥४॥
मेरे माता पिता और सुहृदजन सबही हरजीके दास । कहे जनजसबंत हरिभजन बीन ज्योकोदरके घास ॥५॥

श्लोक । सुखार्णवाचे गुण आठवावे । मनांतरीं ते मग सांटवावे । जनीं जनाचे गम नाठवावे । पदार्थ रामार्पण लूटवावे ॥१॥
उदासवृत्ती हृदई धरावी । अत्ध्यात्मविद्या मग वीवरावी । प्रपंच माया झट आवरावी । रतीपतीची चट नावरावी ॥२॥
निरावलंबी विवरत जावें । सोहंपणाला मननीं तजावें । आच्यार्यपद्मीं कमळीं पुजावें । गोविंद जिव्हे स्मरणीं रिझावें ॥३॥
हरादिकाचें निजगूज गावें । नि:कामबुत्धि सज्जनीं जगावें । माईक सर्वै निरसी जगावें । श्रीराम नस्तां मग ना जगावें ॥४॥
श्रीरामनामीं रत सूमना रे । सध्याच सर्वै मनकामना रे ॥ सर्वस्व वाहे बळि वासना रे । ब्रह्मांड भेदी मग जा मना रे ॥५॥
भृभंगमात्रें त्रैलोक्य जाळी । त्या शंकरातें विषपंक जाळी । श्रीरामनामांमृत वीष जाळी । तें नाम घेता अघ सर्व जाळी ॥६॥
चराचरीं ठाण रघोत्तमाचें । हें वाक्य गर्जे भविष्योत्तमाचें । ममताश्रमी जें रजोत्तमाचें । त्या प्राप्त कैचें सुख उत्तमाचें ॥७॥
अनाथबंधु निजसूखदानी । भक्ताभिमानी पुरवी निदानीं ॥ जडजीव नामें नामाभिदानी । अगणित केले कल्याणदानी ॥८॥

॥पद॥ सोरट॥ धरा धरा सांवळीमूर्ति मनीं ॥धृ०॥
रविकुळविभुषणी धनुशरधारिणी । असुरकुळ संहारिणी ॥१॥
ध्यातसे निसिदिनीं तत्पर होउनी । शिवनिजहृद्भुवनीं ॥ अयोध्यानिवासिनी दासाची स्वामिणी । पाहोनि निजनयनीं ॥३॥

॥वोवी॥ मानवोन श्रीरामा पावले मान । लक्ष्मणबावाचें तोषऊन मन । चालिले पुढारी पाहत क्षेत्रस्थान । येऊन सातारीं राहिले ॥१३॥
महंत विरक्तु परम दयाळ । सेऊनि भिक्षान्न कर्मिती काळ । उतरले ठाई मिळती प्रेमळ । होतसे कीर्तन नित्यश: ॥१४॥
जाणोन साधु हा सर्वज्ञ निस्पृही । जाले कितेकी सांग सांप्रदाई । मुख्य राजा जो वानितु नवाई । धन्य हा गोसावी रामदासी ॥१५॥
असो हें साहु येक असे थोर । संग्रहिलें असती ग्रंथ फार । करवितो पूजन पढतो आदरें । परि नसे हो त्याला अनुग्रह ॥१६॥
कोणते कोठें हो असो कां ग्रंथ । थोर ग्राम थोराला होता श्रुत । संग्रहोन भिडेनें कीं वेचून अर्थ । करुण श्रवण ठेवितो ॥१७॥
त्या स्वामीच कळता वर्तमान । बोलाऊन घेतला भक्तियुक्तिनें । करवाऊनिया मंगळस्नान । पक्वान्नफराळ करविला ॥१८॥
मानसीं तयाचे हे चि आस्था । विरक्तु हा करणारे ज्ञानकथा । राहवावें जेवाया रात्र होतां । राहोन करितील नित्यनेम ॥१९॥
कीर्तन कराया कोठें न जाती । यास्तव या मुक्तें केले आईती । उभेले तंव त्यानीं केली विनंती । महावाक्यार्थ विस्तारिजे ॥२०॥
हांसोन तयाला पुसिले देशिक । लोकांतिच कीं येकांत वाक्य । कळवितां त्याचा ऐकउं विवेक । येरु हें नुमजतां स्तब्धला ॥२१॥
स्वामिरायांनीं महा आनंदें । कैसेनि बोलावें हें वदोन पद । नेतिशब्द अर्थाते केलें विशद । तो वोळखा पद अर्थावरुनी ॥२२॥

॥पद॥ धृवक । कैसेनि बोलावें वाचें । स्वरुप हें श्रीरामाचें । शेष ही सीणला साच । वर्णायालागी राम ॥१॥
वेद तोही मौनावला । नेतिशब्द परतला । तन्मय होउनी ठेला जेथींचा तेथ ॥२॥
ज्ञानाज्ञानवृत्तीशून्य पूर्णरुप पुरातन । रामदास तनुमन अर्पिजे पदीं राम ॥३॥

॥वोवी॥ हें पदव्याख्या जालें कीर्तन । तृप्त न म्हणे चि गृहस्थमन । दुसरे दिवसीं आदरमान । पावोन कथेसी ठाकले ॥२३॥
महावाक्यरहस्य म्हणे गृहस्थ । गुरुराज वदलें सांगा कोणत । उत्तर सुचेना जाला तटस्थ । तंव कथेंत गाइले पद ऐका ॥२४॥

॥पद॥ सद्गुरु॥ गोंडाळे झांकिले जीवन गे बाईये । तैसा जगजीवन ॥धृ०॥
जड चंचळ होतसे गे बाईये । सर्व आटोनि जातसे ॥१॥
सावधासी सकळ कळे ॥गे०॥ दुश्चिताला कांहीं न कळे ॥२॥

॥सद्गुरु॥ पिंडब्रह्मांडमांडणी उभारणी पाहे खांजणी भांजणी ॥धृ॥
तेणें तूं सुटसी मना । संगत्यागें चुके संसारयातना ॥१॥
सदा श्रवणमनन निरंजनिं असावें अनन्यपणें ॥२॥
सोहं हंसा विचारी ब्रह्मास्मि ऐसें सदृढ धरीं ॥३॥
दास म्हणे रे गती बहुजन होते सज्जनसंगती ॥४॥
॥वोवी॥ महावाक्य अर्थु कळविता बहुपरी । समाधान न वटे गृहस्थअंतरीं । प्राथ:काळीं उठोन भवारी । प्रार्थितां ही पातले स्थळासी ॥२५॥
दुसरे दिनीं तो गृहस्थ सभेंत । जाणते लोकाला मिळवोन बहुत । पुसे न ठसला कां सांगा निजार्थ । तें विनविलें गुरुदया पाहिजे ॥२६॥
तेणें अनुतापें जाला मुमुक्षु । निजता मोक्षाची धरुन अपेक्षु । पातला परमार्थी होऊं दक्षु । नमित स्तवोन कींव करिता ॥२७॥
पद्मकर मस्तकीं बैसतां सदये । खुणेसि पावला घडला अनुग्रह । वेदांतग्रंथीच जें रहस्य आहे । कळलं वदे मी कृतार्थु ॥२८॥
दादोपंताचा पुत्र रामचंद्र । आणीक ही भाविकीं थोर थोर । घेऊन उपदेशु वर्तती सादर । धन्य रामदास प्रसन्नता ॥२९॥
पुसोन सद्भावें संतसाधुसी । ओपून वर अभय भक्तसिष्यासी । पातले हरिखत अपचंदासी । ईनाम भिक्षेचे धनासह ॥३०॥
जाहगीरादीक साहित्यसह । न पुरे चि करु देवगुरुउत्साह । हरिदासादि भिक्षुकी ब्राह्मणसमुह । तारतम्येनें संतोषती ॥३१॥
ज्योतीपंत सद्गुणी रटकलकर । वदे सुस्वप्नीं जोडूनि कर । भीमा माझा जो नेणता पुत्र । अनुग्रह त्यास करावा ॥३२॥
सांगून तैस चि पुत्राचे स्वप्नीं । कथोन धाडितां तो पातला सद्गुणी । जाला उपदेशु मानस्थ होऊनि । जाला परमार्थी सादर ॥३३॥
आणिक ही जाले सिष्यवर्ग भोळे । धन्य महिमा तो इतरा न कळे । बोलणें चि नाहीं निज जरी बोलिले । तो वाया न जाये अनुभव ॥३४॥
कवण करणें कीं उपदेश देणें । थोरीव सांगणें वटवटणें ज्ञान । दंभ मांडणें ना काकुलत करणें । नावडे चि हें विरागिया ॥३५॥
वैरत्व करितां घालितां किंत । मनास नाणिती पूर्ण विरक्त । चालवीत उपास्य राहिले मठांत । सिष्यवर्गसहित गुरुरायें ॥३६॥
दोनतीनसेंहेचा विदित पाक । कुण्बावकळा ते आस कीं ठाऊक । सिफायगरी तो शूर येक । समयप्रसंग ठावा जया ॥३७॥
काया झिजवाया नाहीं आळस । ज्ञान ध्यान कीर्तन वैराग्य सरस । पायकाहून चालणें विशेष । वैद्यपणांत जाणती ॥३८॥
जयाचिया मंत्रकटाक्षें केले सिष्यांनीं गोड लिंबवृक्ष । तपस्वी जैसा श्रीविरुपाक्ष । गुरुभक्त जैसा संदीपन ॥३९॥
वरदविषई तो विष्णुवर्ध । रुष्टल्या भासती दुर्वास वृत्ध । असो विदित ज्या कळा विविध । साबडेवत मठीं राहिले ॥४०॥
हक्क रुसुम पोहचल आस्ता सर्व ही । बाकीच वदताती जाहगीर गावीं । करिताती पीडा जिद्द सर्वदां ही । दंदी बहु बावा तो निस्पृही ॥४१॥
गुरें वळाया पाळती ठेऊन । पातले क्रूरांनीं स्वारी करुन । नदीतटीं राणीं गुरुमाल गोधन । लाहनथोर खिल्लार द्वयशत ॥४२॥
गोरक्षकाला धरोन युक्तिनें । करुन चालिले त्वरें गोग्रहण । लाग निघाला परि न चले प्रयत्न । वर्तमान कळलें बावासी ॥४३॥
सान सान गोवत्स अर्डा करिती । सायंकाळाची कराया आरती । दुग्धनैवेद्य नित्यश: दाविती । मठांत विश्रांती दुप्तची ॥४४॥
मुसाफरांनीं संतोष पाउं । सणवार सर्व ही साजिरे होउं । मर्‍हाटयजमाना वृतांत कळउं । आणाया गउं चालिले ॥४५॥
तो थोपवोन इकडे नदीतटीं गोधन । ठळक विश्वासिया ठेऊन रक्षण । नाघोरमारुतीपुढें शयन । केलासे पारी सरदार तो ॥४६॥
गुरुरायाचें देखोन येणें । तोंडावरि तो घेतल वसन । आला गुरुराया कोप दारूण । देउळामाजीं प्रवेशले ॥४७॥
विनविले देवा रे तुह्माविण । धरील आमुचा रे कोण अभिमान । धर्मकार्याला पक्षपात होण । उचित ही आसे प्रचिती ॥४८॥
यावरी छाटीच मग स्वल्पभस्म । कपींद्रकपाळीं चर्चिले प्रेमें । उभेले सन्मुखी जोडोन करपद्म । तात्काळ बलभीम पावला ॥४९॥

॥अभंग॥ धन्य भीमराय भक्ता होतो साह्ये । संपादितो कार्य जें असाध्य ॥१॥
मोठा अभिमानी न माने चि त्रास । येक चि विश्वास ठासलीया ॥२॥
ऐसा देवो कैंचा सर्वासि पाळिता । उबगु सर्वथा मानीना ची ॥३॥
आत्माराम भक्ति भजनीं तत्पर । सांभाळी त्या मित्र भाऊनीया ॥४॥

॥वोवी॥ सरदाराच्या उरी बैसोन । ताडितां मुखाब्जीं तळमळोन । मानितु पडल हे मज दुष्ट स्वप्न । वोढिला पदर पुनरपि ॥५०॥
पुन्हां देवानीं करितां ताडण । खरचि दु:ख ते सुजोन वदन । तुष्टवोन मम भक्ता वोपी गोधन । श्रवणीं हें वचन पडियल ॥५१॥
तो येऊन तात्काळीं धरोन पद । क्षमा कीजे जी ह्मणे अपराध । धन्य जालों मी तुमच्या प्रसादें । हरिपदकर लागले अंगासी ॥५२॥
गावकरी ही मिळाले येऊन । पूजिलें गुरुदेवा सुमन वसन । करविलें ससांग संतर्पण । गेले राहिले कीर्ति गात ॥५३॥

॥अभंग॥ नाघोरग्रामाची सत्यपुण्यभूमि । तारीफ निष्कामी बहु केले ॥१॥
नानापरी संत विसावोन गेले । प्रीतिनें ठेविलें सुकृतांश ॥२॥
पयबसवण्णा बीरजीतापीर । पूजा निरंतर होये ज्याची ॥३॥
भोळेभाविकाला स्वल्पभक्तिसाठीं । भीमजगजेठी पावतसे ॥४॥
स्वात्मानंद सूखदाता गुरुराय । पुण्यभूमि होय ह्मणतिलें ॥५॥

॥वोवी॥ कृष्णपय्या रुक्मण्णापंत । तिप्पण्णय्या कासीरामदीक्षित । सहजानंदप्पा पुंडलीकभक्त । तानपय्या मुदलिंग ॥५४॥
शिवरामस्वामी पूर्णानंद । अपचंदकरस्वामि ब्रह्मविद । भाळोन भक्तिला पावले आनंद । तें नाम न स्मरवें अपार ॥५५॥
फकीर जंगम भट्ट गोसावी । बाया सन्यासी हरिदास कवि । विसावोन गेले जया गावीं । प्रसन्न जेथें मल्लिकार्जुन ॥५६॥
पांडया जेथील कोनेरीपंत । कर्मनिष्ठज्ञानी श्रीगुरुभक्त । निर्वाणी नामा सुत उमाकांत । त्यापासाव घट हा दीनाचा ॥५७॥
वडिलानूवडिलीच फळल सुकृत । तरीच बळानें सद्गुरुनाथ । ईक्षोन दासाचा दाविलें सुपथ । सत्कृपापात्र जालों कीं ॥५८॥
सांभाळा श्रोतेनो क्षमा करुन । टाकोन संदर्भु कथिलों स्वकथन । हे ही गुरुकृपाप्रताप गहन । लीळा तयाची श्रवण करा ॥५९॥
प्रसन्न करुनि हणुमंतात । शरणांगताला दाऊन सुपंथ । मठासि पातले गोधनसहित । सेवा संपादित राहिले ॥६०॥
देखों न सकतां महंती करणें । नसतां चि आरोपु ठेविती निंदून । सादृश्य कुचेष्टा न चले ह्मणोन । करविता प्रयोग दुर्जनांनीं ॥६१॥
येती प्रयोगु परि बाधा न होये । रक्षिता जयाला श्रीगुरुराय । विकार येकदां जाला अतिशय । रामजन्म संपता ॥६२॥
प्रयोग आला तो जाले विकळ । हाहाकार करुं लागले सकळ । प्रगटोन अंतरीं अंजनीबाळ । वारुन विघ्न केला सुखी ॥६३॥
येकदां प्रयोजिलें निजेले ठाई । प्रगटोन अंतरीं अंजनीबाळ । वारुन विघ्न केला सुखी ॥६३॥
येकदां प्रयोजिले निजेले ठाई । तीन दिवस देहाच भान चि नाहीं । जानकीश जडलासे ध्यानरुप हृदई । समाधिस्त तैसें ऊठिले ॥६४॥
गुप्तरुप कुमत्यांनीं घातल विख । तनुत्याग करुं पाहे प्राण तात्काळिकें । निर्विघ्न केला हो कपिनायक । भक्त हा निधडा मानुनी ॥६५॥

॥अभंग॥ भाळलासे प्रेमें देव जयावरी । करितील वैरी काय त्याला ॥१॥
पालटोन विख सुधावत होये । अपाई उपाय होती सर्व ॥२॥
काळकृदांताच भय नाही । चिंतील हृदई पावे सित्धि ॥३॥
स्वात्मानंदसुख भोगिती सर्वदा । अक्षई संपदा होय प्राप्त ॥४॥

॥वोवी॥ येकदां न वाखे आला प्रयोग । प्राण उडुं पाहे विकळल आंग । नेणो उदरांत सिरोन आग । तनुमूळकंदा दाहितो ॥६६॥
तंव भाविले पाडिता येथें हा घट । वाहोन चौघांनीं कां पाविजे कष्ट । मठाबाहेरी टेकीत काष्ट । पातले इनामसेतात ॥६७॥
धन्य शिवाजी गुरुवर्य समर्थ । जननी वृंदावन असतां तेथ । जाऊन ते ठाई सद्गुरुनाथ । निजेले गात सप्रेमें ॥६८॥
जाणोन मूल हा आपुला अंशिक । त्याचेनि पुढारी होऊं तारक । शमन तात्काळीं करितां दु:ख । निद्रा लागली सुखमय ॥६९॥

॥अभंग॥ धन्य ते जननी भक्तराजयाची । मारुतीला जीची भीड भारी ॥१॥
धन्य पतिव्रता कांत तो तपस्वी । सज्ञानी गोसावी पोटा आले ॥२॥
वंदीता सद्भावें आर्त ते पुरती । होय मोक्षवाप्ती भाविकाला ॥३॥
अक्काबाई आई निधान माउली । कृपेची साउली करीतसे ॥४॥
आत्माराम सखा साहकारी होये । दावीते जे सोये पुत्रजीचे ॥५॥

॥वोवी॥ स्वप्न ना जागृती तये समई । मठांत ने म्हणे प्रगटून आई । ते चि समाधी आणोन निस्पृही । वृंदावन केलें मठांत ॥७०॥
आषाढ वद्य द्वितीय सुदिनीं । पुण्यतिथ करिती भक्त लोकांनीं । फारदा विसरतां दिवस मठच्यांनीं । सांगसांगोन स्वप्नीं करविली ॥७१॥
करितां सद्भावें सेवा कोणी । मनकामना पुरविते जननी । रामचंद्रबावाला प्रसन्न होऊनी । केली संरक्षण कृपेनें ॥७२॥
पीडेस कारण धरणें स्छळ । गुरुवर्म नेणल्या गर्वप्राबल्य । करामत होणें सकृतफळ । भावना निर्मळ असावी ॥७३॥

॥अभंग॥ सुकृतावांचुनीं न लभे ऐश्वर्य । परमार्थ होय दीनरुप ॥१॥
बहुता पाळण होय कैशापरी । बहू पुण्य पदरीं नसलीया ॥२॥
सुकृतीं सुकृत होय गुरुसेवा । स्वात्मानंद ठेवा प्राप्त होये ॥३॥

॥वोवी॥ भोगीत राहिले परमार्थवैभव । तो चैत्र नवमीचा आला उत्साव । साहित्य जालेसे ससांग सर्व । परसैन्य पातल पीडक ॥७४॥
खण्णीदंडानें पीडिती बळें । अर्दोळले चौकडे जाला कल्लोळ । अपचंद नदीतटीं पडल तळ । सभोवतीं फौजा दाटली ॥७५॥
धाबडें उकलिती काष्टाकारण । न राहे कडबा तॄण शुभा सर्पण । भले भल्याला नेती धरुन । राबवोन काम घ्यावया ॥७६॥
गनिमाच फार तें लस्कर । रामदासीचा हा गांव जाहगीर । फडके निशाणीं हुर्मुजी वस्त्र । क्षेम होईल जाणुनी ॥७७॥
आश्रयेसी सकांचनीं आले फार । यात्राकर वागती नारीनर । विष्कळित हो पाहे कृतकर्म समग्र । केलें न चाले युक्तीरत्न ॥७८॥
दिवस उदयाचा श्रीरामनौमी । घाबिरोन तेणें रामचंद्रस्वामी । समाधींत बैसले अंतर्यामीं । समर्थादिचरण स्मरोन ॥७९॥
मारुतीरायांनीं केलें विचित्र । निद्रिस्थ कटकींचा असता सरदार । स्वप्नांत कथिलें त्या खबर्दार । उत्साव ससांग करवी रे ॥८०॥
कवणाच ही न दुखवी मन । प्राथ:काळीं जा ऐको कीर्तन । पावोन प्रसादु उत्साव पूर्ण । जाल्यावरी कूच होवो दे ॥८१॥
सादृश्य यापरी देखोन स्वप्न । तैसाचि वर्तला तो भावीक ब्राह्मण । बहुत काय बोलूं रोख शतमान । मिळाल रुपया वोवाळणी ॥८२॥
कृपणजन सांगती बावाप्रती । खुर्दा तो द्यावा गुरवाहाती । मुद्या नगदी ते घ्याव ह्मणती । ऐकोन स्वामिनी हांसिले ॥८३॥
वोवाळणीच घेतां हें धन । ज्ञानतेज ते होय मळिण । नाडलें हरिदासी बहुत येणें । बला दुरधनें मळिण वस्त्रें ॥८४॥

॥अभंग॥ संताची राहणी मुख्य उदासीन । सार निवडोन चालताती ॥१॥
जयासी न कळे राहटी निषेधाची । सार्थकता कैंची होय कैसी ॥२॥
द्रव्यलालुचीनें बहुतेकीं बुडाले । जाणत ची जाले मंदमती ॥३॥
पुण्यपरायणु न टळे समयीं । आत्मारामपाई निष्ठावंत ॥४॥

॥वोवी॥ निस्पृही जयाला होणें आहे । उदासवृत्ती ते सांडूं नये । जेणें परमार्था होय अपाय । तो चाल ते दृष्टी कामा नये ॥८५॥
न मिळालिया एक्या समई । पदरिच कांहीं देत नाहीं । हे ऐकोन जीर तो तोषला हृदई । धन्य हो ह्मणतिले भल्यांनीं ॥८३॥
समर्थाराधनीं येकदां ब्राह्मण । मिळाले जाले सांग सतर्पण । कथांतीं द्विजांनीं केला प्रश्न । समाधीतोंड कां पश्चमेसी ॥८७॥
दक्षणेस आणि पश्चिमेस । द्वार कराया प्रमाण नसे । तंव हासोन गुरुंनीं बोलिलें त्यास । भाव कां नोळखा पुरता ॥८८॥
देउळापुढें करितां देऊळ । अस्ताद्रिकडे तोंड जालें । गड डोंबगांवीं गुरुची स्थळ । पूर्वेस समाधी असती ॥८९॥
येथें होते जे सत्सिष्य भाविक । तेथवरी केले संकल्प येक । तरि नीट चि जाले किं पश्चिममुख । आणीक असे होय युक्त ऐका ॥९०॥
जे असती इष्ट कुळदैवत । ग्रहपूजा पूजाया ठेवितां तेथ । समठावदेव्हारा तरी शास्त्रयुक्त । पूर्वेस मुख व्हावं अर्चिकाच ॥९१॥
आणीं ऐका काय कीं भविष्य । करुन सन्मुखी देवाल्य सरस । स्थापितां तेथ अयोध्याधीश । देवभक्त न्याव युक्त कीं ॥९२॥
ऐस ऐकतां तोषोन सिखी । वदती सद्महिमा नेणो काय कीं । मग निर्णय निघाला सोवळे विखी । बहुतीं बहुपरी बोलिले ॥९३॥
गुरुराज वदती निर्मळ चित्त । निर्वैर भावना उदार शांत । तोचि धीर तो होय शुचुष्मंत । क्रिया वरी ते नेटकी ॥९४॥
कामक्रोधाचा ज्यासी विटाळ । काय करिल त्या गंगाजळ । परधन परनारी ध्यास मळ । न फिटेचि वोविळ या नांव ॥९५॥
ऐस बोलतां गुरुगोसावी । मध्यमतस्थु तोषोन हृदई । पुरंधर पद वदे तये समयीं । मडी माडुव बगी ब्यारुंट ॥९६॥
मग बोलतां बोलतां सूचनोपाय । अहिंसा धर्माचा निघाला निर्णय । निर्धारितां न तुटला संशय । विदेहत्व काष्टदशावरी ॥९७॥
गुरुरायांनीं बोलिलें हासत । आत्मत्वा जाणणें अहिंसा सत्य । न दुखवाव कवणाचही चित्त । यद्यपी दुखविल्या हित व्हावें ॥९८॥
ह्मणाल अहिंसी कैस वर्तणें । जीवान्जीवो भक्षयति वचन । तरी ऐका हो ऐसें आहे लक्षण । चौर्‍याऐसी लक्ष योनी की ॥९९॥
प्राणापानरहित त्यांत । वीस लक्ष योनी वृक्षजात । औषधिभ्यो अन्नं वदति सत्य । तें भक्षिता युक्तवत हिंसा नव्हे ॥१००॥
सिर छेदल्यानें प्राण न जाये । ना पक्षपाती ना अग्नि भय । उदराग्नी अग्नी या योग्य ते होय । तनुभेद यातिभेद ग्राह्य ॥१॥
असे पुराणीं हे सकळ ही खटपट । तनुजाणत्याला न द्याव कष्ट । यावरी आत्मया वोळखोन स्पष्ट । आत्मब्रह्महिंसा निरसिजे ॥१०२॥
ऐसियापरी धर्म अनेक । कथिलें कृपेनें सहित विवेक । सर्वत्रांनीं मानिलें हरिख । मग काढिलें भल्यांनीं सित्धिकथन ॥३॥
हांसोन बोलिले गुरुदयानिधी । व्हावि तर व्हावी येक आत्मसित्धि । वरकड सर्व ते भ्रमिष्टोपाधी । स्वहित ना परहित ना सार्थक ॥४॥
बीरमंत्रावल्ली सहज कर्मकाया । याचेनि बहु होती करामत जनिं या । जन मोहित हे ते सार्थक व्हावया । गुरुकृपासेवा कारण ॥५॥

॥अभंग॥ धन्य भक्तिसित्धि आत्मसित्धी होय । याला सोयोपाय गुरुसेवा ॥१॥
सिष्यासि बोलता तुं चि वस्तु होसी । बाणावी तयासी खूण वेगीं ॥२॥
मस्तकीं हस्तक ठेवितां कृपेनें । भेदभयभान दूर व्हावें ॥३॥
ईक्षिता कृपेनें व्हावें सदां सुखी । अपार लौकीकीं कीर्ति व्हावी ॥४॥
चाले उपासना यथासांग सदा । प्रेम स्वात्मानंदा वाड व्हावा ॥५॥

॥वोवी॥ स्थितिसंपन्न जो तत्वपारखी । रामचंद्र बावा सदा सुखी । असतां मठांत येकायेकीं । जाडय बहु जाल तनुसी ॥६॥
जाले दुखण्यानें काहिले फार । वाटला थोरीउं तिरस्कार । उठोन येकाकीं पातले सत्वर । कंठीमारुतीसन्निधीं ॥७॥
निर्वाणज्ञानी भक्तिसंपन्न । ह्मणोन मारुति जाला प्रसन्न । कथिलें स्वप्नांतरीं उपाय खूण । सकाळीं ईशान दिशेकडे ॥८॥
चालोन अष्टोतरशत पाउल । प्रत्येक तरुवल्ली जे मिळतील । ते चूर्ण करुन देतां घेतां सकळ । दुखण निरशन होईल ॥९॥
तैसचि युक्तिनें करितां उपाय । तात्काळ शांत तें जालें अमय । आणिकाही आरोग्य होत आहे । वरदान योग्य हें लाधलें ॥११०॥
मारुतीचा निरोप होता । मठांत राहिले येवोन दाता । भेटीस्तव पातला योगी अवचिता । दामोदरबावा मेळासह ॥११॥
धन्य तयाच दिव्यतर ज्ञान । धन्य तयाच अनुभवीक कवन । करा हो येक द्वय वाक्य श्रवण । धन्य टेकडी ते राहत स्थळ ॥१२॥

॥पद॥ दामोदरबावाच ॥ येक नवलाच पाखरु ग । पाखरु ग । कस मी धरुं ॥धृ०॥
येक्या सकाळच्या प्रहरीं । पाखरु आल माझ्या द्वारीं । पांच रंग अंगावरीं । गमननिरसुनद्यामाधरु । धरुं मी धीरु ॥१॥
पाखरु रतिहून लाहन उडतां गर्जे त्रीभुवन । पाखरु देखिलें बिरदान । येथ कैंच जन्ममरण । धरुं मी धीरु ॥२॥
अपार रंग पाखराचे । तें मज देणें सद्गुरुचें । उलटी उड्डाण त्या वस्तूचें । दामोदर ह्मणे फळ मुक्तीची तारु ॥३॥

॥वोवी॥ परि ठेविले असती ऐसी चाल । उसंत न घेतां येकही पळ । वोढिती गांज्याबजं पुष्कळ । राबति सिष्य ते त्यांत तिघे ॥१३॥
असे त्यापासीं दासबोध ग्रंथ । हेतु तयाचा पुसो गुह्यार्थ । पातले या अर्थी त्यास गुरुनाथ । भेटोन आदरें केले बहु ॥१४॥
उतरले अश्वत्थपारे वरी । वोपिले सीधादि सांग सामोग्री । जोगीनाथ तो मठांतरीं । थोपवोन समुदाया पातले ॥१५॥
गुरुगृहांतरीं होतां येणें । घुडघुडीच न करिती स्मरण । व्यसनी ह्मणाव काशावरुन । मन हस्तगती जयाच ॥१६॥

॥अभंग॥ शुत्ध सांप्रदाई निर्मळ वर्ततां । धन्यांत मान्यता पावे तो चि ॥१॥
विखासि सेविता व्यस्ता व्यस्त होये । केवी कळे सोये स्वहिताची ॥२॥
लालुचिनें ह्मणे कायसा निषेध । सर्वातीत शुत्ध मुक्त सदा ॥३॥
गुरुमार्ग ह्मणोन मदद्रव्यविख । सेउनीयां मूर्ख नाडी नाडे ॥४॥
धरुनिया चट सोडाया नेणती । जडेना कां भ्रांती सांगा त्यासी ॥५॥
स्वपचादि भ्रष्ट अनाचारी लोक । त्यासरी हा मूर्ख वर्ततां कीं ॥६॥
विषई विरक्त तो ची होय भला । सांभाळी तयाला आत्माराम ॥७॥

॥वोवी॥ तैसा नव्हे तो जोगी विवेकी । अपवाद मात्र तो घेतला लोकीं । वर्ते स्वतंत्री सर्वदा सुखी । ह्मणोन गुरुदेवा आवडला ॥१७॥
गणेशचतुर्थी तो होता दिन । मिष्टान्नाचा प्रसाद पावोन । नित्यनेम आरती करुन श्रवण । पुसिलें बाहेरी येताना ॥१८॥
परामर्षोन समुहा येता पर्तोन । करवाल कीं पाहिजे प्रमय श्रवण । गुरुराज वदती लाभ याहून । कोणता असे जी योगींद्रा ॥१९॥
मग गेले बैसले आसनावरी । परामर्ष केलें वरव्यापरी । वोढून हुक्काही वरचेवरी । पातले गुरुसदना येकांतीं ॥१२०॥
तों आधीं च सर्वज्ञु गुरुदयाघन । बैसले असती ग्रंथ सोडून । बैसविलें सन्मुखीं देऊनि आसन । धन्य ह्मणे स्वयें सद्गुणी ॥२१॥
चुकारा गेला राजा चौघाचा । मार्ग होय परि अंतरिक्ष याचा । आहे तितुक नाहीं जाल वोवीचा । अनुभव पुसावा हा जोगीहेत ॥२२॥
तंव प्रसंग कोणता सांगा ह्मणत । पढाया जाले सित्ध गुरुनाथ । योगिराज वदती अंतरिक्षमात । प्रांजळ करुन सांगा जी ॥२३॥
येक या बोलण्यामाजील रहस्य । सांगतां ऐकतां प्रेमोल्हासें । उदयाद्रिवरी पातला दिनेश । उठिले स्वनेम साधावया ॥२४॥
तो ही सुखाचा लोटला दिन । पूर्ववत बैसले करित श्रवण । सूर्य आलासे हें नाहीं भान । दिवस चढिलासे चार घटिका ॥२५॥
उकलोन दाविलें सकळ योग । लय लक्ष मुद्रा भेद अनेग । भक्ति ज्ञान वैराग्य मार्ग । प्रत्यया आणिले विवेकें ॥२६॥
न उरे दृष्टाच साक्षित्वपण । थोरीव मनाच मानीं कवण । जिराला स्वानंदीं स्वानंद पूर्ण । पावोन गुरुखुणें डोलती ॥२७॥
जे जे प्रश्न होते योगीमानसीं । परिहार जाले सहज अनयासी । मग निरोप मागतां जावयासीं । कां आलेति कां त्वरा म्हणतिलें ॥२८॥
जी सदयें जाल तें आल कार्य । कांहीच न राहिला पुसो संशय । मग प्रीतिपडिभरे जाला निश्चय । भोजनांतिं जाऊं पुढें ॥२९॥

॥अभंग॥ धन्ये ते हो संत संतासि भेटतां । नये चि सांगतां आनंद तो ॥१॥
गोडी केवि कळे इत्यादिक लोका । थोर देवादिका दुर्लभचि ॥२॥
मिळतां सद्भावें अंतरा अंतर । होय जगदांतर येका चि तो ॥३॥
संशय तुटती कळे निजवर्म । सखा आत्माराम होय त्याचा ॥४॥

॥वोवी॥ ह्मणाल श्रोतेनो सूचना वचन । गर्भार्थ काय तो करवा श्रवण । मज मतिमंदा योग्यता कोठून । संज्ञावरुन जाणा हो ॥१३०॥

वोव्या दासकृत ॥ मार्ग होय परी अंतरिक्ष । जेथें सर्व ही पूर्वपक्ष । पाहो जातां अलक्ष । लक्षवेना ॥१॥
अभंग॥ अंतरिक्ष ऐसें आकाशाच नांव । शुद्ध ते जाणिव अंतरात्मा ॥१॥
काडितां तेथील शुन्यत्वाचा डाग । गुरुगम्य मार्ग उफराटा ॥२॥
चहूं भूतातित शुद्ध जें आकाश । तें चि चिदाकाश ज्ञानघन ॥३॥
ईश तें पाहणें अंत:तें अतौत । अंतरिक्षपंथ याच नांव ॥४॥
स्थुळांतरीं सूक्ष्म सूक्षमीं कारण । त्यापरत ज्ञान । ज्ञानीं दृष्टा ॥५॥
दृष्टत्वीं चालतां होय निराधार । मग परात्पर स्वयें वस्तु ॥६॥
येणें पंथें जातां अंतरींचा ईश । व्यापे सावकाश भेदातीत ॥७॥
जेथें पूर्वपक्ष होय सर्वस्वासी । तो देव अविनाशी आत्माराम ॥८॥

॥वोवी॥ दासकृत॥ दोघा ऐसें तीन चालती । अगुणी अष्टधा प्रकृती । आधोर्थ सांडुनि वर्तती । इंद्रफणी ऐसी ॥१॥

॥अभंग॥ देवाधिदेव जो राजा निर्विकार । जेथें अणुमात्र गोवा नसे ॥१॥
अहं स्फुरण चि मूळमाया तेथें । नभांतरी वात । तैस्यापरी ॥२॥
वायु ते प्रकृती जाणीव पुरुष । दोघा सामरस्य सर्वकर्ते ॥३॥
त्रिगुण त्रिदेव या दोघाच मत्त । करिती कर्तृत्व सृष्टिक्रम ॥४॥
भूतसह गुण अष्टधा भासती । टाकुनि वर्तती अधऊर्ध्व ॥५॥
जडभागु अध ऊर्ध्व ते निश्चळ । चंचळता खेळ मध्यभागीं ॥६॥
हे तीघे वर्तती इंद्रफणीऐसे । विपटाचा सोस सव्यवत ॥७॥
इंद्र तो मार्जार द्वंदशुक फणी । वर्तती नोकुनी तैसे हे ही ॥८॥
न लक्षुनी येकमेका ते वर्तती । दुजा अर्थ श्रोतीं । आणा ध्याना ॥९॥
आपुलीच पिल्ली आपण भक्षितीं । ऐसी स्थिति गती सृष्टिक्रम ॥१०॥
सत्य अर्थ आतां रवि खेळे जेवी । अधोर्ध्व हे तेवी नातळती ॥११॥
पणतु तमोगुण जाणीवा निवटी । सत्वा करी कष्टी रजोगुण ॥१२॥
खटपटी हे होता राजा निर्विकार । न दिसे अणुमात्र चोरलासे ॥१३॥
घेतां पंचिकर्णमहावाक्यशोध । होईल विशद अर्थ तेव्हां ॥१४॥
मुख्य आत्मारामीं जडलिया ध्यान । बिंबे तेव्हां पूर्ण अनुभव ॥१५॥

॥वोवी॥ दास० ॥ आहे तितुकें नाहीं जालें । नाहीं नाहींपणें निमालें । आहे नाहीं जाऊन उरलें नसोन कांहीं ॥१॥

॥अभंग॥ धन्य गुरुकृपा लाभतां चि वर । होय निर्विकार स्वयें वस्तु ॥१॥
आहे स्थूळादिक जितुका दृश्याकार । करितां विचार नाहीं जालें ॥२॥
नाहीं शून्यपण गेलें नाहीं सरिस । आहे मी ब्रह्मांश भ्रांति उडे ॥३॥
नाहीं मजमाजीं कांहीं च ह्मणणें । हें ही नसे भान अनुभवीं ॥४॥
अनुभवीं कैंच भेदाच सांगणें । कांहीं हें नसोन स्वयें तू रे ॥५॥
उरलें मुरलें जेथें हे न साजे । खेळे सहजीं सहज आत्माराम ॥६॥

॥वोवी॥ दासकृत॥ जे गगनाची गवसणी । गवसणीस ही धणी । धणीपणाची कडसणी । जेथें नाहीं ॥१॥

॥अभंग॥ आत्मकृत ॥ धन्य गुरुकृपा धन्य अनुभव । द्वैताद्वैतभाव जेथें नसे ॥१॥
गगन चिदाकाश गवसणी जाणीव । धणी तो स्वमेव दृष्टा साक्षी ॥२॥
दृष्टा दृष्टेपण न उरे आपण । कटाव तो कोण कीजे तेथें ॥३॥
जाणोनिया सर्व जाला धणी भोळा । कांहीं सांगायाला न स्फुरे ची ॥४॥
ऐसा आत्माराम सत्य सार वस्तु । दावी भक्ता प्रांतु निजकृपें ॥५॥

॥वोवी॥ ऐसियापरीचा बिंबतां अनुभव । येरयेरा केलें मित्रत्वगौरव । स्वस्थळासि गेले योगीराव । जाले गुरुदेव उदासी ॥३१॥
ऐसा तपस्वी गुरुदयाघन । येतां नेमाचा मास श्रावण । कंठीमारुतीपासी जाऊन । लिंबरस सेऊन कर्मिती ॥३२॥
पाणी आणाया होत अवघड । यास्तव निर्मविला तेथ आड । खास द्रव्य तेथ खर्चुनि रोकड । बुर्ज येक करविलें वस्ति होऊं ॥३३॥
मध्यमध्ये हीं होऊन उदास । जाऊन तेथें करिती वास । भ्यासूरस्थळीं च कथन सुरस । सांगतां ऐकाल पुढारी ॥३४॥
बंदोबस्त करुन मठाकडील । गुरुयात्रेसि निघाले दयाळ । सारीत विधाना पाहत क्षेत्रस्थळ । सातारेसी पातले ॥३५॥
सभ्य येक तेथें असे गृहस्थ । खर्चीक सात्विकु भोळा भक्त । हुडकितु दाहा ही अवतारचरित । जयंत्या ससांग करावया ॥३६॥
ऐकोन स्वामिच जाले येणें । विनवणी केली घेऊन दर्शन । हरीअवतारदशाच जन्मकथन । करुनि सुपंथ दाखवा ॥३७॥
वदोन तथास्तु श्रीगुरुराणा । पाहोन साहित्य कथाभरणा । कीर्तनीं गाईलें तें ल्याहवेना । नूतन अभंगीं भाव उमजा ॥३८॥
न लिहितां संग्रहो पाल्हाळ बहु । सारांश त्यांतील विदित होऊं । साबडें चि तें भाविकीं गाऊं । लिहिले अभंग नूतन ॥३९॥
(दश अवतार अभंग)

॥वोवी॥ अभंग वोव्या दोहा पद श्लोक । कथाभरणा त्या वोपुनि देशिक । दावीत बहुताला परमार्थसौख्य । येउनि अपचंदीं राहिले ॥१४०॥
शेषभट्टनामें अंबलगेकर । साह्य जयाला मंत्रादि बीर । प्रसन्न असे तो भोळा शंकर । जन्मोजन्मींचा तपस्वी तो ॥४१॥
पतिव्रता भली तयाची पत्नी । रामचंद्रबावा ज्ञानी सद्गुणी । जाणोन प्रीतीनें ह्मणवि ते भगिनि । साचार चि वाटे जनाला ॥४२॥
भट्टजी तो केवळ शक्तिभक्त । होऊन येकदां अव्याव्यस्त । अडवीस जाता वारिले गरुनाथ । वाटोन वाईट उग्र जाले ॥४३॥
लोक ह्मणती हा वाचेना जीवें । मग उठोन चालिले महानुभाव । न धरितां मानसीं अणुमात्र भेव । कंठीहरिपासी पातलें ॥४४॥
करुन पाहतां चित्रविचित्र । न होय अपावो ज्यासि अणुमात्र । मग साह्य बहु जाला आधीं च मित्र । भेटीस्तव झुरों लागला ॥४५॥
बाहत बावाच्या आसपासीं । नयेऊन राहिले अहिर्णीसी । आणि बोलाउं धाडितां भलेभल्यासी । द्रवेना मन विरक्ताचें ॥४६॥
दीपावळीचा पातला सण । तळमळ बहु वाटे भगिनी कारण । तेणें नवरा ही अनकूळ होऊन । भेटीस यावया सिद्ध जाले ॥४७॥
स्वयें गरुदेवो जाणोनि ज्ञानें । निघतां सद्विप्रा कळली खूण । कांतेस कथिलें पाक त्वरेनें । करी वो पातला तव भाऊ ॥४८॥
हरषोन झडकरीं केला पाक । इकडून येकले पातले देशिक । सर्वापरीनें पावोन हरिख । स्तविलें ऐका हो रामभक्ता ॥४९॥

॥अभंग॥ धन्य तुझी लीळा सर्व योग्यतेची । कृपा सद्गुरुची फळलीसे ॥१॥
ब्रह्मवेत्ता परी राखिसी लौकीक । सद्गुण अनेक वस्य तुज ॥२॥
विरक्त उदार धीर वीरपण । जालेति स्वाधीन आळंकृत ॥३॥
धन्य सर्वांनंद अवतार तुझा । प्रिय पवनात्मजा होसी बहु ॥४॥
ज्ञानयोगकळा सर्व ही जाणसी । महंती सांभाळीसी उदासीन ॥५॥
स्वात्मानंदसौख्य दाउनि बहुता । निजपरमार्था वाढविसी ॥६॥

॥वोवी॥ स्तवोन राहिले स्वस्थ सुखरुप । कारभारी तेथिचा होता बाप । यास्तव विसावले सद्गुरुभूप । यळवंतीत असतां येकदां ॥५०॥
सकळही जाणती मर्दुमी चिन्ह । सहज क्रीडाया बंदुख भरुन । नरसिंहाला लाऊन निशाण । उडवावया ठाकले ॥५१॥
पातले शेषय्या हें ऐकोन । न मानितां त्याचें समजावणें । मग हिरिवडियानिं देउनि दर्शन । समजाऊन उभयता केला सुखी ॥५२॥
देणें जयाचें अचुक वरदान । रायभट्ट अप्पा सद्‍ब्राह्मण । नागनाथपंतीं योगसंपन्न । माहगावीं स्थान जयाचें ॥५३॥
आत्मज्ञानकिली पुसायालागी । विवेकसिंधु घेऊगि संगीं । अपचंद पातले वेगीं । भेटोन गुरुदेवा राहिले ॥५४॥
येथास्थित जाली मेजवानी । अर्थार्ती होता येकांतस्थानीं । हासिले बरवा भला ह्मणोनी । दुसरे दिनीं हि त्याचपरी ॥५५॥
तृतिय दिवसीं बोलाऊन स्वयें । वदले विश्वासें धरा हे सोये । गुरुकृपें तंव महती करणें आहे । तरि अर्थ कोणास ही पुसूं नका ॥५६॥
भलत्यास पुसतां वासुनि तोंड । न सांगती मावी जे निजनिवाड । यद्यपी बोलतील हिणोन पुढें । यास्तव बहु व्हावें गंभीर ॥५७॥
हें ऐकतां केलें म्लान वदन । जाणोन हृद्गतु दिल्हें वरदान । येकांतस्थानीं बैसका घालून । पारायण करा हो आक्रादा ॥५८॥
तेणें पावाल बहु समाधान । येरु विनविलें सांगा निजखूण । मग महावाक्याचें कथोन विवरण । अंतरसंधान दाविलें ॥५९॥
निश्चयोनिया स्वरुप आपुलें । अर्थ सामाविजे त्यांत सकळ । ऐसें ऐकतां वंदोन पाउल । स्वस्थळा पातले सहस्मरण ॥१६०॥
माळगीराया ऐलाड स्थान । ग्रामोत्तरेला काननीं नेमुन । अनुष्ठान करितां पावले निजखूण । प्रतिमुकुंदराज म्हणविलें ॥६१॥
उपासना वाढली बहुत ते स्थळीं । पावनपद लाधले भक्तसिष्यमंडळी । मानस्थ हो ठेले सत्पुरुषमेळीं । कवनवचन कांहीं अवधारा ॥६२॥

॥अभंग॥ मी ना नामी नामातीत । नाम मना अमन होत ॥१॥
रुपारुपी स्वरुपीं कैंचें । आपी आप आपण साचें ॥२॥
साच असाच ह्मणणार कोण । ऐसें जाणणें ते निजखूण ॥३॥
कये काय काये पुससी । पुसणातित तूं चि आससी ॥४॥
स्थानीं बैसोनि पावला । पाउला पाउली आपण जाहला ॥५॥
आपपरता आपण कोण । ज्ञानी ह्मणती ब्रह्मज्ञान ॥६॥
निर्गुणासि संग कैचा । तो चि दास सद्गुरुचा ॥७॥

मी ह्मणतां माझे ठाई । ठाई पाहतां मी च नाहीं ॥१॥
नाहीं ह्मणणें ऐसे आहे । आहे तें ची तें कीं होये ॥२॥
होयहोयासि लक्ष द्यावें । देणें घेणें नाहिंस व्हावें ॥३॥
नाहिंस नाहीं तें मी लक्षी । गुरुदास धरीतो पक्षी ॥४॥

॥वोवी॥ देणार ऐसे देणगीभाग्य । परि न दाविती आपुलें आंग । येकदां वर्तला ऐसा प्रसंग । निरहंकार चिन्ह ऐकावें ॥१६३॥
धन्य रामचंद्रस्वामी योगींद्र । जाणती राजकारण द्वार । न चुकती कराया परोपकार । करिती उर्जित गुप्त बाहवा ॥६४॥
जगन्नाथस्वामीचा सिष्य महंत । सर्दार दर्बारीं जाला दुश्चित । कां ह्मणाल तरी न ये चि त्यांत । कीर्तन कराया परि प्रार्थिती ॥६५॥
सोंग पाहवा तरि असे थाट । काळवंडले चिंतेनें मुखवट । रामचंद्रबावांनीं निवारु संकट । बोलिलें सर्वानीं ऐकेसा ॥६६॥
सिष्यसांप्रदाई आम्ही असतां । श्रमूं न द्यावें थोरा सर्वथा । सर्दार वदे तै व्हावी कथा । मग माजवोन रंग तोषविले ॥६७॥
सरमंडळ कामाक्षी मृदांग दोन । टाळ झ्यालर द्वय सरस विणे । आइत्या अनमुळीं डवर धरुन । तोषविले कीर्तनीं सकळासी ॥६८॥
कथांतीं बोलिला तो सरदार । सिष्य लोकाची हे कथा सुंदर । तरि मुख्याचें वदनें ऐकेन सादर । तो परिहारोत्तर दीधलें ॥६९॥
उछाव नेम असे उद्यां तयाला । तरि आज चि निरोपु पाहिजे दीधला । यद्यपी संपादूं नेम येथिला । ठेऊन आह्मास जातील ॥१७०॥
संतोषुनिया यजमान तेणें । धाडिला शालादि धनमान देऊन । मग बावांनीं बहुता उपकार करुन । पावोन आदरें गेले पुढें ॥७१॥
येकदां रामाजीबावा सन्मानीं । कीर्तनास उठिले सरदारसदनीं । न जमेल धृवपदीं नसती कोणी । जाणोन जाले टाळधारी ॥७२॥
तेणें मिळाला त्यास धनमान । आश्चिर्य मानिलें गुरुबंधु तेणें । धड्ड येक येतां तेथें ब्राह्मण । मानवोन धनसहा धडिलें ॥७३॥
जे कृत्रिमपणानें करिती वैर । तयास करिती बहु उपकार । जफत दुष्टांनीं करितां जाहगीर । वाटोन साखर सुखावले ॥७४॥
नैवेद्य करविलें भिक्षा आणुन करवे ते गणणा सद्गुण । गीता भागवतीं जे कथिले हरीनें । ते विलसती आंगीं सर्व ही लक्षण । येक दों पूर्वोत्तरी वाक्य ऐका ॥७६॥

॥श्लोक सं०॥ अक्रोधवैराग्यजितेंद्रियत्वं । क्षमादयाशांतिजनप्रियत्वं । निर्लोभिदानं मननिर्मलं च । ज्ञानस्य चिन्हं दशलक्षणानि ॥१॥
गीता भ.॥ लभंते ब्रह्मनिर्वाणमृषय: क्षीणकल्मषा: ॥१॥
छिन्नद्वैधा यतात्मान: सर्वभूतहिते रता: ॥१॥

॥वोवी॥ विलसती चिन्हें हे जयाचे आंगीं । गुरु रामचंद्र गो तुप्तयोगी । अमायीकाच्या प्रेमालागीं । न देती होउं उत्थापन ॥७७॥
उत्धवचिद्धनसांप्रदाई । शिवरामबावा ग्रहस्थ निस्पृही । विनवितां मानोन गुरुगोसावी । मंठाळाप्रती पातले ॥७८॥
मिळाले होते संतसज्जन । सकळिकांस वाटला संतोषमान । संपता आराधना दिवस तीन । अंबिलकुंडासि पातले ॥७९॥
बैसले येकांतीं करुन स्नान । गुप्तसित्ध भेटला तेथ प्रगटून । येक रोग्याचें निरसून दुखणें । चालिले पुढारी भिक्षार्थ ॥१८०॥
कलेश्वराचें घेऊन दर्शन । उजलंबीभीमाचें करुन पूजन । दामोदरबावाते संतोषऊन । प्रेमनाथासी भेटले ॥१८१॥
तो माडजमाहळीचा बावा सद्भक्त । गुरुदर्शनार्था होता झुरत । संतोष पावला भासता गुरुवत । पावोन सन्मानें चालिले ॥८२॥
सहज मिळाली ते भिक्षा घेऊन । मदारशाहाला करुन वंदन । सलगरबेट जीरगी खेडेवरुन । आपचंदाप्रती पातले ॥८३॥
सहज मिळाले तें मानिती फार । तळमळ आशा चि नसे अणुमात्र । चाले उपासना योग्य प्रकार । दंभाचार नावडे जयासी ॥८४॥

॥अभंग॥ गुरुकृपें व्हावी वृत्ती उदासीन । श्रेष्ठ हें साधन सर्वधर्मी ॥१॥
सर्व ही संसार पदार्थभरण । वृत्तीस भ्रंषण त्यांत होये ॥२॥
ह्मणोन संसृती न सरे प्राण्याला । भवभोगा जाला ठाव तेथें ॥३॥
पदार्थी उदास होतांचि निश्चित । लागे पुढें प्रांत उन्मनीचा ॥४॥
तेथें वृत्ति वीरे हरे द्वैतभ्रम । खेळे आत्माराम सर्वातीत ॥५॥

॥वोवी॥ चैत्री नौमीचा करुन उत्छाव । पर्याटत चालिले महानुभाव । भीमण्णा सिष्याचें फळोन सदैव । रटकल्लासि पातले ॥८५॥
दरिद्रता व्यापिली आसे तयाला । अनकूळ नसे चि नैवेद्याला । कष्टोन बहुपरी करितां सोहळा । भाळोन ह्मणतिलें श्रमतो हा ॥८६॥
झोळीमाजील दाणे काढोन । दीधले गेले सदयें ईक्षून । तधीहून त्याला अन्नवसन । न पडलें नून्य जन्मवरी ॥८७॥
त्याचा च बंधु गप्तरुप । लग्न व्हावें हा धरुन संकल्प । उपदेश घेतां फलद्रूप । जालें सवें चि ऐका पुढें ॥८८॥
काळेश्वर तीर्थी करुन स्नान । गावांत धाडितां मी गेलों दीन । येका च सदनीं राहतां जाऊन । तो डेरा फुटोन तक्र वाहे ॥८९॥
देखोन विन्मुखी जालों हासत । अगत्य बहु करितां कथिलों वृत्तांत । ताक आपेक्षित असती सद्गुरुनाथ । ऐकोन दंपत्य उल्हासले ॥१९०॥
आग्रह ते वेळीं करुन भाविक । फाकांत सांचल ते वोपिले ताक । हे वर्तमान कळवितां देशिक । बरें होईल ह्मणतिलें ॥९१॥
आठवे दिवसीं तो जाला आमिल । ऐसें चि बहुताला भालले दयाळ । चालिले पुढारीं तो उत्तम स्थळ । जयतीर्थ रायाचें देखिलें ॥९२॥
शिष्यवर्ग उतरले तिरीं तेथें । स्वामिराव गेले त्या मळखेडांत । पीरजादे तेथील तोषले बहुत । पावोन निजखूण गुरुमुखें ॥९३॥
न घेतां ही सामुग्री धाडिली । सयपाक जाला समाधी जवळी । नैवेद्य स्वामींनीं नेतां देउळीं । सर्प जालासे टाकाकारु ॥९४॥
भय न धरितां कांहीं संशय । सादृश्य जाला तो येतिराय । सारुनि भोजना मग गुरुराय । मुडवळाप्रती पातले ॥९५॥
इनाम चौथाई जाहगिरी वित्त । जें निघालें हीशोबी घेतां रुजुवात । आपचंदाकडे धाडुनि खर्चात । पुढती जावया सिद्ध जाले ॥९६॥
स्वप्नीं नागावीची वदे यल्लंबा । मज भेटून पुढें जावे रे बाबा । तदुपरी पूजोन विश्वकदंबा । तोषवोन स्तवोन गेले पुढें ॥९७॥

अभंग॥ धन्य ते यल्लंबा जगत्रजननी । भक्ता येकक्षणीं न वीसंबे ॥१॥
आहे जैशापरी जयाचा नवस । फळें वोपी तैस जगज्जोती ॥२॥
बहुविधनाम घे धरी संभ्रम दाउं जना ॥३॥
रामवरदायनी माशंभुशरीरी । गायत्री सावित्री वेदमाता ॥४॥
भिन्नत्वं भाविता गोवि भवपाशी । होये जाणत्यासी ज्ञेप्तीकळा ॥५॥
सेखी आत्मारामीं करुनिया लीन । वाढवीते पूर्ण उपासना ॥६॥

॥वोवी॥ गुणमटकल्लु मोतकपल्ले । नारायणपेठ कोल्लापल्ली । ऊटकुर धनवाड बरीमखतली । पाहिले फिरत सन्मानें ॥९८॥
कृष्णायात्रातें सारुनि विधान । आपचंदास येतां फिरत पर्तोन । सहजानंदस्वामीचा वंशभूषण । सित्धनमडुग्रामीं भेटले ॥९९॥
तो ब्रह्मानंदपा सर्वै जाणता । बहुतापरीनें ममता लाविता । द्वय रात्र तेथें राहिले दाता । तुष्टले आदरें विधि पाहतां ॥२००॥

॥पद अभंग॥ योग्या योगी भेटतां सौख्य मोट । निरसे तेणें इतराचें कष्टारिष्ट ॥१॥
संसारीक नेणती भोळे लोक । दर्शनें चि होतसे त्याला सौख्य ॥२॥
रहणी ज्याची धरितां नेम मनीं । कामावरी पडतें निजनिर्वाणी ॥३॥
ज्याचा संग वाटता गोड प्रेम । सखा साह्य तो होय आत्माराम ॥४॥

॥पद अभंग॥ योग्या योगी भेटतां सौख्य मोट । निरसे तेणें इतराचे कष्टारिष्ट ॥१॥
संसारीक नेणती भोळे लोक । दर्शनें चि होतसे त्याला सौख्य ॥२॥
रहणी ज्याची धरितां नेम मनीं । कामावरी पडतें निजनिर्वाणी ॥३॥
ज्याचा संग वाटता गोट प्रेम । सखा साह्य तो होय आत्माराम ॥४॥

॥वोवी॥ बोलत बोलतां येकांत समई । तटस्थ होठेले दोघे तन्मई । मग पुसोनिया पातले निस्पृही । स्वस्थान आपचंदग्रामाप्रती ॥१॥
भिक्षार्थ येकदां फिरत भवहर । माने हाल नेलविगी गाणगापूर । बोंदरवाडादि तिकडील क्षेत्र । पाहोन पातले सिंदगीसी ॥२॥
होय सदग्रामु तो गणारसिंदगी । जखप्पय्या जेथें रमला योगी । अगाध महिमा पुजा बिंदगी । उत्साव भारी होतसे ॥३॥
रामचंद्रस्वामीची उदासवृत्ती । उतरले नेणती तेथील सुमती । स्वयें जखप्पा सद्गुरुमूर्ती । प्रगटून केलें परामर्ष ॥४॥
हितमितयोगादि बोलिले गोष्टी । राहवितां आराधना पाहिले दृष्टी । भिक्षा मिळाली ते घेऊन संतुष्टी । सगरावरुन परतले ॥५॥
कलबरगेंत राहोन त्रय दिन । बंदेनवाजाचें घेतलें दर्शन । तगनूरमारुतीचें करुन पूजन । भेटले कनडी मलकण्णा ॥६॥
वीरण्णा बीरण्णा शक्तिदेव हरी । उपासना असती अनेकपरी । ममता जयाची त्या सर्वत्रावरी । हें असो अपचंदाप्रती पातले ॥७॥
उत्साव चैत्रीचा होतसे गजरें । भावीकयात्रा ते मिळाली फार । बैसले जेवाया गृहस्थ भूसुर । वाढाया घेतलें दशमी दिनीं ॥८॥
तंव डोंगरचा राजा बागस्वार । नदीतटीं बैसला होऊन फकीर । येणार्‍या हातीं धाडिली खबर । भूक फार लागली तुष्ट कीजे ॥९॥
येऊन शूद्रांनीं हा कथिता वृत्तांत । सुचवोन सांभाळु पंक्तीपारपत्य । घेऊन झडकरी वडे पोळ्या घृत । पळत चि पातले समिपीं  ॥२१०॥
तो पैलाड पैलाड गेला सरकतां । चालिले बावांनीं पाठिलाग करित । स्वस्छानीं बैसला पातले तेथें । जेऊं घातले पोटभरीं ॥११॥
सर्वज्ञगुरुराया मानस कळल । करामतशाहांनीं मांडिला खेळ । तो धरितील या भयें मागें जळ । आणाया निघतां गुप्तला ॥१२॥
पातले स्वस्थळा हो कां ह्मणोनी । समजाविलें पीर तो येऊन स्वप्नीं । प्रतिवर्षी नैवेद्य दिधलें तधिहुनी । देवसंत मानिती हो सखा ॥१३॥

अभंग॥ संपादितां ते गुरुकृपा ये । वस्य होताती देव सकळिक ॥१॥
साधुसंत भाळती कृपा करिती । भोलेभाळे तरोन वाढे कीर्ती ॥२॥
भक्तिज्ञान वैराग्य भजन ध्यान । इछुनीया वर्तती सन्निधान ॥३॥
मोक्षलक्ष्मी अखंड राबे घरीं । रिध्यासिध्या वागती ते कामारी ॥४॥
प्रेमभावें येतां चि शरण । आत्मारामीं अखंड करिती लीन ॥५॥

॥वोवी॥ समर्थस्वामीची जाणिजे हे कृपा । तरी च परमार्थु जाला सोपा । प्रतापयेशाचा साधून नफा । अभर बहु केलें हीन दीना ॥१४॥
रामदासस्वामी भाळले पूर्ण । तरी च मारुती असती प्रसन्न । आंगीं विलसती ते उत्तम चिन्ह । धन्य रामदासी गुरुबावा ॥१५॥
प्रबळ होतां चि उदास वृत्ती । डोंबगावादि पाहत जाती । सज्जनगडयात्रा करुन येती । नामें मिरविती दासाचे ॥१६॥
श्रीरामजीचें वाढऊं भजन । विस्तार व्हावयास शुद्धज्ञान । अवतारा आले दासभगवान । होती प्रसन्न भाविका ॥१७॥

श्लोक सं० ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस:श्रिय: । ज्ञानवैराग्यसंपत्ते: । षण्णां भग इतीराणा ॥१॥

॥वोवी॥ हे षड्‍गुणामाजिं येक वश्य ज्याते । भगवान्‍ ऐसें ह्मणावें त्यातें । मां धैर्य उदार हे गुणासहित । शोभती भगवंत कां ह्मणो नये ॥१८॥
धन्य धन्य समर्थु श्रीगुरुराणा । न पाहतां दीनाची दृढ भावना । करविती हे स्वलीळा रचना । आलीसे करुणा यास्तव ॥१९॥

अभंग॥ रामदासकृपें जालों निरंजन । कराया रंजन भाविकासी ॥१॥
सर्वी सर्वांतरी न दिसोन असतां । व्याप्यव्यापकता नाहीं जेथें ॥२॥
मजमाजीं मीं चि मीं हें न दीसे । न कळोन असे काय की ते ॥३॥
वेदगर्भ जेथे मौन्य चि विलसे । बोलो ऐसें तैसें न घडे चि ॥४॥
स्वसंवेद्य हा हि जेथें आटे प्रेम । तो मी आत्माराम सर्वांतीत ॥५॥

वोवी॥ दासविश्रामधाम मेरु । सिखरीं वर्तती विधीहरिहरु । आत्माराम जो निजनिर्विकारु । सद्भक्तासहित विसावला ॥२२०॥
इति श्री श्रीरामकृपा । परमार्थ मार्ग सोपा । रामचंद्रबावाचरित्र । मान येकशेवीस ॥१२०॥
समाप्त ॥ जय जय राम ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP