मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|दासविश्रामधाम| ॥अश्वास॥ ९८ दासविश्रामधाम श्रीसद्गुरुस्तवन ॥गत॥ ९७ ॥अश्वास॥ ९८ ॥समास॥ ९९ ॥मान॥ १०० ॥प्रकरण॥ १०१ ॥प्रसंग॥ १०२ ॥सर्ग॥ १०३ ॥अध्याय॥ १०४ ॥खंड॥ १०५ ॥पटळ॥ १०६ ॥विसावा॥ १०७ ॥स्तबक॥ १०८ ॥कांड॥ १०९ ॥वर्ग॥ ११० ॥सोपान॥ १११ ॥अवधान॥ ११२ ॥वर्ग॥ ११३ ॥पटळ॥ ११४ ॥खंड॥ ११५ ॥अध्याय॥ ११६ ॥सर्ग॥ ११७ ॥प्रसंग॥ ११८ ॥प्रकरण॥ ११९ ॥मान॥ १२० ॥समास॥ १२१ ॥लळीत॥ आत्मकृत ॥अश्वास॥ ९८ एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले. Tags : dasvishramdhammarathioviओवीदासविश्रामधाममराठी ॥अश्वास॥ ९८ Translation - भाषांतर ॥श्रीरामसमर्थ॥॥पद॥ (राग गौडी॥) सज्जना सज्जन मानी मना । अगणित गुणगणना ॥ध्रु०॥ गुणी गुणालय आलय लीळा । पाळक जो भजना ॥१॥भजनजनितजन पतीतपावन । भवीत भवशमना ॥२॥दास हरीजन भ्रमित उदासिन । गळीत ये सदना ॥३॥॥वोवी॥ अरे मना तूं होसी सज्जन । जाणसी सर्व हि हिताहितखुण । सद्गति नसे कीं सज्जनांवांचून । मानीं सज्जना शरण रिघ ॥१॥सज्जनजनांचा गुणानुवाद । वानी ऐसा तो कोण प्रबुद्ध । मुख्य हे जाण पां लीला अगाध । सर्वसार क्रिया जयांची ॥२॥भजनाश्रयो करुनि स्वयें । भजकासी सकृपें होती साह्य । भजतां तयांतें मग नसे भवभय । उदासीनता न टाकिती ॥३॥असती जनीं या अलिप्तपणें । दृष्टांत नसे चि ह्मणूं समान । अळंकृत जाले उत्तम गुणें । तरी च महिमान धन्य त्यांचें ॥४॥नातरी दाऊनि उत्तम सोंग । क्रिया नसे चि लावितो डाग । तयास न ह्मणती कां सांगा धिग । धन्य ते सज्जन सर्वमान्य ॥५॥॥पद॥ (राग श्रीराग, धाट-हर हर देव०॥) न.ना. फराळ जाण व्यर्थ भोजनेविण । तैसें गोसावीपण विवेकेंवीण ॥१॥नाना निर्मळपण शोभेना स्नानविण । तैसे गो०॥२॥दास ह्मणे भूषण नसता दूषण । तैसें गोसावीपण ॥ भगवंतेविण ॥३॥॥वोवी॥ यास्तव पाहिजे प्रत्ययज्ञान । तरी च वदलें तें शोभायमान । नातरी खटपटीं व्यर्थ चि सिणणें । स्वहित साधावें झडकरी ॥६॥बहुकाळवरी फिरतां शोधित । कांहीं कशाचा न लागे अंत । प्रपंचामाजील शाहणीव रीत । स्वहितकार्यासी न ये चि ॥७॥॥श्लोक॥ जगीं पाहतां ग्रंथ कोट्यानकोटी । किती संस्कृत देशभाषा मर्हाटी । कितेकी किती निश्चयो होत आहे । परी तुळणा ज्ञानमार्गा न साहे ॥१॥तया ज्ञानमार्गामधें प्रत्ययाचें । पाहातां बरें बोलणें पष्ट कैचें । कितीयेक ग्रंथीं गथागोवी जाली । बहू निश्चयो येकबुद्धी बुडाली ॥२॥जगीं पाहतां साधकें काय घ्यावें । सदां संशयामाजि किती पडावें । खरा देव तो मुख्य ठाई पडेना । ह्मणोनी जगोद्धार तेणें घडेना ॥३॥जनीं अल्प ते चूकती कारणाला । नसे धारणा सर्वसाधारणाला । कितीयेक नानापरीचीं पुराणें । ठके लोक मत्तांतरीं साभिमानें ॥४॥॥अभंग॥ सज्जना नमावें ज्ञान संपादावें । प्रत्ययानें व्हावें वस्तु स्वयें ॥१॥नाना होत कष्टी धुंडितां हे सृष्टी । परिणाम शेवटीं न लागे चि ॥२॥पृथ्वी फिरो जातां अंत चि न कळे । आप अग्नि अनिळ अप्रमित ॥३॥आकाशाचा अंत न लागे सर्वथा । वेदशास्त्र पाहतां वाड आहे ॥४॥पुराणें फार चि बहु हेतु मत्त । नानायोग पंथ अंत कोठें ॥५॥देहासि शोधितां अंत चि लागेना । केलें तें तगेना नानाश्रयें ॥६॥मुख्य आत्मारामकृपा येक पुरे । स्वरुपानंदी भरे धन्य तो चि ॥७॥॥वोवी। ऐसियापरी बोलती सज्जन । तें सत्य चि मनीं रे मानीं प्रमाण । संसारु हा जाईल निघोन । पाडोन भ्रमणावर्तीत ॥८॥जन्मापासोन सेवटपरियंत । सौख्यासी हुडकितां नसे किंचित । असार चि तें सेविती भ्रमित । गोड बहु वदती परि नव्हे ॥९॥सावधान व्हावया जनाकारणें । बोलिलेति विवळ करुनि सज्जन । अरे मना तूं ध्याना आणुन । होई सज्जन भजन करीं ॥१०॥॥पद॥दंडी॥ हित करा रे लागवेगे । काळ लागला पाठिलागें रे रे रे रे ॥ध्रु०॥ जन्मदु:ख तें सोसवेना । गर्भवास कठिण वसवेना । चर्मकारागृहीं दु:ख नाना रे० ॥ जाणतयासी हें मानेना रे ॥१॥नीर बहुत ठाई हिंडलें । झारा घातला मग निवळलें । मग कोठें नेणा वोतलें रे रे० । तेथें येकाचें येक चि जालें रे ॥२॥जन्म जाला कवणे ठांई । तेथें निर्मळपण तें काई । मन घालूनि समजे भाई रे० । तेथें निर्मळपण तों नाह्री रे ॥३॥बाळपणीं कांही न कळे । मळमूत्रांत जाउनि लोखे । काय घ्यावें न घ्यावें न कळे रे० । सुखदु:खामध्यें आडकलें रे ॥५॥पुढें उत्पत्ति जाली फार । वाढविला बहु जोजार । काळ आला कठीन थोर रे० । कांही आठवेना विचार रे० ॥६॥रात्रंदिवस लागली चिंता । अन्न कैसेनि मिळेल आतां । न ये लौकिक ही राखतां रे० सदां घाबिरा दुश्चिता रे ॥७॥दीर्घसूचना नाहीं केली । पुढें कठिण वेळ आली । कष्टी होउन अंग घाली रे० । वैभवाची कळा वोसरली रे ॥८॥बहु देश विदेश पाहिले । बहुतांचे बहुत कष्ट केले । तितुके ही व्यर्थ गेले रे० ॥ पुढें दु:खाचे डोंगर जाले रे ॥९॥कांहीं केल्या संसार सावरेना । बहु कष्ट जाले आवरेना । नाहीं आधार धीर धरवेना रे०॥ मग त्याग चि मानिला मना रे ॥१०॥घर सांडुनि निघोनि गेलें । तेथें अदृष्ट पाठीं लागलें । बहु जनामधें कष्ट केले रे०। तें झुरझुरों पंजर जालें रे ॥११॥वृद्धपणीं बहु खंगला । जिवलगासि आवजा जाला । देव मरण देईना मला रे० । देखीं पश्चात्तापीं पडला रे ॥१२॥ऐसें कोण्हीयेकें न करावें । वेगें आधींच शाहणें व्हावें । आपणासी आपण सोडवावें रे०। जन्मसार्थक चि करावें रें ॥१३॥फार आवघड संसार । कितियेकासि वाटतो सार । अंतरतो सकळ जोजार रे० । यांत हरिभजन येक सार रे ॥१४॥काय आणिलें येतां येथें । काययेउं पाहातें सांघातें । हें माइक सर्व हि जातें रे० । दास ह्मणे राम सांघातें रे ॥१५॥॥वोवी॥ ऐसियापरीं करितां प्रबोध । मनासि लागला स्वरुपछंद । विसरुनि भेदाभेदंद्वंद्व । तदाकारीं लीन जाले ॥११॥॥जो सदां मनातें रमवोन स्वरुपीं । जो वोसणेना विस्मृतिझोपीं । जो अरिषड्वर्गा धरुन दापी । पूर्णप्रतापी तो येकु ॥१२॥समर्थ ऐसा तो श्रीरामदास । सज्जनगडीं केला रहिवास । सकळिकामनीं भरला उल्हास । झेलिती परमार्थ वर्चेवरी ॥१३॥मागिलाध्याईं सेवटीं कथन । कृष्णजन्माचें जालें वर्णन । कथाभरण भाविका भाविका दिल्हें भाळून । साधुसज्जन संतोषले ॥१४॥हरिदास गवाई भोळे भाविक । हरिहरशत्तयादि उपासक । नमोनि गुरुदेवा कवन वरदवाक्य । भरणा इच्छितां अपेक्षित ॥१५॥संतुष्ट वाटला कविराजयासी । सांगती सत्शिष्य कल्याणासी । जो जें इच्छिती जें अगत्य ज्यासी । तें तें लिहोन दे सांग ॥१६॥डाका गोंधळ लळित चरित्र । पंचीकर्णप्रमय महावाक्यसार । फुटग्रंथ आरत्या भूपाळ्या सुंदर । पंचक अभंग फुटश्लोक ॥१७॥पद श्लोक दोहरे हरिहरपर । निवडक संग्रहो संवाद वीर । लिहोन देतां मग अर्थसार । पुसोन घेतलें संतुष्टले ॥१८॥कृष्णोपासक आले मग । त्यास हि वोपिले पद श्लोक अभंग । श्रवण करा हो सारांशभाग । सगुण हरिचे लीळापर ॥१९॥॥वोवी॥ दासकृत॥श्रावण वद्य अष्टमीस पाहीं । अर्धरात्रीचे समई । कृष्ण जन्मला गौळयागृहीं । लीळाविग्रही बाळकु ॥१॥रितासुर शकटासुर । विमळार्जुन तरुवर । कागासुर बगासुर । तृणवछे गोपिका ॥२॥केलें पूतनाशोषण । मावळभट्टा पिटे दान । पुढें मांडिलें विंदाण । बाळपणीं गोकुळीं ॥३॥दही दुध लोणी चोरी । आटाटी घरोघरीं । साय तुपगुळचोरी । परोपरीं होतसे ॥४॥बाळा तारूण्य सुंदरी ॥ व्रजांगना बहु नारी । हरी त्यासी रळी करी । वाटे तिटे येकांतीं ॥५॥लहान होतो मोठा होतो । नाना वेष पालटितो । बहु कैवाड करितो । ब्रह्मादिका कळेना ॥६॥गाई गोपाळ वासुरें । नेली विरंची तस्करें । विश्वरुप जाला पुरें । घरोघरीं पुरवला ॥७॥इंद्र कोपला अंतरीं । मेघ पाडिला शिळाधारी । कृष्णें धरिला बोटावरी । गोवर्धनु पर्वतु ॥८॥कृष्णें काळिया नाथिला । कंसासुर संव्हारिला । भार पृथ्वीचा फेडिला । नाना दैत्य मारोनि ॥९॥पांडवाचा साहकारी । अर्जुनचि घोडे धरी । द्रुपदीस तो कैवारी । भक्तासाठीं कष्टला ॥१०॥सोळासहस्त्र गोपिका । छपन्न कोटी यादव देखा । नाहीं वैभवाचा लेखा । दासासी सखा तो येक ॥११॥॥श्लोक॥ समर्था जरी चिंतिजे भक्तिमार्ग । तरी धावतो सांडुनी आप्तवर्ग । त्वरें टाकुनि देवकी सीघ्र आला । पहा येशोदेचा स्वयें बाळ जाला ॥१॥कधीं तापसालागि तो दैन्य नोहे । पहा सवंगडया लागि तो पुष्टि वाहे । कधीं ब्रह्मयातें न ये ध्यानमूर्ति । पहा गोपिका त्यास हो नाचवीती ॥२॥शिवादीक ते दर्शना घेति धावा । पहा गौळणी बांधिती त्यासि दावा । जयासी भले इच्छिती आवडीं हो । तयाची गडी फुंकिती सवंगडी हो ॥३॥जयातें पहा सहस्त्रनामीं स्मरावें । तयातें थडी बाहती अल्प नावें । श्रुती बोलती साम्यता वाहिं ज्यासी । गडी थापडया मारिती पाहा त्यासी ॥४॥मुनि इच्छिती पादसेवा जयाची । गडी तांगडी वोढिती हो तयाची । कवीलागि हो वर्णितां कष्ट होती । पहा सवंगडे त्यासि हो बांधिताती ॥५॥भुलेना कदां रुक्मिणीच्या रुपासी पहा तो हरी रातला कुब्जकेसीं । वरी रुक्मिणी रोधिते व्यर्थ जाया । अती आदरें प्रीति ती दास पायां ॥६॥॥पद॥ (केदार,धाट-हरिवीण घडी॥) हरि वेणु वाहे त्रिभंगी । गोपीगोपाळाचे संगीं ॥ध्रु०॥भृकुटी वेंकट वेंकट पाहे । चपळ कर पल्लवताहे ॥१॥श्रवणें अहंभाव गळाले । सकळ चक्कित जाले ॥२॥नादमुळीं उद्भव जेथें । दासजन तन्मय तेथें ॥३॥॥केदार॥ हरि वेगीं आणीं रे उद्धवा ॥ जीव फुटतो भेटीलागीं ॥ध्रु०॥ अशन भाषण नयन नमन । यदुवीर गेला बहुत दुरि रे ॥१॥रात्रिंदिवस निजध्यास मनाचा । सौख्यकळा न दिसे दुसरी रे ॥२॥ यदुकुळटिळक प्रभु आमुचा । दास ह्मणे आतां कोण परी रे ॥३॥॥धृवक॥ सुरस मधुर वेणु वाजवितो रुणझुण । विकळ होताहे प्राण भेटीकारणें ॥ध्रु०॥रुप मनीं आठवे आवडी घेतली जीवें । यदुवीरा पाहावें सर्व सांडुनी ॥१॥अखंड लागलें ध्यान । स्वरुपीं गुंतलें मन । सकळ पाहतां जन आठवे हरी ॥२॥सकळ सांडोनि आस तयालागीं उदास । फिरे रामीरामदास वेधु लागलाए हरीचा ॥३॥॥ध्रुवक॥ सुरस मधुर वेनु वाजवितो रुणझुण । विकळ होताहे प्राण भेटीकारणें ॥ध्रु.॥ रुप मनीं आठवें आवडी घेतली जीवें । यदुवीरा पाहावें सर्व सांडुनी ॥१॥अखंड लागलें ध्यान । स्वरुपी गुंतले मन । सकळ पाहतां जन आठवे हरी ॥२॥सकळ सांडोनि आस तयालागीं उदास । फिरे रामीरामदास वेधु लागलासे हरीचा ॥३॥॥ध्रुवक॥ डोलत डोलत चाले श्रवणीं कुंडल हाले । भेदिक वचन बोले चित्तचोरटा ॥१॥सकळकळाचा हरी भेटवा वो झडकरी । तयावीण देहा उरी नाहीं साजणी ॥२॥चपळनयनवाणीं भेदिल वो साजणी । पाहतां न पुरे धणी डोळियांची ॥३॥ऐसा हरि लाघवी मुनिजना वेधु लावी । रामीरामदास कवी साबडा ॥पद॥ धाटी-नामामधें उत्तम० ॥) गोपी ह्मणती तूं कैसा रे कृपाळू । करितो ह्मणसी भक्ताचा प्रतिपाळु । तुजकारणें जीव जाला विकळु । युगासारिखा कठिण जातो वेळु ॥ध्रु०॥आम्ही आवस्ता भुललों तुझ्यायोगें । दु:खी झालो रें तुझिया वियोगें । आह्मा सांडुनि जातोसी रागें रागें । सुख पाहतां नाडळ तुझ्या संगें ॥१॥कृपा भाकितां भाकिताम जाला सीण । अंतर गुंतलें न कंठे तुजवीण । कृपाकोमळ ह्मणती विश्वजन । परि तूं पहातां अंतरींचा कठीण ॥२॥गोपी वचनें बोलताती उदास । पोटीं लागली भेटीची थोर आस । वाट पाहती चिंतनीं रात्रंदिवस । देव पावला सरिसें निज दास ॥३॥॥चाल-धर्म जागो॥ माभळभट्टा पीडेदान । देतो भगवंत आपण । निंदा द्वेष कामा नये । तेणें होतसे कठीण ॥ध्रु०॥गोकुळीचा पुरोहितु । गोवळ्या सांगतों हितु । बाळकु कुळासी घातु । याचा करा नि:पातु ॥१॥सर्वासि लाविला वेदु । त्याचा मानिला खेदु । स्वार्थमूळ पोटासाठी । केला देवासी विरोधु ॥२॥पराधिक सोसवेना । चाळे करीते कल्पना । कुष्टपुष्ट उणें पुरे । दास ह्मणे हें मानेना ॥३॥॥वोवी॥ हे लीळा पढतां त्या स्फुरली स्फूर्ति । जाले बहुतेकीं यापरीं सुमती । मुख्य दासकवनीं अयोध्यापतीं । कृपावरशक्ति ठेविलीसे ॥२०॥जे जे येती स्वामीराजसन्मुखी । लाहोन सकरुणा होती सुखी । उदारत्व यापरीं असतां लोकिकीं । वर्तती लोक ते ऐका कसे ॥२१॥सद्ग्रंथामाजीं जें असे बोलणें । प्रत्यक्ष होय तें सत्पुरुषवचन । अविश्वासिका हे न कले खूण । केव्हां हि त्याला तितुकें चि ॥२२॥वार्तावंदता नव्हे कीं येथें । प्रत्ययअनु भउवाक्य साक्षात । ग्रंथांत नसल्या ते इच्छितां मात । अंतरी च अंतरीं समजाविती ॥२३॥ग्रंथरुप चि ते असती सादृश्य । करुन घ्यावें हो अर्थविमृश । पारायण करितां कळे रहस्य । असतां विश्वास दृढतरा ॥२४॥ग्रंथाचिनि न होत स्वरुपज्ञान । ह्मणाल यापरी बोलती सज्जन । तरि उपदेश घडल्यानंतरीं वचन । फळदायक होतील कीं ॥२५॥ग्रंथासी मानावा आतां गुरु । ऐसा विश्वासी कोणता नरु । स्वथेवज्ञानाचा अहंकारु । त्यागूनि सेवाभक्ति करी ॥२६॥यास्तव लाहोनि सद्गुरुवर । मग वाक्यामृतबोधीं असावें तत्पर । सार क्रिया ते वळखोन समग्र । आवरोन धन्य होइजे ॥२७॥जगदोद्धार व्हावयाकारणें । श्रीरामआज्ञा मानोन प्रमाण । तपसाध्यफळ तें त्यांत निक्षेपुन । ग्रंथ निर्माण केलेति ॥२८॥त्यावरी येकाज्ञा केले आहेति । प्रगट करित जा हे पुढतपुढतीं । ते आज्ञा न मानितां लपोन ठेविम्ती । वाक्य कीं अर्थ न सांगताम ॥२९॥भावीक उल्हासा होती आडवे । क्रिया उद्धार कीं नेणतीं सोय । तनुबुद्धि उदाराचें पाहती कार्य । करुं वाचाळी षठ मैंद ॥३०॥आपणा हि नसे पुरता उमज । न पुसती ज्ञात्या थोरीवलाजें । ठकले न साधितां स्वहितकाज । पडले अव्हाटीं जाणत वि ॥३१॥॥श्लोक॥अष्टाक्षरी॥ विरोन जो मुरेल रे । भल्यांत तो सरेल रे । विरेचिना मुरिचिना । भल्यांत तो सरेचिना ॥१॥उगाउगी च भांडतो । उगाउगी च तंडतो । उगाउगी च ढाल घे । उगाउगी आढाल घे ॥२॥उगा चि व्यर्थ कर्करी । उगा चि व्यर्थ खर्खरी । उगा चि व्यर्थ गर्गरी । उगा चि व्यर्थ घर्घरी ॥३॥उगाचि व्यर्थ चर्चरी । उगा चि व्यर्थ तर्तरी । उगा चि व्यर्थ बर्बरी । उगा चि व्यर्थ भर्भरी ॥४॥उगा चि व्यर्थ कुर्कुरी । उगा चि व्यर्थ बुर्बुरी । उगा चि व्यर्थ सुर्सुरी । उगा चि व्यर्थ घुर्घुरी ॥५॥करंटलक्षणें पहा । कुलक्षणें बहु पहा । अखंड लौंदसा फिरे । कवी ह्मणे धिरे धिरे ॥६॥विशेष लक्षणें बरीं । सुलक्षणें मनीं धरीं । समस्त नीवतील ते । सुलक्षणें चि मान्य ते ॥७॥॥वोवी॥ परोपकारी जे कवेश्वर । ताराया करिती कवनविस्तार । ते लपवितां बुडवितां जगदेश्वर । भक्ताभिमानी तुष्टेना ॥३२॥येक ह्मणे आमुचा सांप्रदायग्रंथ । दृष्टीस घालों नये दुजयातें । ऐका मानसीं कां हा लोभ अत्यंत । व्हावा बहुमान आपणा ॥३३॥येक ह्मणे वोपूं तो प्राप्त नोहे । इच्छा येकाची मला चि पुसावें । येका आशा तें मिळावें द्रव्य । जिंकिजे भल्यांतें भेडसाविजे ॥३४॥॥अभंग॥ लक्षण असोन न बाणे सत्खूण । जळो मानज्ञान मूर्खत्वाचें ॥१॥आपुलें कवन ह्मणे पडो पुढें । सांदी घाली द्वाड भल्याचें तें ॥२॥दिसाया चांगले आपुलें कीर्तन । वाक्य तें लपोन ठेवीतसे ॥३॥अर्थासी पूसतां सिष्यभाग ह्मणे । बोले संतां नुन्य पोटासाठीं ॥४॥जळो ते महंती पूर्णता नसे चि । न ठावा गुरुची वाट सोय ॥५॥मुख्य आत्माराम भाळेल तें कीजे । संता होय रीझ तो चि धन्य ॥६॥ ॥वोवी॥ पहा दासाची स्थितगति कैसी । स्ववर्गापेक्षां प्रीत परासी । नानापरीनें भावीकजनासी । दाऊन सन्मार्ग तारिती ॥३५॥फेडिती सकृपें कष्ट क्लेश तळमळ । दाविती करुणेनें विश्रामस्थळ । सेवटीं खर्चिती आपुलें तपफळ । परहितीं प्रीत जडलीसे ॥३६॥तपपुण्य स्वामीचें खर्चतां पुष्कळ । जडमूढ आह्मा सौख्यसुकाळ । बहुतांस करायालागीं सांभाळ । तपव्रतश्रम केले बहुतापरीं ॥३७॥संकटांत स्मरतां निरसिती वेगीं । साह्य बहु होती उपास्यालागीं । भक्त जे वसती चहुंकडे जगीं । पावोन सर्वातें सांभाळिती ॥३८॥॥अभंग॥ गुरु व्हावें तरी आचरावें पुण्य । तपोतेज मान्य अग्निवत ॥१॥बहुतां सांभाळणें होईल सुकृत । नाहीं तरी होत तारांबळी ॥२॥साहु तो दरिद्री मूर्ख गुणहीन । गुमास्तेसी मान होय कैसा ॥३॥रंडीमुंडीदेवपूजनें छुल्लक । सायोज्यतासुख पावे कैसें ॥४॥टोणें करुनीयां वैकुंठा न जाये । सीधावीण होये पाक कैसा ॥५॥गुरु विषयीक उपासनाहीन । सिध्य तो पावन होय कैसा ॥६॥गुरु क्रियावंत सुकृताच्या रासी । वोपील सिष्यासी स्वात्मानंद ॥७॥॥वोवी॥परगण्यांत न करितां बंदोबस्त । रुजु न होववे सरकारांत । वतनदार ते करिती कस्त । अमिली न शोभे कष्टे बहु ॥३९॥स्त्रीपुत्र संसारा पोषण न करी । टिकाव यजमाना न होय घरीं । कूप न लावितां कृषि चौफेरी । केवि माल हाताम येईल ॥४०॥तेवि गुरुजवळी सुकृत नसतां । न होय भजका विश्रामता । पुण्यांश बहुपरीं देवा अर्पितां । उपासनामार्ग थाटे पां ॥४१॥तंव श्रोते होऊनि साशंकित । वक्तयास पुसती आपुलें सुकृत । कष्ट करुनि मिळविलें त्यांत । व्रय किंचित हि न करावें ॥४२॥करुनि व्रततपदान योगयाग । पुण्यांशाचे जालेति जे ढीग । पडतां हि आपणा कष्ट अनेग । खर्च त्यांतील न घालिजे ॥४३॥खर्चेल आपुलें पुण्य ह्मणोनि । बहुतांस श्रमविती निग्रहीयांनीं । प्रसंग घटल्या हि स्वल्पाल्प त्यांतुनी । स्मरोन उदक सोडिती ॥४४॥॥अभंग॥ वक्ता ह्मणे ऐका पुण्याची काहणी । येकदेशीचेनि साह्य नोहे ॥१॥ज्याचा क्षुद्र योग स्वल्प व्रत कांहीं । तयाचे हृदईं कार्पण्यता ॥२॥ब्रह्मार्पणविधीं ध्यानीं पूर्ण भक्त । तयाचें सुकृत गणवेना ॥३॥देव आत्माराम भारावला जेणें । कर्ते ते पावन होत जाती ॥४॥॥वोवी॥ वक्ता ह्मणे हो धन्य भक्त ज्ञानी । प्रपंचिकाच्या विपरीत काहणी । सुकृत उंच तें येकेकाहुनी । कोणतेम हें चि कळेना ॥४५॥प्रपंचरित्याला भुलती लोक । कोण्या हिशोबीं मूर्खजन कामिक । भले लोक हि अमुका दंडक । ह्मणोन पेंचांत पडूं नये ॥४६॥॥अभंग॥ सिद्ध मुक्त ज्ञानी रमती चिद्वनीं । पाप पुण्य दोनी त्यागूनियां ॥१॥स्वरुपसिद्धिलागीं आचरोन पुण्य । करिती रामार्पण तेणें धाले ॥२॥कार्यसिद्धि जाल्यां न सोडिती भक्ति । फळें रामाप्रती अर्पितां हि ॥३॥सांचूनि तयाचे भजका दे विश्राम । सखा आत्माराम अखंडित ॥४॥॥वोवी॥ धन्य मुक्ताचें अक्षयी सुकृत । खर्चितां न सरे कल्पपरियंत । देवसाहुचे हवालेनें पुरत । हें धनमाल विदित अनुभविया ॥४७॥सिष्यभक्तवर्गा खर्च न करितां । सांचोन कृपणत्वें कां ठेविजे वृथा । आर्तवंतयाचका तें दान वोपितां । कां न होय अधिकस्य अधिकं फलं ॥४८॥हें आसो जयाला महंती करणें । समुदाववृंदीं गुरुत्व वाहणें । नेमनिष्ठेचे पुण्यनिधानें । सांभाळ करावें सकळांसी ॥४९॥पहा दासाची क्रिया ते कैसी । धगधगीत महातपी पुण्यरासी । भक्तिभावबळें अयोध्यावासी । साह्य करित सन्निधीं वसे सदां ॥५०॥भोंवते मिळाले सत्पुरुषवृंद । येकासीं येक करिती अनुवाद । धन्य समर्थ हा सिद्ध प्रसिद्ध । करणी जयाची अत्यद्भुत ॥५१॥संकटीं जयाचें घेतां नांव । धाऊनि परिहरितो पवनोद्भव । धन्य दासाचा सिष्यसमुदाव । साहकारी देव सकळिका ॥५२॥जे जे स्थळीं ज्या देव-अधिष्ठान । सहज ते स्थाना जातां सज्जन । परामर्ष करिती होऊनि प्रसन्न । दृढ येक भक्ति जयाची ॥५३॥जरांडीं मारुतीसन्निधानीं । राहिले ते स्थळीं नसताम पाणी । मग साह्य होऊनि बलभीमांनीं । जीवन निर्मिलें कुंडांत ॥५४॥फिरतां स्वामींनीं वाईप्रांतीं । छंद चि घेतला तेथें मारुती । निर्माण करुनि स्वहस्तें मूर्ति । स्थापूनि गेले पुढारीं ॥५५॥मोक्षपुरी मारुतीपुढेम पाषाणी । जडोन बैसल्या दृढतर आसनीं । खोलावला तेणें ग्राव तो घष्टुनी । गिरिजेनें वोपिला फराळ ॥५६॥उत्तरेसी जातां यात्रानिमित्य । नग आडे जाले झाडी बहुत । तेणें दृष्टीस न पडे आदित्य । दिन निशी कळेना अभ्रवाटें ॥५७॥दिवाकराचें मांडिले स्तवन । स्पर्श न करितां फलमूळ जीवन । गजबजोन तेणें सहस्त्रकीर्ण । जाला प्रसन्न रामांकिता ॥५८॥आदित्यहृदईं रुप जें वर्णिलें । जें सूर्योपासका वर्णू आवडलें । तैसा चि उतरला दिव्यरथ मंडळ । दासहृत्कमळीं विहरावया ॥५९॥॥श्लोक॥ ध्येय: सदा सवितृमंडलमध्यवर्ती । नारायण: सरसिजासनसन्निविष्ट: । केयूरवान्मकरकुंडलवान्किरीटी । हारी हिरण्मयवपुर्धुतशंखचक्र: ॥१॥सशंखचक्रं रविमंडले स्थितं । कुशेशयाक्रांतमनंतमच्युतं । भजामि बुद्धया तपनीयमूर्ति । सुरोत्तमं चित्रविभूषर्णोज्वलम् ॥२॥॥वोवी॥ कर्माध्यक्ष जो कर्ता सुकाळ । प्रभाकराचे प्रकाशउमाळ । न लक्षवे पाहती नेत्रबुबळ । लपो भकाशा पैलाड ॥६०॥तंव सुदिव्य चक्षु वोपूनि कृपेनें । दिल्हें सवितांणीम दर्शनालिंगन । याज्ञवल्किया जें बोलिलें ज्ञान । बोलोन त्यापरीं केला सुखी ॥६१॥वोणव्यांत सांपडतां पुढें सकुमार । इंद्रा आज्ञापिलें श्रीरामचंद्रे । पाडोन तात्काळीं मेघ सहस्त्रनेत्र । भेटोन गेला गुप्तरुप ॥६२॥श्रीरामसेवका घडों उपकार । खर्चास वोपूं पाहे कुबेर । न बैसे कहीं लागसुमार । विरक्ता इच्छा नसे चि ॥६३॥चाफळासी आल्यावरी समर्थ । चित्त रुणसंकल्पा होऊं मुक्त । धन आणोनि वोपितां मुक्त विरक्त । भिरकाविलें याचकलोकांकडे ॥६४॥न मानूनि तेणें उत्तीर्णता । जे लागती नि:सीम स्वामिराजपंथा । त्या वोपित चि जातो पुरे हो आतां । न ह्मणे चि हे सत्ता जयाची ॥६५॥न करवे ज्याची लीळा वर्णन । मुख साहकारी श्रीरघुनंदन । ऐसियापरीं बोलतां महाजन । सभेस्थी हरुष पावले ॥६६॥श्रोतेनो येथें मानाल संशय । स्वमुखें न सांगते श्रीगुरुराय । गुप्तचर्या हे विदित केवि होय । सांगा या जनीं विस्तारुनी ॥६७॥ऐका हो मिळाले असती सर्वज्ञ । त्रिकाळज्ञानीं योगसंपन्न । मुख्य अंतरात्मा प्राणेशनंदन । प्रगटोन हृदईं बोलवितो ॥६८॥बहु काय वदों आहे प्रचीती । मी तों सर्वस्वी मंदमती । वेडा लाऊन जिव्हेस स्फूर्ति । वदविती आपणा आवडलें ॥६९॥देव जयाचा जालासे ऋणी । आळविती त्या बहुता वदनीं । उपकार तेणें भरतां जनीं । होय अभिवृद्धि वर्णन ॥७०॥ह्मणाल चरित्रीं कां पडतो भेद । वर्णन न करिती कां येकविध । तरि श्रोते हो चर्या असे अगाध । गवसलें तितुकें वानिती ॥७१॥जातां निजधामा रघुनंदन । जिकडे तिकडे दिसलें विमान । येकदां च बहु ठाईम प्रगटला हनुमान । स्थानभेदपरत्वें वानिती । न पुरती वाचा शेषाच्या ॥७३॥देवभक्तांच्या अगणित लीळा । समर्थ नसे हो वर्णावयाला । स्वल्प चि पुरे कीं तरावयाला । सुधानिधि आच्मन अमर करी ॥७४॥जंव रोहिदासकबीरा जालें दर्शन । दोघें हि देवा आवडते पूर्ण । सगुणनिर्गुणाचें लागतां भांडण । जाला हो देव ज्यात्यापरीं ॥७५॥रामकृष्णभक्तांनीं करितां वाद । द्वयरुप धरिलें सच्चिदानंदें । समजाऊन उभयतां केला आनंद । येकविध अनंता कायसा ॥७६॥जन्मापासूनि रामदास संत । होऊनि पुढारीं समाधिस्त । विचित्र लीळा दाविती जगांत । अनेकपरीनें येकेक ॥७७॥पहा बालत्वीं दाससमर्थ । जन्मभूमीसी असताम जांबांत । लीळा दाविली तें न होय विदित । मायामोहित जनासी ॥७८॥संवगडयासवें खेळतां गोटी । फुटतां मुलाची तो होय कष्टी । संतोष भराया तयाचे पोटीं । पूर्ववत जाली स्पर्श करितां ॥७९॥येक्या मुलाची कुंची हरपोन । घरास गेला तो करित रुदन । मायबापांनीं करितां ताडण । निमित्य घातलें दासावरी ॥८०॥रोगेजोन ते पुसाया येतां । तग आहे कीं ह्मणतां दाता । हरीनें ठेविली निर्मोन तत्वता । घेऊनि चालिले घराकडे ॥८१॥कुंची सांपडली दुजी वाटेंत । आश्चिर्य केलें तेणें मनांत । हें प्रगट कवणा हि न करितां मात । गेले उगा चि नेल्या गृहीं ॥८२॥सासरवासिणीची फुटतां घागरी । आक्रोश भयानें करितां नारी । करुणाकटाक्षें पाहतां भवारि । जाला धड घडा गेली सुखें ॥८३॥येक्या बाईंचीं मोतीं गळोन । बुडतां जीवनीं ते करी रुदन । कृपावंत होतां बाळसंतसज्जन । तरंगत आलीं तोषली ते ॥८४॥येकदां शाळेंत असतां भवहर । पद लागोन पाठीं घातलीं अक्षरें । पुसतां भयानें रडतां पोर । अक्षरें उमटलीं ज्याचे कृपें ॥८५॥बाळपणीं ऐशी लीळा जाली । जाणवले नाहींत कोणीं ते वेळीं । जंव राजयोगकीर्तिप्रभा फांकली । तंव आठवोन वानिती येकेक ॥८६॥ऐसे महाराज करुणासिंधु । अवतारपुरुष हो धन्य दीनबंधु । प्रस्तुत सज्जनगडीं आनंदु । मेळवोन सद्वृंदु माजविला ॥८७॥कवणा हि नसे हो मागील चिंता । न बाधी कवणा हि मोहादि व्यथा । प्रेमभरें ऐकती परमार्थकथा । इच्छाभोजन करुनि ॥८८॥सर्वत्रामनीं हा चि उल्हास । सदां घडावा दाससहवास । अध्यासबळानें पुण्यपुरुष । होऊनि तद्रूपें दिसती ॥८९॥ज्या ज्या अध्यासीं जयार्चे मन । फळत्कार त्याला होतसे तेणें । यास्तव श्रीगुरुकृपावरदान । लाहोन स्वरुपीं रमत जावें ॥९०॥अध्यासबळानें होतसे कार्य । परि नाशिवंत फळाचें थोरीव नव्हे । अध्यासबळमहिमा कैसा आहे । ह्मणाल तरि ऐका दृष्टांत ॥९१॥किडयास भृंगीचा लागतां ध्यास । होय तद्रूपता प्राप्त तयास । पार्वतीरेतुचा धूर फुलास । लागतां तांबडें शुभ्र होय ॥९२॥॥अभंग॥ अध्यासबळानें काययेक नोहे । साधतसे कार्य परमार्थ ॥१॥अंग श्वेत पुच्छ पीत शामकर्ण । वळूचें संतान अश्व कोठें ॥२॥माघें राजेलोकेम केले अश्वमेध । सलक्षणी शुद्ध वारु होते ॥३॥जातेली अश्विनी बांहुनियां नेत्र । रंगूनि शृंगार केला घोडा ॥४॥किंवा काष्टवाजी रंगोन विध्युक्त । दाविती घोडीतें रतीअंतीं ॥५॥तें ध्यान ठसतां जन्मे शामकर्ण । हजारों प्रयत्नांमाजीं येक ॥६॥मां तों निजवस्तु दावितां नराला । न होये काशाला सांगा ते चि ॥७॥होय अध्यासानें आत्माराम प्राप्त । धन्य ज्ञानी रत योगीसंग ॥८॥॥वोवी॥ धन्य दासाचा ध्यानसंसर्ग । गवंसला भाविका सहज सन्मार्ग । स्वर्गवास वानिताम ह्मणती धिग । सारिती मागें मुक्तीसी ॥९३॥संतसाधु ते हरुषती थोर । करिती ऐकती कीर्तनगजर । येकदां पैलाड असती भवहर । समानस्कंदगडयासह ॥९४॥जेवि ऋषिमेळीं वसिष्ठमुनी । सद्भक्तसमुदाईं नारद ज्ञानी । धृवराज शोभला नभीं उडगणीं । नृपराजेगणीं बळिराव ॥९५॥जुत्पतींत नेटका दिसे हणुमंत । गोपाळवृंदीं श्रीकृष्णनाथ । सिद्धसमुदाईं गिरिजाकांत । शोभती सज्जनीं तेवि दास ॥९६॥पैलाड मुमुक्षु साधक सिद्ध । भोळेभाविकी हरिदासवृंद । सभेंत माजला कीर्तनानंद । सुवाद्यगजर होतसे ॥९७॥उदक मिश्र होये महान दींत । अद्वैतभजनीं आटती मत्तें । तेवि सर्वांचें मुरोन चित्त । चैतन्य येक जालें दिसे ॥९८॥प्रत्यक्ष जेथें रंगदैवत । वाटे उभेले नटनाटय करित । डोलों लागले राम हणुमंत । तल्लीन श्रोतेजन जाले ॥९९॥पसरला देखोनि यापरी रंग । सन्मित्राकडे देखोन भवभंग । संतोषभरानें बोलिले मग । ऐका त्यांतील स्वल्प कांहीं ॥१००॥निपट नाहींसे अवगुण । घमंड जालें तें कीर्तनलक्षण । जन अनायासें जाले पावन । तुष्टोन सज्जना वानिलें ॥१॥ ॥पद॥ दंडी॥ होते घमंडी हरिकथेची । मुक्ति सांपडते फुकाची रे रे रे रे ॥ध्रु०॥ यंत्र वाजती क्षणक्षणा । ताळ वाजती खणखणा । मृदांग वाजती दणदणा रे रे रे रे । शब्द बोलताती चणचणा रे ॥१॥गीत संगीत ताळ निवळ । बोल बोलती सार केवळ । गुणी गायक जाणतां मेळें रे । धुमघुमिती नादकल्लोळ रे ॥२॥घोळ घागरिया वाजती । चंग चिपोळिया गाजती । बहुजिनस रंग माजती रे० । देव भक्त सकळ साजती रे ॥३॥॥श्लोक॥ अष्टाक्षरी॥ बहु वीणे विराजती । मृदांग चंग वाजती । उल्लाळ ताळ गाजती । धनीकल्लोळ माजती ॥१॥चट चुट चुट चट चटा चुटका बरा । फट फुट फुट फट फटफुट खापरा । लट लुट लट लुट लट लुट होतसे । तट तुट तट तुट तट तुट जातसे ॥१॥॥पद॥ (राग अव्हेरी, धाटी-नाम गावें रे नाम०॥) रंग वोळला रे रंग वोळला रे । ताळबद्ध बहु कल्लोळ जाला रे । नाहीं विताळाचा लेश । ताळबद्ध सुंदर वेश । कथेमध्ये जगदीश । भक्तांमध्यें तिष्ठतु ॥१॥कीर्तिप्रतापाचें गाणें । भक्तांलागी श्लाघ्यवाणें । नाना संगतीं पुराणें । विळास होतसे ॥२॥जेथें कथानिरुपण । तें चि उत्तम लक्षण । रामदास सांगे खूण । गावे गुण विचारें ॥३॥॥वोवी॥ कथानंदु तो गगनीं न माये । तरी हि न धाती आर्त दीर्त होये । जाणोन सकळांचा चांग मनोदय । रसिकराय संतुष्टले ॥२॥परमार्थवैभवा आणूं शोभा । मानवोन भाळऊं भूमिजावल्लभा । येकायेकीं येकले येऊनि उभा । कीर्तनरंगणी ठाकले ॥३॥सादरले सर्वी मानिलें चोज । सवें चि साज तो केला बहु सज्ज । धृपदी जयाचे कविबोधराजे । श्रोते साम्राज्यपदभोक्ते ॥४॥संतोषें मानिलें देवभक्तलोक । कीर्तनाआधीचें हें मान्य सौख्य । जेवि उपदेशाआधीं पूजा सम्यक । किं संसाराआधीं निजस्मरण ॥५॥श्रीरामसमर्था आठवोन ध्यानीं । धरोन सद्गुरुला अं:तकरणीं । टाळस्वरबद्धीं पद येक वदोनि । करविलें भजन वाचत ॥६॥भक्तशिरोमणी दासविरक्त । वैष्णव सज्ञानी प्रतापवंत । वैराग्यराजा सिद्ध संत मुक्त । निवविती सर्वा मृदुवाक्यें ॥७॥ऐकावया जयाचें कीर्तन । श्रीरामराजा देतसे कान । कपिवर्य तो हि कर जोडून । केलेसें मन येकाग्र ॥८॥दृष्टीस जनाच्या न पडतां सुरगण । उभेले असती नग आश्रयोन । सीताकांतस्मरण जय जय राम ह्मणोन । आरोळ्या सज्जन देववितां ॥९॥गजर होसरतां सभास्थानीं । स्मरण ऐकों येत चहुंकडोनि । नगाखाले हि उठतसे ध्वनि । घोष नभोदरीं होतसे ॥११०॥नामदेव आणि ज्ञानदेवास्तव । कथेंत स्वर्गीचे उतरले देव । तैसें चि जालें चोज अपूर्व । टाळया हि वाजती प्रेमादरें ॥११॥नवलाव मानिलें साधुसंते । प्रेमोदधि हलविला समर्थें । वग्तृत्व केलें त्यांतील किंचित । ऐकोन बहुत माना हो ॥१२॥॥अभंग॥ स्वरुपाचा डोहो भरलासे निघोट । ऐलपैल तट आडळेना ॥१॥अर्द्र ना खळाळ उथळ ना खोल । हालेना निश्चळ भरला असे ॥२॥तयामाजी चाले मजमाजी भरलें । अंगासी लागलें आडळेना ॥३॥रामदास ह्मणे मिनलें स्वरुपडोहीं । स्वरुप जालें पाहीं मन कैचें ॥४॥मछें जावें कोणीकडे । पाणी जिकडे तिकडे ॥१॥आंत पाणी बाह्य पाणी । नाहीं पाणियाची वाणी ॥२॥पुढें पाणी माघें पाणी । वाम सव्य आवघें पाणी ॥३॥पाणियाचा मासा जाला । देहभाव हरपला ॥४॥रामदास पाणी जाला । नामरुपा हरपला ॥५॥॥वोवी॥ या अनुभवार्थी निवाले थोर । सेवटीं कथिलें सगुणचरित्र । सद्महिमा तो वर्णूनि विचित्र । स्तविलेम श्रीरामा बहुतापरीं ॥१३॥मग आरती गाइले सप्रेमभरें । नामस्मरणटाळीचा जाला गजर । नमनाळिंगण जालें सादर । खिरापती वाटिल्या ॥१४॥रमले स्वस्थानीं देव सज्जन । परि वाटे अद्यापि होत कीर्तन । गुप्त चि प्रसादु घेऊन सुरगण । राहिले आज्ञा इच्छित ॥१५॥लक्षभोजनाचा पाहोन आनंद । संतसाधूंचा ऐकोन संवाद । भक्तराजदासाचा पावान प्रसाद । यात्रा फुटलिया जातील ॥१६॥पुढीलाध्याईं कथनभाव । करितील कीर्तन वीर शैव वैष्णव । संतोष मानिती दासगुरुराव । ऐकाल दैव धन्य ह्मणत ॥१७॥येकदाम च न कथवे पुढील संपूर्ण । सूचना सुचविली च्या वळखोन । वोपितां राजानीं सकृपें वसन । तो राज्यधर जाला जाणिजे ॥१८॥राजाधिराजा दाससमर्थ । नसतां तयाचें वळखणें पुरतें । न जातां तयाचा कारभारांत । वदतों वृत्तांत क्षमा करा ॥१९॥॥अभंग॥ मी तों महाराजाचा देशी फितवेगार । कृपेचा सागर सांभाळिती ॥१॥साधकमर्दासी गुप्तधनठाव । दावीतसे भेव न धरितां ॥२॥अनुग्रहा छिद्र घालितों बाहेर । क्रियाव्यवहार न झाकितां ॥३॥धन्य मान्य संगीं गुप्त जें बोलती । तें हें लोक्राप्रति वानीतसे ॥४॥मी तों मूळभेद्या कोपतील जरी । जीव घेती तरी बरें जालें ॥५॥पिसाट होऊन सोडीना मी पद । लावीन समंध बहुतांसी ॥६॥मुख्य त्यांच्या घरीं आहे आत्माराम । सांपडूं तो प्रेम वर्म बोलूं ॥७॥॥वोवी॥ दासविश्रामधाम हें गड । नवभजनद्वारें हीं असती उघड । स्वात्मसुखाचें असे सुरवाड । सद्भक्तमेळा मिळाला ॥१२०॥इतिश्री श्रीरामकृपा । तारक परमार्थ सोपा । सज्जनप्रताप । मनास बोध । कृष्णलीळा । कविनिंदा । ग्रंथसंग्रह । दासप्रताप । बाळलीळा । कीर्तनरंग । कथा केले । अश्वास अठयाणव ॥९८॥ N/A References : N/A Last Updated : March 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP