॥अध्याय॥ ११६

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


श्रीरामसमर्थ

॥पद॥ (राग धनासिरी) ॥ देवा सोडवितो देवराया ॥ध्रु०॥ वंदविमोचन । सुरवरासी उपाय ॥१॥
भुवनकंटकरावणा मारुनि । चुकविले किं अपाय ॥२॥
दास ह्मणे हा पूर्णप्रतापी । महिमा सांगों मि काय ॥३॥

॥वोवी॥ तो देव हा वाया गौरव । करुन आपुला विचिती भाव । किं वदती शून्याचा पैलाड ठाव । हे ही मायेचा गल्बलानें ॥१॥
देव असती तेहतीस कोडी । तयाला जो घातलें बांदोडी । पादुनि तयाला रणीं मुरकुंडी । सोडवी प्रतापें तो देवराय ॥२॥
जेथें जयाचा विश्वास जडला । बहु थोर ह्मणती तया देवाला । जेवि खेडयाचा पटेलसुताला । आळविती रस्त्यांनीं राजा हा ॥३॥
विकारअवयवी विकारपूजा । पशुपूजकाच्या फोडिती काळिजा । दीन दिवस कांहीं दाऊन मौजा । करिती तळपट सवें ची ॥४॥

॥अभंग॥ ऐसा नव्हे माझा राम । सकळ जीवाचा विश्राम ॥१॥
नव्हे गणेश गणपाळु । लाडुमोदकाचा काळु ॥२॥
नव्हे चंडी मुंडी शक्ति । मद्यमांस भक्षिती ॥३॥
नव्हे भैरव खंडेराव । रोटीभरतासाठी देव ॥४॥
नव्हे जाखाई जोखाई । पीडिताती ठाई ठाई ॥५॥
रामदासीं पूर्णकाम । सर्वांभूतीं सर्वोत्तम ॥६॥

॥वोवी॥ ऐसा श्रीराम जो भक्तसखा । वंद्य होय प्रतापी ब्रह्मादिका । कर्तृत्वलीळा ते संकेतिं ऐका । वानिलें दासांनीं प्रेमभरें ॥५॥
ऐसा प्रतापी श्रीरघुवीर । भक्तप्रियकरु सर्वाधार । देवराय हें नाम साजिरें । होत आहे जयासी ॥६॥

॥अभंग॥ सोडवी जो देव । तो चि देवराव । येरें जाण नाव । नाथिलें चि ॥१॥
नाथिलें चि नांव । लोकांमध्यें पाहे । ठेवीजेत आहे । प्रतापाचें ॥२॥
प्रतापाचें नाव येक राघवासी रामीरामदासी । देवराव ॥३॥

॥वोवी॥ ऐसियापरी करीत वर्णन । सज्जनपर्वतीं राहिले सज्जन । उपासनेची पावोन खूण । भक्तजन बहु सुखावती ॥७॥
दिसती तरी जाले समाधिस्छ । परि प्रगटोन दाविती लीळा साक्षात । दर्शनास येती साधुसंत । साक्षात्कार होतसे ॥८॥
पावोन आदरें करिती कीर्तन । अनुपम्य लीळा वानवानून । सेवा करुं येती भक्तजन । मनकामना पुरताती ॥९॥
देशदेशांतरीं असती भक्त । तेथें चि वानिती ऐकती चरित । तोषविती कीर्तनीं भाविकांत न वानवें संज्ञीं समजा हो ॥१०॥

॥पद॥ वैराग्याचा राजा । रामदास स्वामि माझा । त्याचे चरणीं भाव धरा वोजा । रे गडियानो ॥ध्रु०॥
रामचंद्र धरुनि मनीं कामक्रोधताप हरुनी सावधान ह्मणतां गेला पळोनी । रे गडियानो ॥१॥
मनासी लागली गोडी । मायेची तोडिली बेडी । संसाराची केली देशधडी रे गडियानो ॥२॥
दायक हा कैवल्याचा । दाता भोक्ता विश्वासा । संग नाहीं द्रव्यदारेचा रे गडियानो ॥३॥
सज्जनगडीं रहिवास । सर्वकाळ तो उदास । शिवरामि लागे चरणास रे गडियानो ॥४॥

॥श्लोक॥ श्रीरामदास गुरुवर्यमीडयं । भक्तार्तिनाशं भवतापहारं । रामांघ्रिपद्मभ्रमरं वरिष्ठं । नमामि तं योगपथैकनिष्ठम्‍ ॥१॥

॥वोवी॥ देशदेशांतरीं अनेक भक्त । अनेकपरीनें वानिती चरित । समुद्र न समाय सरोवरांत । तेवि ग्रंथगर्भी न साटवे ॥११॥
प्रेमळ नाम शिवदिन । सज्जनपर्वतीं पावोनि मान । कीर्तनीं स्वामीचें केलें स्तवन । करा हो श्रवण अष्टक ॥१२॥

॥अष्टक शिवदिनकृत॥ परमार्थाचा अद्वय ब्रह्मानंद खरा । वैराग्याचा सारविचारविवेकगरा । कीर्ति जयाची पावन त्रितापविनाशी । तो हा वंदा रामदास गुरु अविनाशी ॥१॥
नामरुपाचा गाळुनि स्फुंद प्रतिष्ठेचा । तारक रामीं पूर्ण उपासक निष्ठेचा । भक्तीभावें केलें नवविधभजनासी ॥१॥
नामरुपाचा गाळुनि स्फुंद रामरुपांत मिळाला कीं । कर्पुर जैसा दीपसंगांत गळाला कीं । महिमा त्याची काय वदों मी वदनासी । तो हा०॥३॥
वदला नाना पद ग्रंथ श्लोक मनाचे । शब्दनि:शब्दी उन्मनबोधी मननाचे । वेधक पुरता योगी साधक स्वजनासी । तो० ॥४॥
वृत्तिनिवृत्तीसाक्षी सकळांतरयामीं । स्वहिता शांति अहिती क्रूर मुद्रा स्वामी । कृपादृष्टी तारक अवतार जनासी । तो० ॥५॥
प्रणवकडयांत गुप्त समाधि गुह्यात । बिंदुस्छानीं सज्जनगड अभिधानांत । उल्हासाचा दर्शनडोळा नयनासी । तो०॥६॥
पुण्यतिथीचा अद्भुत उत्सह पुण्याचा । पाहे त्याचा ठाव पुसित मुळशून्याचा । जाग्रत साधु मंगळ रंग विधानासी । तो०॥७॥
भवगजारिकेसरि नाम सदा गाऊं । नाथसमर्था उपमा काय तुला देऊं । अष्टक अष्टांगीं जीवन शिवदीनासी । तो हा वंदा रामदासगुरु अविनासी ॥८॥

॥वोवी॥ ऐसे दयाळु श्रीरामदास । कल्याणस्वामी तयाचे सिष्य । डोंबगावीं केलें निवास । पाहोन रम्य सीनातटीं ॥१३॥
चैत्री नवमीचा पातला वृत । सर्व ही ससांग जालें साहित्य । यात्रा मिळाली देवजनभक्त । अर्चन पूजन होतसे ॥१४॥
विधान देखता भाविकी भावें । ऐसा चि कीजे ह्मणती उत्साव । पुढें करणारे जाणते सर्व । लक्षांत ठेविती विध्युक्त तें ॥१५॥
अन्नसंतर्पण भजन कीर्तन । देवद्विजसंताच मन स्तवन तुष्टणें । होतसे नुन्यता दृष्टांतेविण । मानपान पावती संतोषती ॥१६॥
हरिदासभक्तांनीं केले कथा । ग्रंथ वाढेल समूळ सांगतां । करुं साफल्य होऊं सफळता । स्वल्प चि ऐका हो दासवाक्य ॥१७॥
सीतासैंवर सुंदरकांडीच । उल्हास उर्जित प्रेमळ जीच । लळिता माजील येकपदाच । मनन करुन व्हा सुखी ॥१८॥

॥पद॥ (राग अव्हेरी धाती राम गावा रा०) फावलें रे हरिसुख फावले रे ॥धृ॥ राया दशरथा नृपासी । मातेकौशल्ये जननीसी । अयोध्यावासिया लोकांसी । निजसुख फावलें रे ॥१॥
त्या सुखाचेनि पडिपाडें । भरथा सांपडलें निवाडें । भिल्लडी लाधलें बापुडें । रामसुख पुढें गुह्यका ॥२॥
जें सुख फावलें त्रिंबका । तें सुख फावलें वाल्मिका । तें सुख फावलें रामदास रंका ॥३॥

॥पद॥ धृवक । सैंवराचिये काळीं । नवमंदिरीं मैथुळी । राम पाहतसे वेल्हाळी । सुखियासी ॥धृ०॥
राम राजीवलोचनु । सकुमारु चिद्धनु । दुर्येतवर्ये पण जनकाचा ॥१॥
गवाक्षद्वारें दृष्टी । राम अवलोकी गोरटी । तंव तन्मय जाली दृष्टी । रामरुपीं ॥२॥
देहभाव पारुषले । चित्त चैतन्य मिळाले । सबाह्य कोंदाटलें । रामरुपीं ॥३॥
ऐसी निचेष्टित शक्ति । तंव सखिया सारिती । सावध केली भक्ती । सीता देवी ॥४॥
पुढती पद्मनयना । अवलोकी रामुराणा । तंव आठवलें पणा । पितयाचा ॥५॥
बहु कठीण धनुश । राम सकुमार राजस । धरुनी त्र्यंबकवेशें । विघ्न आलें ॥६॥
रामकरतळ सकुमार । कैसें ठाण मनोहर । अतिशय दुर्धर । महेश चाप ॥७॥
ऐसी जानकीची भक्ती । देखोनि भक्तपती । धनुष्य वोढुनी श्रीपती । भग्न केलें ॥८॥
रामदास प्रार्थी । सीता मीनली रघुनाथीं । तें सुख जाणे पशुपती । महादेव ॥९॥

॥दंडीस्वर॥ सांग सखया निभ्रांत । भेटईल । तरि राखेन जीवित । अन्यथा न राहे चित्त ॥१॥
आत्मा माझा राम वनीं । अंतरला मायेचेनी । त्यजिली कीं यालागुनी । न पवे कां अझुणी ॥२॥
राघव खाच न भेटे । शब्दीं तो सुख न वटे । रामालागीं प्राण फुटे । वियोग क्षण न कंठे ॥३॥
आत्मयाराघवाप्रती । सांग सखया मारुती । वियोग कंठूं मी किती । वेगीं पावे रघुपती ॥४॥
तुज मज च्यापपाणी । अहिरावण विघडुनि । ठेविलें अशोकवनीं । शोक वाढे माझे मनी ॥५॥
लक्षमण तुझा स्वबांधी । छळिला विषयबुद्धी । आड ठेले भयोदधी । सोडवि करुणानिधी ॥६॥
तुझें अतर्क संधान । भेदिल हें त्रिभुवन । तेथें किति ते रावण । रामदासी सोडी पूर्ण ॥७॥

॥पद॥ (धाटी फुट) ॥ माधोजीका भ्याह बनायो । येकेक दोभर सीधा पायो । तांको तीन्हो रोट बनायो । तांथें पंच चुरमा कियो ॥१॥
जिने किया सो आपना खावे । वांके देखत खल्लक रोवे । मेरा मेरा सब कोई भावे । झुटे हि मन्मे प्रस्तावे ॥२॥
आज्य तो भला बोलो माधाजु । सुन माने सो साधोजु । खोज मनमो बाधाजु । बोध भये सुं गाजो जु ॥३॥
परदेसी माधो आया हे । भेदो ताल बजाया है । घर घर फेरी पाया हे । वचन अनेक सुनाया हे ॥४॥
बरसकी रस सुनावे भाई । येक अनेक जमा नवल्याई । उसतनकसी जब खबर पाई । तो मासाई कासाई आई ॥५॥
बराई नाराई आई । वामाई रामाई आई । शामाई धामाई आई । बोधाई कल्काई आई ॥६॥
देसदेसकी बात सुनाउ । ठोर ठोरकी रहनी गाऊं । अबका जायसे फेर न आऊं । तांथे मनसे पूर्ण पाऊं ॥७॥
वो शंखाधारी चपला नारी । तलकी तीलिया बोजल भारी । तिजी जबतब दांत उघारी । वो नरसी पूरगकी कोपहि भारी ॥८॥
वो सिद्धाश्रमकी कोपहिकारी । शरयुतिरकी संकटहारी । गोकुलकी चंचळचित्त बिहारी । भीमातीरकी बारे भोरी ॥९॥
माधोजीके पद सुनयो कान । माधोजीकुंहीज दान । माधोजीकुं कीजे मान । तांथे पावे परम निधान ॥१०॥
पूर्वपंथसु माधो आयो । पश्चम ज्याहाकी ताहा समायो । रामीरामदास कव्हावे । कांहासे आवे कांहासे ज्यावे ॥११॥

॥कल्याण॥ अनाथबंधु करुणासिंधु उतरवि भवसिंधु ॥१॥
आहो जयरामा ॥ध्रु०॥ मेघश्यामा उत्तमोत्तमा । तारि तारि आह्मां ॥२॥
दुर्घट वाते अंतरि दाटे । काय करुं राघवा ॥३॥
मायाजाळ हा भवव्याळ । डंखूं पाहे आह्मा ॥४॥
मनाच्या कामना अनंत भावना । निरसी तूं मेघश्यामा ॥५॥
नाम कल्याण ह्मणोनि शरण । देई चौथीभक्ति रे रामा ॥६॥

॥वोवी॥ ऐसियापरि ऐकोनि कीर्तन । सांप्रदायांनीं धरिले खूण । धन्य सद्गुरु दाता कल्याण । लीळा जयाची करी धन्य ॥१९॥
सज्जनगडयात्रा करुं सर्वज्ञ । वरषास येकदां जाती नेमानें । समुदाव बहु मिळता जीवप्राणें । यात्रा करवोन आणिती ॥२०॥
गडाजवळ नदीतटीं यात्रासह । उतरोन करिती ससांग उत्साह । जाताति जाणारे गुरुआज्ञासह । समाधिदर्शन करावया ॥२१॥
माहराजाला पुसती सद्भक्त । काय जी न येतां गडावरुत । येरु बोलिले स्वरुप साक्षात । पाहिलें ते हृदईं जडलेसें ॥२२॥
दृष्टींत जडलासे सद्गुरुभूप । कां आसेना दिव्यसमाधिरुप । पाहतां वृत्तिला होईल विक्षेप । यात्रा करावी हे क्रम ची ॥२३॥
ह्मणाल येथें चि काय आहे । तरि लीळा केलेल स्थान होय । पर्वतपूजनीं सर्व पावताहे । गुरुमये चि येथें भासत हो ॥२४॥
हें वाक्यप्रत्यय येऊं तयाला । विचित्र केलें श्रीराम सावळा । साक्षात्कार होता तैसा चि त्याला । वदिलें महिमा वाखाणित ॥२५॥
धन्य सद्भावी सगुण प्रेमळ । संतसाधूची प्रीती केवळ । स्तविती सद्भावें वाक्य रसाळ । सभागी साधु पढियंत ॥२६॥

॥पद॥ साधु रे धन्य साधु रे ॥धृ०॥ सकळ चराचर त्रिविध देवा । समान अंतरीं वेधु रे ॥१॥
षड्‍रिपुचा संहार करुनि । दासासि केला बोधु रे ॥२॥
पंचभूतीं त्रिगुणमाया । समूळ शोधिला शोधु रे ॥३॥
अहं सोहं हें गिळोनि ठेला । विवेक परमानंदुरे ॥४॥

॥वोवी॥ ऐसे कणवाळु श्रीमोक्षपाणी । डोंबगावीं राहिले येऊनि । बोलाऊं येतां अमाईकभक्तांनीं । मानोन भक्तिला चालिले ॥२७॥
ब्रह्मवेत्ते विरक्त निस्पृही । कीर्तन करणारे भजक गोसावी । सांप्रदाई ते असती संग्रहीं । पुरवीत आर्त चालिले ॥२८॥
येकेक भक्ताचे मनोरथ । पुरऊन पावावे स्वस्छांत । तो विशेष भावाचा पादांकित । होऊन प्रार्थितां मानिती ॥२९॥
पुढें पुढें चालोन यापरी । बालेघाटदेशीं पातले भवारी । सरदार ते असती बरोबरी । सांभाळावया आर्जिकरु ॥३०॥
पाहोन रानीं रमणीय स्थान । सुसीळ छाया विहिरींत जीवन । बैसले स्नानांतिं घालूनि आसन । संध्यादि कर्म सारुनि ॥३१॥
पद्मासना घालुनि दृढतर । जप करीत बैसले मनें येकाग्र । तो जटिळ येक पातला दुराचार । चेटकी टोणपा शक्तिवान ॥३२॥
वरळाव भलत भांडण काढाव । बीरभूतासी लाऊन द्याव । कुटिळ तो पोटीं जळत कुभावें । न भीतां जवळी पातला ॥३३॥
ठेऊन द्वयजानुवरी पाउल । दम्म धरुन दडपूं लागला बळें । पाहोन स्वामीला देतसे सळ । भक्तसरदार चौताळले ॥३४॥
स्वामिराज वदती । लाभ हा मोटा । शांतिवस्तुला न आणा तोटा । महापुरुषपणाला लागे बट्टा । ऐसें सर्वथा न कीजे ॥३५॥
संतोषं जनयेत्प्राज्ञ:  बोल । तरि अभिष्ट याचें होऊं द्या सफळ । दृढ काया केलेति समर्थदयाळ । केस येक माझा न दुखे ची ॥३६॥
उडतां बैसतां तरुवरी पाखिरु । न सिणे भू न वदे कां घालितां भारु । नगावर टाकितां थोर प्रस्तरु । न हाले तैसी वृत्ति कीजे ॥३७॥
ऐसियापरी बोलतां त्यासी । सहन न पडे चि गुरुभक्तासी । मग दटाविलें कीं प्रमाण तुह्मासी । आज्ञा तरि उगे विलोका ॥३८॥

॥अभंग॥ धन्य व्हावा तरी ऐसा जगीं संत । प्रत्ययार्थ व्यर्थ न करी च ॥१॥
सर्व साधनांत सिरोरत्न शांती । हरीहर संती वानियले ॥२॥
भूषण जो ल्याला गुरुकृपें शांती । साजे हो महंती तयासी च ॥३॥
सखा आत्माराम शांतीसी भाळतो । लळे पुरवीतो अपेक्षीत ॥४॥

॥वोवी॥ आरे देहावरी बैसतां मक्षिका । न वाहती कोणी अपमान धोका । कां तयापरीनें हें ही न लेखा । बाळकासि खेळणें मांडीवरी ॥३९॥
बहुकाळावरी होती अपेक्षा । कोण शांतीची करील परीक्षा । करुणा आली हे कमळपत्राक्षा । शांतिदांति परीक्षा अगत्य ॥४०॥
गुरुराजस्वामी माझा समर्थ । त्यास शूद्रांनीं पीडितां बहूत । साहोन तयाचें होऊं उर्जित । चाल सेत इनाम देवविलें ॥४१॥
द्वेष करणारा पंडिताला । धन देवविलें सांगोन नृपाळा । विखादि प्रयोग योजिती तयाला । बहुमान भूषण देवविलें ॥४२॥
जे जाले भुतटीं विख्यात सज्जन । विखादि प्रयोग योजिती तयाला । बहुमान भूषण देवविलें ॥४२॥
जे जाले भुतटीं विख्यात सज्जन । नानापरीनें केलें सहन । स्वल्पमानास्तव अल्प कां होणें । कर्ता श्रीराम सर्वही ॥४३॥
ऐसें ऐकतां सन्मार्गगौरव । दर्शन स्पर्शन पुण्यप्रभावें । सवेंचि पालटला तयाचा भाव । पायावरी लोटला ॥४४॥
प्रेमाश्रुचा चालिला लोट । कापे थरथरा दाटला कंठ । जोडोन सदृढ कर संपुट । उत्धार कीजे जी ह्मणतसे ॥४५॥
अपराधिया करितां अव्हेर । प्रायश्चित्ताला वोपीन शरीर । एवं अनुतापला जाला पवित्र । जाणोन केलें अनुग्रह ॥४६॥
अनुग्रहकृपेचा ऐसा प्रताप । जाला सहवासी वैराग्यभूप । जालें तात्काळीं लभ्य स्वरुप । पापोआधी नाठवे करि भक्ती ॥४७॥
सेऊनि सद्भावें प्रसादतीर्थ । पुसोन गेला तो तीर्थक्षेत्र फिरत । मस्तक डोलविती संत महंत । सांगिकां वाटलें आश्चिर्य ॥४८॥
राहोन सन्निधीं समर्थ देशिक । करविती लीळा वानूं जनमुखें । इकडे समुदावसहित हरिख । चालिले वृत्तांत पुढें ऐका ॥४९॥
कीर्तिवाटेनें थोरथोर येती । अनुवादती सांगती वर लाभ घेती । येकदां मतवादी वोळी पत्धती । छेळोन पुसाया पातले ॥५०॥
भाव तयाचा जाणोन सर्वज्ञ । भेटतां करुनि आदरमान । ऐका करुनि श्रीरामस्मरण । स्तविलें गुरुवर्या भाव कळों ॥५१॥

॥पद॥ मोक्षपाणी मम वंशा । श्रीगुरुस्वामि मूळपुरुषा । षड्गुणईश्वर सर्वेषा । भवहर हर तूं वरईशा ॥१॥
परतरपरवर श्रीरामा । अगाधमहिमा गुरुगरिमा । श्रुतिपरपर तूं परब्रह्मा । भवहर हर तूं विश्रामा ॥धृ०॥
आमुची वोळी देवाची पतितपावन सर्वाची । वर वरदायक जीवाची प्रचीत पदवी शिवाची ॥२॥
कृष्णावेण्यातिरवासी । सज्जनपर्वतनिवासी । सुरवर वांछिती देवासी । कल्याणदायक सर्वासी ॥३॥

॥वोवी॥ ऐकोन यापरी स्तवनशब्दु । श्रीरामकृपेनें विसरले भेदु । बोध संपादूं लागोन वेधू । शरणागत जाले असो हें ॥५२॥
समीप पातला प्रथम मास । रामोपासका थोर उल्हास । साहित्य करुं लागती हरुष । अयोध्याधीश पावावया ॥५३॥
रामनौवमीचा व्रतनवस थोर । नेम धरल्यानें होती पुत्रपौत्र । लाभती स्त्रीधनविद्याव्यापार । वांछिता मंदिर मुक्तिच ॥५४॥
कल्याणस्वामीचे सिष्य भक्तिवान । अंबेरीवाले गुण संपन्न । अपेक्षा तयाची गुरुदयाघन । हा उत्साव करावा येथें चि ॥५५॥
घेऊन स्वार्‍यादि अनकूळ सहित । बोलाऊं पातले स्वामिरायात । ऐकोन प्रार्थना पुरऊं हेत । प्रसन्न होऊन चालिले ॥५६॥
डोंबगावमठीं असती तयात । सांगूं धाडिले अनकूळ सहित । वाट न पाहतां यथास्थित । उत्साव तेथें करावा ॥५७॥
सद्गुरुची आज्ञाप्रमाण । उत्साह केले यथाविधीनें । इकडे अंबेरीप्रती येऊन । सगजरीं मिरवत उतरले ॥५८॥
साहित्य जालेसें आधीं च सांग । करवणार असे कीं भक्तभवभंग । कवण्याविषई हि न पडे चि व्यंग । प्रेमाचा रंग माजलासे ॥५९॥
मकरतोरण करुनि शोभा । स्थापूनि पूजिती भूमिजावल्लभा । न पुरे चि जागा ते होतसे सभा । कथेचा लाभा झोंबती ॥६०॥
परवडीनें करविले पाक । जें अन्न नेणती इंद्रादिक । शुत्ध सोवळ्यानें भूसुरी हरिखें । बैसले हारीनें वेद पढत ॥६१॥
कोणी करिताती जपस्तोत्रभजन । कोणी सांगती वार्तामहिमान । वैश्वदेवांतीं नैवेद्य वोपून । मंत्रपुष्पादि सारिले ॥६२॥
घेऊन विप्राच चरनतीर्थ । गंधाक्षता वोपूनि तयांत । पुष्पहार घातले सुवासित । परिमळ घातलें प्रीतीनें ॥६३॥
प्रोक्षुनी जीवनें विस्तीर्णपात्र । मांडून वोपिले द्रोण थोर थोर । वाढणी करावी तंव जाले विचित्र । जटीळ येक पातला मेळासह ॥६४॥
तो कोण ह्मणाल हो पैलाडगावी । करित तुंदाई असे देशाई । मानाढय धनाढय क्षेत्रीच आह्मी । म्हणतसे संग्रहीं फौज असे ॥६५॥
करामती देखून विशेष । जटीळाचा जाला तो मर्‍हाटा सिष्य । हाजर चि असतो रात्रिंदिवस । आज्ञा उल्लंघन न करीच ॥६६॥

॥अभंग॥ काय भोळेलोका कळे गुरुस्छिती । चेटक्या भाविती पीर थोर ॥१॥
कांहीयेक ईलु पाहतां विचित्र । गुंतती पामर नाडावया ॥२॥
स्त्रीपुत्रधनाशें राजी पीकासाठीं । लागताती पाठी भ्रांता भ्रांत ॥३॥
मद्यमांससुरा त्रिकोणा संभ्रम । जुडती अधम गुरुसिष्य ॥४॥
ऐसे भोंदियाला त्यागीतां निंदितां । न लागे सर्वथा बट्टा दोष ॥५॥
आधीं च नारकी संसारक्षुल्लक । त्या कान ठाऊक परमार्थ ॥६॥
स्वात्मसौख्यखूण न कळे तयासी । आपदा दोघासी सुटेचिना ॥७॥

॥वोवी॥ यजमानाचा गुरु तो थोर । जाणोन वळगो लागती परिवार । त्या सिष्यबळानें तो मस्तिखोर । साधुसंताला द्वेषितु ॥६७॥
मधुरता किमपी नसे मुखीं । भूसुराला नोकी न लेखी । आपण मग्न तो आसोन विखीं । करितसे कुचेष्टा भल्याला ॥६८॥
मानितु मी मी सन्यासी थोरु । द्विजवराचा हि मी होय गुरु । ऐसा मज मान्या करुन अव्हेरु । हा कोण मीरऊं उरावरी ॥६९॥
उत्कर्ष न राहवे त्या वाटला विषाद । कां वेडे होठाती ह्मणे जनवृंद । मग मेळा सिष्याचा घेऊन मैंद । किरकिर काढाया निघाला ॥७०॥
खटेल तटानें दावितां भय । न टिकती जाणून साधूचे पाय । पंक्तित पातला बैसला रघुनाथ समुदाय । आह्मासही वाढा ह्मणोनी ॥७१॥
पत्रोळया डारो भर देऊं पानी । ल्याव गंधाक्षता वदती क्रूरानीं । विप्रजन योजिती जावें उठोनी । या द्वेषीया संधी सांपडली ॥७२॥
घाबिरे होठेले यजमानलोक । देशमुखाचा बहु असे धाक । हा वृत्तांत कळवितां उठिले देशिक । नाभिकार देत सर्वासी ॥७३॥
समर्थस्वामीचें असे वरदान । राहीन सन्निधीं करीन पाळण । काय करिल तें बापुडें विघ्न । वैरी कपटयाचें न धरा भये ॥७४॥
स्थिराऊनिया सकृपें बुत्धी । उभा ठाकले जटिळा सन्निधीं । वदले तुह्मी तो थोर तपोनिधी । मर्यादाविधी राखिते ॥७५॥
मनोदयाची कळविजे खूण । येरु वदती ते द्यावें भोजन । तरि येकीकडे बसावें जाऊन । सुखें जेवा हो तृप्तिवरी ॥७६॥
केऊं बावा आह्मा लाविता बट्टा । अधिकार मानाला पाडिता तोटा । तंव गुरुलाल वदती पैलाड वोटा । ऊंच निर्मळ तेथ बसा ॥७७॥
कुटिळास नसे की भोजनप्रीत । छळणाच्या पाठीं कीजे विष्काळित । पंक्तीलाभ आह्मा वदता अगत्य । कां होईना आह्मा ह्मणतिलें ॥७८॥
या लोकाचा गुरु मी निस्पृही । पुज्यमान सन्यासि तुह्मी गोसावी । राहोन अनुसुट मागून दोघे ही । होऊं पंक्तीचे यजमान ॥७९॥
तुष्टेल तेणें सच्चिदानंद । अनयासी पावेल हरिप्रसाद । समजावितां यापरी सुशब्दें । न ऐके वेथु बीरबळें ॥८०॥
तो इकडे द्विजांनिं वदती शाप । सिष्यवर्गाला न धरवे कोप । भोज्यकार्य होऊं पाहे विदृप । उपासनीं विकल्प वाढो पाहे ॥८१॥
क्षोभोन तेणें गुरुराजयोगी । पिटवा अधमाला ह्मणतिलें वेगीं । अगत्य चि होत सर्वालागीं । घातले बाहेरीं मर्दित ॥८२॥
विषईक लंगोटया होतां ताडण । सहवासी केलें पलायन । मर्दुमी कराया न परते मन । धाक बैसोन लपाले ॥८३॥
तिकडे गेला तो करीत रुदन । इकडे ससांग जालें भोजन । वदले पुनरुक्ति गुरुदयाघन । बाळगूं नका हो भय कांहीं ॥८४॥
तरि ही ग्रामस्थीं जाले हुषार । वरचेवरि घेत समाचार । तो जाऊन जटिळांनीं अपस्मार । जल्पूं लागला सिष्यापुढें ॥८५॥
कोण कीं आलासे आंधळा बावा । घालोन मोहन भुलविलें सर्वा । आह्मा लोकाला करितसे हेवा । उत्साव काय कीं मांडिलासे ॥८६॥
मंडळीसह गेलो पाहूं तोषुन । न करितां न देता अन्न मानपान । क्षोभोन खुद्दांनीं दांडिगे लाऊन । पीडण करित चि पिटविलें ॥८७॥
या मूर्ख वचनानें भुलला मूर्ख । सहनशोधधर्मि न जाला व्यापक । घेऊन तात्काळीं स्वार शूर लोक । रात्रौमाजीं निघाला ॥८८॥
आरडतां ऐकिले लूट माफ बोल । शस्त्र सित्ध केले सोडून सळ । येकमेकां तारिफ करिती खटयाळ । सिंवारामाजी पातले ॥८९॥
करुनि दिवटयाचा प्रकाशमय । तो ध्रुरकीं भटांनीं केला अन्याय । गावकरी ही न धरिलें भये । तरी सगट दंडावे धरधरुन ॥९०॥
या तौरानें येऊं लागले इकडे । कीर्तन सगजर होतसे तिकडे । तो कळोन सूचना येकेका पुढें । घाबिरोन सावध हो पाहती ॥९१॥
चहुंकडे पडली तेणें गडबड । दडती भयानें येकेका आड । ह्मणती विघ्न हें मांडलें अवघड । गजबजितां कीर्तनीं विकारलें ॥९२॥
स्वामिराज वदती काय रे वटवट । येरु कळविताहे मांडल संकट । अरे गातां ऐकतां तो अर्थ घट्ट । धरा हो भय कासयाच ॥९३॥
सत्समईच पद हें उत्तम । कैसा देव दयाळु आत्माराम । श्रवण करा हो धरुन प्रेम । मग पुढील प्रसंगीं चित्त ठेवा ॥९४॥

॥पद॥ (धाटी चौचरणी) ॥ कैसा देव हा दयाळु आत्माराम । दासाकारणें भोगिलें नानाश्रम । त्याचा पूर्ण केला सर्वकाम । देऊन वैभव तोडिला भवभ्रम ॥धृ०॥ अकस्मात वाळी वधीयेला । नीच शब्द तो आपण घेतला । सुग्रीव तो राजीं बैसविला । सेखीं सायुज्यता प्रसाद दीधला ॥१॥
दाहा वेळ रावण दाहासीरी । शिवपूजेनें पावला लंकापुरीं । रामें अप्रयासें बिभिषणाकरीं । देऊन चिरंजीव केला धृवासरी ॥२॥
चौदावरुषें आपणा वनवास । वधिलें भुवनकंटक राक्षेस । देव पावविलें रामें निजपदास । स्वयें पावविलें रामीरामदास ॥३॥

॥वोवी॥ गुरुराज वदती कां होतां दंग । विष्कळीत न करा हो कथेचा रंग । कैवारी आमुचा आहे जो माग । तो चि पाहोन घेईल ॥९५॥
निघता यापरी सद्भक्तवचन । तो आंतून पळाला दासहनुमान । सर्वत्रासि घडल दर्शन । बैसले धैर्यानें निर्भय ॥९६॥
रंग तो कीर्तनीं चढला अधिक । तिकडे हरीनें मांडिल कौतुक । दिवटया विझाल्या सुजलीं मुख । चडकण्या तफराखे बैसतां ॥९७॥
घाबिरोन जिकडे फिरविती वदन । बैसे थोबाडीं सकळां तिकडून । जटिळ तो ठाकला वेडा होऊन । पळों नेदीच करतार ॥९८॥

॥अभंग॥ कृत्रिमाचें काम न पवे चि सित्धी । नानापरी बाधी देत धका ॥१॥
मागें बहुतांनी शौर्य तपबळ । केले चेष्टा फाळ न जाले कीं ॥२॥
दिसे बहू चांग प्रथम आरंभीं । पाडुनि आचंबी मान हरी ॥३॥
नोहे कृत्रिमाला स्वात्मानंदप्राप्ती । अमाईक भक्ती धन्य जगीं ॥४॥

॥वोवी॥ तंव समर्थांनीं देसाईश्रवणीं । वदले गुरु काय रे हा अवलक्षणी । ताडूनि कुटिळाला ठेवितां बंधनीं । तरी च क्षेम तुजला रे ॥९९॥
हे सांगतां मुख्यानी संगिकाप्रती । हिणोन कपटयाला केली फजिती । गेले स्वस्थानीं न सुचे चि पुढती । काय हे ह्मणती आश्चिर्य ॥१००॥
देशमुखाच्या स्वप्नीं जाऊन । कथिलें कीं ऐस भगवान । हा जटिळ गुरु नव्हे ज्ञानध्यानहीन । सद्गती याचेनि न होय ॥१॥
तरि वरदपुत्र माझा तो कल्याण । गुरु करी तरसी होसी संपन्न । वदोन तथास्तु तो करुन नमन । जागृत होऊन बैसला ॥२॥
मिळाले बाहतां थोर थोर ब्राह्मण । पुसोन ससांग उपदेश विधान । गुरुरायासी पातला शरण । साहित्य सर्व घेउनी ॥३॥
आधींच कृपाळु वोपूनि अभय । दीधलें विधियुक्ती अनुग्रह । सवें जनाला वाटल आश्चिर्य । जाला आनंदु सर्वापरी ॥४॥
जटिळ कुटिळ जो होता बंधनीं । ठेऊन घेतले आणवोनी । धाडिलें तयाला उत्साह करुनि । देववोन मानधन वस्त्र ॥५॥
ह्मणाल श्रोते हो काय पुण्यांश । होता तयाला करुं उपदेश । आहो गणना न करवे तयास । स्वप्नीं समर्थ भेटले ॥६॥
रामदास भेटाया हें चि सुकृत । कैसा ही गुरु गुरु होता ह्मणत । सत्य चि ताराया पावला हनुमंत । कल्याणपवन लागल ॥७॥
ह्मणाल कैसा ही गुरु होता । त्याग तयाचा न कीजे सर्वथा । आहो ज्ञानहीन जो गुरु नव्हे दाता । सिंतरकामाच काय काज ॥८॥
मंत्रतंत्राचे आसती बहु गुरु । होती साहकारी प्रपंच सावरु । अवस्य तयाचा करुनि अव्हेरु । परमसुखदासी शरण रिघिजे ॥९॥
हें आसो उत्साह होतसे पूर्ण । सप्रेमभरें करिती कीर्तन । श्रवण करा हो येकदोन वचन । दृढभाव हृदई संचरो ॥११०॥

॥पद॥ राग बिलावळ ॥ टाळमृदांगें श्रुतिउपांगें गायन होत आसे । देव गुणीजन थक्कीत तेथें । रागरंग विलसे ॥१॥
देव दयाळ परम सुखदाता ॥धृ०॥
सरिगमपद परप्रासवित्पती बंद प्रबंधपदें ॥ नाना ताळ उल्लाळ मूर्छना मुख्य पदे विशदें ॥२॥
ऋषिकुळवेष्टीत श्रेष्ठपदीं रघुराज विराजत आहे । आगमनिगमपुण्यपरायण दास ह्मणे महिमा हे ॥३॥

॥राग बिलावल० धाटी ऐसे ध्यान समा) ॥ वैकुंठवासी रम्यविलासी देवाचा वरदानी । तेतीसकोटी सुरवर सोडी भक्ताचा अभिमानी ॥धृ०॥

तो हा राघव ध्याय सदासिव अंतरीं नाम जयाचें । रमणिय सुंदर रुप मनोहर अंतरध्यान तयाचें ॥१॥
त्रिंबकभंजन मुनिजनरंजन गंजन दानवपापी । बाणीं जर्जर घोर महावीर केले पूर्ण प्रतापी ॥२॥
वरद हरिगण दास बिभीषण सेवक वज्रशरीरी । भूमि चराचर चंद्र दिवाकर तंवरी भय आपहारी ॥३॥

॥वोवी॥ मुख्य ज्या ठाई साह्य भवभंग । उत्साव जाला हो सर्व ससांग । मनोरथ भक्ताचे पुरउनि मग । डोंबगांवां पातले गुरुराय ॥११॥
उपासना चाले ससांगपत्धती । साधुसंत ते तोषोन वानिती । भक्तलोक ते संतुष्ट पावती । मिळती अन्नार्थी मोक्षार्थी ॥१२॥
माघवद्यनौमी पुण्यतिथीला । विलोकुं मिळती जनलोकमेळा । देखोन करणें तो ससांग सोहळा नवाजिती जनें चतुर्विध ॥१३॥
सांप्रदायी बहुत होती । गुरुआज्ञे कराया जाती महंती । भरणा कथेचा लिहोन घेती । अभ्यासिती ब्रह्मविद्या ॥१४॥
कथेंत संताची गाईलें वचनें । रामदासाच कवनभाषण । कल्याणस्वामीचा भावार्थ गाणें । करा हो श्रवण स्वल्प कांहीं ॥१५॥

॥पद॥ फुट०॥ परम दयाळु माझा राम॥ धृ०॥ दशमुखभगिनी ताटिकातें । वधुनि केलें विश्राम ॥१॥
रावण मारुनी आमर स्थापी । पावउनि स्वधाम ॥२॥
जानकी घेउनि अयोध्येसि आले । दास म्हणे प्रियनाम ॥३॥

॥रामा शामा परमदयाळा मजवरी कृपा करी रे । करुणावचनीं रामा भवसिंधु उतरी रे ॥धृ०॥
विषय सुखासी भुललों रामा तुज रे विसरलों । कष्टी बहुत जालों ह्मणउनी रामा शरण आलों ॥१॥
चरणी शीळा तारियेली त्रिभुवनीं केली ख्याती रे । सुरनरभेदन पाळण रामा ऐसें तुझें चोज रे ॥२॥
ऐसा करुणावचनिं शरण येका जनार्दन रे । कृपेनें तुष्टले श्रीचक्रसारंगपाणी रे ॥३॥

॥हमारे निरधनको धन राम ॥धृ०॥ उठत बैसत सोबत जागत । हृदये जपत रामनाम ॥१॥
च्योर न लेवत घ्रीटतु कबहुं । वारो वारो लाख दाम ॥२॥
सुरदासप्रभु तिहारे मिलनकुं । तेरे चरनका वीश्राम ॥३॥

॥कब मे रामउपासक देखुं । चरन धोउं चरनोदक लेउं । जनम सफल कर लेखुं ॥धृ०॥
संपत विपतट सुख:दुख न मने रामरंगरस राता । परधनइछा कबहुं नही परनारी सब माता ॥१॥
ज्योग न भावे ज्युगत न भावे । हरीखें हरीके गुन गावे । कहे जनजसबंत दास दासनको संत देखत मन भावे ॥२॥  

॥अभंग॥ आह्मा जन्म ना मरण । सत्य श्रीगुरुची आण ॥१॥
अग्नीकापुरमिळणी । तैसें श्रीगुरुचरणीं ॥२॥
आह्मा नाहीं येणें जाणें । अजन्माचें लाजिरवाणें ॥३॥
रामानंदीं हा निर्धार । चिदांबरी अजरामर ॥४॥

॥पद॥ सूख जाल सुखा आनंद छुटा फुका ॥१॥
लुट मोटी पाही घेणार कोणी नाहीं ॥२॥
ज्ञानगर्व जातां ते लूट नये हाता ॥३॥
केशव ह्मणे ऊठा । तुह्मि संतसंग भेटा ॥४॥

॥वोवी॥ बाहोन नेतां सोनारीकर । भैरवदेव जाला साक्षात्कार । हिवरेस गेले प्रार्थितां गुरुवर । नागोबा भेटला प्रत्यक्ष ॥१६॥
येक गुरुभक्ती ठसतां हृदई । प्रसन्न होती देव ते सर्व ही । राहती स्वभावें जया गावीं । पूजोन सन्मानें करिताती ॥१७॥
कुकडगावकरी भेटुन गेले । कर्मळकरानीं आतिथ्य केलें । परंडयाप्रती येऊन राहिले । रामायन भक्ता ऐकवीत ॥१८॥
मग येऊन राहिले स्वस्थळाप्रती । तो मित्र हो वागे वैकुंठपती । लक्ष्मी ह्मणे मी भगिनी आईती । नांदे सरस्वती कन्यावत ॥१९॥
कोण येती कीं कोणकोण देशिचे । कोण सिष्य होती कीं कोणत्या वंशिचे । सत्पुरुषयोगी येती तयाचे । क्रम कोणास ठाउक हो ॥१२०॥
ग्रंथ बहु भरणा आसे संग्रहीं । अन्यमतस्थीं कीं सांप्रदाई । लिहून घ्यावया मागतां कांहीं । कृपणत्व न करितां वोपिती ॥२१॥
विसावोन मठीं बहुत राहिले । जे थेट ठळक सिष्य शाहणे जाले । महंती कराया तयास धाडिलें । बुद्धिवादयुक्त्या सांगुनी ॥२२॥
देती साहित्य वीणा पुस्तक । संच ते हुर्मुजी वस्त्र पोषाक । देउन धाडिता जगदोत्धारक । जाउन राहिले स्थळोस्थळीं ॥२३॥
उघडोन दाविती निजार्थ ठेवा । जगजीवनबावा निघाला जेव्हां । गुरुस्तवन केलें श्लोक येक बरवा । ऐकोन आर्थ धरा मनीं ॥२४॥

॥श्लोक॥ बहुमत्तमत्तांतरी दाडि जाली । पदीं आपदीं वृत्ति निवांत ठेली । जगज्जीवनाचा प्रभू तो अनामी । नमस्कार साष्टांग कल्याण स्वामी ॥१॥

॥वोवी॥ ऐसें बहुतांनीं केलें स्तवन । ते ग्रंथगर्भी न होय लिहिणें । तथापि ऐका हो प्रेमळवचन । विश्वास कैसा तो परीक्षा ॥२५॥

॥श्लोक॥ कल्याण होणे जरि तुज आहे । कल्याणपाई तरि स्थीर राहे । कल्याणबाणी पडतां स्वकानीं । कल्याण जाले अविनाश प्राणी ॥१॥

॥वोवी॥ शिवराजस्वामी अपचंदकर । निरोपाअंतीं पूजुनी आदर । आरती गाइले स्तवनप्रकार । श्लोक येक वदले ऐकिजे ॥२६॥

॥आरती॥ अविनाशब्रह्म जे कां नाम कल्याण त्याचें । वित्पन्न बोलताती सार सर्वशास्त्राचें । न खंडे अखंडीतध्यान योगीवृंदाचें । पाहतां मोक्षमूर्ति कोड पुरे लोचनाचें ॥१॥
जयजया मोक्षपाणी स्वामी कल्याणराजा । आरत वोवाळीन विश्वंभर विश्वबीजा ॥धृ०॥
अवतार ब्रह्मवंशी शक्ती अद्भुत देही । मारुतिस्वरुप भासे जिंतिले रिपु साही । जितेंद्रिय ब्रह्मचारी पूर्ण लक्षणे दाही । शड्गुण विश्वराजा पार न कळे कोणाही ॥२॥
धन्य हे वंशावळी हंसविधीवशिष्टयोगी । रामचंद्रभीमापुढें रामदास कलयुगी । सद्गुरुकल्याणस्वामी चित्सुखानंद भोगी । नातुडे द्वैतभावा शिव नि:संगसंगी ॥३॥

॥श्लोक॥ अविनाश जें नाम कल्याण त्याचें । करी सर्वकल्याण सर्वांसि साचें । समर्थे जना उत्तरायासि पारी । असी ठेविली मूर्ति कल्याणकारी ॥१॥

॥वोवी॥ ऐसीयापरी गेले तयाला । श्रीपवनात्मजु संगीक जाला । उदास वाटल इकडे गुरुला । अवतार समाप्त करुं पाहती ॥२७॥
संकल्पासरसी जोडुनी कर । काळ वदे मी तुमचा किंकर । प्राणदान मागुं आलों सत्वर । काय आज्ञा ते वोपिजे ॥२८॥
हांसोनि बोलिले माहानुभाव । सद्गुरुपदीं हा विराला जीव । ठाव न उरला सर्वथैव । बासनेसी रमावया ॥२९॥
सत्यसंकल्पीं गेला संकल्प । मीतूंपणाच नुरे चि रुप । आत्मा खेळे तो आपणांत आप । तनु ते येथें पडतसे ॥१३०॥
वायुविनाशे मोक्ष:वचन । कैंचा ठिकाणा राहूं पवन । जिरेल आकाशीं संकल्पेविण । काय नेसील आता तूं ॥३१॥
स्वरुप आहे तें निर्विकार । माईक मृषा ते जडविकार । चंचळ ही जालें तदाकार । कर्मधर्मवेळ जेथ नसे ॥३२॥
सद्गुरुरायाच कृपेबळें । परमार्थाचा मांडतां खेळ । पालटोन जालासि तूं ही सुकाळ । यद्यपी येक ऐक पां ॥३३॥
युद्धकांडाच होतसे श्रवण । रणरंगीं गुंतला रघुनंदन । सिंहासनीं बैसतां संतर्पण । होईल मग तुं ये जाई ॥३४॥
तितुक्यांत साधेल महात्कृत्य । सज्जनगडाला आलेति संत । अगत्यरुप ते येऊन येथ । भेटून पुढें जातील ॥३५॥
येऊन जातील सांप्रदाई । मग उत्साह विलोकूं यावे तुह्मी । तों काळ गुप्त जाला लागोन पाई । नित्योस्छाव मांडला ॥३६॥
आले संत ते पावले आदर । कीर्तन ऐकाव हें अपेक्षा थोर । मनोरथ पुरऊं दिनोत्धार । मानविलें तया कीर्तनीं ॥३७॥
भक्तिज्ञानवैराग्यध्यान । आणोन ऐक्यत्वीं कळवीलें महिमान । सेवटीं सुचविलें गुरुप्रीतिलक्षण । गुरुभक्त हो श्रवण करावें ॥३८॥

॥पद॥ मज तो आवडतो मम स्वामी । निशीदिनीं अंतरयामीं ॥धृ०॥ अक्षैपदीचा सुखदाता । निरसुनि मायाममता ॥१॥
भक्तिमार्गीच्या गजढाला । चालविल्या आढाला ॥२॥
काय बोलुं मी कीर्तीसी । न दिसे तूळणेसी ॥३॥
छत्र बहुतांचें दासाचें । धाम चि कल्याणाचें ॥४॥

॥श्रीगुरुराजया माझेया स्वामी दीनबंधु ॥धृ०॥ लिंगदेह मोट खोटें । वज्रघाय न तुटे न फुटे । अवलीला चरण स्पर्शे केला छेदु ॥१॥
भवभारी वारी स्मरण । जडमूढालागी तरण । जन्मासी येणें मरण नाही खेदु ॥२॥
परतरवर कल्याण देवा । हिनदीनजनपावनदेवा । सज्जन हृदयांतरदेवा तुझा वेधु ॥३॥

॥वोवी॥ सर्वापरीनें पुरोन हेत । गेले साधू ते महिमा वानित । सिष्य लोक ही पावले खुणांत । मुक्त होठेले महायोगी ॥३९॥
ब्रह्मी समरसले देवाज्ञा जाली । साजे ऐशाला बोलणे बोली । ऐसे विरुळे ते अंतकाळीं । सावध होऊन राहील ॥१४०॥
तनु नव्हे तें स्वरुपमंदिर । मानसपूजेच होये माहेर । ते ही विध्युक्ती शास्त्राधारे केले अगोचर संभ्रमें ॥४१॥
धन्य संताच कर्तृत्वसार । गोठोन साकारनिर्विकार । समाधिरुपें भावितां आकार । तारिती भजकां सांभाळिती ॥४२॥
माहराजाचे सिष्य उदासी । न वांछिती किमपी थोरपणासी । हरकारा धाडिलें सिरगांवासीं । होउन अधिकारी यावया ॥४३॥
तो दत्तोबाचा सत्पुत्र राघव । बावासि नावडे थोरीव वैभव । श्रेष्ठपणभोगाच ऐकतां नांव । राम राम ह्मणतिला त्रासुनी ॥४४॥
नेम जो नेमिला स्वयें समर्थ । अंतर तयाला न कीजे किंचित । ह्मणोन अधिकारी तेथील सत्य । निस्पृही ऐसा कळविला ॥४५॥
ऐशास ह्मणावें रामदासी । ते चि सद्वंशी सुकृतरासी । गुरुरुपी भावोन विरक्तांसी । सांगूं धाडिला नि:संशय ॥४६॥
तेणें सत्क्रिया सारिलें समग्र । नुन्य न पाडितां कहीं अणुमात्र । देउळाकार करुनि सुंदर । केलें साकार समाधी ॥४७॥
सर्वा देखतां स्थापिते वेळीं । तपज्योति ते प्रवेश जाली । कीर्ति ते चहुंकडे फांकोन गेली । पुण्यतिथी उत्साव करिताती ॥४८॥
अधिकशुत्ध आषाढमासीं । तिथी बरवी ते त्रयोदशी । मीनले तहिनीं स्वरुपसमरसीं । कल्याणस्वामी गुरुलाल ॥४९॥
सज्जनगडीं जाले विचित्र । पूजका स्वप्नीं कथिलें गुरुवर । कल्याणघट अस्तीबरोबर । कासीस मम अस्ती धाडा रे ॥१५०॥
महंत ही देखिल हें चि स्वप्न । न कळें चि ह्मणती चरित्र गहन । अस्ती होत्या जे शुत्ध करुन । ते हे मिळऊन धाडिले ॥५१॥
धन्य धन्य हे गुरुशिष्यपण । धन्य धन्य हे सेवाविधान । धन्य धन्य हें अभेदलक्षण । धन्य धन्य लीळा अगाध ॥५२॥
सज्जनगडीं सेजसदनीं । येकांत करिती गुरुशिष्यानी । आसती समाधी सन्निधानीं । चाफळामाजीं रामघळीं ॥५३॥
गुरुशिष्यऐक्यता याच नांव । जैसा होतसे श्रीगुरुदेव । तैसी च लीळा दाविती अभिनव । सिष्य तो गुरु कां नव्हे ॥५४॥
विशेष न वानिल कां कल्याण चरित । तरि समर्थ व्याख्यानीं आसे सम्मिश्रित । पराक्रम केले बहु हणुमंत । तरी ते पाहवे रामायणीं ॥५५॥
कल्याणस्वामीचा ऐसा सप्रेम । जो गुरुभक्त जगीं या आसे नि:सीम । तयास मानिती सत्सखा परम । घेतां ज्या नाम सौख्य होये ॥५६॥
वाटे इतराला समाधिस्छ । परी प्रत्यक्ष आसती नांदत । बाहतां भक्तांनीं शुत्धभावार्थे । प्रगटोन करिती सांभाळ ॥५७॥
पुण्यतिथी करितां शिवाजीपंत । हो पाहे राणीं वृष्टीनें कलित । प्रार्थितां पावोन केलें निश्चित । जन्मवर उत्छावीं वृष्टी न पडे ॥५८॥
सिष्य व्यापारी पडतां बंधनीं । पावोन सोडविलें मोक्षदानी । सीणता भक्तानीं परमार्थ इछुनी । बहुतांसि केले उपदेश ॥५९॥
उत्तरोत्तरी पावले पावती । येईल आल बहुतां प्रचिती । वानिलें वानितील ख्याती कीर्ति । विश्वासिका प्राप्ती सौख्य फळें ॥१६०॥
हे कृपा सर्व ही समर्थस्वामीची । वाट नीट दाविले परमार्थाची । कीर्ति वानावी प्रभुराजयाची । ऐकतें अश्रत्धा न करावी ॥६१॥

॥अभंग॥ रामदासस्वामी धन्य गुरुराये । हरीहर स्वयें अवतार ॥१॥
भक्ताच हृदय कैलास वैकुंठ । भव नष्ट दुष्ट हरपले ॥२॥
वृषभ खगेंद्र जालों मी आईता । भक्तांनीं बाहतां नेउं तेथें ॥३॥
शिवस्य हृदयं हे श्रुती वचन । दोघे ही अभिन्न गुरु येक ॥४॥
ज्ञानउपासना स्वात्मानंदसुख । येक चि असक दावियलें ॥५॥

॥वोवी॥ दासविश्रामधाम गंडी । परी भक्तजना नसे सांकडी । आत्माराम जो समर्थ गडी । जेथें अनुदिनीं नांदतु ॥१६२॥
इति श्रीरामकृपा । तारक परमार्थ सोपा । कल्याणस्वामी चरित्र उत्तरार्ध । अध्या येकसेहे सोळा ॥११६॥
जय जय राम ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP