॥स्तबक॥ १०८

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


श्रीरामसमर्थ

॥पद॥ धाटी चौचरणी नामामध्यें उ० ॥भक्तिभावें पावन होति लोक रे । भक्तिभावें पाविजे परलोक रे । भक्तिभावें सांपडे देव येक रे । भक्तिभाव हा सर्व ही विवेक रे ॥धृ०॥ भक्तिवीण आधार कोठें नाहीं रे । भक्तिभावें करावी लवलाही रे । नवविधाभजनें बरें पाहीं रे । विभक्त नको भक्त होउन राही रे ॥१॥
अखंडध्यानें राहावें समाधानें रे । नाहीं तरी श्रवणें मननें रे । अर्थांतरें मुळींचा अनुसंधानें रे । अनन्यभावें त्या आत्मनिवेदन रे ॥२॥
सांडा सांडा परता देहभेद रे । देहभेदें होतसे नाना खेद रे । अंतरंग सांपडे अभेदें रे । मुळीं निश्चळीं भेदाभेद रे ॥३॥
दास ह्मणे भजन येकाभावें रे । तनमन भक्तीस लावावें रे । देवाचेनि सकळ पावावें रे । देवीभक्तीं निश्चळी लीन व्हावें रे ॥४॥

॥वोवी॥ जेणें संतुष्टे देवाधिदेव । जेणें स्वरुपीं मिळतसे ठाव । जेणें मायामय हें होतसे वाव । तो भक्तिभाव जाणिजे ॥१॥
भाव तो करी विरक्त निर्धार । भक्तीनें होतसे तदाकार । निरसोन अभाव तो दृश्याकार । भवपरपार पाविजे ॥२॥
भक्तिभावाची कळतां स्छिति । निपटोन हरपे भेदभ्रमभ्रांती । गुंतणें नलगे चि विपरीत गुंतीं । घ्यावें समजोनि गुरुमुखें ॥३॥
हरिजनाचें होय मंडण जन्मवृक्षाचें मूळ । खंडण । गुरुभक्ताचें दिव्य निधान । कैवल्य जीवन तपसित्धि ॥४॥
योगेश्वराची युक्त मुक्त लीळा । वाटेस आणी अभक्तजनाला । देवभक्ताची प्रगटे लीळा । भक्तिभाव चि कारण ॥५॥

॥अभंग॥ जाणे भक्तिभाव तो धन्य साचार । होय अवतार जगा तारु ॥१॥
जेथें भावभक्ति तेथें राबेमुक्ति । नलगे बहु युक्ति योगादिक ॥२॥
भावावें सत्य चि टाकूनी अभाव । विभक्त तो नोहे भक्तराज ॥३॥
भक्तिभाव काय रुप कैसें आहे । कळेना हे सोय संतावीण ॥४॥
जाणेल तो नेम येथील सप्रेम । तया आत्माराम साहकारी ॥५॥

॥श्लोक॥ आत्मकृत ॥ अहो भक्तिभाव करा वोळखूनी । फळत्कार होय जसा भाव ध्यानीं । ह्मणोनी सदा होइजे शोधवंत । तरी लभ्य होय निजीं निज अर्थ ॥१॥
अहो लेंकरा कीं धनावृत्तिलागीं । करी भक्तिभाव पडो ते उपेगी । प्रपंचीक ते जाणती काय सोय । फळ भक्षितां जीर्ण होऊनि जाय ॥२॥

॥वोवी॥ आतां जन्माचें होऊं सार्थक । भक्तिभाव कीजे अमायिक । अंतवंत ते टाकूनि अस्क । धरावा येक देवा मनीं ॥६॥

॥पद॥ साराचें सार हें होय । भक्तिभाव चि माना सकळा उपाय ॥धृ०॥ परमार्थी होय कारण । सर्वसिद्धिचें जाणिजे हें अधिष्ठान ॥१॥
देवा भक्ता करी ऐक्य । अहो भोगवी बळानें अनुपम्यसौख्य ॥२॥
साधन आहे सुल्लभ । येणें चि फळासि ये महालाभ ॥३॥
मुख्य आत्माराम देव । लक्षीं लक्षीतो पावाया निजभक्तिभाव ॥४॥

॥वोव्या॥ भक्तिभावाचें कीजे व्याख्यान । तरि पदबंदीं विलोका मन घालून । भाविका सुमार्ग दाऊं सज्जन । कळवळोन बोलिले उदार ॥७॥
नकल कराया आला आळस । कथामृत पीऊं उठिला हव्यास । तरि असल चि विलोका सावकाश । भक्ति भावार्थ उमजेल ॥८॥
माघील समासीं वर्तलें कथन । कल्याण सत्सिष्या निरोप देऊन । उदास जाले माहाराजसज्जन । सज्जनगिरीवरी राहिले ॥९॥
धन्य सुपर्वती सज्जनगिरी । देवभक्त वागती जीपाठारीं । द्यावया न साजे दुसरी सरी । भुक्ति मुक्ति जेथ सुकाळ ॥१०॥
नृपादि आसती सेवेंत सादर । दर्शनास येती ज्ञाते चतुर । समुदाव मिळाला तेथ फार । होतसे गजर भजन कीर्तन ॥११॥
परी जाली दासाची उदासवृत्ती । बैसले आसती सदा येकांतीं । नसती करणारे मिळगतु व्याप्ती । परिउपासना चाले यथास्छित ॥१२॥
आतां इकडील वर्तमान । कल्यानस्वामी करित गुरुध्यान । आसतां पातले गुरुदर्शनाकारण । भले ते सज्जन यात्राकरु ॥१३॥
कासीकेदार रामनाथ क्षेत्र । पाहवया तयाला असोसी थोर । ते कल्याणस्वामी सहितपरिवार । यात्रेसि न्यावया इछिलें ॥१४॥
जाणोन गुरुचा जाला निरोप । पर्याटणेचा आसेल संकल्प । सहवास संताचा घडतां अमूप । लभ्य होईल सुकृत ॥१५॥
होईल बोलणें चालणें । श्रवणीं पडेल भजनकीर्तन । सांगतील कृपेनें ज्ञानध्यानखूण । ह्मणोन प्रार्थू पातले ॥१६॥
नमन प्रार्थना करुनि विनये । निवेदूनि मनि जे आस्छाकार्य ।

प्रार्थिती दयाळा न धरी संशय । सेवक सर्वस्वीं सित्ध आसो ॥१७॥
द्रव्य खर्चाला जितुक लागेल । पादप्रतापें होईल अनकूळ । समागमीं असावा समुदाय सकळ । नुन्य न पडेल कांहीं च ॥१८॥
ऐकोन यापरी वदन हास्य । करुनि ह्मणतिलें भला शाभास । ऐकोन ऐशाचें निर्मळ मानस । कां अयोध्याधीश भाळेना ॥१९॥
बाप हो यात्रेचें फळ काय प्राप्त । कैसेनि तेथें व्हावें कृतार्थ । साधून आधीं हें सार्थक पंथ । मग सुखें करावें पाहिजे ते ॥२०॥
ऐका बा आणीक येक वृतांत । जेवी मज सांगता तेचि स्वामीत । प्रार्थितां भल्यांनीं वदले तयात । श्रवण करा हो आवडीनें ॥२१॥

॥अभंग॥ आत्मारामेंविण रितें । स्छळ नाहीं अनुसरतें ॥१॥
पाहतां मनबुद्धिलोचन । रामेंविण न दिसे आन ॥२॥
सीवडी नाहीं तीर्थागमन । रामे रुंधिले त्रिभुवन ॥३॥
रामदासी तीथभेटी । तीर्थ राम होउन उठी ॥४॥

॥वोवी॥ कळतां सद्वाक्य अभिप्राय । किं सद्भक्ताच कृपावैभवें । किं रसीकरायाच वरप्रभावें । पालटला भाव तयाचा ॥२२॥
वाटे तयाला संतदर्शन । घडोन बिंबतां बोधवचन । सफळ जाली ते यात्रा संपूर्ण । वोळलें सुकृत सर्व ही ॥२३॥
सानकूळ जाल्या सर्व कमाई । विश्वास ठसतो सद्ग्रुरुपाई । शोधून पाहतां मत तें सर्व ही । घडला योग हा दुर्लभ ॥२४॥
स्छिती ऐसी हे अनुभवा येउं । त्वरेनें जन्माचे सार्थक होउं । क्रमयुक्त गुरुचें भूषण लेउं । नमियले करुणा भाकित ॥२५॥
देखोन तयाचा भावार्थ पूर्ण । कृपाकटाक्ष करुनि ईक्षण । उपदेश करितां बोधुनि ज्ञान । स्छितीसंपन्न होठेले ॥२६॥
अधिकार होते कीं अधिकार जाले । काय कीं संताची करणी न कळे । स्वानंदसागरीं पोहो लागले । वानो लागले अनुभवासी ॥२७॥
संपादूनिया सेवा सप्रेम । वंदोन गुरुआज्ञा पुसोन क्रम । समर्थापासी पातले संभ्रमें । नमिता साष्टांग वोळखिलें ॥२८॥
समरसले आसती सांफ्रदाई । विश्वास ठसलासे कल्याणपाई । वदले तयाची थोर कमाई । तरत जातील पुढतपुढती ॥२९॥
वाटला गुरुदेवा थोर आनंद । वोपून पूर्णता तोषवून सुशब्दें । आज्ञा वोपिता वरप्रसाद । पावोन गेले फिरत स्तवितो ॥१३०॥

॥अभंग॥ वानवेना मुखें संतमहिमान । देती मोक्षदान भाविकासी ॥१॥
स्वांगीचें भूषन वाटिती सुंदर । वोपिती उदार निजठेवा ॥२॥
न पाहती भेद न करिती वाद । अचूक सद्बोध जिरविती ॥३॥
गुरुशिष्यपण सांप्रदायक्रम । सेवेचा संभ्रम ज्याच्या घरीं ॥४॥
आत्मारामप्रभु वर्ते मागपुढें । सुखसुरवाड ज्याचे संगीं ॥५॥

॥वोवी॥ ऐका पुढारी सुंदर कथन । आसती येकांतामाजीं सज्जन । आवघे देवाचें केले भजन । संपादूनिया यात्रेसी ॥३१॥
कासीदेदारादि कोल्हापूर । श्वेतबंदादी अनेकक्षेत्र । पाहिले वानिलें तेथील चरित्र । क्षुद्रदैवतां ही मान दिल्हे ॥३२॥
होउनि स्वयमेव निर्विकार । मसोबादिका केले आदर । बसविले कानन भैरवक्षेत्र । निजभक्त निर्वैर पुरुष हा ॥३३॥
हें स्मरोन प्रतापगडची स्वामिणी । ह्मणे योग्य हे तीन्हीं भुवनीं । क्षेत्रासि यावें सत्पुरुष ज्ञानी । तरी च धन्य पवित्र ॥३४॥
कां मजकडे न आले समर्थसंत । मम वार्ता ही न ठावी त्यांत । मीही देणारी होय उचित । तरि बोलाऊन आणिजे तयासि ॥३५॥
मी राजाश्रिती निरंतर । ह्मणोन मानीना जरी भवहर । तरी राजा ही आसे माझा पुत्र । जें अगत्य आपणा तें मज ॥३६॥
दिवसंदिवसीं होती उदास दास । निस्पृहीयाला कोण काय प्रेष्य । ऐसे न येतां उत्तमपुरुष । क्षेत्रधर्म कायसा ॥३७॥
कोण आणील त्या बोलाउन । कोणाचा ही न चले प्रयत्न । तरि ब्रह्मवेत्याचें घेतां दर्शन । आह्मासि भूषण बहु होये ॥३८॥
तयास नावडती मायादि व्यसन । झिडकावील जरी शक्ति ह्मणोन । तत:क्षणीं सीताराम होऊन । समजावीन दासा निकियापरी ॥३९॥
मी स्वथा जाईन तयाचे ठाई । युक्ति दुजयाला सुचेल काई । बोलता सादृशी बनोन काई । येइल कार्य चिंतिल तें ॥४०॥
चिंतोन यापरी आपुल्या हृदईं । प्रताप दाउं निघाली आई । गुंफेत प्रगटता देखोन निस्पृही । मोट आश्चिर्य मानिलें ॥४१॥

॥अभंग॥ जगज्जोति जगदंबा । आंगी फाके दिव्य शोभा ॥१॥
प्रकाशला उजीयेड । झाके पिंड ही ब्रह्मांड ॥२॥
सदानंदी सर्वेश्वरी । सत्तारुपी चराचरी ॥३॥
वसनभूषण सुंदर । रुप साजीरें गोजीरें ॥४॥
प्रणवरुपी ज्ञेप्तीकळा । जिची अघटित लीळा ॥५॥
मुळी रामवरदायनी । स्वात्मसुखाचिया खाणी ॥६॥

॥वोवी॥ मग हळूच पुसती दासे निस्पृही । कोण तुं येथ कां आलीस आई । पूजा न घेतां बैसल्या ठाई । अंगिकारिलें कां श्रमासी ॥४२॥
भाळीं शोभती श्रमधर्मबिंदु । म्लानला दिसतसे नेत्रकंज मुखेंदु । ऐकोन यापरी सप्रेमशब्दु । सिणभाग हरला बापा ह्मणे ॥४३॥
वास्तव्य माझें बा सकळा ठाई । प्रस्तुत प्रतापगडची आई । संत सर्वज्ञ आसोन तुम्ही । कां आडपडदा करितसा ॥४४॥
त्रिभुवनामाजील जे जे वृतांत । सकळदेवदेव्याचें मनोगत । श्रीरामकृपेन आसोन विदित । धन्य पां भोळेपणें वर्तसी ॥४५॥
यद्यपी अपेक्षा येक मम जीवीं । मम क्षेत्राप्रती यावें तुह्मीं । हें ऐकोन हासत पुसे निस्पृही । उचित वोपाल काय सांगा ॥४६॥
तोषोन बोलें तैं जगज्जननी । तु कुडक्या मागोन बाळपणीं । छंद धरिता ही कोपली जननी । अनकूळ तेधवा न जाला ॥४७॥
जन्मापासोन तुझी बा स्छिती । आस्छा न उपजली कांहीं च चित्तीं । अलाड तों जाली उदासवृत्ती । एवढीच वासना राहिली ॥४८॥
तुह्मी तों केवळ जाला विरक्त । जगज्जनक श्रीरामा हें काय आगत्य । कळवळा वाटोन मी आलें येथ । मनोरथ पुरवीन चाल पां ॥४९॥
ह्मणसील जालों मी वयपरता । बाळलेणीं अपेक्षा काय आतां । कैसाही तुं बाळ मी माय सद्भक्ता । मम हृदयांतून पार पडलासी ॥५०॥
मानसील बिट्टीबिगार करीन । रे मौक्तिका काढून मम नथांतुन । आपुल्याहातानें नीट घडोन । लेववीन स्वकरानें सत्य पां ॥५१॥
ऐकोन यापरी प्रसन्नवाणी । अवश्य ह्मणतिलें श्रीमोक्षदानी । झडकरी येई वदोन भवानी । स्वमंदिराप्रती पातली ॥५२॥
धराया घडाया विझउं ताउनि । मूससेणतैल माथणपाणी । कातर तंडास अगटी फुंकणी । साहित्य सर्व मेळविलीं ॥५३॥
अवलंबून सोना कर्तृत्व समुद । केल्या मायेन चौकडया सित्ध । भीमावतार करणी तैं पाहूं शुत्ध । कापटयायोचना योजिली ॥५४॥
कैसा येतो कीं नसता वाट । ह्मणोन दृढतरा लाविली कपाट । धन्य दासराव तो सित्ध वरिष्ठ । उभेले अवचट देउळीं ॥५५॥
विदित योगिराया मुक्तपंथ । भाळले सर्व ही योग जयात । जो बद्धासि वागवि ते करुनि मुक्त । आणि इछिल पुरविता श्रीराम ॥५६॥
अगस्तीची जे अघटीत करणी । जे सित्धि दाविली वसिष्ठांनीं । संतसित्धयोगीश्रीदत्तमुनी । गोरक्षादि केले जें वस्य ॥५७॥
जें विदित आहे इंदुधरासी । जो समग्रसंग्रहो मारुतीपासी । जे सत्ता वागविती विधिहरीऋषी । ते समर्थापासी सित्ध आसे ॥५८॥
परि भक्तिसित्धी आवडली येक । जें पाहिजे तें करो श्रीरघुनायक । हें आसो आईला वाटलें कौतुक । केवि आलासी बा ह्मणतिली ॥५९॥
येरु ह्मणतिलें कपाटबंधन । करुनि केला कीं जैसें राहणें । तैसें चि जाणिजे हें ही राहणें । कर्ता सर्वही श्रीराम ॥६०॥
स्छूळतनुच्या जाल्या अतितु । आडवे न होती जडपदार्थु । संकल्पचि कायसी मातु । लिंगदेहासी वोलांडिता ॥६१॥
कारण शून्यासी वोलांडिता । नुरेचि भय तें अंधारवार्ता । तुर्याउन्मनी जिरोन घेतां । कांहीं बाधकता न बाधी ॥६२॥
समरसोन स्वरुपीं राहतां सदा । आडळेना अडवेना आष्टधा । अधिकारी जाला जो तुमचिया पदा । तुह्मा जवळी येईना काय तो ॥६३॥
नसे मुक्ताला बत्धमुक्तभ्रम । योगाचेनि पालटे स्छूळ जडकर्म । सित्धिचेनि होय नवलाव परम । भक्त मुक्त सूक्ष्म नभाहुनी ॥६४॥
सत्ता शक्ति कळा तुह्मीच होय कीं । कोण गोष्टी आहे तुह्मां न ठाउकी । योगजन माउले भक्तजन पाळकी । कर्तृत्व मातोश्रीयेच ॥६५॥
ऐकोन यापरी भक्तमुक्तवाणी । संतोष पावली परब्रह्मरुपिणी । स्वकरें भूषण तें लेवउनि कानी । उत्तम वरात वोपिलें ॥६६॥
उल्हासोन तेणें रामभक्तराय । प्रभुल्लित होउं अंबेचें हृदय । भूपाळीस्वराचा जाणोन समय । स्तवन आरंभिलें उदार ॥६७॥
हे चि अपेक्षा आईमानसीं वोळखून आर्त ज्ञानैकरासी । बहुत चि स्तविलें दास उदासी । वचन येक ऐका त्यांतील ॥६८॥
तुळजामातेत होत स्तविल । तें च पद ते समई आठवल । मंजुळस्वरानें गातां प्रेमळ । डोलली ती लोकस्वामिणी ॥६९॥

॥भूपाळी॥ अनंतयुगाची जननी । तुळजा रामवरदायनीं । तीचें स्वरुप उमजोनि । समजोनि । राहे तो ज्ञाता ॥धृ०॥ शक्तिविणें कोण आहे । हें तों विचारुनि पाहे । शक्तिविरहित न राहे । यशकीर्ति प्रताप ॥१॥
शिवशक्तीचा विचार । अर्धानारी नटेश्वर । दास ह्मणे हा विस्तार । तत्वज्ञानी जाणती ॥२॥

॥वोवी॥ भजा रे भजा विश्वमाता भवानी । आणिखी अष्टाक्षरीधाटीवरुनि । गाता सन्मुखी जोडोनि पाणी । अलाई बलाई घे आई ॥७०॥
ह्मणे जाईन वोवाळुनि । किं लपोन  जिजेनें हृदयभुवनीं । मग तटस्छ होठेली जैसी निर्गुणी । मागण देणें विसरली ॥७१॥
ऐसियापरी करुनि स्तवन । इछिलें नमोन करुं प्रयाण । कराया गमन तें अवलोकन । प्रसन्न जाली मूळमाया ॥७२॥
अंतर्ज्योति ते नयनद्वारानें । प्रकाश केला दैदिप्यगहन । निराकार तैं होउनि सज्जन । जेथीचा तेथें मुराले ॥७३॥
परापैलाड दीसतां समर्थ । सदानंदी ते संतोषभरित । होउनि ह्मणे धन्य सद्भक्त । वदती देव जिया उदो उदो ॥७४॥
मागोन जोगुवा जिच्या नांव । सुरवरादिकीं भोगिती विभव । ते आईस वाटल मोट अभिनव । देखोन आपणी दासाला ॥७५॥
पावली आई तें समाधान । प्रगटोन स्वस्छळीं बैसले सज्जन । प्रात:काळी करुं पूजन । पातले नंबी ते देउळासी ॥७६॥
कुलुफकुंजा ते पूर्ववत आसती । वोहदेदारांनीं न केली विस्मृती । आईचे नाकीं न दिसे मोती । विस्तरीत बहुता मोलाचीं ॥७७॥
तेणें पूजारी जाले घाबिर । नृपापावतो गेली खबर । सोनाराच साहित्य समग्र । पाहतां पैलाड पडलेंसे ॥७८॥
धडकोन नृपाहृदईचा क्रोध । ह्मणे केला रे केवि बेबंद । तंव कोणाचेनि न देववे प्रतिशब्द । जाचणी होऊं लागली ॥७९॥
निरपराधी पावती क्लेष । शब्दें मजवरी ठेविल दास । ह्मणोन दचकल आईमानस । भरली अंगात येकाच्या ॥८०॥
पालटली तयाची पूर्वस्छिती । बोलतो बोलती वाटे भगवती । ह्मणे भोळा तुं ऐक रे नृपती । गोरगरीबा दंडुं नको ॥८१॥
वस्तु पडलीसे कारणावरी अनुमान झणी धरिसी अंतरीं । सद्गुरुदर्शना जाई झडकरी । वर्तमान असल कळेल ॥८२॥
गुरुभय दाविता दचकला राव । न कळे ह्मणे हें काय नवलाव । दास्यकर्त्याला करुनि गौरव । सद्गुरुकडे निघाला ॥८३॥
प्रात:काळीं ईकडे दयाळ । स्नाननेमादि सारुनि सकळ । सभेंत बैसतां भावीक प्रेमळ । तोषोन मानिलें विचित्र ॥८४॥
कुडक्या नव्या ह्या भूषिलें कोण हें । कवणा ही पुसों धैर्य न होय । तितुक्यांत पोहोचला येउनि राय । भीत भीत संशई पडोन ॥८५॥
नमोन दुर्‍होनी येतां सन्निधीं । सुभूषणीं शोभती दयाब्धी । वळखोन मौक्तिका विव्हळली बुत्धी । तटस्त हो पाहती सर्व ही ॥८६॥
संशयाचा करु परिहारु । हासोन बोलुं लागले भवहरु । अद्यंत वर्तला समाचारु । एकोन सर्वा सुखावले ॥८७॥
उपकार आईचा मानोन थोर । स्तवन आरंभिलें करुणाकर । ऐकिलें तेव्हां होउनि सादर । आतां तुह्मी ऐका सद्भावें ॥८९॥

॥पद॥ रामवरदायनी जननी । रुप कळे कळे मननीं ॥धृ॥ गगनमंडळीं गुप्त खेचर । योगीमुनिजनध्यानीं ॥१॥
रम्य योगीणी नाटकलीळा । सकळभुतींभुवनीं ॥२॥
अंतरवासी दासविलासी । उर्ध्व भरें गगनीं ॥३॥

॥वोवी॥ बोलोन यापरी डोलतां समर्थ । सर्व ही जाले संतोषभरित । नृपवरु मानी जाल सफळित । आईकृपेनें मम जन्मु ॥९॥
न सिविती मी कांहीं करविलें भूषण । मम आईनें हें वळखोन चिन्ह । ममअर्पित हें ही जाणोनि धन । करुनि प्रयत्न वोपिल ॥९०॥
आइस्वकरानें भूषिल भूषण । लेऊन मिर्वितील सदा सज्जन । हें जाणोन मनिंची कल्पना सज्जन । जाले उदासी बहुत ची ॥९१॥
आतां वस्तु हे आमुची जाली । वासनापूर्णता होउनि गेली । काय कीजे हें ह्मणतां ते वेळीं । ब्राह्मण येक पातला ॥९२॥
नमितां गुरुदेवा केलें आदर । आसिरवादपन सुवदला विप्र । तदनंतरें कथोन समाचार । जी देवा लग्नार्थी मी ह्मणे ॥९३॥
आदौ येथें जी कृपाकरुन । द्याल ते घरा घेऊन जाईन । होईल त्रिसत्य कार्यसंपादन । भर्वसा आहे दयाळा ॥९४॥
नसे जी जवळी कांहीं द्रव्यांश । परि प्रपंचाचा उठिला हव्यास । पिसाट जाल आसे मानस । ह्मणोन परिस इष्टि तो ॥९५॥
मी तो आसे जी अनाधिकारी । परि ऐकिलों बहुमुखें पुराणांतरीं । सत्पुरुष आवतरती या चराचरी । साधकबाधका तारावया ॥९६॥
दर्शनें होती दुरित दूर । संकटें होती ते परिहार । सर्वप्रकारीं होय सौख्यकर । मी तो अनाथ काय बोलु ॥९७॥

॥श्लोक॥ सं०॥ गंगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तथा । पापं तापं च दैन्यं च हंति सज्जनदर्शनात्‍ ॥१॥

॥अभंग॥ परिहितालागीं सज्जन जन्मले । प्रयत्नीं श्रमले सौख्य देऊं ॥१॥
धन्य ते कमाई न कळोन वायां । स्तौत्य करावया सरसावती ॥२॥
गंगास्नानपानें पाप मात्र जाय । मूळ तो संदेह न क्षीणे ची ॥३॥
शशीछायातळी ऊष्ण मात्र हरे । त्रैताप वावरे सदा देहीं ॥४॥
कल्पवृक्ष वारी दैन्य अन्न वस्त्र । जीवत्व किंकर न निवारे ॥५॥
दर्शन लाभतां भाळती सज्जन । पापतापदैन्य ते हरपती ॥६॥
स्छिती वळखतां हरे भिन्नभाव । विश्रांतीचा ठाव होय स्वथा ॥७॥
एवं होय कृपा ते कांहीं करावें । स्वात्मानंद फावे हितकारी ॥८॥

॥श्लोक॥ सं० नह्यमयानि तीर्थानी । न देवा मृछी लाभता । ते भवंत्युरुकोलन दर्शना देव साधन: ॥२॥

॥वोवी॥ ऐसियापरी बोलतां साधकु । आणवोन कपाळीं लाविला कुंकू । ह्मणतिलें कोठें ही नको बहकु । मनोरथ पुरवील श्रीरामु ॥९८॥
दिधल्या चौकडया काढुनि स्वहस्तें । ह्मणतिलें लेउनि जाई मिरवत । मग द्रव्य वोपितां खर्चापुरतं । तोषोन गेला जाल सुखी ॥९९॥
राजास वाटला थोर आश्चिर्य । वदले ते वेळीं श्रीगुरुराय । प्रतापगडाला लवकरी जाय । शोभिवंत करी आईमुख ॥१००॥
वंदोन आज्ञा करुन नमन । स्वस्छळासि पातला सहीतसैन्य । पूर्वीहून करविला अधिक चि भूषण । मानी जगदंबा धन्य लीळा ॥१॥
येकदा शिष्येवर्गाची बाळक । येउनि बोलतां वचनें लाडक । संतोषुनिया पुसती देशिक । काय हो पाहिजे ह्मणोनी ॥२॥
जी गुरुजी देवितां किता घालुनी । शाहणे बहु होतों अक्षरें वळुनी । सिष्य बहु करितो हिंडोन या जनीं । बाळभाख ऐकतां संतोषले ॥३॥
मानिलें श्रीरामकृपा ऐसी । हाव परमार्थी लेकरासी किता अगत्य वोपिजे यासी । परि पसंद अक्षरें पाहिजे ॥४॥
तंव कल्याणसत्सिष्या आठवोन । ह्मणतिलें मनींच जाणेल कवण । कवण मग ग्रंथ गाठोडी सोडितां सज्जन । दाहावीस कित्ते आसती ॥५॥
कल्याणस्वामीच सावधपण । गुरुरायाच निघतां वचन । तत:क्षणी द्यावया कारण । लीहोन ठेविले आसती ॥६॥
कां होईना ह्मणतीलें श्रीमोक्षदाता । दीधले येकेक मुलासी कित्ता । वस्त्रभूषणमिठायी वोपिता । स्वस्छळासि गेले तोषत ॥७॥
बैसोन येकदां सभागारीं । सिष्य सकळासि बाहविलें भवारी । अभय वोपुनि तयावरी । झडती घेतली विद्याची ॥८॥
मग अक्षरें लिहिविलें सर्वाहातीं । पाहपाहोन ठेवितां गुरुमूर्ती । आपणात आपणा शाबास वदती । निंदोन घेतीं स्वयें ची ॥९॥
आज्ञापिलें त्या श्रीगुरुनाथ । लेहोन दावारे नित्य नित्य । हें ऐकोन निशिदिनी सावधचित्तें । शाहणे बहु जाले सर्वापरी ॥११०॥
त्याचे च घरचा गुलाम्ज मी दीन । अक्षरमाळिका नाम ठेउन । दोनतीनभाषामिश्रकरुन । लिहितों कित्ता श्रवण करा ॥११॥
॥अक्षरमाळिका॥ आत्मकृत॥ वोवी॥

ॐ नमो श्री सद्गुरुदाता । अद्वय अच्युत आनंदभरिता । इष्टमित्र ईश्वरु तुं ची समर्था । उदारा उष्णत्रयहारका ॥१॥
रुक्सामादिका न कळसी वानितां । रुषिमुनीवंद्या रुपनामरहिता । क्लुप्ता नये ची तुमची सत्ता । लुलू धरित्यला दुर्‍हाविसी ॥२॥
करिसी एकत्वीं ऐक्यता शुत्ध । ओ ओ देत भवरोगा देसी औषध । तरि त्रासुनि अंतका भाव आष्टविध । वोपुनि सुखवी अहर्निशी ॥३॥
ऐसियापरी करितां ग्लांती । श्रृणोन प्रसन्न जाले गुरुमूर्ती । श्रमभ्रम हराया आतां श्रोतीं । व्हावेंख परमार्थी सावध ॥४॥
कनककामिणी किमपी न चिंता । कीर्ती कुरुपी कूड ते सर्वथा । केलिया कैवारी श्रीमोक्षदाता । कोटयावधी कौटाळपण कासया ॥५॥
कं किं क: या खतलेशब्द । खालीं करावा कां खिन्नत्ववाद । चाखून खिरीचा खुषखूण बोध । वारा खेदात तरी खैर ॥६॥
खोटे खौट जे गुण घरीं मनीं । खंडज्ञानी ख: परा तो जाय कैसेनि । गणगाण्यानें गिवसेना धणी । गीतेंत विलोका पर्याय हा ॥७॥
गुजगूढ कळेल गेलिया शरण । गैरसाल गोष्टीच गौरव हीण । गंडीत गाहळ तु जालिया प्राण । तपासि गाढ तु ह्मणों नये ॥८॥
घरघाट सोडिल्या न चुके घिसणी । किं घीगुळ घुटका साधितो ह्मणोनी । घुरघूरीत आला काळ परतोनी । न जाय प्राण हरिल्यावीण ॥९॥
घेरितां घैघोरा तैं नवारी कोणी । घौघौ स्वानवत कां भुंकावें जनीं । घंगनघोळ करिता घष्टघष्टुनी । काळकर्मा न अडवे प्रपंचीक ॥१०॥
गती नसे जनिं या ज्ञात्यावांचुनी । ज्ञापकताज्ञेप्ती असावीं मनीं । ज्ञेयज्ञानज्ञाता जिरवोन तीनी । होई प्राज्ञारेततुची ॥११॥
चटोर चाहळु चिची चुबक । चूर चेंद करी धैर्या कंटक । चैन न पडवी चोरटा लुब्धक । चौकडे चौढाळक अकर्मी ॥१२॥
चंचळु खोटा चाष्टाळ वादी । छळक छानसी छिछी बुत्धी । छुल्लल छुरीवत कुशब्द भेदी । छेदक छेताळ विधी नसे ॥१३॥
छोर बुत्धिचा छौ छौ ह्मणोन । संतासि लावितो निंदाश्वान । छंदी छप्पन्न भाषा सिकोन । सत्कृपाछायातळीं न ये ॥१४॥
जडजाडय जिणें जीर्ण होउन । जुडितो धनाला जूज पैज घालुन । जे जैसे जोडिती तैसें भोगण । परि जौख दिमाखु जौक भुमी ॥१५॥
जंग शस्त्रानें युध्य करितां । ज:स नयेची जाय जीव वृथा । मूर्ख जे ऐसे त्याचा सर्वथा । संग न धरावा भल्यांनीं ॥१६॥
झकोन झाकी झिडकितु श्रेष्ठा । झील घरी मैंदु झूलझूलो झूटा । झेंडु दाटल्या ही न सांडि ताठा । झैझैश्वरी लुब्धे झोपाळु ॥१७॥
गुंतोन कमळीं न करितां झौझंकार । प्राण झ:पादिनी वोपी भ्रमर । तैसा संसारीं भ्रष्टे नर । एवं न भजतां एकदेवा ॥१८॥
टपत्याकाळाला टाळुं बहुत । प्रयत्न केला टिटीवीवत । टुप्‍दिन न कळतां आदळे मृत्य । टूकटेक टैळता कामा नये ॥१९॥
न कळे टोणप्याला टौकें तोडीता । टं टं टिं टिं न सोडी सर्वथा । टह फोडुनी ह्मणे मी स्वथा । टाळितो काळ वृथा ची ॥२०॥
ठळक संताचा ठाव न धरिता । ठिकाणा ठीक हे मानी ममता । ठुमठुमी ठेऊन निंदी संता । ठकठैळु ठोंबेमत स्छापी ॥२१॥
ठौळेखोर ठठंठा ठटाबाजी । डगमगे डागे डिवकडीकवाजी । डुर्कितो डुरडुरु जेवि बैलनाजी । डेर्‍यांत मी गाजी हुंबरतु ॥२२॥
ढेडै करितां हि न लाजे कावा । डौल डौल दावितो परमार्थाचा । डंक धरी डाका डहुळमानाचा । संग ऐशाचा कामा नये ॥२३॥
ढग उठे तेवि जमवोन सैन्य । वागवी ढाला ढिग करि धन । ढील न करीच विषयाकारण । ढुकली घे मस्तीमाझारी ॥२४॥
ढूसणी देतां ही ढूलेपण विखी । ढेंडढैवरसा ढोरसा पातकी । ढौळेखोर ढोंगी ढंग न टाकी । ढाळसे नारकीं न ढकलितां ॥२५॥
णवछिद्र्देहाचा धरि ताठा । णौखंडामाजी मी ह्मणे मोटा । परमार्थविषईं णकारघंटा नेघे चि साटा णवाचा ॥२६॥
ततुताचि तीतीक्षेपणें तुकितु । ते तैस तो हा तौरी मिरवितु । तंडवादतष्टाचा न धरी हेतु । तूचि अलिप्तु सर्वसाक्षी ॥२७॥
थडका दे भेदा थाट धर कांहीं । थिटीबुत्धी न करी थीर अंश पाही । थुथूक अल्पा थेट थैक ठाई । घोळसी थोरिवा थौंताडा ॥२८॥
थंड न करी पां अनुताप अग्नी । था था था थै कां पाहीजे जनीं । दयदाक्षिण्यकर्ता दिनेश कुलमणी । दीनबंधुच भजन करी ॥२९॥
दुरित दूर होउं नाहीं वेळ । मग देखिनासी दैन्यदोषदौर्बल्य । दंडिसी यमाला दाहशमन होईल । दौलत पावसी त्या दर्बारी ॥३०॥
धन्य तुज वदती धारिणीवरी । धिग शब्द नयेल धीरत्वें सावरी । धुरिण धूरता येइल करी । धेनु दुभेल धैर्यपात्रीं ॥३१॥
मग धोका निरससी धौतालपण । धंदा पावसी परमार्थज्ञान । धस्कटा कळेना किमपी हे खूण । धकाधकी मामला कामा नये ॥३२॥
नरनारीत्व निवडणें हें चि नीचत्व । नुमगे ची निजतेज डके नून्यत्व । नेति विचारी धरि नैष्टिक्यत्व । नोस्माकं नौबत वाजवी ॥३३॥
नंग अनंग नष्टा नागवी । न लक्षी कामिका परपार होई । पि पी बोधामृत पुसण काई । पूजा बहु घेईं पिकवी मोक्ष ॥३४॥

पेटपैगंबरी पोकळा मार्ग । पौरुषपणानें त्यजी अंगपंग । पष्ट न गुंतता पाव नि:संग । फरारा लावी फायदेचा ॥३५॥
फिफी फुगडी फूटपण कासया । फेरे घालिसी कां फैलोन वाया । फोलपण नको फौज सुखदाया । मेळवून फंद फस्त करी ॥३६॥
बडिवार बाह्या वरता करी । बिगडुं नको बाबीर बहु धरी । बुडवी अपकीर्त्या बूट हे सावरी । बेबंदी बैसका करुं नको ॥३७॥
बोधबौध्यकता क्रमा न बुडवी । बंधनांतूनी बहवास उगवी । भला सद्भागी भावकीर्ति गाजवी । भिन्नभीण भुली भूटाटकी नको ॥३८॥
भेदात निवडी भैरव हा कीं । भोळा रे तुं चि हो सार्वभौम सुखी । भंग करी कुकर्मा भाळवी लोकीं । भक्तिवान होई भार भेडी ॥३९॥
मनमानमित्रा मी ह्मणों नये । मुरोन मूळा मेळवीत जावे । मैळधूणेन मोटी मौज आहे । मंदतामष्टिता काय काम ॥४०॥
यमयातनादि भययिलू यीरषा । युगधर्म युष्मादि नसे चि सहसा । येणें चि ह्ति तें प्राप्तयैव भर्वसा । श्रीरामनाम स्मरावें ॥४१॥
योगयाग साधनीं कासया सिणणें । वाया दवडावें कासया यौवन । यंदा पुढारी कासया ह्मणणें । य:सद्भक्त सद्ययुक्त ची ॥४२॥
रम रामपदी कां रिकामा फिरणें । रीस मर्कटा जो करी पावन । रुजु होउन त्या रुढवी भजन । रेटंका हणीत पडों नये ॥४३॥
रेरैबाजींतसापडों नये । रैस्यसमुदाईं गवसे सोय । रोप जन्माच वाळोन जाय । रौरवादि भय मग कैंच ॥४४॥
रंगोन झडकरीं श्रीरामरंगीं । विराजित राष्टिं जे धन्य राजयोगी । लवकरी लाविजे भाविकालागी । तराया ध्वज भक्तीची ॥४५॥
लिगाड बिगाडु तोडुन टाकिजे । लीनता धरावी लुलु न कीजे । लेखन भुईच टाकोन दीजे । लैशचि होईजे परमार्थी ॥४६॥
लोकाच्यापरी लौभ्यलौंदेपण । लंपट लालिप्त लष्टपष्ट होणें । वर्जून वाउगी विचळता विघडणें । वीरचि होईजे हितास्तव ॥४७॥
वुभौलोकाची टाकिजे आस्छा । ऊनवुष्मादि हरिल भवव्यथा । वेवाद वैरता न कीजे सर्वथा । वोव्या मंगळ गाईजे ॥४८॥
वौषटु हुंफटु करितां अनुदिनीं । वंशोत्धारणा न होय याचेनी । वहवा व:वा ह्मणवाया जनी । वानिजे महिमा हरीगुरुचा ॥४९॥
शरण्या शाबास वदती शिवहरी । शीर्ष सहस्त्र ज्या तो वानिजेल थोरी । शुभ हेची शूरता जगाभीतरी । शेषप्रसादु सेविजे ॥५०॥
शैल्यपणांत टाकिजे दूरी । शोधावा सुन्याव सदा अंतरीं । शौर्यत्व हे चि पा शंका अंतरीं । न धरितां वस्तु व्हावें स्वस्था ॥५१॥
शष्पवत पाहवे शब्द मान कामिणी । षडिवकारतनु घालिजे कारणीं । संसार सिकवणें मनीं धरुनी । सीतापतीपाईं रत होईजे ॥५२॥
सुख पाउं बहु सुचना हे ची । सेवा संपादिजे गुरुदेवाची । सैरा फिरल्यानें होईल चि ची । सोडिजे सौभाग्य मस्त खस्ती ॥५३॥
संग संताचा संसार होय । महावाक्याची जेथील सोय । जेणें स्वरुपीं होउनि तन्मय । उत्धार करावा बहुतासी ॥५४॥
हटनिग्रहानें येतसे हारी । हिकमतुहीलहीणता झुगारी । हुकमतहूडताचाड न धरी । हे हैराणकारक होय पा ॥५५॥
हौसला आसोन कां व्हावें कष्टी । हद्द जाली पां बुद्धिवादगोष्टी । सोहंहंसाभाव धरी पोटीं । हातवटी ह:काची आसो दे ॥५६॥
ळळळळ्लाळीजीभ द्वंदशुक । लकलका हालोन डोलवी मस्तक । तो किमपी न होये भोळा सात्विक । तैसा विषकंटक होऊं नये ॥५७॥
क्षमाशांतीनें पाप होय क्षाळण । क्षिप्रं भवति धर्मात्मा कर्ता पावन । क्षीराब्धीशय्या त्या वदेल धन्य । संरक्षु धावेल त्वरेनें ॥५८॥
क्षुधान बाधी अमृत पीता । क्षूद्रता नावडे किमपी सद्भक्ता । क्षेम आणि क्षै नव्हे अक्षैवार्ता । सांगती क्षोणीतळीं सज्जन ॥५९॥
निंदका तारिती प्रत्यई मुंडोन । वपन नव्हे तें क्षौर कल्याण । क्षंतव्योमे ह्मणता भगवान । भक्तालागी सांभाळितु ॥६०॥
क्षाम नसेचि तयाचे घरीं । क्षपनिका प्रवेशु न होय अंतरीं । मुक्त्यादि तिष्ठती महाद्वारी । क्षाराक्षरातीतसुख साधु ॥६१॥
तरि वळखोन आधी ॐकाररुप । ज्ञानस्वरुपीं व्हावे तद्रूप । न कीजे वैराग्याउदास लोप । आचरोन भक्ती व्हावें सुखी ॥६२॥
कराव तरी खरें चि भजन । गति दाय घरिंच गवसेल ज्ञान । चळ छळकता ठाकुनि जतन । झडकरी कीजे एकात्मता ॥६३॥
टपकरी ठसता गुरुगम्य बोध । मग डगमगेना ढळेना वेध । णवखंडामाजि होउनि प्रसित्ध । तनुतर्का थडका हाणिसी ॥६४॥
दयाधर्मनमृता होईल वस्य । परोपकारफळाचा उठेल हव्यास । बहुत भला हा योग्यता पुरुष । ह्मणतील महात्मा येशवंत ॥६५॥
रसिका रे लवकरी वडिलपण साधी । शमदमानें अवरी बुत्धी । षडवैरियात वधोन आधीं । सखा ह्मणवी पा हरीचा ॥६६॥
ळळें पुरेल इत्छिसील तेणें । क्षणांत पतिता करिसील पावन । एवं गुरुकृपें होई सर्वज्ञ । आवडी सेवेची आसो दे ॥६७॥
मुळीं उद्भवला देव ॐकार । तेथुन अकार उकार मकार । आर्धमात्रा आष्टधा विस्तार । जगदाकार हा मायामय ॥६८॥
सकळसाधनीं सार गुरुभक्ती । देखत देखत कां धरिजे विस्मृती । संगत्याग करितां घडे प्राप्ति । वोघ खंडेल भवाचा ॥६९॥
सूज्ञ जो संज्ञा पुरे हे ची । अचळपद पाउं हे वाटची । तुछता वाटे जे इहपरभोगाची । राजिमान्यता ही नावडावी ॥७०॥
वोझें न वाहिजे संसारिक । सएव लक्षामाजी लाल येक । लटके भासिजे खटपटी अस्कें । शठत्व किमपी कामा नये ॥७१॥
पडल्या पेचांतें न पुसती कोणी । दृढभावधर्ता धन्य या जनीं । वाण काय त्याला सांगा त्रिभुवनीं । स्वतसित्ध धणी तो मोक्षाचा ॥७२॥
पथ सर्वही त्याला सुलभ । भेदभयाचा न होय क्षोभ । अधर्माचा त्या नसेचि लोभ । ज्ञानध्यानसंपदामाजिं वागे ॥७३॥
उपकार कराया आले या जनी । सफळें चि करिती बोधबोधुनी । शबलमायेचें भय निवारुनी । लाभ तो वोपिती स्वपदींचा ॥७४॥
प्रेमभावाचा जेथें सुकाळ । सोयधरित्याला फळें तात्काळ । फार काय वदावें सौख्य केवळ । आलें हातासी जाणिजे ॥७५॥
आवडी यदर्थी असावी मोठी । पाश तुटेल हो यथार्थ गोष्टी । त्या षडवैर्‍या करुनि कुटाकुटी । दास ह्मणवावें हरीचा ॥७६॥
सहजयोगातें वर्तिजे सदा । आळस न करावा यदर्थी कदा । अक्षई भोगिजे गुरुगम्यसंपदा । स्वात्मसौख्य वाटिजे बहुतांसी ॥७७॥

॥श्लोक॥ असावी मनी भक्ति ते सौख्यकारी । नको संशई पाड पा गोष्टी खरी । नको खेदकारी करी गर्व गठ्ठ । मनी ठेवि पा भावना हाव घठ्ठ ॥१॥
करि सार विचार तो सत्य ज्ञाता । पडो देईना वीषई स्वस्छवेता । कदा मानिना बंडगाथापछाडी । स्वरुप चि देखे जडीही अजडी ॥२॥
कदां सांपडेना कुमार्गी रिझेना । दुरात्मे बहु बाहती तेथे एना । किती त्रासितां भाव तो पालटेना । बहु शांतवंतु भकाया उठेना ॥३॥
पडे ना उडे वाजवी ज्ञानडंका । पराव्यासि तो लाविना भेदढक्का । जयामानसीं वागती भक्ति णव । देहाला ह्मणे कर्मिचे भोगितव्य ॥४॥
गुरुचे पदीं मानीतु निजधारा । असोसी नये कीमपी द्रव्यदारा । सदासर्वदा आवडी भक्तिधंदा । बहुतोष उल्हास देतो अनंदा ॥५॥
न लोळेचि तो लालचि लोभ्यपंकीं । अहंभाव जो वाटुनि हाणि फक्की । कसा ही असो बैसका त्यासि बागु । क्षणामाजि तो पाववी पंग भंगु ॥६॥
न गुंते कहीं इषणींकिं दुमानी । न होय कदा रुढ त्या गर्व थानी । समान चि ज्या वाटती रंकराजा । गुरुसेवनीं देईना येउ लाजा ॥७॥
बरें पाहुनी वर्ततु जो अवांका । झुगारुनि टाकी भयादीक शंका । जयाचेनि दर्पे खपे वैरिषट्‍कें । कसे वानिजेति गुणें ते असंख्ये ॥८॥
वळु जाणतो या भव्याला श्नेहाळु । बळें पुर्वितो इछिल्यांतील लळु । क्षमाशांतिचा आगरुकार क्षेम । बहु पावती भक्त ते सौख्यधाम ॥९॥
निराकार होउनियां दावि लीळा । सरी कोणती काय द्यावी तयाला । गती होय होते पदीं वंदि त्याला । सखा होय आत्मप्रभु सत्यबोला ॥१०॥

॥श्लोक॥ अष्टाक्षरी॥ तद्वस्तु ते निष्कळंक । देखरेखविन्हा सुखें । अनुभवा ये नि:संग । जन्ममृत्युहरे अघ ॥१॥
जाणिजे हें चि सुसौज्ञ । वर्म हें ज्ञान ध्यानिच । वैभउ मानित तुछे । होसील निज ते निज ॥२॥
स्छूळ हे टाकि पां वोझें । तो पाहवा आत्मञ्जयं । भोगिजे चित्कळा लुट । ना धरी मार्ग तो रठ ॥३॥
स्वात्मींचें सौख्य तें वाड । करावि भक्ति ते दृढ । नसे चि कांहिं ही वाण । जाणती शाहणे हित ॥४॥
न होई पां जसा बेथें । वाउगी वाद तो भद । न हिंसी पां यथाव्याध । साचिसी व्यर्थ कां धन ॥५॥
श्रीरामस्मरण सोपें । दाटेना सांग तो कफ । जाण हि न लगे लांब । सर्व ही माजिं सुल्लभ ॥६॥
लाभता मुक्तिच धाम । अग्नादीक नसे भये । सारांशामाजि हें सार । ध्याईजे गुरुपाउलें ॥७॥
पाळी पां सत्य हा भाव । लेशही क्लेष तो नसे । सुखदा होई नि:शेष । पीववी बोध सारस ॥८॥
अभ्यासी जे रहरह । तेणें होईल सूफळ । साधिसी वस्तु आलक्ष । भाळेल आत्माराम तो ॥९॥

॥पद॥ भाळता सद्‍गुरुराज । हित होईल सहजीं सहज ॥धृ०॥ मुळिं ब्रह्म सनातन । उल्लेख तें स्फुरण । ते रेखापासूनि शुन्य । येकडा त वोढुन । मग येक दोन तीन । चार पाच साहा जाण । सात आठ णव प्रमाण । दाहा अंक जाली नीज ॥१॥
ॐ अ आ इ ई उ ऊ । ऋ ऋ लु लू ए ऐ । ओ औ अं अ: पाहे । कठाक्षर षोडश होय । क ख ग घ ज्ञ च । छ ज झ ञ ट ठ । ड ढ ण त थ हे । ऐका हो टाकुनि व्याज्य ॥२॥
द ध न प फ ब । भ म य र ल व । श ष स ळ क्ष । बावन्न हे मातृका । स्वरसंज्ञा अजपा ह्मणती । योगी ते सोहं ध्याती । येणें चि नीजप्राप्ती । आत्म्याच हें ची गुज ॥३॥

॥अभंग॥ वाया कां सिणावें साधनाचें व्याज्य । पावन होईजे गुरुकृपें ॥१॥
चक्राचे आधार सोहंहंसास्वरीं । जप निरंतरी होत आहे ॥२॥
सर्वांत जें पाहतें तूर्येच तें स्छान । साक्षित्वेंचि खूण तेथें नांदे ॥३॥
सहजीं नैवेद्य सहज पूजन । सहज नमन ध्यान तप ॥४॥
कर्ते करविते सांगते वागते । आसती हो सत्य ब्रह्मार्पण ॥५॥
सहज सित्धासनीं आत्माराम खेळे । सन्मुखींच लोळे मोक्षसित्धी ॥६॥

॥वोवी॥ आतां श्रोतेनो होउनि सावध । हृदई ठेवा हा निट बुद्धिवाद । तेणें स्वरुपीं लागेल वेध । शुत्धबुत्धवस्तु व्हाल स्वयें ॥७८॥
वर्ण जुडाया साधितां उपाव । मागें पुढें पडलासा दिसेल अनुभवें । तरि आद्यंतावरी न्हाहळुन पाहावें । ताळा चि आहे सुखासी ॥७९॥
कळाया वळाया आर्थवर्ण खूण । अक्षरमाळिका या ग्रंथाभिधान । सद्भावें वाचितां करितां श्रवण । भाळेल आत्मारामप्रभु ॥८०॥
संख्या ॥८१॥
श्लोक ॥१०॥ अष्टाक्षरी ॥९॥ पद॥१॥ अभंग॥१॥ एकून ॥१०२॥

॥वोवी॥ पुढें सद्‍लीळा कराया श्रवण । दत्त करा हो गुरुराया मन । होउन कृतार्थु करा पावन । कथन रसाळ संताच ॥११२॥

॥अभंग॥ दास परमेश्वर दाता करुणाकर । त्याच्या घरी इंद्रपद माझें ॥१॥
इंद्रियसुरवर करा शरण येती । तुष्ट सर्वाप्रती होत आहे ॥२॥
शमदम शांत दिव्य जे ब्राह्मण । मज मीस करुन संतोषती ॥३॥
नंदनवनांत सोहंसुधापान । करिती पुण्यवान आज्ञा होतां ॥४॥
यशवंतावरी वर्षुनि सुमन । सुघोष करुन वाखाणितो ॥५॥
कामिकालागुनि पछाडितोंझ बळ । संताच पाउल वाहतों सिरीं ॥६॥
आत्मारामप्रभु आह्मादिनालागी । घेतो युगायुगी अवतार ॥७॥

॥वोवी॥ दासविश्रामधाम विषाळ । सत्भक्ताच नांदतस्थळ । प्राप्तीस येतसे इछिक्तफळ । सालकारी आत्माराम प्रभु ॥११३॥
इतिश्री श्रीरामकृपा । तारकपरमार्थ सोपा । भक्तीभाव प्रशांश । प्रतापगड आई प्रसन्न । अक्षरमाळिका । उदारपण स्तबक येकसे हे आठ ॥१०८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP