॥सर्ग॥ १०३

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


॥श्रीरामसमर्थ॥

॥पद॥ (सद्गुरु सेवी०) रामाचा वेधु लागलासे बाईये । प्रेमस्वरुपीं गुंतला ॥धृ०॥ वारिजदळनयनीं गे० । वृत्ति गुंतली जाउनी ॥१॥
उरल्या देहाचें कारण ।गे०। सूर्यवंशाचें मंडण ॥२॥
रामदासाचें मूळ । गे० राम चि हा सकळ । गे बाईये ॥३॥

॥वोवी॥ प्रेम आणि वृति देहादि मूळ । श्रीरामसमये चि होऊनि ठेलें । देखोनि दिव्य हा सदैक्य खेळ । दासदयाळ संतोषले ॥१॥
रामीं राम चि होऊनि स्वयें । दाऊनि मनाला उन्मनीसोय । आणोनि अनुभवा अनुभवप्रत्यय । बोलिले उन्मनीबाईसवें ॥२॥
उन्मनी बोलणें निमित्यमात्र । येरवीं असती ते तदाकार । आपणामाजीं च दाविले प्रकार । पदान्वयीं विलोका ॥३॥
जें स्वरुप वर्णितां नुठे वाद । जे स्वरुपीं रमतां हरपे भेद । ध्यातां स्वानंदीं खेळे स्वानंद । पापतापखेद नाम नुरे ॥४॥
होऊं भाविकातें रुप गम्य । गणेशादिका करुनि प्रणम्य । बोलिले दासांनीं वाक्य सुरम्य । स्छिति अगम्य वोळखा ॥५॥

॥अभंग॥ नमन लंबोदरा शारदा सुंदरा । सद्गुरुमाहेरा० ॥च०१०॥

॥वोवी॥ स्वरुप न वानवे सौख्य परम । तो श्रीरामसावळा पूर्णकाम । तद्रूपीं ठेला जंव पाहूं प्रेम । माघिला उदिमा त्या नाठवे ॥६॥
दृश्यादृश्याचें जेथें देखणें । सरोन कळमणी विकसे पूर्ण । तों श्रीरामजीचें देखोनि नयन । वृत्तीस नाठवे वृत्तित्व ॥७॥
प्रेम प्रीत वृत्ति होतां तन्मय । दृश्याकार हा उरला देह । राममंडणें चि भासो लाहे । कर्मधर्मसहित राम चि ॥८॥
दासदास्यत्वा अन्वयादि मूळ । रामरुप चि वोतीव निखिळ । धन्य भक्तीचें हें फळलें फळ । सद्गुरुदयाळकटाक्ष ॥९॥

॥अभंग॥ भक्तांचे सौभाग्य वैराग्यविधान । श्रीराम आपण स्वयें होय ॥१॥
कायामायामूळ कार्यकारण हीं । श्रीराम सबाहीं व्यापिलासे ॥२॥
त्रिपुटीभेद सरे मीतूंभान नुरे । सर्वी सर्व भरे राम येक ॥३॥
धन्य भक्तसखा देव आत्माराम । भक्तमनोरम लीळा दावी ॥४॥

॥वोवी॥ वानीत यापरी रामदासस्वामी । अर्पूनि तनुमनधन श्रीरामीं । राहिले सज्जनगडपाटधामीं । सत्सिष्यलोकां प्रबोधित ॥१०॥
रामोपासना व्यापिली पूर्ण । श्रीरामावांचून नेणती आन । कर्मधर्मादि भजनपूजन । सद्गतीकारण श्रीराम ॥११॥
कुळदेव असती जें सुष्ट दुष्ट । ह्या निष्ठत्वीं त्यांची मोडली वाट । फळकामनष्टादि कर्म कनिष्ट । करणें नावडे नैष्ठिक्यांते ॥१२॥
देखोनि वेत्त्याचा निज निश्चयार्थ । तळमळोन उगे राहती दैवत । विघ्नादिक बाधा न होये किंचित । धन्य येक भक्ति गुरुकृपा ॥१३॥
कुळदेवतादि न देतां सळ । वागती वैष्णवांभोंवतीं दुर्बळ । देखोन तयांला दासदयाळ । इछिलें वोपावया ॥१४॥
येक्या अवसरीं लाडके भक्त । समर्थाला करुनि प्रणिपात । पुसती आतां जी कुळादि दैवत । श्रीरामसमर्थ जाला कीं ॥१५॥
पूर्वात्पर जो धर्म वडिलांनीं । आचरत आले नाना विधानीं । तो न करितां निंदों लागती जनीं । येविषयीं आज्ञा काय ते ॥१६॥
हांसोन बोलिले तंव कृपावंत । सुखवितें जें सर्व दैवतात । जो नि:सीम निस्पृही असे विरक्त । त्यासी हा चि पंथ प्रमाण ॥१७॥

॥अभंग॥ असे उदासी जो भला । त्याचा श्रीरामीं जिव्हाळा ॥१॥
क्षुद्र दैवता न भजे । काम्यप्रसंगीं न झिजे ॥२॥
न धरी अन्यमार्गी भीड । न वटे खटपटी त्या गोड ॥३॥
आत्माराम उपासिती । सद्गुरुसंतसेवा प्रीती ॥४॥

॥वोवी॥ जयासी असे हो घरदारआश्रम । तो वडिलान्‍वडिली असे जो धर्म । तो चालवावा यथानुक्रम । ठेऊन विश्वास श्रीरामीं ॥१८॥
रामोपासना सित्ध चि आहे । वेगळी च आहे ते परमार्थसोय । संसार करणें बाध्य न होय । त्यासवें कर्मधर्मादि ॥१९॥
त्यजूनि येक तो शाक्तमुक्तमार्गा । कीजे आचरणु स्वधर्म अवघा । प्रशस्छ कळाया अर्थ त्यजूनि येक तो शाक्तमुक्तमार्गा । कीजे आचरणु स्वधर्म अवघा । प्रशस्छ कळाया अर्थ अभंगा । माजीं कळविलें बहुतापरी ॥२०॥
शाक्तमार्गा कां दूषिलें ह्मणाल । तरी जन्मसार्थकाचें नसे फळ । कलिराजयांनीं कापटय केलें । गोड ह्मणोनी भुलवावया ॥२१॥
छंद व्यसनाचा हव्यास भारी । आधार आहे ह्मणती शास्त्रीं । इलु हि न करिती विधान त्यापरी । मुकोन इहपरा नाडती ॥२२॥
व्यसनाभिळासु सिरतां पोटीं । काम्यविषभोगीं जडे दृष्टि । अवाच्यवादी करिती चावटी । कैसेनि प्रमाणिक ॥२३॥
श्रुति प्रमाणीं तूप तें अमृत । उचउचलोन पितां करी घात । मा विख सेवित्याला कैचें हित । मांगिणीस पूजितां मुक्ति कैंची ॥२४॥
भ्रमेजोन उकरडयावरी लोळणें । मायबहिणीची वोळख सांडणें । सिव्या देत संतां निंदित भांडणें । शास्त्रीं प्रमाण कोठें पां ॥२५॥
कोणी बोलती याचेनि प्रभावें । वोळोन लक्ष्मी येत वैभव । तरि कां न पीतां जाले राव । हें असो अभंग श्रवण करा ॥२६॥

॥अभंग॥ गणेश नमावा आणि सरस्वती । मारुती गभस्ती चंद्रमौळी ॥च०॥५०॥

॥वोवी॥ ऐका जालें हो येक नवलाव । जंव सज्जनगडीं मांडला उत्साव । हरिदास येक तैं धरुनि हाव । सातारेसि पातला ॥२८॥
त्या कुचेष्टिया असती बीर साध्य । साधुसंताला नोकूनि शब्दें । प्रताप आपुला कथितां अगाध । चाटेभाटे भाळले ॥२९॥
देत खर्चाला होऊनि सादर । बढावणी त्याची करित विस्तार । थोरथोर लोकांला समाचार । कळवितां होती सानकूळ ॥३०॥
असे बहु शाहणा करुं कीर्तन । जाणे बहु कळा करितसे नर्तन । कटावगिरीचें बोलूनि वचन । कथितो पवाडें अति चोज ॥३१॥
ह्मणे जगदात्मा प्रसन्न मज असे । तेणें सुरवरीं जालेति वश्य । प्रचीत याची हो पहा ह्मणे सरस । सुमनवृष्टि करवितों कथांतीं ॥३२॥
भलेभल्यांला ठेऊनि वाक्य । अपस्तुतीनें येरा वदतु साधक । तेणें जी जी ह्मणत हुब लोक । करित आर्जव फिरताती ॥३३॥
चहुवर्णीचे नरनारीपोर । कथा ऐकाया होती सादर । ह्मणती बावा हा उदासी थोर । करुं उत्धार आलासे ॥३४॥
तो अधिक चि करुं लागे ढोंग । येती भेटाया दुर्‍होन जग । पाहतो कथाडी लाग । द्रव्य यथेष्टु न्यावया ॥३५॥
पल्लव पसरिती संपतां कीर्तन । विलोकिती ऊर्ध्वेसि करुनि वदन । वर्षाव होतसे ताजीं सुमनें । सुवास कोंदाटे चहुंकडे ॥३६॥
स्वर्गपुष्पें हें ह्मणती अपूर्व । नेऊनि साचिती प्रसादभावें । वानिती हरिदासा प्रत्यक्ष देव । प्रगटोन दृष्टीं पडलासे ॥३७॥

॥अभंग॥ जनाचा स्वभाव मना आला तैसा । निदानीं सहसा न टिकती न ॥१॥
कांहीं करामती देखोन भुलती । पारख करिती निंदावया ॥२॥
क्षुद्र दैवताला कीजे आराधना । नीचालागीं नाना उपचार ॥३॥
कोताई नजर हुजरा न जाती । साजीरा करिती कापटयता ॥४॥
फासी पडोनिया मिडकिती मागोन । फजीत पावोन पुन्हा तेची ॥५॥
सर्वें चि निंदिती वंदिती सवेंची । घालमेल हे चि अंत पाहुं ॥६॥
कांहीं आपणाला प्राप्त ही न होये । येरा कामा नये तें चि काम ॥७॥
स्वयें गुरुकृपें अस्ता आत्माराम कळवितांही वर्म भ्रमताती ॥८॥

॥वोवी॥ हें आसो गवाई करो कां कांहीं । मानिती भयभेदु यास हो नाहीं । साधनीं चि करविती सर्वदां हि । रामदास निस्पृही क्रम भारी ॥३८॥
सज्जनगिरिवरी सत्पुरुषमंडळी । मिळाली होती हो समर्थाजवळी । हे आश्चिर्यता सत्ता नव्हती ते स्छळीं । अयत्नीं फळलें दैव आमुचें ॥३९॥
राज्गुरुविन्हा थोर आणिक । नाहींच ह्मणत होते भाविक । तरि त्या सगट समूहा कळो कौतुक । दाविजे सन्मानें विचित्र ॥४०॥
मग कुचेष्टियांनीं करुनि योचना । कळवोन विंदाणु करुं प्रार्थना । भेटूं समर्था घ्यावया आज्ञा । ग्रामस्तासह पातले ॥४१॥
राजासी प्रजाची प्रीत मोठी । हरिदासकपटयाची ऐकोन गोष्टी । मानिला उल्हासु बहुत चि पोटीं । माहाराजांस कळवा जा ह्मणे ॥४२॥
मग समर्थापासी आले त्वरेनें । नमोन बैसले करीत स्तवन । प्रार्थिले नित्यश: ऐकों कीर्तन । सिष्य येक धाडित जावें जी ॥४३॥
हरिदासाची कळविता थोरीव । संतोषोनियां रसिकराव । विदित असतां हि कापटयभाव । विनवणी मान्य केली हो ॥४४॥

॥अभंग॥ धन्य साधुस्छिति क्षमिती अन्याय । होऊं तर्णोपाय इछिताती ॥१॥
मान करविती दोषें न पाहती । दु:खऊं न देती वृत्तिलागी ॥२॥
आणोनि साध्येसी प्रत्ययाचा बोध । लाविताती छंद भजनाचा ॥३॥
सर्वावंरी दया करुनि समान । स्वात्मानंदी खूण बाणविती ॥४॥

॥वोवी॥ तोषवोन धाडिलें प्रजानना । नित्य येक सिष्या करिती आज्ञा । आसिरबाद करुं जनकराजसदना । जेवि सिष्य जाती ऋषीचे ॥४५॥
नित्य येक जाती ऐकों कीर्तन । येऊन श्रुत करिती पावला मान । विश्वास बहु जाला नृपासी तेणें । वाटलें हरिदासा कार्य साध्य ॥४६॥
साधुसंतांला निंदा करित । मंत्रौषधी प्रचित दावित । प्रताप आपुला बहुत चि वानित । खराब बहुतांची करुं पाहे ॥४७॥
पाळी प्रमाणें मुसळरामातें । कीर्तन ऐकाया समर्थें त्रासले होते जे अति बीर भूतें । शरणांगत पातले बळिष्टा ॥४॥
मुसळरामबावा । भोळा भाविक । प्रसन्न असे त्या कपिनायक । करितील भरवंसा त्या मोकळिक । होऊन सन्मुख ठाकले ॥४९॥
ह्मणाल श्रोते हो मारुतीस भजतां । कां सर्वबीरीं चालते सत्ता । कां मुक्तिपद इछितां येतसे हाता । सुज्ञान प्राप्तता होऊनि ॥५०॥
तरि ऐका करुनि चित्त निर्मळ । अंश बहु असती ते दाविती फळ । सांब चि तरि जाला गुरुदयाळ । ज्ञान वैराग्य वोपावया ॥५१॥
विष्णु च तो होय उपास्य दैव । भक्त हो अवतरला जाणा वैष्णव । बीर ही होठेला सित्ध बीरराव । भावितील तैसा फळ वोपितु ॥५२॥

॥अभंग॥ ध्यातां भावें मारुतीतें । पूर्ण होती मनोरथ ॥१॥
पडों नेची च संकटीं । पावतसे जगजेठी ॥२॥
ऊंच नीच न ह्मणे कार्य । ज्यात्यापरी साह्य होय ॥३॥
डोळा लाऊनि अंजन । दावीतसे निरंजन ॥४॥
ज्याचे चित्तीं हरिप्रेम । त्यासी भाळे आत्माराम ॥५॥

॥वोवी॥ ॐ नमो भगवते वीर हनुमते । ऐसे वाखाणिती महिमा जाणते । आत्मा हरी श्रीरामरुपीं सत्य । हें असो प्रार्थिती भूतें बावासी ॥५३॥
ह्मणती दयाळा सिणलों राबतां । नुपेक्षितां मुक्त कीजे जी आतां । श्रेय असे हें बहु पुण्य़वंता । पडलों जी बंधनीं पुरे पुरे ॥५४॥
वस्ताद याचा तो ह्मणवितो योगी । हिंमतीस असतो या दुष्टालागीं । धन मिळवोन दोघे होती विभागी ॥ अनाचारासी प्रवर्तती ॥५५॥
उत्तम स्त्रियांतें भाळवा ह्मणती । मनांतील जाणोन सांगा वदती । उसंत नाहीं जी आहोरातीं । फुलें आणवितीं दुरोन ॥५६॥
हरिदास असे तो बुद्धिमंद मोटा । ज्या सत्पुरुषावरी न चले कुचेष्टा । व्यर्थ चि भल्याला करितो तंटा । घालोन रगडयांत आह्मांसी ॥५७॥
मान न देतां कोणी तयाला । नि:पात करा जा ह्मणतो आह्मांला । यावरी धण्या रे द्याल जरी टाळा । दावा धरोनि तयाला । नि:पात करा जा ह्मणतो आह्मांला । यावरी धण्या रे द्याल जरी टाळा । दावा धरोनि पीडील ॥५८॥
अकर्म करणारे आह्मी थोर । ते देखोन करणी जालों बेजार । तव दर्शनें दाता रे जालों उत्धार । त्रासवोन भ्रष्टाला करीं मुक्त ॥५९॥
ऐकोन यापरी ते काकुलती । आठवोन गुरुदेवा निर्मळ चित्तीं । कांही न सुचतां बैसोन येकांतीं । धावा मांडिला बळीचा ॥६०॥
पूर्वी जाणे तो हे क्रिया सकळ । सेवोन गुरुपाये जालासे निर्मळ । यास्तव प्रसन्नु प्राणेशबाळ प्रांजळ लाभलासे ॥६१॥
तर्कोन इकडे सद्गुरुसमर्थ । वर्तमान कोणा हि न करितां श्रुत । स्वयें चि हरि कीं पावतां त्वरित । नमोन वृत्तांत सांगितला ॥६२॥
आज्ञा न देववे त्या सिक्षु करितां । आणि नुपेक्षिजे कोणी हो शरणांगता । परि हरिदास अकर्मी मोडितो सत्पथा । न सीक्षितां अधिक बावळेल (बळावेल !) ॥६३॥
ना ऐकवें निंदितो सत्पुरुषलोका । घालोन कूपें चि बुडवितो भाविका । नासाडिला हा परमार्थ आसका । तरि सीक्षोन कीजे मग ऊर्जित ॥६४॥
ह्मणतिलें पडोन संकटीं हे रामा । सांभाळून झाडणी करी अकर्मा । सांगोन यापरी जावोन स्तोमा । माजीं न कळतां बैसले ॥६५॥
तों भूतप्रेतपिशाच्चबीरासी फुलें । संक्षेपून वृष्टि करा कश्मळ । परि दृष्टींत आसों द्या भक्त पुण्यशीळ । हें सांगोन इकडे पातला ॥६६॥
सभेस्छ सर्वा हि न्याहळून दृष्टि । धरुन श्रीगुरुध्यान हृत्पुटीं । रुषिगणामाजी शोभे परमेष्टी । तेवि श्रेष्ठासनीं विराजला ॥६७॥
हरिदास होठेला ससाजी सावध । जाणोन बावाला अर्थभेद विशद । गातसे कटाउ कूट कोड पद । केलें सर्वासि मोहित ॥६८॥
गावोन आरती पहा ह्मणे वरती । देवसमूह आला पुष्पें वर्षती । पसरोन पल्लवा ऊर्ध्वेसी पाहती । फुलें न पडती दचकला ॥६९॥
तंव चौफेरी पसरली घाणी । सुमनबदला ते कश्मळा आणुनी । उत्तम लोकांत सांभाळुनी । वर्षाव करुं लागले ॥७०॥
त्रासले दुर्गंधी नेघवे वारा । ह्मणती कुटिळ रे पाजी खरा । धरा ठोका रे सीक्षा बहु करा । मारा पाडा रे उताणा ॥७१॥
न बोलवे न उठवे कंटाळले । चुकविती तोंडें ईक्षिती खाले । धुवोन घ्यावया कोणी पळाले । न सुचे घाबरले कांहीं च ॥७२॥
तंव बाहतां कपटयानीं सिबंदीभूत । न येती न दिसती जाले गुप्त । वस्ताद हि त्याचा ठेला तटस्छ । कुडमंत्रयुक्ति न चालतां ॥७३॥
जो राबवील भूतांला कपटहव्यास । तो पावेल फजिती गति नसे त्यास । मरणसमई घडेल क्लेश । गुलाम भूतांचा होय सेखीं ॥७४॥
हें असो गल्बलीं जाला प्रकाशले । जे करीत होते बहुत तारीफ । ते चि चवताळले कुटूं संतापें । तंव सद्गुरुभूप कळवळले ॥७५॥
तंव मुसळबावांनीं हरिदासातें । घेऊनि खांदी निघाला पळत । गडासी पातले सद्गुरुसहित । हें विदित कवणा हि नसे चि ॥७६॥
स्वस्छळासी गेले जन ते निंदिती । सहवासिक त्याचे करिती खंती । पंडित मानी ते दचकले चित्तीं । होठेला नरपती सावध ॥७७॥
हेरुन हरिदासा नेलें धरुन । पीडितील करकरों मारहाण । सोडऊं वस्ताद तो करीत रुदन । प्रार्थू गडासी पातला ॥७८॥
धन्य स्वामीची अप्रतिमा क्रिया । सन्मानून दोघा हि केली दया । पुसिलें कापटय हें करावया । कार्य काय अगत्य हो पां ॥७९॥
जी देवा संसारीं शोभिवंत धन । विवाह मुंजी फळशोभन । व्हावें बांधावें पडल सदन । फिटाव रिण माघील ॥८०॥
यास्तव निरसाया सर्व हि कष्ट विद्या सिकली हे करुनि खटपट । थोर ग्रामीं हें मांडिलें कपट । जाळाया पोट सिंतरोन ॥८१॥
खोट कां होईना बोलतां सत्य । अपराध क्षमा करिती संत । कवण्याहिपरी होऊं स्वहित । प्रपंचिकांत सावरती ॥८२॥
चिंतावोन पुसिले वदले सज्जन । दाता येक रे श्रीरघुनंदन । आस्छा किती ते व्हावें किती धन । येरु ह्मणतिला द्वयसहस्त्र ॥८३॥
तितुक्यांत दर्शना आला भूपती । देखोन हरिदासा तापला चित्तीं । तंव होऊनि प्रसन्नु श्रीगुरुमूर्ती । ह्मणतिलें रायासि ऐक रे ॥८४॥
घडी घडी दक्षणा देईन ह्मणसी । तरि काय देखिल सांग या समयासी । तो लागोन पायाला वदे आज्ञेसी । उलंघण किमपी होईना ॥८५॥
तरि निखालस दोन हजार द्रव्य । वर खर्चालागी नाण्य पांचसे हे । देऊन धाडी यासि लवलाह्य । वस्त्रादि गौरव करुनिया ॥८६॥
तैसें चि करितां अनकूळ सर्व । उठिला कपटयाला परि शुद्धभाव । तेणें ताराया सद्गुरुराव । प्रबोधिलें कृपेनें ऐका कसें ॥८७॥

॥श्लोक॥ सार आसोनि असार चि घेणें । चिदृप सांडुनि विदृप होणें । सुंदर सांडुनि बांदर घेती । साखर सांडुनि घर्डिती माती ॥१॥
ज्ञान तजूनि वसे । संगित सांडुनि नाचति चार । सद्गुण सांडुनि दुर्गुण पाहे । गायन सांडुनि बोंबलिताहे ॥२॥
हरिदास विळास विळासतसे । हरिभाग्य सभाग्य सदां विलसे । रघुनंदन कंदन दानव रे । सुरनाथ किती जिव मानव रे ॥३॥
जन अंतरहेत बरा फिरवी । जन जीनस त्यांत सदा सिरवी । जगदांतविवर वीवरवी । रघुनाथउपासकें मिरवी ॥४॥

॥पद॥ (डफ०) थोर अवघड आहे घाट । कैसे उरकेल न कळे वाट । होई रघुवीरजीचा भाट । कां भुललासी ॥१॥
जंवरि आहे संपतिवार । तंवरी खाया मिळती फार । अंतीं सोयरा रघुवीर । कां भुललासी ॥२॥
डोळे झाकिसी कां दिवसा । वोढी जळत्या घरिचा वासा । स्मर माझ्या रमाधीशा । कां० ॥३॥
रामदास ह्मणे योगिया । जेथिल तेथें जाइल विलया । स्मर माझ्या रघुराया । कां०॥४॥
॥श्लोक॥ महंत हो नका नका । बहुत वैभवें धका ॥श्लो०॥५॥

॥वोवी॥ ऐशापरीनें बोलती सदयें । तो चि त्या घडला अनुग्रह । गळती प्रेमाश्रु धरिले पाय । कपटाचा ठाव पूसिला ॥८८॥
बिंबवितां हृदईं पुन्हा भावार्थ । दोघे होठेले केवळ सद्भक्त । कळवोन इहपरसार्थकीं रीत । धाडितां सुखरुप वर्तले ॥८९॥
धन्य उदार श्रीगुरुराणा । मुक्तिघर दाखवी ज्याची आज्ञा । भुलोन धरितीं जे विपरीतभावना । कां मूर्ख न ह्मणावें तयासी ॥९०॥

॥अभंग॥ जळो तें करणें माईक दुर्मती । पाडोन पडती पेचामध्यें ॥१॥
माहपुरुष आणी कापटयकरणी । बुद्धि सांगे रहणी पापरुपी ॥२॥
ह्मणवी सांप्रदायी षट्‍योगिं वर्ते । घालितो निमित्य गुरुवरी ॥३॥
आंगा आणी देव सांगतो भविष्य । मानाचा हव्यास विखीं लुब्ध ॥४॥
करितो कीर्तन सिंतराया द्रव्य । वैराग्य ते माव शोभे कर्म ॥५॥
लोक गोळा होऊं विखरु चि दावी । भलती च लावी चटोरता ॥६॥
ऐसे जे अधम समूळ माईक । कैच आत्मसौख्य परमार्थ ॥७॥

॥वोवी॥ आतां ऐका हो सहज सुलक्षण । सर्व सिद्धित्व फलदाय पूर्ण । अमाइकता श्री गुरुभजन । क्रियायुक्तज्ञान सद्भक्ती ॥९१॥

॥अभंग॥ धन्य तो विवेकी सर्वमान्य क्रिया । लोभ दंभमाया केला दुरी ॥१॥
सर्वामाजिं खेळे श्रीराम चि येक । कळता चेटक त्या न बाधी ॥२॥
सर्वी सुखी आसो ठसतां हा भाव । वैराग्यविभव दोनी फळे ॥३॥
क्रिया ते नेटकी प्रत्ययें बोलणें । न लगे मोहन कीजे जना ॥४॥
ठसतां विश्वासु उदारत्व धैर्य । प्रयोगाच काय प्रयोजन ॥५॥
आत्माराम भक्ती मुक्ती च मंडण । पतीतपावन सर्वसित्धी ॥६॥

॥वोवी॥ ऐसियापरी करणार विवेक । समर्थां घरीं आसती सेवक । लीळा जयाची देखोनि लोक । पावोन परपार सुखावती ॥९२॥
गडांत आसती जाणोनि दास । भेटीस पातले अनुभवी पुरुष । धाडोन सामोरी भजनकर्त्यास । आणवोन केलें सन्मानें ॥९३॥
मानसीं तयाच ऐसा भाव । बैसले असतां सर्व समुदाय । तयास न कळेसा बोलिजे अनुभव । जाणाव आर्त न सांगतां ॥९४॥
सर्वज्ञराव श्रीसद्गुरुभूप । सफळ तयाचा करुं संकल्प । पद ये गावया करुनि सोप । कल्याणा हातीं दीधलें ॥९५॥
सभानभिं होता गुरुचंद्रोदय । योगी महातारे शोभती समुह । चकोरकल्याणजी मंजुळ गाय । निवती अनुतापी आर्थकीणीं ॥९६॥
 
॥पद॥ धाट॥ निरुपम रामाबाई ॥) दिवसा पडे चांदिण । रात्रीं पडे ऊन हो ॥धृ॥
सेळी सेवि लांडगा व्याला ।गाईन व्याघ्र भक्षिले हों । आंधळा काढी मार्ग पांगुळ धावण्या धावला हो ॥१॥
गाय व्याली व्याघ्र जाला । च्यार तोंडें त्याला हो । चहुं तोंडीं भांडणें हें । जनासि पडलें ठकड हो ॥२॥
तळ उडाल गगना गेल । गगनें चि ग्रासिल हो । रामीरामदास ह्मणे हें गुज । संतांनि निवडल हो ॥३॥

॥वोवी॥ ज्याची जालीसे अतौता दृष्टी । तेजोमयाची होठेली दाटी । ध्यानयोगामाजिल ह्या गोष्टी । कळे अनुभविका दावितां न ये ॥९७॥
भोळेभाविकीं आपुल्या चित्तीं । अनुभव प्रासाया करिती ग्लांती । सुचवितां सकृपें कल्याणाप्रती । कळवोन रहस्य केला सुखी ॥९८॥
योगीखूण ते जाणतील योगी । काय होय ते इतरालागीं । दैववान जे परमार्थविभागी । ते चि नि:संगी विदित त्या ॥९९॥
यद्यपी कळवणें राष्टणार्थ । दिवस ज्ञान चांदिण आत्मज्योत । शून्य अज्ञान निशी संतप्त । ऊन अनुताप गुरुकृपें ॥१००॥

॥अभंग॥ धन्य श्रीगुरुप्रताप । सिष्य होय ज्ञानभूप ॥१॥
सूर्य आत्मा चंद्र मन । ध्यान उपासना खूण ॥२॥
मोडुनिया भासाभास । अहोरात्रीं साजतस ॥३॥
आत्मारामीं सदा रतु । त्याला शोभे हा पदार्थु ॥४॥

॥वोवी॥ अविद्या सेळी वृक अहंकार । वडिल तया ही काळ संग व्याघ्र । तुर्या गो त्याला गिळितां समग्र । जाला सुकाळ भय फीटला ॥१॥
संकल्प अंधळा सुमार्ग काढितु । जाणीव पांगुळा लागी धावतु । हे शब्द मण्यांत वोवा येकरंगतंतु । पावाल प्रांतु प्रत्ययाचा ॥२॥
ते चि अर्धमात्रेचा द्र्ष्टा व्याघ्र । श्रवणादि बोध ते वदन चार । प्रवृत्तीचा करितां संहार । ठक पडे अभिनवीं जनासी ॥३॥
अष्टदळकमळाच वसतस्छान । मनमधुकराच जेथ खेळण । तें तळ ऊर्ध्वेसि गेल उडोन । विद्गगनानें तें सेविल ॥४॥
निवाडा केला जें गुज हे संत । उपदेशापासून स्छितीपरियंत । गुरुपुत्रांनीं कळवितां अर्थ । समाधान वाटल सकळांसी ॥५॥
योगानुभवी तें मानोन आश्चिर्य । दृढ दासपाई केला आश्रय । कृपावंत तेणें होऊनि गुरुराय । उचित निजवस्तु वोपिलें ॥६॥
माहाराजराजे दास राजयोगी । मुक्तसित्धपणें वर्तती जगीं । उपाय दाविती ताराया लागीं । लीळा विचित्र जनांत ॥७॥
महंती कराया जाती कोणी । दर्शनास येती कोणी दुरोनी । साधनस्छितीगतीदृढतालागुनी । पुसतां उपाय संतोषती ॥८॥
आर्जित्यास ह्मणती विचारा बा रें । सकळ ही साधनीं साधन हें बरें । मग कल्याणाप्रती सांगती सांग रे । तारीत बहुजना तरेसे ॥९॥
वंदोन गुरुआज्ञा कळविती सांग । कथिलें जें आतां बहुतासि माग । संसार होय तो निरुपणमार्ग । ऐका अभंग येविषयीचे ॥११०॥

॥अभंग॥ वस्तुचा निर्धार होये पारंपार । साधनाचा सार निरुपण ॥च०५॥
निरुपण सार अद्वैत करावें । तेणें उत्धरावें नि०॥च०५॥
निरुपणें भक्ति निरुपणें ज्ञान । अनुताप पूर्ण नि० ॥च०५॥
गतीचें लक्षण हेचि हे प्रमाण । श्रवणमनन सर्व० ॥च०५॥
निरुपणेंऐसें नाहीं समाधान । आणीक साधन आ०॥च०५॥
निरुपणीं जनी लाभे सर्वकाही । दुज ऐसें नाहीं० ॥च०६॥
केले चि करावे पुन्हा निरुपण । तरी बाणे खूण० ॥च०५॥
येकदा जेवीता नव्हे समाधान । प्रतिदिनीं अन्न खाणें०॥च०६॥
नमूं वेदमाता जे कां सर्वसत्ता । ब्रह्मज्ञान आतां बोलो कांहीं ॥च०५॥
श्रवण करावें जेथ ब्रह्मज्ञान । ज्ञानेविण० ॥च०५॥
माणूस चि ब्रह्म होते कोणेपरी । हे ची तूं विचारी० ॥च०६॥
सावधान व्हावें विवेकें पाहावें । वायोच्या स्वभावें ॥च०६॥
शरीराची तत्व तत्वाच शरीर । पाहावा विस्तार विस्ता० ॥च०५॥१३॥

॥वोवी॥ कवण्यापरीनें कीजे श्रवण । काय ऐकाव तें केवि निरुपण । कल्याणकर्ता जो यशस्वी पूर्ण । कळविलें विधान कल्याणजी ॥११॥
धन्य स्वामीचे सिष्यसांप्रदाई । येकाहुनि येक ते ज्ञानी निस्पृही । ज्याचेन उपकारें मानितें मही । उतरला भार असत्क्रिया ॥१२॥
धन्य स्वामीच उदारपण । सकळिकावरी दया समान । येकदां अप्पा हे असे अभिधान । येकनाथस्वामीसांप्रदाई ॥१३॥
कृष्णउपासना असतां त्याची । उपजली प्रीत त्या श्रीरामजीची । वळखोन स्वामींनीं अपेक्षा त्याची । राहविलें सन्निधीं बहुत दिवस ॥१४॥
तो राहणारा ऊर्णबाहुकडील । जाणे बहु निका योगाचा खेळ । निजवर्म तयाला बोलूनि प्रांजळ । रामोपासना सांगितलें ॥१५॥
स्वकरानें वोतिली जे दिव्य मूर्ति । ते वोपिली कृपेनें धातु मारुती । मग नमोन पावला तो स्वस्छळाप्रती । पूजितु सद्भावें हरिप्रतिमा ॥१६॥
शुत्ध जयाचा पडला मार्ग । चैत्रीनवमीचा उत्साव सांग । करिता संतुष्टे भूमिजांतरंग । मान्य बहु केले उपासक ॥१७॥
वासुदेवबावा तयाचा सिष्य । आळंदग्रामीं ज्याचा रहिवास । चालविले ते हीं सांग उपास्य । अद्यापी दंडक आसे मठीं ॥१८॥
सिष्य ज्याचे ही जाले प्रवीण । श्रीनाथजीचे भोगिते निजधन । ऐस दासाच आसिरवचन । जाले पावन बहुतेकीं ॥१९॥
उत्तरोत्तरीं होऊं पवित्र । ऐसीं आसतीं हो अपार चरित्र । गाईन आठवल तें ऐका सादर । कृपा करितील दासहरी ॥१२०॥

॥अभंग॥ सज्जनगड ते वेंकटेशगिरी । भवांतक हरी जेथें नांदें ॥१॥
सर्वा समभाग प्रसादवाटणी । मर्यादा रहणी क्रिया शुत्ध ॥२॥
तनुमनधन अर्पण केलिया । टाळीतां ही तया न सोडीच ॥३॥
संत भक्त मुक्त यान्नाकरु येती । होय मनोवाप्ती फळसित्ध ॥४॥
मी तों काठीकर वारकरी होय । भोळासमुदाव मिळालासे ॥५॥

केवी नेतो पार त्याचा तो चि जाणें । लाभ हा चि मान्य करवीतो ॥६॥
आत्माराम स्वयें भक्तसाहकारी । भजा निरंतरीं पावा सौख्य ॥७॥

॥श्लोक॥ कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थ प्रदायिने । श्रीमत्‍व्यंकटनाथाय श्रीनिवासाय ते नम: ॥१॥

॥वोवी॥ दासविश्रामधाम सुंदर । वैकुंठनाथाच भांडारघर । जे स्छळीं मिळाले भक्तअपार । स्वात्मानंदप्रसादु सेवावया ॥१२१॥
इति श्री श्रीरामकृपा । तारक परमार्थ सोपा । रामवेधु लक्षण । कुळधर्मादिकरण आज्ञा । कपटी हरिदासा शिक्षण । कोडें बोलणें । निरुपणप्रमय । कृपा करणें । सर्ग येकसेहेतीन ॥१०३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP