मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|दासविश्रामधाम| ॥खंड॥ १०५ दासविश्रामधाम श्रीसद्गुरुस्तवन ॥गत॥ ९७ ॥अश्वास॥ ९८ ॥समास॥ ९९ ॥मान॥ १०० ॥प्रकरण॥ १०१ ॥प्रसंग॥ १०२ ॥सर्ग॥ १०३ ॥अध्याय॥ १०४ ॥खंड॥ १०५ ॥पटळ॥ १०६ ॥विसावा॥ १०७ ॥स्तबक॥ १०८ ॥कांड॥ १०९ ॥वर्ग॥ ११० ॥सोपान॥ १११ ॥अवधान॥ ११२ ॥वर्ग॥ ११३ ॥पटळ॥ ११४ ॥खंड॥ ११५ ॥अध्याय॥ ११६ ॥सर्ग॥ ११७ ॥प्रसंग॥ ११८ ॥प्रकरण॥ ११९ ॥मान॥ १२० ॥समास॥ १२१ ॥लळीत॥ आत्मकृत ॥खंड॥ १०५ एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले. Tags : dasvishramdhammarathioviओवीदासविश्रामधाममराठी ॥खंड॥ १०५ Translation - भाषांतर ॥श्रीरामसमर्थ॥॥पद॥ (राग धनाश्री-धाट जप रे मना॥) दे दे दे देवा भजन तुझें ॥ध्रु०॥ करितां माझें माझें व्यर्थ जालें वोझें । आतां नावडे कांही दुजें ॥१॥॥वोवी। साधान जनिं या असती अनेक । सुष्ट दुष्ट नाना फळदायक । परि स्वहित संपादु सुलभ येक भजन होय मार्गी सुमार्ग ॥१॥अवगत जालिया भजनमूळ । फिके तात्काळीं स्वानंदफळ । बत्धापासुनि सित्धासि केवळ । गती जीवनकळा भजन ची ॥२॥जेथें नांदत भजनसौभाग्य । तो जीवत्वदैन्या फेडूं योग्य । सन्मित्र जोडल्या श्रीरमारंग । सहसंपती सादर इंद्रादी ॥३॥श्रवणाहूनि आत्मनिवेदन । हे चि जाणिजे नवविधानभजन । येकात्मऐक्यता प्रेमभूषण । जाणेल हे खूण धन्य तो ॥४॥॥अभंग॥ जयासि लाधलें भजनसौभाग्य । पदासि तो योग्य होय येक ॥१॥मत्तमत्तांतरीं शोधुनि पाहतां । खरें हें योग्यता भजन ची ॥२॥पतीतपावन सद्भक्ती संपत्ती । स्वरुपाची प्राप्ती भजन ची ॥३॥मृषा खटपटी ह्मणतां माझें माझें । नोहे स्वहितवोझें अधीक ची ॥४॥सर्व बीजसार जाणुनि भजन । इछिती ज्जनस हें चि सुख ॥५॥नावडे नावडे आतां कांही दुज । भजन सकाज ह्मणती ज्ञानी ॥६॥आत्माराम प्राप्ती भजनद्वारें घडे । अधिकाधिक वाढे परमार्थ ॥७॥॥वोवी॥ जाणोन भजन हें सर्व सित्धांत । सर्व हि साधनीं मथित निजअर्थ रामीरामदासस्वामी सर्वज्ञपंडित । भजनास्तव देवा प्रार्थिले ॥५॥दे दे दे देवा भजन तुझें । पुढतोपुढती हें चि साम्राज्य । कार्य ससित्धि पावोन माझें । संपादेल निजकाज बहुताचें ॥६॥दाता दयाळा श्रीरामराणा । सफळ कीजे जी विज्ञापना । वृत्यादि उफाळा विषयवासना । परिहारुन होई प्रसन्न ॥७॥प्रस्तुत भावातें करीन विदित । जो आधीं च देवा ठावा तुह्मातें । विभक्तिपणाचा मोडूनि किंत । सामाऊन पदीं मिरविजे ॥८॥॥पद॥ (कामोद धाट कारण पा०॥) वृत्ती माझी गाय दश्य हे सकळ खाय । दोहिली न जाय काय करणें रे ॥धृ०॥१॥रामीरामदास आस करुनि पाहे वास । तुझा मज ध्यास कां उदास रे रामा ॥२॥॥वोवी॥ ऐसियापरी करीतां स्तवन । प्रसन्न जाला श्रीरघुनंदन । मग स्वजनासि कथिलें सार तें सज्जन । करा हो भजन रामाचें ॥९॥माईक भ्रमानें भुलोन वृथा । विषयाब्धिमाजीं उलथोन बुडतां । किमपी न होय सार्थकता । कीजे सदृढ भजनाश्रय ॥१०॥॥श्लोक॥ समरस विषयाची वाउगी व्यर्थ वाया । तरुणपण शरीरीं घेतले सर्व जाया । कठिण विषमकाळी सर्व सोडूनि जावें । ह्मणउनि रघुनाथीं सर्वभावें भजावें ॥१॥॥वोव्या॥ बुत्धिवाद जना सांगत यापरी । करीत मुक्तीचे सद्वाटेकरी । परमार्थसौख्य तें परोपरीं । दाविले अवतारी हरी स्वयें ॥१२॥तया देशिकाचें कृपावचन । कैवल्य भोग्तृत्वा निधान कोण । सत्य त्रिसत्य श्रीरामभजन । करा प्रीतीनें सज्जन हो ॥१२॥संज्ञा मागील कथा रसाळी । राहिले भवहरु श्रीरामघळीं । स्तवितां श्रीरामा येकांत स्छळीं । जाला सादृश्य जगदात्मा ॥१३॥धन्य दासाचा भावार्थ निका । कवण्यापरीनें प्रार्थिलें ऐका । प्रसन्न होऊं गिरिज्यावरसखा । विळंब कांहीं न लागे ॥१४॥॥पद॥ फुट राम । ये हो हो आजि तूं राहे रामा । वृत्तिअ पासीं गुंतली रे रामा । देहावस्छा लागला रे रामा ॥धृ०॥ ये हो हो लागली थोर चिंता । कैं भेटसी मागुता । जीव जाला दुचिता रे रामा ॥१॥ये हो हो दु:ख संसारीचें । कां आह्मी साहिले रे रामा । तुज देखतां राहिलें रे० ॥२॥ये हो संसार गांजिले । तां ही कां अव्हेरिलें रे बहुत कठीण वाटलें रे० ॥३॥ये हो हो रामदास वाट पाहे । भेटि इछिताहे रे० । तुझा वियोग न साहे रे रामा ॥४॥॥वोवी॥ स्तवनांती साकार होऊनि देव । सन्मुखी ठेला करुं गौरव । पाहतां न उरवी जो द्वैतभावदेवभक्त स्वमेव करी लीळा ॥१५॥ब्रह्मैवरसाची वोतीव मूर्ति । सदिव्य शोभा निवळ सज्जोती । प्रसन्नवदनु अनुपम्य कीर्ती । सुदिव्यभूषणी भक्तसखा ॥१६॥नमनपूजनादि अर्पूनि आदर । निवेदूनिया अंतरी अंतर । परोपकारासाठीं उत्तर । बोलूनि वरदान घेतलें ॥१७॥जी देवा भक्ताचे मनोरथ । पुरवावया उपजतां हेत । करुणास्वरानें प्रार्थितां तुह्मातें । पुरविले आर्त नानापरी ॥१८॥कितेकां दिल्हें प्रत्यक्ष दर्शन । इछिलें इछा ते केले पूर्ण । कितेक दिल्हें सफळीत स्वप्न । कैवल्यनिधान दाविलें ॥१९॥कितेकां सांभाळ केलेति मार्गी । सुखदु:ख विचारिलें कितेकालागीं । गाइला जेविला कितेका संगीं । महिमा अपार न वानवे ॥२०॥सांभाळुनिया चौंदेशीं भक्ता । आणोन शोभेसि निजपरमार्था । मज लागो न दिल्हें कांहीं चिंता । न पडों दिल्हें वाक्य खालीं ॥२१॥सुकृत पाहिजे हे न केला आड । अथवा न पाहिला भक्तिभाव दृढ । सुलभ होठेलें काम जें अवघड । कीर्ती वानविलें जगदोन्मुखीं ॥२२॥मज दीनास्तव सर्वा केला लालन । पुढती ही कराल संरक्षण । परंपरावरी कीजे पाळण । उपास्यअभिमान तुमचा ॥२३॥आणिक येक पुसेन येक्षणीं । तव सगुणदर्शन वांछितां कोणी । कवण्यापरीनें प्रसन्न होऊनि । भेटी द्याल तें सांगिजे ॥२४॥ऐसिया परीनें बोलतां सांग । वरदान वोपिलें भूजांतरंग । येतद्विषईचा असे अभंग । करोन श्रवण समजा हो ॥२५॥॥अभंग॥ आज्ञाप्रमाण परमार्थ । केला जाण म्या यथार्थ ॥१॥आतां देहाचा कंटाळा । आला असे जी दयाळा ॥२॥आहे येक चि मागणें । कृपा करोनीया देणें ॥३॥ज्यासी दर्शनाची इत्छा । त्याची पुरवावी आस्छा ॥४॥ऐसें सखया वचन । त्यासी देईन दर्शन ॥५॥तेरा अक्षरिया मंत्राचा । जप करील जो साचा ॥६॥त्याची संख्या तेरा कोटी । होतां भेटेन मी जगजेठी ॥७॥भय न धरावें मनीं । बहु बोलिलों ह्मणोनी ॥८॥नलगे आसनीं बैसावें । नलगे अन्नही वर्जावें ॥९॥येतां जातां धंदा करितां । जपसंख्या मात्र धरितां ॥१०॥येका तेरा कोटीतची । पापनाशन जन्मांतरीची ॥११॥मग तयासी दर्शन । देऊनि मुक्त त्या करीन ॥१२॥ऐसा वर होतां पूर्ण । दास जाला सुखसंपन्न ॥१३॥॥वोवी॥ पावोन यापरी उत्धारक वर । ऐका हो प्रार्थिलें पुन्हा उदार । जी देवा वाहिला सर्वभक्तभार । चिंता अणुमात्र न राहिली ॥२६॥परि येक संशईं पडलें मानस । अनुभवामाजिं गुंतलों भासे । तेणें द्वैताचा न होय विनाश । उफाळेल दृश्य तेणें कीं ॥२७॥तरि सामाऊनिया अनुभवीं अनुभव । वोपी बा स्वपदीं निजैक्यठाव । समूळनुरवावें माईक माव । ह्मणोन प्रार्थिलें ऐका कसें ॥२८॥॥पद॥ (धाट नरापरीस वानर०॥) मी तों धुंडित न येतां तुजला । चाड नसतां अंगिकार केला । आतां ठाई ठाई गोविसी काशाला । गुंतों नेदी सोडवी वहिला रे रामा ॥१॥अनुभवीं गुंतलों सोडवावें । मज मीपणावेगळें नुरों द्यावें ॥धृ०॥ तुज चुकलें शरणांगत तुझें । कां रे न पडे तयाचें सांग वोझें । बहु बोलतां उचित नव्हे माझें । परी अंतरीचें समर्थे जाणीजे रे रामा ॥२॥ऐसें जाणोनिया दीन आपंगिलें । दिनानाथनाम आपुलें राखिलें । जें जें अर्त होतें तें तें पूर्ण केलें । रामें दासासाठीं मीपण टाकिलें रे रामा ॥३॥॥वोवी॥ पावोन हे ही वरदसौभाग्य । ह्मणतिलें देवा रे आला उबग । तरि संगपंग तनूचा करीन त्याग । स्वरुपीं रमेन अखंड ॥२९॥तरि सगुणरुप हें सुदिव्य चांग । दृष्टींत ठेवीं जडवोन अभंग । साकार होठाका पडतां प्रसंग । चिंतील तें सांग पुरवीत ॥३०॥ऐकोन यापरी प्रेमळवाक्य । सद्गदीत होठेला रघुनायक । न बोलवें तैसी च देऊनि भाक । दिसत चि लपाला हृत्कंजीं ॥३१॥समाधान यापरी पावोन पूर्ण । मग सिष्याप्रती कथिलें वर्तमान । सारुनि संध्यादि नेमविधान । भिक्षान्नभोजन सारिलें ॥३२॥॥अभंग॥ पवित्र या जनीं भिक्षेचें तें अन्न । गुरुकृपें विधान कळलिया ॥१॥मुख्य संतुष्टता वृत्ती ते असावी । लालूच नसावी षड्रसाची ॥२॥भिक्षान्न सेवील्या सज्जोती प्रगटे । अनुसंधान तुटे विषईक ॥३॥अन्न भोक्ता कोण कोण दाता शोध । घेतां योग साध्य होय सर्व ॥४॥बिंबल्या हृदईं रहस्याचें वर्म । भाळे आत्माराम सौख्यदाता ॥५॥॥वोवी॥ मग ईक्षोन घळांत कृपादृष्टी । भैरवादिकाच्या घेऊनि भेटी । राहत पाहत तीरी कडे कपाटी । सिंगणवाडीसी पातले ॥३३॥सारुनि तेथें पूजादि विधान । निरोप पुसतां गहिंवरुन । देऊनि प्रीतीनें आळिंगण । सामावला समरसीं ॥३४॥पुसोन आपणा तीर्था वंदुनी । चाफळाप्रती पातले तेथुनी । तोषवोन श्रीरामा नमनस्तवनीं । दृष्टी भरुनि पाहिलें ॥३५॥ उपकारउबाळा लोटला पोटीं । प्रेमांबुधारा होतसे वृष्टी । न बोलवे ह्मणतिलें दीनासाठीं । नाना संकटीं श्रमला कीं ॥३६॥अपार महिमे दाविले जनासी उरों न दिल्हा द्वैतभावासी । काय उत्तीर्णता होउं यासी । वेगळीक दिसेना पदार्थु ॥३७॥पुनरपी देवा रे विनवणी हे ची । ब्रीदास्तव सहनता कीजे श्रमाची । चिंता असावी दासलोकाची । अधिकार न पाहतां सांभाळिजे ॥३८॥येरु गहिंवरला न निघे वाक्य । तथास्तु कारण हलविलें मस्तक । स्छूळाकृतीनें भक्तनायक । न येति क्षेत्रा यास्तव ॥३९॥पुनरपी पाहतां मूर्तिकडे । दचकले प्रतिमा ते दृष्टीस न पडे । अंतरीं लक्षितां शरकोंदड । धरुनि हृदई उभी असे ॥४०॥पावोन अंतरीं अति संतुष्ट । मिळोन श्रीरामीं कर्म धर्म सगट । न्याहाळून सिंहासनपीठ । सादृश्य केलें नमियले ॥४१॥सव्य घेऊनि श्रीरामजीसी । नमन करुनि महारुद्रासी । वर वोपुनि क्षेत्रीं राहणारेसी । वंदोन स्छानासि निघाले ॥४२॥न्याहाळीत वृक्षांत संभ्रमु मानित । तरुतळीं पर्वतीं विसावा घेत । चालिले जयाला संसार तृणवत । आतां इकडील वृतांत हो ॥४३॥ऐकोनि अपाडु समर्थख्याती । दर्शनापेक्षा धरुन चित्तीं । जे भोगिते सदा हे दैवी संपती । सद्वृंद निघाले सोळाजणी ॥४४॥माहानुभावी ते ही विरक्त । गडासि पातले दुर्होन फिरत । ऐकोन तेथ नाहींत समर्थ । चाफळा उजुं परतले ॥४५॥आठवीत दासाला चालता रानीं । सिष्यासह आले दास तिकडुनी । पायासी लागले देखतां नयनीं । उठोन स्तवावें विसरले ॥४६॥उचलोन प्रीतीनें । तया सज्जन । सप्रेमें दीधलें क्षेमाळिंगण साउलीस वृक्षातळीं बैसोन । निजखूणवचनें बोलती ॥४७॥प्रचीतवाणी ते देवसुरभी । रस सामावे केवि ग्रंथगर्भी । येक रव होतां स्वर्गीचे दुंदुभी । चुटक्या वाद्यात न माय ॥४८॥कां विरक्त व्हावे कां वनी राहावें । कां तीर्थाटणु कां पृथ्वी फिरावें । ज्ञानोपासना वैराग्य प्रभाव । निर्विकारदशा कथियले ॥४९॥श्रीगुरुरायाचें कृपाकौतुक । श्रीराममय जाले आसक । अनुभवपणाचें रहस्य वाक्य । साधक साध्यता बोलिले ॥५०॥ ॥श्लोक॥ आटव्यवनीं भुवनीं राम आहे । जनीविजनी राम सर्वत्र पाहे । दिशा दाटल्या राम संपूर्ण जाला । विवेकें चि तो दास रामीं मिळाला ॥१॥सदा सर्वदां सेवकेवीण स्वामी । भले जाणती भक्ति हे मुख्य नौमी । स्वरुपीं भरावें बरें वीवरावें । विवेकें नुरावें जना उत्धरावें ॥२॥दिसे सर्व माया नसे सत्य कांहीं । विवेकें तुला तूं चि शोधूनि पाहीं । किती पाहसी तूजला ठाव नाहीं । देहेभावना सर्व सांडूनि राहीं ॥३॥जनीं सांडणें मांडणें या मनाचें । मनीं मूळ शोधी बरें उन्मनाचें । परी शोधितां कल्पनारुप होसी । स्वयें संत आनंत सांडूनि जासी ॥४॥आरे तूजपासीं तुझें ता नसावें । मनांतील मी सर्व कांहीं पुसावें । निराकार तूं मानि रे सत्य भावें । जनीं सर्व ही होत जातें स्वभावें ॥५॥स्वभावें चि होतें स्वभाचें चि जातें । वृथा सीणसी आवरेना तुला तें । भले सांगती तुजला गूज कांहीं । तयामाजि तो पाहतां हेतु नाहीं ॥६॥पाहावें कसें पावनें पावनाला । उठे हेतु चि भावना भावनेला । न बोलोनि बोलों किती काय आतां । अनुर्वाच्य तें सत्य नि:संग होतां ॥७॥आखंडीत खंडीत कैसें करावें । लोहो हेम जालें कसें पालटावें । नदीचा मुळीं वोघ वोघें मिळाला । उपाये करावा कसा वेगळाला ॥८॥तसा साधकु लागतां संतसंगें । स्वयें संत आनंत जो तो चि आंगें । परब्रह्मबोधें परब्रह्म जाला । ह्मणे कोण रे देहधारी तयाला ॥९॥देहेधारकाला देहे भासताहे । जसी कल्पना ब्रह्म कल्पूनि राहे । परब्रह्म तें नाकळे कल्पनेसी । तसे संत आनंत हे रामदासी ॥१०॥॥वोवी॥ हें सद्गुरुमुखीचें ऐकोन बोलणें । अनुभवपणाची उजळलें वदन । पूर्णत्वीं पावलें समाधान पूर्ण । करूणा उपजली दासासी ॥५१॥महानुभावी ते आसती सीणले । भुकेजले आणि तान्हेजले । तेणें मुखाब्ज आसती कोमाइले । देखोन्ब कळवळले रसीक ॥५२॥ईक्षोन कल्याणा सांगती ऐसें । गांव नाहींत कीं आसपास । या अवेळीं भिक्षा वनदैवतास । झाडपाहडास विचारी ॥५३॥वदोन तथास्तु झोळी घेऊन । श्रीरघुवीर समर्थ नाम स्मरोन । वनांतरीं करितां आटण । जें तें दैवत धावीनलें ॥५४॥ससांग सयपाक भीक्षा घालिती । पाहिजे ते सेवा करुं इछिती । भीक्षा आणोन प्रमाणपत्धती । नमोन गुरुदेवा निवेदिला ॥५५॥धन्य दासाची कमाई ऐसी । येक आवडता श्रीरामासी । मानों च लागती त्रैलोक्यवासी । जनविजन जया समान ॥५६॥साहित्य जालें पाकविधान । परि काम खोळंबलें जीवनेविण । हासोन श्रीरामास्मरोन सज्जन । उलथविला धोंडा येक तेथें ॥५७॥स्वत्छोदक निघालें मिष्ट बहुत । भीमकुंड नाम ठेविलें तीर्थांत । स्छापना करुन महादेवात । तुंबेश्वर नाम ठेविलें ॥५८॥इकडे जालें ससांग रांधन । तिकडे देवाचें पूजन । वैश्वदेवांतीं नैवेद्य दाऊन । सारिलें भोजन उल्हासत ॥५९॥जालियावरी तांबोलसेवन । आर्तवंत ते पावले निजखूण । तंव कल्याणदात्यांनीं करुनि नमन । गुरुराजसन्मुखी ठाकला ॥६०॥ह्मणे दयाळा या तीर्थाकारण । भीमकुंड ठेविल नामभिदान । तरि जंव गंगा प्रगटली तीर्थी भरुन । साधुसज्जन संतोषले ॥६१॥ते गडावरील तीर्था हें चि नाम आसे । हा वळखोन भावार्थु हासिले दास । ह्मणतिलें ते टाकी तीर्थकुंडास । रामकुंड नाम वदाव ॥६२॥ऐसें आसे हो रसाळ चरित । प्रांजळ कितेका नाहीं विदित । पाहताही कोणी देवतीर्थात । कोण स्छापित नेणती ॥६३॥देवतीर्थाच काय वरदनाव । कोण होते ते महानुभाव । वनदैवतांनीं केलें गौरव । यास्तव प्रख्याती नसे कथा ॥६४॥उदासवृत्तिचा योगिराणा । महिमा दाविजे हें आवडेना । यद्यपी वाढली उपासना । हरीश्रीरामकृपेनें ॥६५॥आसो साधु ते करुनि नमन । गेले अद्महिमा करीत वर्णन । गुरुशिष्य इकडे पंथक्रमोन । सज्जनगडासी पातले ॥६६॥होते ते होते पाहत वाट । मिळाले होते जे घेउं भेट । भोळेभाविकीं लोक चतुष्ट । पावले संतुष्ट गुरुकृपें ॥६७॥राजा ही पातला समुदावसहित । सेवेसि जाला बहु अनुसरत । नुन्य उल्हासी न पडे किंचित । नित्योत्साव नित्यमंगळु ॥६८॥सद्गडीं राहिले श्रीमोक्षपाणी । आसतां सभेसि येक्यादिनीं । सभोवतीं तेथें जाली दाटणी । जन सज्जनविप्रवृंद ॥६९॥अपूर्व जे कांहीं बोलती मात । देशोदेशीचे सांगती वृत्तांत । गोष्टीनें गोष्टी वाढली त्यांत । येकभक्तिभक्त बहुमान्य ॥७०॥तंव नमोन पूसती स्वामीरायात । नि:सीम तुह्मी तो श्रीरामभक्त । शिवस्छापनेचा कां उपजला हेत । कां शिवउपासका प्रीत बहु ॥७१॥सहज शंभूच पाहतां स्छान । परिवारेसि तेथें मोकाम करुन । सारुनि ससांग नैवेद्य पूजन । स्तवोन कीर्तन करितात कीं ॥७२॥एवं पुसणेचा भाव कृत्रिम । कां जनाचार तया विदित क्रम । पोटास्तव नाना दाविजे प्रेम । हीणाच मन राखिता ॥७३॥समर्थ ही होय गुरु राजाचा । महादेव शंभु कुळदेव त्याचा । महिमा वानिले काय कीं तयाचा । हा भाव विप्राच्या मानसीं ॥७४॥परि धन्य स्वामीच कर्तृत्व आसक । कहीं न लगे बट्टा कळंक । मान्य ज्या करिती देवदेवादिक । लोकाचारपरी नव्हे हो ॥७५॥गावेगावीं जे आसती देव । कवन त्यावरी कीजे लाघव । आरत्यादि गातां आपुल नाव । मिरवेल जनीं याहेतु ॥७६॥कासारांनीं पुसपुसोन मूर्ति । तारीफ करितां नव्हे कीं भक्ती । धर्मन्याय कथितां धनपिशाप्रती । मोक्षापेक्षसिष्य नव्हे तो ॥७७॥यजमानाची जे उपासना । लक्षून कीजे थोरीवर्णना । नोकून बोलिजे साधुसज्जना । ठोंबेमत येक स्छापावे ॥७८॥हें आसो लुबर्याची निचाड कीर्ती । धिग त्या न होती योग्य परमार्थी । हें आसो विप्रांनीं सद्गुरुप्रती । बोलिलें होईल दैव धन्य ॥७९॥येकदेवासी धरितां दृढ । दुजे देवाची नसावी आवड । येरु ह्मणतिलें हें मत पाषांड । येकदेशी हटनिग्रह ॥८०॥येक चि सर्वत्रीं आत्माराम । तरि कां आणावा भाव विषम । ऐकोन तयासि उपजला प्रेम । समर्थदर्शन लाभ घ्यावया ॥८१॥पाहोन तयाचा भाव निर्मळ । ईक्षण कृपेनें करितां दयाळ । आत्मा चि भासला सकळींसकळ । आपणा आपण विसरले ॥८२॥निवाले धरितां श्रीपादपद्म । स्वामीराज वदती न टाकिजे क्रम । यद्यपी उपासनीं उपजे प्रेम । गुरुंनीं नेमिलेंक नेमांत ॥८३॥धरुनि अंतरीं येक दृढभाव । वरकड देवा ही कीजे गौरव । तरि आमुचा कुळस्वामी महादेव । जो वोपिता वैभव भक्तांसी ॥८४॥शिवस्य हृदय श्रुतिव्याख्यान । शिवराम येकचिमय संपूर्ण । जें वानिजे तें साजे महिमान । आत्मायनह्यादि ज्या वोपे ॥८५॥तो भावार्थ संचरो सकळिका हृदई । अभंग बोलिले येक ते समई । संतुष्ट पावोन दक्षजावाई । रामदास आपुला मित्र ह्मणे ॥८६॥॥अभंग॥ माझा कुळस्वामी कैलासीचा राजा । भक्ताचिया काजा पावतसे ॥१॥पावतसे दशाभुजा उचलोन । माझा पंचानन कईवारी ॥२॥कईवारी देव व्याघ्राचा स्वरुप । भुमंडळ कोपें जाळुं सके ॥३॥जाळुं सके सृष्टी उघडितां दृष्टी । तेथें कोण गोष्टी इतराची ॥४॥इतराची शक्ती शंकराखालती । वाचविली क्षिती दास ह्मणे ॥५॥॥वोवी॥ ऐकोन अभंगीं । प्रभुत्व आर्थ । संतोष बहु जाला सकळिकात । यापरी बहु जना सद्गुरुनाथ । भक्तिसुपंथा लाविलें ॥८७॥भक्तसिष्य तरती हें नवल काय । निंदका गवसली निजात्मसोय । स्वभाविका होतसे तरणोपाय । होती तन्मय तत्त्ववेत्ते ॥८८॥एवं अवतार हा जाला तारक । कीर्ति न वानवे सहस्त्रमुख । तेथें बापुडे मानवीरंक । लीळानिधी पार केवि होती ॥८९॥ऐकोन जयाचे प्रबोधवचन । मंदमती ते होती शाहणे । नीचकुळसंभवी पावती मान्य । सित्धत्वावरी साधन ॥९०॥येकदा स्वजनाला घेउनि समीपी । शाहणे असता ही बहुत तथापी । बुद्धि वाद कथिती कथिले पुनरपि । सादरें संतीं अवधारिजे ॥९१॥॥श्लोक॥ आलेख जागती जनी॥ निजो नका निरंज० ॥श्लोक०१२॥॥वोवी॥ येकास बोलतां ऐसियापरी । खूण ते बाणती सर्वाअंतरीं । मग दुजयाकडे ईक्षोन भवारी । बोलिले सावध ह्मणोनी ॥९२॥॥श्लोक॥ तनासी भेटली तन । मनासि चूकली म० ॥श्लोक०१२॥॥वोवी॥ आणिखी सर्वत्रा बोलिले येकदां । स्वल्प शब्द ऐका त्यांतील येशदा । न व्हावया महंतीत विपदा । खुणवोन बोलती घडिघडी ॥९३॥॥श्लोक॥ विवीधधर्म लोचनी । कदा नसे सवें जनीं०।श्लो०॥५॥क्षमील त्या नरा जयो । क्षमीचना तया लयो करील जे उतावळी । जनात तेचि बावळी ॥१॥मनीं उदंड साहिलें । जनी समस्त पाहिले । अखंड साहती मती । तरी च लोक वोळती ॥२॥जनात न्यायसा कळे । विशेष गूण आडळे । प्रचीत मानली मना । तरीच आवडे जना ॥३॥रुपें विशेषता दिसे । परंतु गूण तो नसे । तयासि मानिती कसे । सभा समस्त वीरसे ॥४॥उडेल पाभळें बळें । गुणासि मोल आगळें । तगेल रंग तो खरा । बरें चतूर वीवरा ॥५॥रुपें रसाळ तो गुणी । तयासि आवडी दूणी । रुपें गुणें विशेषता । करील तोचि पूरता ॥६॥विशेष वेष साजिरा । उदंड गूण तो बरा । प्रचीतीनें खरा खरा । चढेल कोण दूसरा ॥७॥सदा उदास तो धरी । परोपरी क्रिया बरी । गुणें गुणी गुणाथिला । भला भला भला भला ॥८॥प्रताप सूर्यसा तपे । तयासि कोण रे जपे । अनंतगूण उत्तमा । कदा कळेचिना सिमा ॥९॥करी न्याहाल सेवका । समर्थ वीसरों नका । विशेष हा रघोत्तमु । भजेल उत्तमोत्तमु ॥१०॥हळूहळूचि बोलणें हळू हळू विचारणें । विचार ०॥श्लो०२॥प्रसंग हा कठीण हो । बहुत पावले मोही ०॥श्लो०२॥चकोर चातकी दुखी । चतूरही बहु दुखी ०॥श्लो०५॥॥वोवी॥ यापरी बोलिले करुणावंत । आधीं च शाहणे ते प्रज्ञावंत । हृदयांतरीं झेलुनि अर्थ । वर्तणूक केले तैसे ची ॥९४॥बहुत बहुठाई घेतां शोध । परमार्थ या रितीं न दिसे विषद । मुख्य प्रचितीवरी क्रिया शुत्ध । सर्वरहस्यविचार ॥९५॥अहंकार बोलाच्या ह्या नव्हे युक्ती । तराया पुरे हो येक गुरुभक्ती । स्वल्पाल्पद्रव्यानें सुखावती । परि सार्वभौमसंपती सुखदाय ॥९६॥कोणी सांगती जप नाममात्र । मुद्रा आसन योग यंत्र तंत्र । वोपिती ऊदी पूजा स्ववस्त्र । तीर्थप्रसादफळ कांहीं ॥९७॥कांहीं येक संज्ञा सांगती सीक्षिती । विश्वास धरावा स्वेछा ह्मणती । मुक्तक्रिया सर्व ब्रह्मीं स्छपिती । करविती इंद्रियपूजन ॥९८॥करामत दावाया परोपरी । छुटाव लुटावी पडोन भरी । जीवहिंसअक्रिया करविती अघोरी । ते पूर्णज्ञ न होती बेबंदी ॥९९॥धन्य दासाचें परमार्थकार्य । आधीं च अतिशुत्ध सांप्रदाय । जाणोन वर्ते तो सर्वमान्य होय । सोय उपाययुक्त सर्व ॥१००॥सगुणभजनपूजनीं मोटा प्रेम । कथाप्रसंगीं सत्सेवीं संभ्रम । न टळावा तारकजेपाचा नेम । धर्मकर्म उत्तम न वाळिजे ॥१॥तृटी न करितां कीजे भजन । येकाग्रें कीजे मानसपूजन । साध्यावरी ही तदैक्यध्यान । कीजे खंडण विषयासी ॥२॥केवळ कैवल्यप्राप्तीचें ज्ञान । बोध ऐसा कीं स्वरुप चि होणें । कीजे महावाक्यसारशोधन । पंचकर्णविवरण ससांग ॥३॥दृश्य दिसतां ही विरोन उभा । उमजोन सर्व ही सर्वात्मशोभा । तरि ही आणिजे शोभेसि शोभा । उपासनाक्रमसाधना ॥४॥सद्गुरुपदतीर्थ सेविल्याविण । अन्नोदकाचें नसे सेवण । देवतीर्थ वोपितां भक्ताकारण । संशयादि कल्मष नासती ॥५॥नैवेद्यप्रसादु किं पात्रीच्या बळें । भवभ्रांतीच निरसे तळमळ । तांबोल उछिष्ट सेवितां अढळ । ठसोन प्रबोधु कीर्ति वाढे ॥६॥श्रवणमननाची दृढतरा निष्ठा । नित्यनेमाविषई उल्हास मोटा । नसे चि अभिमानु ज्ञातृत्ववाटा । गुरुदास्य जीवन भक्तिभाव ॥७॥उत्साव कीजे श्रमोन आदार । अतीतपूजनीं उल्हास थोर । परोपकाराविषई तत्पर । अनाचार कामिक जेथें नसे ॥८॥वरदवस्त्राचें लेतां भूषण । होय तपसित्धी भवतापहरण । वागवितां प्रीतीनें झोळीनिशाण । इंद्रादि वंदन करिती तया ॥९॥शास्त्रजाळाचें नाहीं कारण । घोकणें किंवा खटपटी भांडण । सारासार तें वेदांतश्रवण । समाधान तें प्रत्ययीचें ॥११०॥अवघे यातीचे तरती येथें । अवघे आश्रमी होती पुनित । अवघे आश्रमी होती पुनित । अनुभव येथींचा कोण्ती मतस्छ । घेतां श्रीराम साह्य होय ॥११॥अधिकारी किंवा अर्धत्री हो कां । या मार्गास लागतां न्त्या नसे धोका । क्रमसारांश जाणतां आसका । त्या होतो निजसखा बलभीम ॥१२॥काय वर्णावी थोरीवमात । नसे चि आणु ही कचाटकृत्य । होती अनयासीं भक्त कृतकृत्य । सर्वसारमथितक्रम होय ॥१३॥जरि दैवहता न वाटे सत्य । अविश्वासिका नव्हे चि प्राप्त । जरि सोंगीमैंदाला न बिंबे आर्थ । तरि ही समर्थपंथ थोर ॥१४॥चालणें तरि हे आहे सर्व ही सांग । श्रमणें नलगे ची सोपा मार्ग । जाणणें चालणें विश्वासयोगें । सर्व ही सित्धी वोळती ॥१५॥न जाणोनिया क्रमाच वर्म । न चालुनिया क्रिया उत्तम । नुन्यता येयाच करुनि काम । सांगती हें नाम धिग त्यासि ॥१६॥जरि अनाधिकारी वेडा राजसुत । अन्नवस्त्राचें न होय विपत्य । तेवी दासाचा धरितां पंथ । केवळ मूर्ख हो मानस्छु ॥१७॥धन्य दासाची कमाई ऐसी । तेव्हां आतां ही भक्तलोकांसी । संरक्षिलें पावोनसमयासीं । संकटीं पडों न दीधलें ॥१८॥करिती महंती महंत जेथें । सत्ता आपुली निरविती तेथें । प्रगटोन पुरविती मनोरथ । भक्तिभावांते वळखोनी ॥१९॥अवंरगजेबानीं धरुनि दावा । सैन्यासी धाडितां करुं हरावा । दाविले स्वामींनीं प्रताप बरवा । शिवाजीनृपा संरक्षिलें ॥१२०॥येकदां राजा तो येक अश्वसहित । सन्मुखी आसतां जोडुनि हात । लागावरी पातले दुष्टांनिं तेथें । फौज निवडक घेउनि ॥२१॥निराश्रई आसती तटाकीं । देखोन वैर्याला येकायेकीं । भयभीत जाला द्रव नसे मुखीं । पाहोन गुरुकडे संकोचला ॥२२॥येक अंदेशा ऐसी अंतरीं । धावतील पाप्यानीं श्रीगुरुवरी । दटोन स्वारीत जावें जरी । तरी विन्मूख जालो सेवेसी ॥२३॥तंव हास्य आलें करुणाकरा । ह्मणतिलें कां रे भीतोसी वीरा । श्रीरामकर्त्ता भाऊनि सामोरा । होई होणार होईल तें ॥२४॥वंदोन निघाला निर्भयें भूप । वैर्यास भासलें सैन्य अमूप । पळोन गेले तें सुटोन काप । पातला हरिखत गुरुपासी ॥२५॥स्वस्छळा जाऊं जाली आज्ञा । वंदोन गेला भावीत भावना । ऐसे चि तारिलें सदये बहुजना । आरिष्टयातना निवारिलें ॥२६॥जी जी वदतसे काळ जयात । अबळेभक्ताच टाळिलें मृत्य । वरदवचन वदता कृपावंत । सवें चि होती भक्तिवान ॥२७॥श्रीरामभक्ती विस्तारली । चहुंदेशीं थाटोन राहिली मंडळी । पुढील समासी कथा रसाळी । सिष्यपरीक्षा अवधारिजे ॥२८॥॥अभंग॥ मी तों समर्थाचा फूट सरदार । संगी थोर थोर साहेबाचे ॥१॥जयासी पाहतां विघ्न होती दूर । नि:पातक मारकर्ते दुष्टा ॥२॥पेंढारे लुटारे बेरडे तस्कर । करुं त्या संव्हार धरुं मारुं ॥३॥पुंड पाळेगार भीती साव होती । जालें निजप्रांतीं नि:कंटक ॥४॥पातकी पळाले नाहीं च होठेले । उरले ते जाले वृतस्छ चि ॥५॥चहुं ही व्यापारी येउनी दर्बारी । रुजु जाले सारी कौलजाला ॥६॥चालती सन्मार्गी योगी भोगी त्यागी । उपसर्गु त्यालागीं नाहीं कोठें ॥७॥आत्मारामक्षेत्रा पावती सुखानें । यात्रा संपादुन धन्य होती ॥८॥॥वोवी॥ दासविश्रामधाम सुंदर । सद्रत्नखचित मनोहर । सद्भक्तीमेळीं सहपरिवार । आत्माराम नांदतु ॥१२९॥इतिश्री श्रीरामकृपा । तारकपरमार्थ सोपा । भजनसौख्य मागणें । श्रीराम प्रार्थना । रामघळीं रामास प्रार्थिलें । चाफळीं रामप्रार्थना । भीमकुंडकथा । शिवमहिमा । बुधिवाद सांगणें । सांप्रदायप्रमय । भक्तास रक्षण । समास येकसेहे पाच ॥१०५॥ N/A References : N/A Last Updated : March 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP