॥विसावा॥ १०७

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


॥श्रीरामसमर्थ॥

॥पद॥ (राग सारंग) भक्ति हे देवाची गजढाळ ॥धृ०॥ कितेक लोकांपासुनि जाते । तोलत नाहीं आढाळ ॥१॥
उगें चि कांही घडत नाहीं । पाहिजे संचितमाल ॥२॥
अनुमानें काम चि होत नाहीं । होईल निपट हाल ॥३॥
तनमन अवघेंचि झिजावें । फुटक वाईट गाल ॥४॥
दास ह्मणे भडसा चि पुरता मग तुह्मी समजाल ॥५॥

॥वोवी॥ थोरीव वानितां सहास्त्रवग्त्रें । बहु पुण्य साचितां तपोन उग्र । करितां पर्याटणु देश समग्र । सौख्य भक्तीचें न गवसे ॥१॥
अवगत जालियां सकळ विद्या । हुकुमांत वागूं लागल्या सित्ध्या । तानमान सिकवी गायगद्यपद्या । तरी हि दुर्लभ भक्तिसौख्य ॥२॥
पुत्रदारादिकां लालित्य करणें । द्रव्यवंताची मर्जि राखणें । कांहीयेक तरि हो भक्तिविण । कार्य संपादन न होये ॥३॥
धरुनि ईषणभूषण आस्छा । भोगिती देऊळीं कष्ट अवस्छा । ठकडे योग्यची अवळिती चित्ता । लोक लोकार्था सीणती ॥४॥
परि भक्तिभाव ते ह्मणों नये । यद्यपीं संसारीं नीट दिसों ये । वेगळ राहिली ते भक्तिसोय । सार्थकोपाय होय जेणें ॥५॥
कामीकभक्तीचें ऐसें लक्षण । वागवील कांहींयेक निशान । यजमान नोहे कीं पूर्ण प्रसन्न । सांगणें मात्र तयाचें ॥६॥
आतां जन्मचि जे करी सफळ । जेणें भव हें निरसे समूळ । ते जाणिजे देवाची भक्तिगजढाळ । जी आश्रई तुंदले बहुतेकी ॥७॥

॥अभंग॥ धन्य भक्तिसुख जाणे तो पावन । कळावी हे खूण गुरुकृपें ॥१॥
ब्रह्मादिकां भक्तिसोय ते नाकळे । गोकुळासि आले साधावया ॥१॥
भक्ति ह्मणजे काय रुप तिचें कैसें । हें भलेभल्यांस न ये आया ॥२॥
भक्तिछायाखालें वसे श्रीनिवास । स्वरुपरहस्य जीच्या पाई ॥४॥
आत्मानंदसौख्यैछा जया मनीं । भक्तियोगात्यांनीं अनुसरावें ॥५॥

॥वोवी॥ गुरुदर्बार ज्याच्या मंदिरीं । जो निस्पृही त्रयगाभीतरीं । गजढाल शोभे तयाचे द्वारीं । रोविल्या ठाई सत्ता चढे ॥८॥
सद्बोधनागाचा असिजे आश्रय । दृढधैर्यनेम ते रक्षिते व्हावें । तरीच सर्वार्थी होईल विजय । सार्वभौम ब्रह्मैव जिरेल ॥९॥
अढळ देवाची भक्ति गजढाळ । बहुतेकांनीं वोढितां बळें । न तोलवे परी असे सुकाळ । एवं जातसे चालत चि ॥१०॥
वोढिते वाहते दुरोन पाहते । सांगते वागविते छायेसि राहते । ते सर्व ही सुकाळीं पडती सत्य । भक्तराज तो राजाची ॥११॥
जरि सांचेल तपाचें विभवमाल । साधननेमादि होय अनकूळ । जे निष्कामकामाचें सुकृत सफळ । होईल तरि मग साध्य हें ॥१२॥
अनुमान करितां न होय काम । झोंबणें चि निपट होईल श्रम । तनुमनादि झिजणीं असावा प्रेम । अक्रियादि विभ्रमगाळ त्यजिजे ॥१३॥
भक्तीमाजील सौख्यत्व असक । जंव प्रत्ययपणानें होईल ठाऊक । तंव समजोन मानाल हरिख । मग सांगाल इतरां कळवळोनी ॥१४॥

॥अभंग॥ भक्त जाल्यावरी विभक्त तो नव्हे । आणि सांडूं नये भक्तपण ॥१॥
देवभक्तपण तंवरि सांगणें । आत्मनिवेदनपरियंत ॥२॥
ज्याची कीजे भक्ति तो स्वयें आपण । आपण मीपण देवराय ॥३॥
जाणे जो हे खूण तो चि निजभक्त । स्वात्मानंदजना पंथ दावी ॥४॥

॥वोवी॥ ऐकोन यापरी भक्तिप्रशांश । वाचाळज्ञान्याला वाटला क्लेष । ह्मणे काशाला भक्तिहव्यास सर्वब्रह्मसौख्य टाकुनी ॥१५॥
मेळवोन भोगिजे ते चि भक्ति । जे प्राप्त होईना ते चि विरक्ती । सिणण भागण हे सर्व भ्रांती । शांतिदांतिखंती कासया ॥१६॥
ज्ञानाहून नसे आन श्रेष्ठ । ज्ञानें चि सापडे अहंब्रह्मवाट । मग कासया पाहिजे भक्तिकचाट । साधनादि कष्ट कासया ॥१७॥
मी ब्रह्म तूं ब्रह्म सर्वब्रह्म । स्त्रीपुरुषविषयो ह्मणणें भ्रम । कळोन घ्यावें हें थोर ज्ञानवर्म । स्वेच्छाचारीं मग क्रीडिजे ॥१८॥
ऐसियापरी ऐकोन बोलणें । अनुभवी वदे हें हेंकाडपणें । पष्ट समजाविलें यदर्थी सज्जनें । अभंग ऐका हो लहान चि ॥१९॥

॥अभंग॥ भक्तिवीण ज्ञान त्या नांव अज्ञान । जाणती सज्जन० च०४॥

-- पान नं. ८४३ ---
-- पान नं. ८४३ ---   

॥वोवी॥ ऐसा आहे पां येथिल विचार । होय सर्वांतरीं भक्ती च सार । बोधीत यापरीं दासभवहर । राहिले सज्जनगडांत ॥२०॥
कल्याणसत्सिध्या महंतीकारणें । धाडूं योजिलें सदयें सज्जनें । परि भक्तराजाचें न ढळे मन । गुरुपदाहून आणिखीकडे ॥२१॥
सगुणस्वरुपीं जडला छंद । सेवा घडावी हा चि अल्हाद । कसवटीं लावितां न मानी खेद । विभवपद जयाला नावडे ॥२२॥
तनुमनधन ज्या वाटे तृणवत । कष्टक्लेशादि न ठावा ज्यातें । राहूं न सकती सद्गुरुविरहित । आनधर्मातें न जाणती ॥२३॥

॥अभंग॥ धन्य ते निस्पृही सद्गुरुवांचून । देवधर्म आन न जाणती ॥१॥
कीर्ति धन माल इहपर संपदा । योग याग धंदा गुरुसेवा ॥२॥
ज्ञानध्यानभक्तिवैराग्यसिध्यादि । मानी मनामधीं गुरुवाक्य ॥३॥
स्पृह आणि काच आशा ते आर्जव । कर्माधर्मा भ्यावें हें नेणती ॥४॥
सर्व स्वरुपाकार भासे गुरुदेव । कायामाया माव जया वाटे ॥५॥
गुरुभक्तालागीं प्राण चि मानितु । संतासी देखतु देवावत ॥६॥
आत्मारामपदीं गुरुवाक्यनिष्ठा । उल्हास तो मोठा उपासनी ॥७॥

॥वोवी॥ गुरुपुत्रमहिमा निवडनिवडोन । वदलेति जैंसे व्यासभगवान । ते अळंकृतीं आसती कल्याण । नाहीं उपमा ह्मणती वेत्ते भले ॥२४॥
दृष्टांता आणूं निवडोन येका । काय कीं अंतरा न होय अवांका । भरथावतारी कल्याण देखा । तधींहून भक्तीनें आगळा ॥२५॥
जेवि उत्धवा हरीनें कृपा करितां । ममतापूर्व कीं बोलतां बोधितां । ब्रह्मशापाचें भय पुढें दाखवितां । विघडावें हें नसे मनीं ॥२६॥
तदाकारें चि दाविलें जेव्हां । अर्पून मनांत चालिला तेव्हां । तैसें चि होईल कल्याणसदेवा । प्रस्तुत मन द्या कथेसी ॥२७॥
पसरला आनंदु सज्जनगडीं । येशमोक्षादि झळके गुढी । चहुंकडे हरिराय घालितु उडी । स्मरती भक्तांनीं जे स्छळीं ॥२८॥
प्रधानी असे जेथें उत्तम । राजास न दावी विकट काम । किं पुण्यश्लोक बापानीं देईना श्रम । अनुष्ठानीक पुत्रासी ॥२९॥
राजहंसाला पाळोन मुनी । सिकारीस त्या नेईना रानीं । तेवि दासाला रक्षितो अनुदिनीं । मानोन हरीनें भक्तथोर ॥३०॥
अवरंगजेबाचा सरदा कोणी । येकदां निस्पृहीझुंड देखोनी । धाडोन फौजाला अडविलें रानीं । कारण दासांचे सिष्य हे ॥३१॥
करामतीची धरुन अपेक्षा । देवद्विजाला छळितो पाछ्या । नृपगुरुदासा असे कटाक्षा । तरि धरुन धाडावें यांसि तेथें ॥३२॥
खाविंद तेणें करील मेहर । साधुसंताला लागेल चुरचुर । महिमा विलोकिजे येणें प्रकारें । नातरी हिणाया नीट जालें ॥३३॥
देखोन अवस्छा हे सिष्य जनांनीं । धाव पाव ह्मणती हे मोक्षदानी । परमार्थलाभा करितील हाणी । विकारेल शानसंपदा ॥३४॥
विडावलों जी उपाय नाहीं । प्राणासी धाडूं स्छिराया पाई । ऐकोन ग्लांती हे कळवळला जीवीं । दासकैवारी बलभीम ॥३५॥
दावितां अकटविकट उग्ररुप । दुष्टदुर्मदाला सुटला कांप । लवलवोन विनविती न करा कोप । खुरनिशातें करिती घडिघडी ॥३६॥
संतोष पावले भोळे प्रेमळ । अदृश्य जालें रुप विशाळ । चालिले भावना करुनि अढळ । उचित आदर पावोन ॥३७॥
फिरोव आले जैं स्वामीपासीं । बुधिवाद कथिले बहुत जनांसी । तो ऐकविला मागें श्रोतयासी । तो चि ध्यानासी आणा हो ॥३८॥
धन्य दासाचा विधानयोग । न मोडितां उपासना ज्ञानमार्ग । चालोन दाविती जना ससांग । परि वागती उदास सर्वदां ॥३९॥
धनवंता करणें नाहीं आर्जव । भर्छून सिष्याला मागणें द्रव्य । फार मिळाला ह्मणोन समुदाव । कंटाळा किं चिळस न करितां ॥४०॥
बुद्धि सिकवाया नाहीं आळस । परोत्कर्षाचा नाहीं रोष । लौकिक व्हावा हा नाहीं हव्यास । मानस जयाचें श्रीरामीं ॥४१॥
धावा कराया नसे कंटाळा । अखंड आळविती श्रीरामजीला । नसे अश्रत्धा वानू लीळा । भजनीं कीर्तनीं प्रेमाधिक ॥४२॥
ठसतां हृत्कमळीं जयाचें वचन । भक्तजनाचे द्रवती नयन । भूलिंगा होतसे अभिषेचन । अनुग्रह घडतसे सहजात ॥४३॥
येकदां जालें सांग संतर्पण । संतोष पावले देवभक्तब्राह्मण । कीर्ति वाखाणिलें साधुसज्जन । महंत ते लक्षिती हातवटी ॥४४॥
सायंकाळींचा नेमधर्म सारुनी । पंचपदादि ससांग करउनी । गुरुराज बैसले येकांत स्छानी । पलंगासी टेकूनियां ॥४५॥
कुंडांत अग्नी असे प्रदीप्त । समयीवरी निवांत दीप । पडलीसे चंद्राची कांती दैदीप्य । सवाप्रहर रजनी लोटलीसे ॥४६॥
सन्मुखी उभा कर जोडून । तिष्टतु कल्याण ज्ञानी सर्वज्ञ । न्याहाळुनियां गुरुराजवदन । वळखिला भाव अंतरींचा ॥४७॥
पाहती लंका उजुं समर्थ । शौर्यवेष फाकूं लागला अत्यंत । युध्यकांडरंगीं मिसळलें चित्त । सौंदर्यचर्या आठवलीसे ॥४८॥
कवन होईल जाणोन रसाळ । साहित्याकडे पाहे प्रेमळ । तंव हासोनियां वदले दयाळ । लिहीं रे ग्रंथा बैसोनियां ॥४९॥
येथोन सफळीत प्रसन्नवाक्य । सप्रेमें पाई ठेऊनि मस्तक । सित्ध होऊनि बैसला भाविक । बोलों आरंभिलें कविवर्ये ॥५०॥
प्रथमारंभी सहित नमन । सांगते जाले श्लोकबत्ध कवन । धन्य सिष्याग्रणु होय कल्याण । भरवंसा जयाचा गुरुसी ॥५१॥
निश्चळ नियमानें कवन सांगणें । माळा मोतीच्या वोविल्याप्रमाणें । विळंबादि योचना नाहीं क्षणें । सुमनवृष्टी वरोन जाल्यावत ॥५२॥
वरप्रसादी कवन सुंदर । हुडकणें नाहीं कटावअक्षरें । जें वाचितां सांगतां सप्रेमभरें । पावती पार भाविक ॥५३॥
पुराणीं श्रीरामचरित्र गोड । शौर्यरसाचा त्यांत युध्यकांड । त्यांतील प्रतापी हरि वीर प्रचंड । तो चि श्रीरामसेवक ॥५४॥

॥अभंग॥ धन्य रामायण धन्य तो वाल्मिक । श्रीरामसेवक सुखावले ॥१॥
शतकोटिमाजीं येकेक अक्षरें । दूरीतासी दूर करीतसे ॥२॥
सुल्लभ चि परी बहुत चि दुर्लभ । वांछी जो हा लाभ दैववान ॥३॥
तीहींलोकामाजीं विस्तार जे कथा । आणाया साम्यता नाहीं दुजी ॥४॥
वानिती ऐकती ज्याच्या घरीं लीळा ॥ बाध्य कांहीं त्याला न होय चि ॥५॥
भुक्तिमुक्ति जेणें साध्य । भाविकासी । होय श्रीरामासी पढियंता ॥६॥
कैवारी मारुती होतसे तयाचा । सखा मानी साचा आत्माराम ॥७॥

॥वोवी॥ केवळ रामोपासकु निस्पृही । सगुणचर्या ते अठवोन जीवीं । लिहूं आरंभविलें प्रतापनवाई । विलोका ग्रंथ तो संगहोनी ॥५५॥
सुंदरकांड एक आगळ शतक । तेराशे पस्ताळ युध्यकांड श्लोक । पदबंदरहस्य अर्थसार चोख । संमती नाटक अध्यात्म ॥५६॥
धन्य कल्याणु जाणता चतुर । विसाउं न घेतां खेळावी कर । नाहीं पुसणें ना पाहणें वग्‍त्र । संज्ञा हुंकार नसे चि ॥५७॥
कपिल सित्ध शंभु नारदमुनीं । संजय जयमिनी व्यास फरशपाणी । तेवी च सांगते सर्वज्ञ गुरुधणी । लिहिणार सद्गुणी विश्वासिक ॥५८॥
केव्हां घेतो कीं कागद दुसरा । शाई घेतो केवीं अति त्वरा । सज्जितो लेखणी धरवितो थारा । आसनाहूनि न हाले ॥५९॥
तनुकर्म व्यापारीं नसे वृत्ती । गुरुकृपें जालेति निमिष्यान्निमिष्य । महाबळी साचा योगी पुरुष । न साधे करितां बहुत अभ्यास । तें लभ्य अनयासें गुरुकृपें ॥६१॥
निमिष्य येक येकाग्र मानस । यास चि वदती कारणीक पुरुष । योगमुद्रा सकळांमाजील सारांश । वर्म कळलियां यांत चि ॥६२॥

॥अभंग॥ जाणे जो हें वर्म तो ध्यानी पुरुष । चिदाकाशीं ध्यास जडे पूर्ण ॥१॥
पलख्मो अलख देखणी या नांव । पाहण्यासी पाहावें परतोनी ॥२॥
देहत्रयावरी तुर्या वोलांडुनी । रमे निरंजनीं निराभासी ॥३॥
द्रष्टा साक्षी डोळा डोळ्यांत मिळोन । उन्मनीची खूण हाता चढे ॥४॥
आत्मरामप्राप्ती महावाक्य सफळ । होऊनी केवळ तारी जनी ॥५॥

॥वोवी॥ बंद जालियां असुळविसुळ । प्रकाश होय तेणें भंबाळ । जिरवोन तो हि कल्याण प्रेमळ । लिहितो ग्रंथासी नवल हें ॥६३॥
आणिकेकडे तोंड उचलोन । न केले धीर तो अवलोकून । संतोष पावले गुरुदयाघन । वोपूं गुरुत्व इछिलें ॥६४॥
सूर्योदय इकडे होत आला । इतिश्रीसह ग्रंथ तो संपला । ठेऊनि सन्मुखी प्रणम्य केला । चौदाशत श्लोक लिहूनि ॥६५॥
ह्मणाल श्रोते हो आश्चिर्य मोठें । काय वरदायका सांगा कष्ट । जेवि शेषाला धरणी हळुवट । सुलभ तेवि अघटित भक्तजना ॥६६॥
युध्यघोरांदरीं भिडतां वान्नर । श्रम न वाटला त्यासि अणुमात्र । गोपाळांनीं राखितां गुरें । बोभाट न आला कुणब्याचा ॥६७॥
सन्मुखीं ठाकतां अहोरात्र । काय सिणला हो सांगा खगेंद्र । वाहोन फिरतां दंपत्यभार । नंदिकेश्वर न भागे ॥६८॥
रुषेश्वरांनी दाविलें विचित्र । बहुतांचें असती बहुत चरित्र । काय तयासी वाटला भार । धन्य गुरुपुत्र कल्याण ॥६९॥
वर वोपून येकदां समर्थ । दासबोध येवढा थोर ग्रंथ । सांगतां सिष्य हा सप्रेमवंत । येक्या रात्रींत लिहिला हो ॥७०॥
ते थोर थोर ग्रंथांचा नाहीं प्रसित्ध । कारण सर्वाचा सारांशबोध । वेष्टुनि स्वामींनीं हा दासबोध । नित्यनेमासि नियमिला ॥७१॥
ह्मणोन सकळांला हा चि ग्रंथ विदित । आहे बंधु स्वामींचा गंगाधरपंत । रामीरामदास ह्मणती तयातें । त्यांनीं ही ग्रंथ केलेती ॥७२॥
संग्रहिती पाहती पुण्यवान । तराया पुरे हो येक वरदवचन । हें असो नमोन उठिला कल्याण । वदन प्राक्षाळूं निघाला ॥७३॥
तंव अर्धोदया आलासे दिनेश । प्रसन्ननयनीं बिंबला प्रकाश । लोपला तात्काळीं पदार्थमास । नेत्रहीनवत चाचपतु ॥७४॥
पाहतां असती नेत्र सुढाळ । न हालती पात्या जालेति अढळ । पाहुं त्वरेनें गुरुपादकमळ । धरोन सुमार परतला ॥७५॥
सद्रुरुपासीं आला परतोन । हांसोन तेणें बोलिले सज्जन । जालासि आंधळा प्रयत्नहीन । बैसोन पूजन घे बहु ॥७६॥
श्रमलासि अतिशय गिरीं काननीं । विराजित आतां हो स्वस्छानीं । करुनि बहुतांला मुक्तीचे धणी । जगदोत्धार करी बा ॥७७॥
ऐकोन येरु करितु रुदन । वदतु न गमे चि सेवेवीण । न देखतां प्रसन्नरुप सगुण । न टिकती प्राण कुडींत ॥७८॥
जन्माचें जालें असे सार्थक । न राहिली आस्छा कांहींयेक । आतां पदकमळीं कीजे ऐक्य । अक्षई सौख्य भोगावया ॥७९॥
मग पुढें न बोलवे दाटला कंठ । अश्रुधाराचा लोटला लोट । भाव आठ हि जाले प्रगट । मानिला बहु कष्ट वियोग ॥८०॥
हें देखोन अवस्छा करुणावंत । सदयें येई बा ह्मणतीलें आरत । तव पदपद्मीं लोटला प्रेमवंत । पद्महस्त फिरविला मुखावरी ॥८१॥
जे कर मस्तकीं ठेवितां सिष्य । तात्काळ स्वरुपीं होती समरस । जे करें पूजितां मानिती हरुष । अयोध्याधीश आणि हरी ॥८२॥
कृपाकटाक्षें करुनि ईक्षण । कुर्वाळितांतें करें वदन । तात्काळ शोभले दिव्य नयन । ज्ञानांजनसहितेसीं ॥८३॥
मायाकारादि सर्व ही लोक । आब्रह्मस्तंभपरियंत अस्क । अगोचरवस्तु निष्कळंक । आत्मासर्वात्मा भूतगुण ॥८४॥
तिहीं लोकींचें कर्तृत्व समग्र । अणुरेणु आदिकरुनि व्यापार । साधनसंपत्ती विश्वविश्वंभर । दृष्टिमाजीं दिसती ॥८५॥
संतोषला सिष्यचूडामणि । तंव हासोन बोलिले श्रीमोक्षदानी । बा रे जालास तुं सर्वज्ञ ज्ञानी । तरि मांस डोळ्याचें काय काज ॥८६॥
अखंडप्रकाशी रमसी सदा । करित असतां ही प्रपंचधंदा भेदभावातें न देखसी कदां । तरि उपचार पाहणें असो नसो ॥८७॥
गुरुआज्ञावाक्य प्रमाण जाणत्या । महंती कराया जाई बा आतां । तुजसन्निधानीं मी असेन स्वथा । सांभाळ करित सदा हि ॥८८॥
कोठें जावें हें न धरीं शंका । सुचविता होईल श्रीरामसखा । सिनानदीतटीं करुनि बैसका । राहिलों होतों त्रय दिवस ॥८९॥
तरि येथून सिरगावीं राहोन पुढें । मान्यवर क्षेत्र तें लागती जिकडे । तेथून त्या बैसकाच्या पैलाड । गांवीं थिरोन राही पां ॥९०॥
परमार्थाचा करी सुकाळ । विदित करी जाई विधान सकळ । आणि धरिल्यानें मंडळी येक चि स्छळ । न निवडती न वाटे सांप्रदाय ॥९१॥
यावरी हेतूला कराया अटक । बोलिले ऐका हो प्रसन्नवाक्य । वदती जयातें अष्टाक्षरी श्लोक । तो अर्थ पुर्ता धरा मनीं ॥९२॥

॥श्लोक॥अष्टा०॥अखंड फीरतां बरें । परत्र होतसे खरें । तनें फिरा वसुंधरा । मनें फिरा चराचरा ॥१॥
मनें मुळास जातसे । मनें मुळास जातसे । मनें चि दूर होतसे । खराच देव सांपडे । अभेदभक्ति हे घडे ॥२॥
समस्तमूळ शोधितां । मनासि ज्ञान बोधितां । बर समस्तहि कळे । निवांत रुप नीवळे ॥३॥
अरुपरुप नांह हें । ह्मणे विवेक खाव हे । तुटोनि जाती आष्टधा । विचारसार हा सुधा ॥४॥
तनु समस्त आष्ट हि । विवर्णसार षष्ट हि । चुकेति सर्व कष्ट हि । कुसंग संगकष्ट हि ॥५॥
विचार सार सुगमु । घबाड हा विहंगमु । कळे समस्त आगमु । विशेष सत्समागमु ॥६॥
जडास चेतवीतसे । जीवामधील वीलसे । सदेवबीज कारणा । धरे उदंड धारणा ॥७॥
प्रमाण ते प्रमाण रे । नव्हेत अप्रमाण रे । स्वसद्य गद्यपद्य हो । सयोगहा जयोजयो ॥८॥
असंतसंतवंत रे । अनंत तो अनंत रे तदंश अंश तेथिचा । निवांती शून्य येथिचा ॥९॥
स्वभक्त तो चि भक्त रे । विभक्त तो अभक्त रे । विवेकपाहतां चि रे । भवांबुनीधि ऊतरे ॥१०॥
तुटोनिजाय संशयो । घडे अखंड निश्चयो । उदास दाससांगणें । कदापि हि न मागणें ॥११॥

॥वोवी॥ हें ऐकोन गुरुमुखें कृपाभाषण । केलें सद्भावें साष्टांग नमन । संतोष पावले गुरुदयाघन । हा पूज्यमान होईल ह्मणोनी ॥९३॥
मग वर्तते जाले सहज पूर्ववत । पाहती स्वामींनीं उत्तम मुहूर्त । जनासि कळला हा सर्व वृतांत । जाला निरोप नेत्र गेले ॥९४॥
त्रिविधजनाचें धरि कोण तोंड । मना रुचेल तें करिती बडबड । पडिजे परमार्थी नून्य त्या आवड । कां निंदोन कुचेष्टा करावया ॥९५॥
कोणी वदताती जन्मदारभ्य । सेवा केल्याचा हा घडला लाभ । येक वदे तैं तंवरी लोभ । हातपाय धड कार्य करुं ॥९६॥
येक वदताती गुरुवचनासी । मानीना जाईना देशाउरासी । पराधेनपण आले आतां यासी । काठी धरोन हिंडवावें कीं ॥९७॥
न केलें हो हें बरवे समर्थे । आपुल्यासन्निधीं आसिजोपरियंत । नेत्र देऊन धाडावें होतें । पैलाड अवस्छा कठीण बहुत । श्रीरामदाता पारकर्त्ता ॥९९॥
कांहींच अलोट नसे गुरुगृहीं । सिष्यास डोळयादि चिंता नाहीं । नुन्यत्व पसरले इतर समुदाई । खोळंबले नसतां क्रमांत ॥१००॥
येक्या दिवसीं सभ्य गृहस्छ । सिष्य स्वामीचा पातला तेथ । काम सरकारी जरुर त्यांत । भेटि घेउन निघावी ॥१॥
नव्यानें रचिल रामायण । पाहतां तयाच रिझल मन । राहवया नसे फुरसत क्षण । संग्रहु ग्रंथ आस्छा बहु ॥२॥
तो स्वामिरायाचा प्रिय सिष्य भला । देखोन तयाचा सप्रेम कळवळा । करुणा बहु आला श्रीगुरुदयाळा । ग्रंथासह उदईक जा ह्मणतिलें ॥३॥
ह्मणाल श्रोतेनो काय अगत्य । दाटून भलत्याला कां वोपिजे ग्रंथ । तरि ऐसी आहे पां भल्याची रीत । उपकार करावा सकळासी ॥४॥
सकळ उपकारामाजीं श्रेष्ठ । बोधकर दाविजे नीट सद्वाट । त्या सन्मार्गी जावया पष्ट ते थेट । सद्वाक्य संग्रहीजे नानापरी ॥५॥
कवनांत विशेष तें सद्वचन । त्यामाजीं भक्तिवैराग्यज्ञान । सगुणचरित्र निर्गुणध्यान । महावाक्यविवरण सद्‍लीळा ॥६॥

॥अभंग॥ ग्रंथ संग्रहोनी आपण वाचीना । आणीका देईना मूर्ख हटी ॥१॥
ग्रंथ केले त्याची हेतु वाढो पुढें । त्यासी लीहीतां अपहार करितां । ग्रंथसंग्रहीतां फळ नोहे ॥४॥
आपणासि नर्क संपती ते धड । पुस्तक विघड होत आहे ॥५॥
कापटयवादाला ग्रंथ जो घेईल । आपणेंचि भोगील यातनेसी ॥६॥
जे आर्त धरील तात्काळ लिहून । देतां सुचऊन पुण्य बहु ॥७॥
धन्य गुरुपुत्र सर्वा मान्य करुं । आस्छा त्या उत्धारुं व्हावें सर्व ॥८॥
संताचा जो बोधग्रंथामाजी आसे । आत्माराम वस्य होय तेणें ॥९॥

॥वोवी॥ हें आसो निघाल सद्गुरुवाक्य । काळत्रयी तें न होय लटक । प्रति पाहुन पुन्हा प्रती येक । लिहोन ग्रंथातें वाढविजे ॥७॥
द्यावा तरी प्रतिवीण आहे ग्रंथ । आणि लिहिणार न दिसे एक्या रात्रींत । मग अनुमान कांहीच न करितां समर्थ । कल्याणबावासी बाहिलें ॥८॥
आज्ञापिलें कीं सदयें हासत । प्रात:काळीं हा जाणार ग्रहस्छ । प्रति करुन त्याला देई ग्रंथ । रात्रीं निश्चित बैसोनी ॥९॥
नसे चि समर्था अटक्य कांहीं । सत्सिष्या हें असाध्य ह्यणणें चि नाहीं । लेखनसाहित्य घेऊन निस्पृही । पोथी पाहोन लिहितसे ॥११०॥
पाती खेळों । लागली तेणें । तरि न इछिती लौकिक नयन । व्यंग न पडतां उदार संपूर्ण । जाला ईनउदयपरियंती ॥११॥
सद्ग्रुरुसन्मुखी ठेउनि ग्रंथ । गेला सद्भावें दीर्घदंडवत । ग्रंथसहा धाडिलें ग्रहस्छातें । आश्चिर्य जनांत बहु वाटलें ॥१२॥
ह्मणती जालें हें केवढ आश्चिर्य । डोळसा तरीच हें घडल कार्य । सेवेंत कांहीं खोलंबा न होय । काय नवलाव न कळे ची ॥१३॥
जाणोन संताची अघटीत करणी । मौन्य स्वीकारिले निंदकांनीं सिष्यास निरोपुं देउं गुरुधणी । मनामाजीं आदरिलें ॥१४॥
श्रोतेनो आतां व्हा बहु सादर । दासवरदाई युद्धकांड सार । लेहोन ठेवितो ग्रंथ समग्र । विलोका श्रीवर तुष्टेल ॥१५॥

॥समर्थकृत रामायण श्लोक॥१४४६॥ (भाग ३ पृष्ठें १ ते १३१ पहा.)

॥वोवी॥ ऐसा कल्याण सत्सिष्य प्रतापी । ज्या होय गुरुआज्ञा फलदृपी । थोरीव पढियंता नावडे किमपी ।
स्वयें गुरुनाथ भाळती ॥१६॥
येकदां सन्निधीं बोलाऊन । आज्ञापिलें कीं करी कीर्तन । संतोषूनियां सिष्य प्रवीण । ससाहित्येसी उभेला ॥१७॥
सादरें तिष्ठती थोर राजादिक । दाटले आसती पंडीत वैदिक । तल्लीन हो आसती भोळे भाविक । रंणांगणीं दाटी बहु जाली ॥१८॥
मध्यें विराजती संत श्रीमंत । विलोकूं पातले देव समस्त । तत्समयीं गाईला सप्रेमभरित । पदे तें श्रवण करा हो ॥१९॥

॥पद॥ राम दीनबंधु रे भक्तपाळ तो कृपाळ देव आमुचा ॥ध्रु०॥ दुष्टासि मारितो दासासी तारितो । संकट वारितो सत्य वाचा ॥१॥
भिलटी वधली भावार्थ लोधंली । शेषफळ खादली विकल्प कैचा ॥२॥
त्रैलोक्यनायकु कल्याणदायकु । भक्तासि रक्षुकु रुद्र साचा ॥३॥

॥ज्यासी दीनबंधु नाम साजे । ज्यासी देहीच देवपण गाजे । ज्याच्या दर्शनें चिन्मयपुण्य माजे । साधुज्ञानवैराग्यसंपन्नराजे ॥१॥

॥वोवी॥ बिंबला सर्वाला अनुभव अर्थ । जाल सर्वाच आर्त तें तृप्त । कृपावंत जाले सद्गरुनाथ । श्रीराम हणुमंत संतोषले ॥१२०॥
निवालों ह्मणती संत सित्ध साधु । वदती धन्य हा रंग गुरुबंधु । आरती गाईले जो वेध छंदु । गुरुरायाची ऐका कसी ॥२१॥

॥पद॥ जालें सेवट कीर्तन गोड करा । मनीं धरा श्रीजानकीच्या वरा ॥१॥
कीर्तनरंगी वाजवी बरी टाळी । नामघोषें पातक होय होळी ॥२॥
येथुनी कल्याण साम्राज्यसुखरासी । आवघे उठा वोवाळा राघोबासी ॥३॥

॥आरती॥ ब्रह्माविष्णुहरादिक मानसीं ध्याती । सुरवर किन्नर नारद तुंबर कीर्तनी गाती । आगमनीगम शेषस्फूर्ति मंदली गाती । तो तूं आह्मा पूर्णकामा मानवा प्राप्ति ॥१॥
जय जय जय जय आरति सद्ग्रुरुस्वामी समर्था । कायावाचाजीवेंप्राणें वोवाळिन आतां ॥ध्रु०॥ ऋषिवर कविवर मुनिवर जानीं तुज स्छापिलें । षड्‍दर्शनी मत्तगुमानी पंथ चालिले । आपरंपरा परात्परा पार नाकळे । पतीत प्राणी पदालागुनी कल्याण चि जाले ॥२॥

॥वोवी॥ आरती संपता केलें भजन । जालें सकळाच नमनाळिंगण । प्रसाद खिरापती वाटून । विडे वोपिले सकळासी ॥२२॥
तैसा चि थोकला सकल समुदाव । देतील सिष्याला निरोप या भावें । ईक्षोन कृपेनें श्रीगुरुराव । उचित साहित्य आणविलें ॥२३॥
रंगीत हुर्मुजी थोर मोल वस्त्र । पागोटें छयाटी मेखळा सुंदर । धोत्र अंगोस्त्र कोपीन शुभ्र । पायतन जोडा पादुका ॥२४॥
स्वकरें स्वमस्तकीं बांधोन पागोटें । सिष्यवर्यमस्तकीं ठेविलें नीट । वोपूनि वरकट तें उपवस्त्र सगट । स्वकरानें मेखळा लेवविली ॥२५॥
झोळी काठी कुबडी मेखळा । दासबोधादि आधींच संग्रहिला । रामनाममुद्रा ठेउनि गळा । पुष्पहार घातला स्वकंठीचा ॥२६॥
श्रोतींवक्तया पुसिले प्रश्न । समर्थसांप्रदाईं पंचवसन । नमितां महंता देती ह्मणे । नामाभिधान सांगिजे ॥२७॥
ऐका येक तो हुरमुजीरंग निशाण । मेखळा गळ्याची शिरावेष्टण । पांचवें वस्त्र ते झोळी मिळोन । परी फळश्रुती वर दे विश्वासिका ॥२८॥
टाळ काहळ विणा निशाण ग्रंथ । अस्तरण प्रावर्ण पुजासाहित्य । घे संगीं ह्मणतिलें करुणावंतें । तांबोल दिधला स्वमुखींचा ॥२९॥
जपमाळ स्वकरिंची वोपुनि उदार्ये । वाढवी ह्मणतिलें पारंपर्य । बहुत दृढतर पाहों नये । साधनबंधान असावें ॥१३०॥
तंव होऊं सर्वत्रा अभिप्राव विदित । परमार्थी असावें सावध उदित । बुद्धिवाद कथिले ऐका समर्थे । कल्याणावदनीं वदउनि ॥३१॥
जे वदाया योचना गुरुराजचित्तीं । तें चि वदतसे सिष्यराज सुमती । गुरुशिष्य उभयांची येक चि स्छिति । आश्चिर्य मानिती सभाजन ॥३२॥

॥अभंग॥ प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य । दोनी यथायोग्य दोनीकडे ॥

॥श्लोक॥ सहज घडत आहे तैसतैसें करावें । अनकुळ पडताहे तेथतेथें फिरावें । अवचट घडतें ते सज्ज होउनि येतें । खटपट करणें तें सेवटीं व्यर्थ जातें ॥१॥
सतीला पती दूसरा शोभवेना । दुजा जन्नकु बोलणें हें घडेना । जनीं सद्ग्रुरुसारिखा कोण आहे । मनीं मानवा तूं चि शोधूनि पाहें ॥२॥
पाहा तुटला तंत तो मंद वाजे । मनीं शोधितां चोरटें चित्त लाजे । पुन्हां सांदितां वेगळा सर्व सांदा । मुखें बोलणें व्यर्थ वादा विवादा ॥३॥
श्नहे तुटला तो कदां ही जडेना । पुढें भेटी कल्पांतकाळीं घडेना । मनीं तूटला तंत कैसा जडावा । पुन्हा मागुतां योग कैसा घडावा ॥३॥
सुखाकारणें थोर अन्याय केला । माहालाभ तो लालचीनें बुडाला । बरें स्वप्नसुखासी वायां सिणावें । मनें व्यर्थ मागील कां वोसणावें ॥४॥
बहु सोसितां सोसितां सीण जाला । माहामूर्ख मी कष्टवीलें तुह्मांला । ह्मणे दास मानेल तैसें करावें । बरें वोखटें सर्व ही वोसरावें ॥५॥

॥वोवी॥ ऐकोन यापरी सुनीतिसार । उल्हास सकळिकां वाटला थोर । सत्शिष्यासह तैं उठोन भवहर । शय्यामंदिरीं विसावले ॥३२॥
गुजगुह्य बोलणीं निशा लोटली । सर्वी सादरले प्रात:काळीं । कल्याणरायांनीं गुरुपादकमळीं । मस्तक ठेऊनी ऊठिले ॥३३॥
स्नाननेमादि झडकरी सारुन । घेउनि आज्ञा सांग विधान । गुरुरायाचें करुनि पूजन । साचिलें तीर्थ तें नेऊ सवें ॥३४॥
वंदोन श्रीगुरुआज्ञाशब्द । सर्वत्रा वाटिला तीर्थप्रसाद । नमन प्रदक्षणा यथाविध । करुनि आइनेसी वंदलें ॥३५॥
निघाले स्वसिष्यमंडळीसह । चौंकडोन आला तो मीनला समूह । अतिवर्षाव जाला वाटे स्नेह । हृत्कमळ विकसलें सर्वाचें ॥३६॥
कळवळोन तेव्हां अनाथनाथ । अश्व थोर वोपिला जो राजदत्त । शिष्य येक आपुला बहु योग्यवंत । सेवेंत राहावया दिधला ॥३७॥
तयांस सांगती मी च हा पाहीं । यास न विसंबे क्षणमात्र ही । अकृत्रिम सेवा करीत जाई । कृपा करील श्रीराम ॥३८॥
बोलोन यापरी प्रेमश्नेहभाव । बोळवीत चालिले सहितसमुदाव । जनसज्जना वाटलें नवलाव । वदती सदैवी कल्याणराज ॥३९॥
येथ बहु पातले संतसद्योगी । भक्तविरक्त यागी कीं भोगी । बोळवीत न आले तयालागी । दिल्हे निरोपूं येकांतीं ॥१४०॥
दुजा वदे तैं काय किं सुलीळा । समाधान केलें विध्युक्त सकळा । हें असो निरखित कल्याणाला । राहिले दिस जोपरियंत ॥४१॥
मग ह्मणतिलें कल्याण कल्याणाकडे । न देखो ऐसा भक्तिवान दृढ । संसारसुखाची न धरी च भीड । कसवटीं लावितां न भागे ॥४२॥
मम हृहुतु ज्याला होय ठाउक । काय संपादी निघतां वाक्य । अघटित करणें ही अवस्यक । करुनि येश संपादिला ॥४३॥
व्याघ्रसर्पादि भूत अंधार । याचें न मानी भय अणुमात्र । परमार्थप्रयोजनीं धुरंधर । त्रासिलों जाचिलों बहुत यासी ॥४४॥
नसे देवाची जयाला भीड । एवं चर्या ते बोलोन उघड । मग तटस्छ हो ठेले बोलवे पुढें । चाकाटले सिष्ये संत राजे ॥४५॥
मग हळूं च बोलिले कोणी धाऊन । कल्याणासि हें कळवा वचन । सिरगावा माजीं राहवें जाऊन । पुन्हा निरोपापावेतो ॥४६॥
हें कळवितां बहुतानीं धाऊन । गुरुरायाकडे होत च वदन । करुनि सप्रेमें साष्टांगनमन । गुरुलीळा वानित चालिले ॥४७॥
मग इछिले येथ चि राहवें पाहत । तव सबाह्य भासो लागले समर्थ । वंदोन अनुमाना टाकुनी समस्त । सिरगावाप्रती पातले ॥४८॥
सन्मुखी पातले गाविचे समग्र । केलें सद्भावें नमनोचार । उतरवोन मठीं आसती सादर । लोटले तेथें चारि मास ॥४९॥
दत्तोबाबंधु निर्वैरपुरुष । सेवेंत वर्ततु जेवि सत्शिष्य । भावना देखोन राघोबास । वर वोपिलें होई योग्य तूं ॥१५०॥
करूणाकरु इकडे गुरुधणी । अनुग्रहार्था येवोत कोणी । तयास सांगती प्रसन्न होउनी । गुरुत्व कल्याणाकडे असे ॥५१॥
तरि भावनापूर्वक जावें तेथें । घेऊनि उपदेश व्हावें कृतार्थ । कृपा करील भूमिजाकांत । साधेल परमार्थ हरिकृपें ॥५२॥
मग ते सद्भावें येती शरण । उपदेश घेती यथाविधीनें । कितेक निस्पृही विरक्त निपुण । कितेक संसारी जाले सुखी ॥५३॥
चारमास लोटले सुकाळीं तेथें । निरोप आज्ञा धाडिले समर्थ । येऊन राहिले डोंबगावांत । विस्तार पुढारीं ऐकाल ॥५४॥
पुडील कथेचें अनुसंधान । उदास होती बहुत चि सज्जन । कराया जातील कृष्णास्नान । आणि आई प्रसन्न होईल ॥१५५॥

॥अभंग॥ मी तों समर्थाचा देशीचा आश्रित । पुसती मुहूर्त दया कर ॥१॥
भविष्य ऐकती शकुन पाहती । उचित वोपिती तुष्ट भाव ॥२॥
ज्याचेनि होतसे कुटुंबपोषण । पंक्तीचें भोजन घदे सदा ॥३॥
संत साधु येती वृत्तांत सांगती । श्नेहेनें बाहती गरिबासी ॥४॥
गुण अवगुण धर्माधर्म कर्म । न पाहतां श्रम परिहा रिती ॥५॥
ज्याचेनी स्मरणें न बाधे किल्बिष । आणीकाचा प्रेष्य धरणें नाहीं ॥६॥
आत्मारामपूजा घडे अखंडीत । स्वार्थ परमार्थ जेथ लभ्य ॥७॥

॥वोवी॥ दासविश्रामधाम सुंदर । जेथें बिहरतु देव कोटेश्वर । साधुयात्रा ते मीनली अपार । स्वात्मामृंत सौख्य भोगावया ॥१५६॥
इति श्री श्रीरामकृपा । तारकपरमार्थ सोपा । भक्तिप्रशांश । रामायण लिहिणें । कल्याणास निरोप । विसावा । येकसेहे सात ॥१०७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP