मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|दासविश्रामधाम| ॥सोपान॥ १११ दासविश्रामधाम श्रीसद्गुरुस्तवन ॥गत॥ ९७ ॥अश्वास॥ ९८ ॥समास॥ ९९ ॥मान॥ १०० ॥प्रकरण॥ १०१ ॥प्रसंग॥ १०२ ॥सर्ग॥ १०३ ॥अध्याय॥ १०४ ॥खंड॥ १०५ ॥पटळ॥ १०६ ॥विसावा॥ १०७ ॥स्तबक॥ १०८ ॥कांड॥ १०९ ॥वर्ग॥ ११० ॥सोपान॥ १११ ॥अवधान॥ ११२ ॥वर्ग॥ ११३ ॥पटळ॥ ११४ ॥खंड॥ ११५ ॥अध्याय॥ ११६ ॥सर्ग॥ ११७ ॥प्रसंग॥ ११८ ॥प्रकरण॥ ११९ ॥मान॥ १२० ॥समास॥ १२१ ॥लळीत॥ आत्मकृत ॥सोपान॥ १११ एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले. Tags : dasvishramdhammarathioviओवीदासविश्रामधाममराठी ॥सोपान॥ १११ Translation - भाषांतर श्रीरामसमर्थ ॥पद॥ (धाटी ॥ सद्गुरु सेवी रे जना ॥) कथाकीर्तन उपाये । सकळ जना । होय तरणोपाये ॥धृ०॥सांडावी सकळ लाज देवालागीं । व्हावें तेणें निर्लज्ज ॥१॥लज्जा राखतां देव । करिल काय जीव बापुडें मानव ॥२॥दास ह्मणे लोकासी । आपुला भार घाला वेगीं देवासी ॥३॥॥वोवी॥ भवनिस्तराया बहुतापरीं । साधनें सांगती जगाभीतरीं । परंतु हित साध्य होय झडकरी । कथाकीर्तन कलयुगीं ॥१॥भाळो आपणा जगन्नायक । वेगीं जन्माचें होऊं सार्थक । विद्यासंपादना कीजे अनेक । भाव हाव तवक धरुनिया ॥२॥तरि जगदात्मा कीर्तनीं नाचे । मोक्षसाज करिं बांधुनि खाचे । धरुं धावती स्वर्गस्छीं पाय त्याचे । मग कटावभाषण कासया ॥३॥॥अभंग॥ पावना पावन कल्याणा कल्याण । ज्ञानाचें संधान निजकथा ॥१॥बत्धासी चेववी मुमुक्षा जीववी । साधका साजवी सत्य कथा ॥२॥सित्धाचें जीवन ऐक्यता अंजन । भवाचें भंजन प्रेमकथा ॥३॥शुद्रवैश्यक्षेत्रीं होवो का ब्राह्मण । कीर्तनश्रवणें धन्य होती ॥४॥जो कां करी कथा सर्वदां निष्काम । मानी आत्माराम सखा त्यासी ॥५॥॥वोवी॥ सांभाळा हो स्छितिगती आपुली । कथाकीर्तनीं लाज ते वोंगळी । घालोन रगडी पायातळीं । केल्या न केल्या करि सरी ॥४॥॥श्लोक॥ (आत्मा०) ॥ लज्जा पापिणी भक्तवैरिणि करी विस्कट भक्तिभावा । दापी अंतरिं गुप्तरुप बसुनी भाउं नेदी सुदेवा । संसारीं विषयांत गर्व धगडा साजवी मोकळेनें । रंका रंक करुन नर्कगति दे मर्जिजे भावनेनें ॥१॥॥वोवी॥ लज्जा पापिणी येतां आडवेसी । धैर्यलत्तेनें पळविजे तिसी । कीजे आपुलासा देवरायासी । संग लाजफाज झुगारुनी ॥५॥जनलोक सोयरे हा ह्मणोन वेडा । निंदोन घालितां रागद्वेषधोंडा । बिगाडु भावना करितां रगडा । सत्कथाकीर्तना न विसंबीजे ॥६॥कैवारी होतां येक देवराय । बापुडे मानवी करणार काय । अमृतपानिया करुं अपाय । कामदुधादुग्ध दिल्ह्यापरी ॥७॥आपुली असतां येक दृढ भक्ती । जे निंदिती ते चि वंदों लागती । येऊनि अनकूळा वानिती कीर्ती । धन्य उपाय कीर्तन ॥८॥ सर्व भार आपुला देवावरी । घालोन विश्वासु धरावा अंतरीं । दाता येक आह्मा देव कैवारी । सांगती हो संत ऐसे चि ॥९॥एवं कथेचें धन्य ऐश्वर्य । गातां साहित्य रसमाधुर्य । वर्मज्ञ जाणते होती तन्मय । जगदानंदकंदा सौख्य वाटे ॥१०॥॥श्लोक॥ खणखणित खणाणी ताळकल्लोळ जेव्हां । दणदणित दणाणी चंग मृदांग तेव्हां । झणझणित झणाणी सप्तरागें प्रसंगें । चणचणित चणाणी वीण जे रागरंगें ॥१॥॥वोवी॥ थोरीव कथेचें सत्य चि आहे । परंतु मजुरी कामाची नव्हे । अश्रत्धावंता न गवसे सोय । दंभाचारलौकिकलौभ्य खोटा ॥११॥करुनि कथेच आडपडदा । सावकाश करुं लागे निंदा । उफराटे त्याला च होय बाधा । जेवि मंत्रित्या अंतीं छळिती भूतें ॥१२॥॥पद॥ (कामोद चाल-लावोनिया लोचन ॥) कथेचें करुनि मीस निंदा करी सावकाश । तया जगदीश अंतरला रे ॥धृ०॥ धावण नागवी त्यासी विष घेतां वैद्यापासीं । जाऊनि तीर्थासी दोष केले रे ॥१॥अमृतसागरीं मेला पोहतां चि बुडाला । आनंदी असोनि जाला दु:खी रे ॥२॥पशु गेले वर्हाडे तयापुढें काबाडें । सज्जना निंदिते वेडे जाण रे बापा ॥३॥रामीरामदास ह्मणे हरिकथानिरुपणें । स्वहित करणे सर्वकाळ रे ॥४॥॥वोवी॥ कथाकीर्तनें हरती संकट । जिये प्रभावें निरसती कष्ट । वोसरे लौकरी सद्वाट श्रेष्ठ । स्छितिसंपन्नपेठ दृष्टी पडे ॥१३॥परंतु न शोभे भावनाखेट । कृत्रिम धरणें तें खोटें चि खोटें । कांहींबाय पुण्य ह्मणणें हळुवट । क्रिया थेट ते नसल्या हो ॥१४॥सांगोन शहाण्यांनीं लोका फळश्रुती । तोंड पसरितो मदांधाप्रती । उफराटे त्याला होय फजिती । येथ हि तेथ यमापुढें ॥१५॥॥पद॥ कथा करितो गोड लोक पडाया भीड । दीनें वासितो तोंड । गर्व्यापासीं ॥१॥बहुलाघव आसे सांगे थोर स्ववंश । ते हे वदे आमुचे सिष्य । द्रव्य मेळऊं ॥२॥जळों त्याचें धिग जिणें बोले लाजिरवाणें । काबाडी होय पूर्ण कुटुंबाचा ॥३॥कथेचें करुनि मीस । निंदा करी सावकाश । देवसंतांचा विश्वास । नसे मानसीं ॥४॥अनसरता कामधाम दुर्हावला आत्माराम । जळो वरपांग प्रेम । भक्ता न मने ॥५॥॥वोवी॥ जळो ऐशाची वृथा चावटी । बोलणें येक तो भाव येक पोटीं । सुधरेना तरी कोणी हि गोष्टी । ताठा अभिमान सांडीना ॥१६॥॥अभिमानपंचक अभंग ॥ संसाराच दु:ख आलें । गाणें अवघें चि बुडालें ॥१॥आतां आठवेना कांहीं । पडिलों चिंतेचे प्रवाहीं ॥२॥गाणे नाचणें सुखाचें । जिणें जालें दु:खाचें ॥३॥ह्मणे रामीरामदास । कोण करीतो सायास ॥४॥१॥॥१॥ नानाप्रकारीचें गाणें । मी च बाळपणीं जाणें ॥धृ०॥ काय जाहलें कळेना । येक तें हि आठवेना ॥१॥मज पाठांतर होतें । इतुकें कोणासी नव्हे ते ॥२॥रामदास ह्मणे आतां । जीव जाला दुश्चिता ॥३॥२॥॥आतां गाती नाना परी । परी ते नये माझे सरी ॥१॥माझें गाणें कोणीकडे । काय गातील बापुडे ॥धृ०॥आतां पडिला विसरु । आठवेना काय करुं ॥२॥दास ह्मणे भक्ति कैंची । ऐसी जाती अभिमानाची ॥३॥३॥॥गाणें कांही च येईना । तरि अभिमान जाईना ॥धृ०॥ आलें निकट मरण । तरी सोडीना मी पणें ॥१॥देह जाले पंजर । ह्मणे होतों मी सुंदर ॥२॥रामदास ह्मणे रितें । वेडें अभिमान धरितें ॥३॥४॥॥वोवी॥ सांगे जनाला वृथा मी गाजी । काळ दवडितो अहंतामाजीं । स्छिरोन निवेना सुशांतसेजीं । जे बरी नव्हे वाजी ते चि धरी ॥१७॥ऐसें न करितां आळस क्षणमात्र । कथाकीर्तनीं व्हावें सादर । देवावरी आपुला सर्व ही भार । घालोन स्वस्छ होइजे ॥१८॥पातेजला जो देवरायासी । वाया न गेला आणा मनासी । भर्वसा यापरी बहुत लोकासी । रामदासांनीं सांगितलें ॥१९॥देवपण आणि भक्तपण दोनी । शोभिवंत होऊं येक्या स्छानीं । रामदास ऐसें नाम ठेउनी । संपादविती द्वयकार्य हि ॥२०॥सत्संगाचें फळ तें रोकडें । नाम किल्याचें सज्जनगड । राहणें स्वामींचें जेथें अखंड । चरित्र बहु गोड जयाचें ॥२१॥नसे जयाला लौभ्यता आस । ज्याचेनि कटाक्षें तुटे भवपाश । करुनि गडाच्या भोंवितीं वास । पातले अक्षयींझ गृहाप्रती ॥२२॥ठळक सिष्यजना जाला निरोप । राहिले महंतीमाजीं सुखरुप । परंतु वेणुबाईचा संकल्प । गुरुपदापरौता न होये ॥२३॥लाडकीस नुपजे थोरिव आस । महंती कीजे हा नसे चि सोस । अखंडित जिला थोर हव्यास । सेवा करावी गुरुसन्निधीं ॥२४॥बहुपरी कथितां निरोपविषईं । न रुते चि वाक्य तें अबळाहृदईं । वदे समाधी श्रीगुरुपाई । माझी होणें हा निश्चय ॥२५॥वळखोन तियेची भावना दृढ । योजिलें स्वामींनीं धाडिजे पुढें । तों अवचट बाईला उठिली आवड । करामतवार्ता ऐकुनियां ॥२६॥सुकृतबळानें सत्पुरुषांनीं । विघरोन जालें पाण्यांत पाणी । तेजीं समरसलें होऊन अग्नी । वार्यांत वारें होठेले ॥२७॥अदृश्य होठेलें देखतां दृष्टी । कोणी कमाई करोन मोठी । जाऊनि बैसले नीट वैकुंठीं । किंवा कैलासीं तनुसगट ॥२८॥घटसहित वैकुंठा जाऊं कारण । श्रीरामचंद्रा मी हि प्रार्थीन । तदनंतरीं समर्थाआज्ञा प्रमाण । मिळेन शामळ हरिरुपीं ॥२९॥ कारण धैर्यासी भक्तिभावानें । गुरुदत्त पट्टाभिरामपूजन । करुनि विनवितां नानापरीनें । संभाषण करितसे ॥३०॥साजिरी जियेची अनन्य भक्ति । मनुजापरी बोले धातुमूर्ति । धगधगित पुण्याला उपमिजे ज्योति । तरि काजळचिन्ह दिव्यामस्तकीं ॥३१॥अग्निज्योतीवरी धूम्रअंकूर । विद्युल्लताआंगीं ताप तीव्र । न साजे भूताचा जेथ प्रकार । निर्विकारीं गुरुकृपें या हेतु ॥३२॥ज्ञानध्यानातें जिरवोन प्रेमीं । वास्तव्य केलीसे वैराग्यधामीं । तोंड न दावी ज्ञातृत्वउर्मी । जिव्हाळा श्रीरामीं जियेचा ॥३३॥नमोन येकदां पुसे देवासी । अघटित हेतु उपजल्या मानसीं । पुरविसील कीं आर्त निश्चयेंसीं । येरु वदतसे तथास्तु ॥३४॥या भरवसेनें कायासहित । जाऊं वैकुंठा उपजला हेत । प्रसन्नसमयीं असतां समर्थ । नमोन अपेक्षा निवेदी ॥३५॥जी देवाधिदेवा दीनवत्छला । तव करुणाकटाक्षें दुर्बळाला । येकदां चि वोळे त्रैलोक्य सोहळा । लागे पायाला काळ तो ॥३६॥हेतु उपजल्या अघटमान । अप्रयासी तो होईल पूर्ण । तरि असे वैकुंठीं काय वर्तमान । आणीन तनुसहा जाउनी ॥३७॥सफळित व्हावया येवढी वासना । आज्ञा द्यावी जी करुनाघना । पत्तही पडलीसे मागें भावना । धरुन बहुतेकीं हें केलें ॥३८॥हे सदृढभक्तीची ऐकोन मात । अंतरीं च अंतरीं तोषले समर्थ । भाविलें कासया हे करामत । तदाकारसौख्यातें टाकुनी ॥३९॥सगुणसौख्य हें नाशिवंत । ह्मणोन दाविजे जरि शुत्धप्रांत । तरि अंतसमयींचा विटोन भावार्थ । दचकोन होईल मध्येस्छी ॥४०॥मोक्षपदवीचा घेऊनि लाभ । तनु गुप्त कराया नसे विळंब । मग परमार्थ दावाया करुनि सुलभ । कां होईना बाई ह्मणतिलें ॥४१॥मग पाहोन काळाला केले आज्ञा । न येई येथ बाहिल्याविन्हा । तो काळ गुप्त जाला करुनि प्रार्थना । मग बोलते जाले बाईप्रती ॥४२॥जाण केव्हां ही आहे निश्चय । त्याची तातडी आतां च काय । पक्वान्न कराया जे विदित आहे । परवडी येकेक दावी करी ॥४३॥तव हातीं च गोडगोड भोजन । नित्य येकपरी करवी येथून । सस्वरुपीं होतां लीनतल्लीन । हें सौख्य मागुती मग कैंचें ॥४४॥सत्य आहे हें स्वामीजे बोलणें । जे कराव तें असतां प्राण । तनुत्यागामागें सौख्य पावेन । कल्पणें मूर्खता जाणिजे ॥४५॥॥अभंग॥ सत्य माना गोष्टी तनुत्यागापाठीं । कल्पील जे पोटीं न घडे चि ॥१॥कोण योन्यामाजी कोण कोठें जाती । जाणीजे प्रचिती काशावरुनी ॥२॥येक्याठाई रमूं भोगूं पुण्यफळ । योजिती सप्रेम होय कैसे ॥३॥वाक्य हे कर्मणी गहना गति: ऐसें । होणें आहे कैसें न कळे चि ॥४॥मुक्त होतां दोघे पुन्हा न भेटती । बत्धमुक्तास्छिती क:समंध: ॥५॥दोघे अनाचारी चौर्यासींत पडतां । भेट उभयतां न होये चि ॥६॥काय कीं कर्मानें पडल्या ही गांठ । न कळे चि स्पष्ट मागें केलें ॥७॥कळतां मागील प्राप्तीसी येईना । मूढाची कल्पना भ्रांतिरुप ॥८॥चारिलक्ष योनी मानव ह्मणती । येकयेकाप्रती भेटी नोहे ॥९॥नरदेहीं स्वामित्व युत्तयाघात आहे । येका चि न साहे क्रिया येका ॥१०॥येक्या योनिमाजी नानामत्तभेद । अन्यासी समंध सोसे केवी ॥११॥यास्तव देवानीं बहुदेसीं टापात । स्छळ मानवांत भिन्न केले ॥१२॥साहतील तितुकी योन्या येक्याठाईं । बद्धानें वर्तवी ते ही टूकी ॥१३॥मागील पुढील भ्रमासि टाकुनी । या जन्मीं ये क्षणीं व्हावें सुखी ॥१४॥यास्तव होउनि सद्गुरुसेवक । स्वात्मानंदीं ऐक्य व्हावे स्वथा ॥१५॥॥वोवी॥ हें असो ऐकतां गुरुराजवाक्य । लोटलें सुनेत्रीं प्रेमउदक । ह्मणे दयाळा अविवेक मूर्ख । वोढिता अडराणीं विस्मावलें ॥४६॥मस्तकीं असतां कैवल्यनिधान । लोकाकोकवासाचे भाकिते दैन्य । टाकुनि सेवेचें अमृतपान । घटगुप्तकांजी इछिले ॥४७॥अपराध क्षमा करुनि दयाळा । बळें चि लाविल सन्मार्गाला । पुढें ही कृपेनें सांभाळ केला । पाहिजे किंकरा माउलीये ॥४८॥ऐकोन यापरी करुणास्तवन । हास्यवदन केले तेणें सज्जन । तेव्हां बाईला कळली खूण । काळासि कृपेनें पर्तविलें ॥४९॥रामानंदस्वामी ज्ञानदेव । वटेश्वरचांगा नागदेव । असंख्य ऐसे जे महानुभाव । केलें कर्तृत्व तैसें च हें ॥५०॥सद्गुरुपाई जयाचा प्रेम । सेवा करी जो निजनिष्काम । तयास मानिती अंतक येम । सखा होय परम काळ तो ॥५१॥मग बाईनें लाऊनि चित्त । साहित्य केलें विधानयुक्त । पक्वान्न करितसे नित्य नित्य । नूतन येकेक परवडी ॥५२॥पोळया कानवले फेण्या घीवर । सिरि पुर्यादि करंजा खीर । सुवासित खिचडया मांडे कचुर । पंचभक्ष परमान्न भात फळें ॥५३॥चुर्मा बुंदेलाडु कोडवळ्या सोजी । अनारसी अपाल अतिरसें भाजी । जे करावें प्रभातीं जें व्हावें सांजीं । तें करुन अर्पितां संतोषती ॥५४॥तूप गूळ शर्करा मैदा तांदुळ । दहींदुग्धसायमदराबदाळ । हिंगसुंट्टजिर्यादि सर्वानुकूळ । सयपाकालागीं सित्ध असे ॥५५॥भोजन येकांतीं करिती सज्जन । पंक्तिकर होतो अंजनीसूत । तुष्टतां प्रसाद सेविती मागुन । कांहीं दिवस लोटले यापरी ॥५६॥दिसोड स्वामींनीं भोजनाअंतीं । पूर्वोपाधीची पातलों वृत्ती । सच्छिष्यीणीला प्रबोध करिती । कळाया कायामाया मृषा ॥५७॥येकेक भूतीं पंचभूतराहटी । भूतांतरीं ते गुण ही त्रिपुटी । अष्टधापासून सकळ ही सृष्टी । वेष्टी समेष्टी मायामय ॥५८॥सगुण मुक्ति ते नाशिवंत । निर्गुण सायुज्यगती शाश्वत । जाणें येणें तें काय कशांत । अविद्यावासनारुप कैसें ॥५९॥नामासी रुपरुपासी नाम । नामरुपातीत परब्रह्म । दृश्याकाराचा निरसतां भ्रम । स्वयमेव वर्म कळलिया ॥६०॥कोठें कां पडेना कळेवर । संकल्पक्षयो मोक्ष: विचार । आत्मस्वरुप तें निजनिर्विकार । हा कळविलें अवग्र वृतांत ॥६१॥श्रवणीं संचारतां येकेक प्रमय । वांटे बाईला तॄणसमा देहे । स्छानमानप्रतिष्ठा मनास नये । तन्मयीं तन्मय होठेली ॥६२॥पिंडब्रह्मांड करुनि ऐक्यता । ब्रह्मानंदीं तें ही निरसितां । तनु नसे वस्तु चि भासे तत्वता । भेदभ्रमवार्ता नुरे चि ॥६३॥जाणोन सरलें पक्वान्न करणें । चिंतावलें तैं अंतरीं सज्जन । इछिलें बाळांनीं आतां प्रयाण । तरी येकादशी पर्व जवळी असे ॥६४॥ह्मणोन सन्निधीं वाहोन निस्पृही । ह्मणतिलें ऐक गे वेणुबाई । वाचिसी प्रेमानें येकांतठाई । सीतासैंवर प्राकृत ॥६५॥तें काव्य स्वकृत आह्मापासी । लाजोन ह्मणाया मर्यादा धरिसी । आतां वसवोन निर्भय मानसी । करी ससांग ते कीर्तन ॥६६॥नमोन येक वदे तथास्तु । केले पाठादि सांग साहित्यु । सभेसी मिरवतां करुणावंतु । जनलोक मिळाले दाटी जाली ॥६७॥मीनले निस्पृही विरक्त भाविक । कवेश्वर गवाई पुराणिक । जे पान करणारे ज्ञानपीयुख । ब्रह्मवेत्ते भजनकर्ते ॥६८॥हरिदास साबडे योगी ध्यानी । पुरश्चरणी जपी तपी मौनी । प्रपंचिक पदज नार्या सद्गुणी । कीर्तन श्रवणासी पातले ॥६९॥नेणो पडलीसे मोहनमुद्रा । जेथें न वागती आलस्य निद्रा । घडिघडी लक्षिती करुणासमुद्रा । उल्हास मुखाब्जीं पसरलासे ॥७०॥धृवपद्या कथा करणारेसी । समस्त श्रोते ऐकणारेसी । पुरें करावें हे न वाटे मानसीं । कथा बहुगोड या हेतु ॥७१॥धन्य गुरुपुत्री प्रसादवाणी । उघड केलीसे परमार्थखाणी । रात्रीं न गणिती न हालती कोणी । धन्य लाघव या नांव ॥७२॥कोण ऐकतो नित्यनित्य कथा । ऐसें न वदती कोणी सर्वथा । कीर्तननेमाचा समय होतां । न बाहतां मिळती येउनी ॥७३॥निरुपणाचा विस्तार आसका । लिहितां न होयेल ऐको अवांका । यास्तव भाव तो साधुनि निका । श्रवण करा हो सैंवर ॥७४॥प्रत्यक्षाला कासया प्रमाण । आदरें करावें श्रवणमनन । मुख्य सद्गुरुकृपा वरदान । महदलाभकारक ॥७५॥(येथें मुळांत वेणाबाईकृत सीतास्वयंवर उतरलेले आहे.) ॥वोवी॥ मग कौलसिंहासन कथन सुरस । उपदेशादिक वर्णितां रहस्य । संतोष मानिलें श्रीरामदास । सकळिका उल्हास वाटला ॥७६॥मग वाईदे सकळा च होईल येणें । ह्मणोन अनुमानीं पडले सज्जन । अर्पोन श्रीरामा तनुमनधन । पुज्यमान फळ न होतां बरें नव्हे ॥७७॥वदले वेणूला जाई आतां । विघडपणाची न वाही चिंता । मी व्यापोन आसेन सबाह्यता । पूज्यस्छान येक जा साधी ॥७८॥मानेल तितुके दिवसपरियंत । करोन महंती स्वस्छ चित्त । वाढऊनिया हित परमार्थ । गुप्त करी घटा मानेपरी ॥७९॥येरु बाईची भावना दृढ । लक्ष लाऊनि चरणाकडे । वंदोन बोलिली वाक्य गोड गोड । श्रीचरणीगंगा मम कीर्ति ॥८०॥या पदाब्जी कराब्ज मुखाब्ज ठेऊन । समाधी साधितां अर्पून प्राण । साधिलें सहजीं लक्षपूजन । फळप्राप्ती तेणें समरस ॥८१॥ऐसें ऐकतां प्रेमरसवाक्य । धन्य हा भावो भाविले देशिक । शरण आपणाला आलासे येक । वर्मज्ञ भाविक विश्वासी ॥८२॥जाणोन सिष्यिणी सन्निधीं येक ही । प्रस्तुत निर्व्हाका करणार नाहीं । यास्तव उमेदिया बाहोन निस्पृही । अभयवरदान वोपिलें ॥८३॥मग बोलिले मी च ते वेणुबाई । ससांग तियेचा सिष्य तुं होई । कृपा करील जनकजाबाई । साह्य होईल भीमराये ॥८४॥येरु तथास्तु वदे भाविक । वेणुस हि कथोन विवेक । स्वयें सांगुनि विधान असक । उपदेश सांग देवविलें ॥८५॥मग वेणुकडे लक्षोन समर्थ । उदईक करावें ह्मणतिलें लळित । वदली तथास्तु घडिघडी नमित । पसरला पूर आनंद ॥८६॥कर्मउपासना नेमनेमक । सारुनि ससांग भोजनादिक । लळितकथेचें अनुभऊं सौख्य । सभा घनवटली स्वयें चि ॥८७॥साह्य जियेला श्रीरामसमर्थ । भीड जियेची हणुमंताते । ऐकतां जियेची येकेक मात । तटस्छ होती सभाजन ॥८८॥येकिकडे आसती समर्थ । सन्निधीं तिष्ठती सिष्यसद्भक्त । अंतेष्टी च सकळ साहित्य । करविते जाले सर्वज्ञ ॥८९॥तुळसीचंदनकाष्टादि आणुनि । सरण रचाया ठेविलें नेउनी । चित्ति ही ठेविलें सित्ध करुनी । व्यंग न पडावें कर्मात ॥९०॥जे निर्जिविया करणें कर्तृत्व । पाहोन लोकाला वाटे विपरीत । विदित जयाला स्वामीमहत्व । चाकाटोन ह्मणती काय कीं ॥९१॥डगमगुं आसे जयाचे चित्तीं । भ्रमभरें महिमा विसरोन जाती । कां हो अपशकुन दावाव वदती । वृत्धाप्यचर्या योगमस्ती ॥९२॥वदे दुजयांनीं हें केल्यावरी । मृत्यु पावेल हो कोणीतरी । पिसाटदशा ते परतली भारी । आसतां कांतारी जे होती ॥९३॥द्वाड भ्याड ते भीऊं लागले । चेले मस्तान जरी चौताळले । धरुनि जीवंता जाळिले पोळिले । कोण गती सांगांवें कोणापुढें ॥९४॥वेघले अधंत्री योचनाहुडे । निवांत आसती केव्हां हि निधडे । स्वामिरायांनीं हासती तिकडे । धन्य भाव सदृढ बाईचा ॥९५॥जीवेन घट हा राहो शाश्वत । होईल वेधना पातला मृत्य । हा राम ते जन द्वैत अद्वैत । हें भान कांहीं न धरी बया ॥९६॥कथांतीं जाला आरती गजर । हरिनामटाळी जयजयकार । भजन करित बाईनीं मंजुळ स्वर । सद्गुरुपासीं पातलीं ॥९७॥वोपूनि विणा तो सद्गुरुकरीं । वाहुनि मस्तकु पदाब्जावरी । प्राणज्योतिते काढूनि झडकरी । सद्गुरुहृदई मिळविली ॥९८॥आधीं च होती ते वस्तु च पूर्ण । तेथें मिळणें ना येणें जाणें । चर्या जाली हे अपूर्व सगुण । उपासनागुणें गुरुकृपें ॥९९॥जनलोक वदती गेला जीव । कुडी ते उचलिली स्वयें गुरुराव । करविलें तेथील विधान सर्व । अधिकारी सिष्याकरानें ॥१००॥गुरुराज वदती धन्य पुण्यखाणी । कैवारी जियेचा कोदंडपाणी । अन्य नरस्पर्श जन्मापासुनी । न जाला जाली कृतार्थ ॥१॥धन्य कृपाळु माहराज सज्जन । वंशावळी ते पुढती वाढून । पूजाराधना होऊं कारण । सिष्यिणीसिष्या प्रबोधिलें ॥२॥कर्मधर्म सारुनि कृष्णातटीं । समाधी तेथ करुन गोमटी । पूजा ठेऊन तेथील मठीं । राहिला महंत तो सुखरुप ॥३॥गुरुबांधवादि साधुसंत । वेणुबाईला जे करणार हितमित । रामांनीं त्याची पुरविली आर्त । रुप वेणूचें दाउनी ॥४॥पुण्यतिथीदिनीं जालें चोज । देखिलें बहुतांनीं स्वरुप निज । ऐसे कृपाळु दासमहाराज । होती प्रसन्न भक्तासी ॥५॥पुढील कथेचें अनुसंधान । भक्ताभिमानी भूजारमण । पावोन दासाला दिव्यमहिमान । दावील श्रवण करावें ॥१०६॥॥अभंग॥ दासविश्रामधाम सुंदर । रम्य सुदिव्य टेकडी थोर । विसावला योगीनाथेश्वर । स्वात्मानंदसुख दावित ॥१०७॥इति श्री श्रीरामकृपा । तारकपरमार्थसोपा । कथा साधन सुलभउपाय । वेणुबाईभक्तिनिकट । पक्वान्नकरण । सीतासैंवरादि कथा करणें । मोक्षसित्धी । सोपान । येकसेहे अकरा ॥१११॥संपूर्ण । जयजयराम ॥(मुळांत येथें वेणाबाईकृत रामगुहकसंवादाचे ४४ श्लोक व कौलाचे २६ उतरलेले आहेत.) N/A References : N/A Last Updated : March 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP