॥पटळ॥ ११४

एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.


श्रीरामसमर्थ

॥पद॥(धाटि फुट) तो हा मुनिमानसहर्ता । ध्येयध्याताध्यानापरता । तत्वता नित्यानंददाता । त्यावांचुनि अणुभरि नाहीं ठाव रिता।
सदृढ निबिड वाड अजड अपाड गोड पुरवि जिविचि कोड सुघड दयार्णव ॥धृ०॥
नाशी दुरितासी कासीपुरवासी ज्यासी ध्यासी । स्वहितासी भावो योगरासी । पोशी सकळासी शरयुतीरवासी । अमळकमळदळलोचन तमारीकुळभूषण दानवदळ सकळ विदारक ॥१॥
सुंदरु अविकारी शरकोदंडधारी हा परनारी । सोहदरु तापत्रय वारी । विबुधा साहकारी राघव रावणारी । विशम विषय सोसे जाणुनी पोसे चरणकमळीं दास समरस ज्याचें ॥२॥

॥वोवी॥ तो निरामय तो निजानंद । हा चि तो श्रीराम सच्चिदानंद । तो हा पदाचा करावा विषद । तरि पाहा पदार्थ व्हा सुखी ॥१॥
मनासि जडवितां तो निर्गुणरुपी । मना मनपण नुरे किमपी । मनासि निरवितां सगुणस्वरुपीं । नुठे चि लीन होउनि ॥२॥
मन तद्रूपीं जाय कैसेनी । तरी यदर्थी व्हावा आपणु मुनी । मननसीळाची धन्यत्व करणी । श्रीरामीं तन्मया मन कैंच ॥३॥
तें श्रीरामरुप वर्णावयात । न दिसे कवणाहीपासीं सामर्थ्य । यद्यपी वानिती विख्यात महंत । तेवढें चि पुरे हो तृप्त होऊं ॥४॥

॥अभंग॥ राम परब्रह्म अनाम्य अजन्म । निर्गुणाचें धाम निर्विकारी ॥१॥
मुनिमनहर्ता नित्यानंददाता । ज्यावांचूनि रिता ठाव नाहीं ॥२॥
त्रिपुटी वेगळा अघड अपाड । सदृढ निबिड दयासिंधु ॥३॥
सांबाचें निधान सगुण सावळा । न वर्णवे लीळा सौख्यकारी ॥४॥
दासप्रियकरु सज्जना आधारु । देवदेवेश्वरु आत्माराम ॥५॥

॥वोवी॥ हा वलखोन आधीं रामरुप । दास्यत्वकीजे मग सुखरुप । होउनि सद्वस्तु आपेंआप । जन्ममरण खेप निरसावे ॥५॥

॥अभंग॥ राम कैसा आहे तो आधीं पाहावें । मग सुखेनावें ॥च०५॥

॥वोवी॥ ह्मणाल श्रोतेनो असोन सगुण । कां येवढें सांगतां अघटीत मान । अहो वेदाचें जें नेति वचन । शेष मौन येथ सार्थक ॥६॥
गुरुमुखें हें पाविजे खूण । तरी च होईल समाधान । लीळावतारी पतीतपावन । प्रेमासारिखें भासतो ॥७॥

॥श्लोक॥ नव्हे मछ ना कूर्म वाराहरुपी । (करुणाष्टक ५८ पहा. श्लोक १०)

॥वोवी॥ हा वळखोन आधीं रामरुप । दास्यत्वकीजे मग सुखरुप । होउनि सद्वस्तु आपेंआप । जन्ममरण खेप निरसावे ॥५॥

॥अभंग॥ राम कैसा आहे तो आधीं पाहावें । मग सुखेनावें ॥च०॥५॥

॥वोवी॥ ह्मणाल श्रोतेनो असोन सगुण । कां येवढें सांगतां अघटीत मान । अहो वेदाचें जें नेति वचन । शेष मौन येथ सार्थक ॥६॥
गुरुमुखें हें पाविजे खूण । तरी च होईल समाधान । लीळावतारी पतीतपावन । प्रेमासारिखें भासतो ॥७॥

॥श्लोक॥ नव्हे मछ ना कूर्म वाराहरुपी । (करुणाष्टक ५८ पहा. श्लोक १०)

॥वोवी॥ ऐसा श्रीराम स्वानंदघन । वंशानवशीं सर्व ही धन्य । ह्मणोन त्या कुळीं वस्य होउन । चरित्र सगुण स्वीकारी ॥८॥

॥पद॥ (धाटी नीर्गुणरुपी०) वंश रघुनाथजीचा । प्रगट प्रतापी जयाचा ॥धृ०॥ पुण्यपरायण धार्मिक राजे । काय वदावें वाचा ॥१॥
सत्वधीर माहावीर बळाचा । वोघ चि थोर नितीचा ॥२॥
दास ह्मणे मज ध्यास तयाचा । खडतर सूर्यतपाचा ॥३॥

॥वोवी॥ धन्य भक्तिचें फळलेंपण । धन्य तपाचें हें महिमान । धन्य भाविकाचें भाग्यविधान । कैवल्यदानी गवसला ॥९॥

॥पद॥ धन्य श्रीराम । साहकारी । भुलतो प्रेमादरीं ॥धृ०॥ बाप ब्रह्मयाचा शिवमित्र । ह्मणवी दशरथपुत्र ॥१॥
निगम आगमा जो न कळे । आंगणांत खेळे ॥२॥
नित्य निष्काम । सुखघन करितो कर्माचरण ॥३॥
करिती सुरमुनी रुषिध्यान । वान्नरा स्वाधीन ॥४॥
परात्पर वस्तु अव्यक्त । पाहती त्या सभेंत ॥५॥
अद्वय अजन्मु अनाम्य । तो हा आत्माराम ॥६॥

॥वोवी॥ समुद्रीं घालितां नेऊनि जळ । न दिसें चि तेथें जालें आगळ । पैसावता व्योमीं आटेना स्थळ । तेंवि च लीळा अगाध ॥१०॥
ऐशा परीनें भाविकजन । समाधिपुढें करितां कीर्तन । संतोषपावले दासभगवान । अंतरनिष्ठांनीं जाणितले ॥११॥
गडास येती जे अनुभवी साधु । संतोषती पावोन प्रसादु । कीर्तनीं भल्याला लाविती वेधु । कविराजयाते आराधिती ॥१२॥
आतां माघील अध्याईं कथा । संकटीं पावले रामदासदाता । चहुं देशांतरीं फाकली वार्ता । उपजती आस्था कीर्ति ऐको ॥१३॥
येऊनि मिळाले गडांत भक्त । मंडळी हि आधीं च होती तेथें । तळमळोन वदती आह्मा समर्थ । उपेक्षा करुन गेले हो ॥१४॥
थोर थोर महंत जे होते नामीं । सादृश्य जयाला कपींद्रगामी । अधीं च तयाला धाडिलें स्वामी । जगदोद्धार करावया ॥१५॥
आतां कोणाला पुसावे प्रश्न । कर्ता न दिसे कीं समाधान । जालों परदेसी सर्वापरीनें । न कळला पुरता क्रममार्ग ॥१६॥
उबगोन देहाला जाले गुप्त । आवरुन घेतलें अवतारकृत्य । हें निसत्वियाच ऐकोन मात । जाले गुरुवर्य प्रसन्न ॥१७॥
समाधींतून उठिली वाणी । का रे परमार्थखूण विसरुनी । देह्बुत्धीते बळकट धरुनी । काय हे वदता सताविण ॥१८॥
लिहून घ्या आतां लागेल जें कां । ऐकोन आश्विर्य वाटल सकळिकाझं । सरंजाम लिहियाचा घेउनि आसका । सित्ध होठेले सन्मुखी ॥१९॥
इत्यादिक जाले ऐको तत्पर । समाधीरुपें बोलिले भवहर । धन्य या नांव चरित्र विचित्र । ऐका सादर श्रोतेनो ॥२०॥
थोर ग्रंथ सांगावे ल्याहवयासी । परी आवांका न दिसे लेखिकापासीं । सेवटीं सांगितलें येक ग्रंथासी । प्रस्तुत अवधारा पदादी ॥२१॥
जरि सन्निधीं असतां कल्याणबावा । उल्हास वाटतां सद्गुरु देवा । काढुनि हृदईचा गुप्तमालठेवा । ग्रंथविस्तार होता बहु ॥२२॥

॥पद॥ (धाटी । डफगाण०॥) माझी काया गेली खरें । मी तों आहे सर्वांतरें । ऐका स्वहीत उत्तरें सांगईन ॥१॥
राहा देहाच्या विसरें । वर्तो नका वाईट बरें । तेणें भक्ती मुक्तीची द्वारें चोजवती ॥२॥
नका करुं वटवट । पाहा माझा ग्रंथपट । तेणें सायुज्यतेची वाट । ठाईं पडे ॥३॥
बुधी करावी स्वाधीन । मग हें मजुर आहे मन । हे चि करावी साधन दास ह्मणे ॥४॥

॥वोवी॥ श्रवण होतां हा वरदशब्द । सगट सर्वासी लागला वेध । सदा सन्मार्गी चालों सशुत्ध । निश्चये चि केला तयांनीं ॥२३॥
मागोन जे आले हे ऐकोन वार्ता । जन्म आमुचा रे ह्मणती वृथा । संतोषऊं तया सद्गुरुदाता । वरदान वचन वोपिलें ॥२४॥

॥पद॥ (धाट कोण मानी०) । संतसज्जनाचा मेळा । त्यासि लोटांगण घाला ॥१॥
तेथें जाऊन उभे राहा । रामदास नयनीं पाहा ॥२॥
गुण श्रीरामाचे गाती । कथा रामाची ऐकती ॥३॥
तेथें श्रीराम ही आसतो । कथा भक्ताची ऐकतो ॥४॥
जेथें राम तेथें दास । सदृढ धरावा विश्वास ॥५॥

॥वोवी॥ ऐसें ऐकतां हरुषले ते हि । मग गजबज करितां भक्तसमुदाई । क्रियावेध बिंबो तयाचे हृदई । बोलिले ऐका मंजुळ ॥२५॥

॥अभंग॥ जो कां भगवंताचा दास । त्यानें असावें उदास ॥१॥
जें कां देतील तें चि घ्यावें । कोणा कांहीं न मागावें ॥२॥
सदा श्रवण मनन । आणि इंद्रियदमन ॥३॥
नानापरी बोधुनि जीवा । आपुलें परमार्थ करावा ॥४॥
आशा कोणाची न करावी । बुद्धि भगवंती लावावी ॥५॥
रामदासीं पूर्णकाम । बुद्धि दिली हे श्रीराम ॥६॥

॥वोवी॥ ऐसें ऐकतां तर्कोन ते हि । बुत्धिवाद तो राखिले जीवीं ज्ञानीजन वदती महानुभावी । ऐसा न देखों भूतटीं ॥२६॥
मग हीनदीनाच्या येऊं वाटा । प्रत्ययवचनाचा वोपिले साटा । प्रयत्नीपुरुषाला काय हो तोटा । साधित्यासि वाण काय असे ॥२७॥

॥श्लोक॥ भजनपूजन आहे ज्ञान वैराग्य आहे । बहुत श्रवण आहे धारणा सित्ध आहे । हृदय आहे पुण्य कारुण्य आहे । विवर विवरताहे गूणसंपन्न आहे ॥१॥

॥पद॥ (गवडी, राग-धाटी सज्जना सज्जना) । आनंद रुप गावें । पद उमगावें ॥धृ०॥ स्वरीं मिळावें । ताळीं मिळावें निवळावें ॥१॥
लिहीत जावें । तान मान समजावें ॥२॥
पाठ करावें दृढ धरावें । सर्वकाळ विवरावें ॥३॥
दंभ तेजावें नाचत जावें । दास ह्मणे निजभावें ॥४॥

॥वोवी॥ ऐशा परीनें दिव्यवाक्यखेप । वोपिले भाविका सद्गुरुभूप । पडिपाड त्यांतील कळविलें स्वल्प । विश्वासिकां पुरें इतुका ची ॥२८॥
कीर्तन एकदां मांडलें तेथें । न बणता येक येका संगित । संव समाधीमधून बोलिले समर्थ । लेखीकासह आर्त होठेले ॥२९॥

॥पद॥ मानी कोण०॥ करि हरिकथा मांडेना । विताळ सांडेना ॥धृ०॥ मन मनासि पुरेना । धारणा धरेना ॥१॥
विताळ पाहावें रोकडें । होतें मागें पुढें ॥२॥
मध्य होउनि निश्चळ । मिळोनि घ्यावें ताळ ॥३॥
गाणें नाचणें संगीत । अखंड गावें गीत ॥४॥
लाज सांडावी समुळ । वाया जातो काळ ॥५॥
उदंड करावें पाठांतर । लाउनि अंतर ॥६॥
दास ह्मणे रे जाणता जाणोनि नेणता ॥७॥

॥वोवी॥ ऐकोन यापरी सीक्षावाक्य । सावधान आसके होऊनि साधक । कीर्तनामाजि प्रेम अमोलिक । आणोन रंग लुटिलें ॥३०॥
असो कोठें हो सद्भक्तजना । पावती पुरविती तेथें चि वासना । मां गडास येती जे धरुनि भावना । अतृप्त कोणी न होती ॥३१॥
पुण्यतीथीचा पाहूं आनंद । गुरव येक आला भाविक शुत्ध । न मिळाला तया तीर्थ प्रसाद । ईकडे कीर्तन आरंभिलें ॥३२॥
तो मानोन खोटा मी सुकृतहीन । तीर्थ तरी आतां सेऊन निजेन । या हेतु येतां तो दासभगवान । विचित्र नयनीं दाविलें ॥३३॥
समाधिजवळी ताह्मणामध्यें । ठेविला आसे पक्वान्न नैवेद्य । भीऊन सरकला तो उठिला शब्द । स्वीकारी प्रसाद ने वेगी ॥३४॥
चाकटतां त्रयदा जाली वाणी । मग नेऊन भक्षिला बैसला कीर्तनीं । द्वयघडीस येतां वासरमणी । ताह्मण घ्या ह्मणत हिंडतु ॥३५॥
जे कोणी ह्मणती आमुचें नव्हे । मग वदती संतांनीं श्रीगुरुराय । दिधलेति कृपेनें घेऊनि जाय । तो नेला भोळ्यांनीं पूजावया ॥३६॥
जागृत ऐसें हो श्रीरामदास । चरित्रें होताती आसमहास । पुण्यतीथीचा येतां दिवस । होतो उल्हास बहुतापरी ॥३७॥
सरदारांनीं मिळोन नव दिन । ससांग करिती संतर्पण । कथा होतसे थोरगजरानें । पावविती मानधनवस्त्र ॥३८॥
नेम चैत्रीचा जेविं गुरुराव । घातलें करिती तेविं उत्छाव । सांभाळ करितसे पवनोद्भव । परि माईका ठाव न मिळे ची ॥३९॥
जातां उरले जे तेथें निस्पृही । जडला अभिमानु सकळा हृदईं । मी थोर तुं थोर ह्मणोन घाई । करुन भांडण काढिती ॥४०॥
महंतपणाचा डौल धरुन । बैसती हारीनें घालूनि आसन । भरावंसा धरिती आह्मी यजमान । थोरासि आर्जव करुं पाहती ॥४१॥
गणेश गोसावी योग्य होय । स्वथेव महंती च नसे धैर्य । विदेहदशा ते बाणली आहे । कल्याणस्वामीचा सिष्याला ॥४२॥
दत्तो बाला सांगूं धाडितां । येविषीं विवेकी न धरी आस्था । नि:सीम गुरुभक्तु कल्याणदाता । ह्मणतिलें गुरुआज्ञा प्रमाण ॥४३॥
वरकड महंत जे स्थानोस्थानीं राहिले श्रीगुरु आज्ञा वंदुनी । विसंच करुं पाहती इकडे येरांनीं । स्थितीसंपन्नता विसरुनी ॥४४॥
हें असो दासाचे सिष्य विरक्त । जाणते बोलके बहुमानस्थ । परि परमार्थविभवीं जडोन हेत । अग्रमान इछिती ॥४५॥
मानास्तव कीजे नाना दंभ । दंभास्तव धरिजे लोभ क्षोभ । लुलुस्तवन घडे परमार्थ लाभ । सुलभ तो अवघड होठाके ॥४६॥

॥अभंग॥ धन्य जो नैराश्य करी बळकट । न धरी च वाट विषयाची ॥१॥
आशा घरघेणी पडोनिया गळा । करी प्राणियाला भक्तिहीन ॥२॥
जिचेनि वैराग्य न पडे चि पुढें । प्रपंचाची भीड नुलंघवे ॥३॥
परमार्थ साध्य असोनि नाडवी । न लाभे पदवी स्वात्मानंदीं ॥४॥

॥तो ची महाधीर त्यजी अभिमान । गुरुकृपें खूण पाउनीया ॥१॥
अहंकार खोटा पाडीतसे तळा । ठाव स्वहीताला उरों नेदी ॥२॥
सित्धासी पतन करी गुप्तरुप । वाटे सौख्यरुप नाडतां ही ॥३॥
जेथें गर्वठाण कैंचा हो विश्राम । देव आत्माराम दुर्‍हावला ॥४॥

॥उदासीन बहु दुर्लभ या जगीं । येयालागी योगी धुंडिताती ॥१॥
उपासनाभीड महंतीची चाड । करी हे नासाड परमार्थ ॥२॥
जडलीयावरी विभवांत दृष्टी । मग आटाआटी काय उणें ॥३॥
यास्तव निस्पृही होउनि निष्काम । सखा आत्माराम मानी येक ॥४॥

॥वोवी॥ भ्रांत तो विभवामाजीं सौख्य । वोढेल सेवटीं अपार दु:ख । थोरथोरा ही हें कष्टकारक । ऐका हो वाक्य दासाचें ॥४७॥

॥श्लोक॥ अ०॥ श्रीकृष्णदेव नाटकु । जनांत सिंतरु ठकु । तयासि बैसला धका । मनुष्य नेति गोपिका ॥श्लो०॥७॥

॥वोवी॥ ऐसी असे पा विभवदृष्टी । किमपी नसावी हे आस्था पोटीं । प्रपंचीक ठकडया न कळे गोष्टी । पावती आटाटी असो हें ॥४८॥
कर्णोपकर्णी हें ऐकोन शाहु । आश्चिर्य मानी मानसीं बहु । कोण कैसे ते आहेत पाहूं । ह्मणोन सरागें निघाला ॥४९॥
दासप्रसादमहिमाबळें । गुरुभजनाचें फळोनि तपफळ । दिसे मुखाब्जीं चिन्ह तें प्रज्वळ । कितेका भासे वेडा ची ॥५०॥
छेत्रपती तो गुरुभक्त होय । उपासनेचा अभिमान वाहे । तो येतां कवणा ही न धरवे धैर्य । गुंडाळून आसन निघाले ॥५१॥
जंव करुं निघाले पर्याटण । किंवा कोठें ही करुं स्थान । तंव राजयांनीं करुनि मान । वसन भूषण देवविला ॥५२॥
ह्मणाल श्रोतेनो धैर्य खचल । देशांतरीं राहिले करुनि स्थळ । कोपले त्यावरी श्रीगुरुदयाळ । भ्रष्टत्व दिसों आल कीं ॥५३॥
हो ऐस न भावा जाणा वर्म । जे वागले सन्मुखी गुरुसमागमें । साधन केलें हो श्रवण नित्यनेम । ते केंवि वाया जातील ॥५४॥
आधीं च स्वामिंनीं देतां निरोप । भाविल येथें चि तपूं तप । आळस अवइनी हें फळद्रुप । जालें अनुताप मग आला ॥५५॥
पूर्वील आज्ञा ते फळोन सुगम । राहिले बहु स्छळीं करुनि आश्रम । सांप्रदायाचा चालवोन क्रम । घेत गुरुनाम जाले सुखी॥५६॥
गुरुत्व दिधलें जें स्वामीरायांनीं । परतोन न घेववे कोणाचेनी । परिदकोतन करुन घेती प्राणी । माजती नाडती अल्प विभवीं ॥५७॥
राजपुत्र न जाला जरी सुमती । मान देशाची होय फजिती । न शोभे आहे ते क्रिया संपती । योग्यता अकीर्ती असो हें ॥५८॥
गणेशगोसावी आला सन्मुखी । नृप ह्मणे महंती नव्हे हे निकी । तो विदेही नेणे हें होत काय कीं । नमोन नृप भावी पूज्यस्थहे ॥५९॥
अधिपती व्हावा येथें बहु गुणी । कारभार चालवी जो आटोपुनी । ह्मणोन जांबाच वर्तमान घेउनि । धाडिले गजादि कारकून ॥६०॥
रामीरामदास विख्यात जनीं । गंगाधर नातु त्याचे सद्गुणी । गडासी आले ते सन्मान पाउनी । जन लोक मिळाले यात्रा जसी ॥६१॥
साधुसंतादी सांप्रदाईक । सर्वानुमत्तें करुनि येक । बैसवोन विधीनें स्वामी जवळिक । येकांत केलें योग्य होऊं ॥६२॥
करिती सभोंवती भजनगजर । आधीं च हरिवरदी हा जाणोन पात्र । ससांग उपदेशु करितां भवहर । सत्सिष्यपणकळा उमटली ॥६३॥
केलें सर्वानीं प्रेमें वंदन । संतर्पणादि सारिलें विधान । गंगाधरबावा जाला यजमान । आवडला ह्मणोन समर्थासी ॥६४॥
तंव संतसज्जन महंतयोगी । बुत्धिवाद कथिती बावालागी । शोधितां सुकृतीं अपुट या जगीं । तुह्मा ऐसा न देखों ॥६५॥
अक्षता लाऊन मान देणें । त्या अक्षताला मान काय योजणें । योग्या रे जनीं या थोर सिष्यपण । तो बावा वदे मी साधक ॥६६॥
तरि ऐकिजे दयाळा पूर्वात्पर । वंश धन्य तुमचा उपास्य थोर । साह्य चि असती इन हरी भूवर । परि भाव येक मानसीं धरावा ॥६७॥
दास तो मारुती अवतार कलयुगीं । सर्वसंगत्यागी महायोगी । संसारीक नावडे तयालागीं । आपण ही व्हावें तैसा चि ॥६८॥
सिष्यत्वाचें टाकूनि भूषण । वंशावळीचा कथित अभिमान । नाडले नाडती न होय ज्ञान । स्थितीसंपन्नता न बाणे ॥६९॥
काया माया ते करुनि दूर । ज्ञानराज जाले स्वरुपाकार । शरण्यांसि करिती निर्विकार । मा त्याला संसार कासया ॥७०॥
यद्यपी दिसतां त्याचें शरीर । करित असतां ही मिथ्या व्यवहार । ह्मणो नये कीं तयासी नर । तो बावा म्हणे जी सत्य असे ॥७१॥
विदेहीया कैंचा देहसमंध । धरिजे एकांशी कोठें भेद । परि मज साधका गुरुपदीं वेध । लागे ऐसा जी वर वोपा ॥७२॥
काय होतें कीं सुकृत अगाध । बळें चि गळासि पडलें गुरुपद । येथें जरी लागला भलता छंद स्वहित होईल मग केवीं ॥७३॥
उदरभरणाचें नाहीं कारण । किंवा थोरीव सांगून घेणें । घडोन सिश्रृषा सार्थक जेणें । हें चि मागणें गुरुदातया ॥७४॥
ऐकोन ऐसें विवेकउत्तर । केलें सर्वांनीं जयजयकार । पुढें तयाचा वरदपुत्र । लक्ष्मण गोसावी प्रतापी ॥७५॥
अन्नदानी तो गंभीर मोठा । महारुद्रपूजनीं बहुत निष्ठा । येवोत कोणी कां श्रेष्ठाकनिष्ठां । निराभिमानें तोषविती ॥७६॥
क्षुधा हें जाणोन हरिचें रुप । भूक सर्वाची मानोन तद्रूप । सत्वान्न कथिलें जें श्रीकृष्णभूप । ते परि वोपवितु समयासी ॥७७॥
विद्यावैभवीं न भरे चित्त । समर्थभजनीं अखंडहेत । येकदां पुसाया दासबोधअर्थ । पातले साधु दूरहुनी ॥७८॥
घाबरोन निजला भीमापासीं । संकट पडलें स्वामिरायासी । प्रगटोन स्वप्नीं अर्थभेदासी । सांग पां ह्मणतिलें यापरी ॥७९॥
तैसा च कळवोन देतां अर्थ । भले ज्ञाते ते जाले तृप्त । घडीघडीं स्तवितां बोलिले तयांत । समर्थस्वामीची करणी हे ॥८०॥

॥पद॥ मोठा अभिमानी भक्ताचा । श्रीरामदास ॥धृ०॥पाहुनीसशुत्धी भावो येक । पावतो समयास त्यास ॥१॥
भक्तजनाचा वाहतो भार । न धरी नाहीं आस त्रास । धरउन आत्मारामीं ध्यास । वारुनि टाकिती क्लेशपाश ॥२॥

॥वोवी॥ सुचवितों कळाया हें स्वल्प अल्प । येरवी जयाच्या कीर्ती अमूप । नामधारिया नसे कपकप । लक्ष्मणबावा तो अधिकारी ॥८१॥
जाला गुरुकृपें पुत्र उत्तम । बापुसाहेब वदती संभ्रम । परि हणुमंत गोसावी मूळनाम । यास ही प्रसन्न समर्थ ॥८२॥
सन्न बारासेहे पंचविसांत । प्रस्तुत गुरुक्षेत्रीं हा असे महंत । देखोन तयाच्या भक्तिभावांत । असती देव प्रसन्न ॥८३॥
आतां श्रोतेनो फिरवा मन । करा कृपेनें सिंहावलोकन । गंगाधर बावा भक्तिसंपन्न । सावरीत गुरुदास्य क्षेत्रीं वसे ॥८४॥
छेत्रपती तो सानकूळ करित । राहिला सदा ही खबर घेत । पाहता बावा तो असोन गृहस्थ । उदासीनता जडली बहु ॥८५॥
कंटाळ ज्याला वाटे वैभव । तो प्रार्थना करुन बोले राव । फळ दोन वोपिले स्वयें गुरुदेव । वडिलासह जाले तीन सिरष ॥८६॥
पदर लागेल पुढें येथून । स्वामीरायाचें थोर संस्छान । इनाम जाहगिर्‍या केले अर्पण । उपासना चालती यथाविधीनें । पाहती ऐकती पुण्यसीळ ॥८८॥
समर्थस्वामीची अद्भुत करणी । जेथील साहकारी कोदंडपाणी । सांभाळित फिरतु सर्वा अनुदिनी । होय अभिमानी बलभीमा ॥८९॥

॥अभंग॥ स्वामी रामदास समर्थ दयाळ । ज्याचेनि प्रेमळ धन्य जाले ॥१॥
ज्याचे वरदानें होउनियां गुरु । करिती उत्धारुया जनासी ॥२॥
क्रिया ते उत्तम आचरती प्रेमें । मिरविती नाम दासदास ॥३॥
वैभवी अलक्ष निस्पृही विरक्त । होती सदा रत आत्मारामीं ॥४॥

॥वोव्या॥ समर्थस्वामीचे सिष्य सकळ । निश्चयेंसीं ते आमुचे वडिल । नामें तयांचीं घेतां रसाळ । स्वहिताचीं फळें चाखिजें ॥९०॥
वर्णिजे तयाची लीळाचरित्र । बहुकाळवरी हें न पुरे वग्त्र । यद्यपी तयाचे सिष्यजन चतुर । सानकूळ करितील परस्परी ॥९१॥
मांडतां अगाध संतर्पण । येकाचेनि कैसें होईल वाढणें । ह्मणोन बहुताला साह्य करुन । संपादविती सभागी ॥९२॥
सुकृतवंताचें नाम घेणें । गुरुपुत्रश्रेष्ठाचें स्मरण करणें । भाविकजनाचें हें चि निधान । अभिधान ऐका स्वल्प चि ॥९३॥
राम रामाजि रामचंद्र । भीम हणुमंत रुद्र दिनकर । शिवराम सिवाजि सिष्य चतुर । येकेक नामीं बहु जाले ॥९४॥
स्त्री शूद्र ग्रहस्थ नानापरीचे । तरले साबडे ते दासंदासाचे । वर्णन न करवे महिमे त्यांचे । ठळकनाम सांगूं ऐका हो ॥९५॥

॥अभंग॥ सर्वही अपार फिर्ता शोध घेत । न लागे चि अंत भांबावें कीं ॥१॥
ब्रह्म सदोदित माया अगणित । पाहतां आपणांत सांपडती ॥२॥
नाम ते अपार रुप भिन्न भिन्न । मूळ तें शोधन कीजे आधीं ॥३॥
तरि सत्तावीसी नामें अष्टोत्तर । णौ रंग साचार ते भूताचे ॥४॥
ब्रह्मांडीं विस्तार देहांत पाहवा । ताळा पडे गोवा नसे कांहीं ॥५॥
पंचभूतांमाजीं सर्व ऐक्य आहे । वृत्तिस्थीर होय मुळी नेता ॥६॥
सर्व ही साधन सर्ति ज्ञान ध्यानीं । देहात्म शोधनीं योग तप ॥७॥
गुरुसेवेमाजी तृप्ति सर्ववृत । स्वात्मीं होता रत समाधान ॥८॥

॥वोवी॥ नानापरीचे अनुभवी पुरुष । वसती भूतटीं बहुतावेशें । ते सर्वही होती अपसया वश्य । नि:सीम गुरुदास जो त्याला ॥९६॥
तैसें दासाचे सिष्यें अनेक । त्यांमाजि जाले जे जगदोत्धारक । तयांस गुरुग्रंथी वानितां सार्थक । होऊं जन्माच पुरे हो ॥९७॥
जयरामबावा शिवरामबावा । शामसुत माधवानंद रामबावा । रघुराज गोसावी उत्धवबावा । टाकळीकर ह्मणती तया ॥९८॥
पूर्णानंद गिरमाजी विजयध्वज । सीतारामबावा । यादव विराज । हरीहर गोपाळ नामी भक्त जे । त्रयंबकबावाचे सिष्य ते ॥९९॥
अनंत मौनी कर्नाटककरु । सिष्य तयाचा धुरीण मेरु । दादाजी नानाजी ते भाविकाधारु । अनंतबावा तारळकर ॥१००॥
अण्णपा गोसावी मुसळ गोसावी । रुद्राजीबावा भट्ट गोसावी । वासुदेवबावा उत्धव गोसावी । इंदूरकर ह्मणती तया ॥१०१॥
देवदासबावा दादेगांवकर । दिनकर गोसावी परळीकर । भानजी जसवंत चाफळकर । अडसूळकर नागनाथ ॥२॥
गोपाळबावा बालेघाटकर । कृष्णाजी हरबाजी पंढरीकर । दत्तोबा भोळा सिरगांवकर । रामाजि गोसावी चतुर तो ॥३॥
दिनकरबावा शिवराम गोसावी । आतुबाई बहिणाई अंबिकाबाई । भीमबावा माधव गोसावी । पिलाजी दत्तु कृष्णा कवी ॥४॥
वेणु अक्का बहिणाबाई । भोळाराम बाळकराम निस्पृही । राहिले तारक ते ठाईं ठाईं । चालवीत उपास्य घेत पूजा ॥५॥
जगदोत्धारक जाले ऐसे । होताति पुढती ही थोर सिष्य सिष्य । आपण चि तरले ते करुनि दास्य । ते तो अनेक असती ॥६॥
शिवाजीराजा असे विख्यात । बरवाजीपंत निळोपंत । रामराव विश्वासी रामचंद्रपंत । ऐसे अनेक असती ॥७॥
गंगाधर होय पीठस्छ । प्रेमानंद तो थोर विरक्त । अठरा यातिचे जाले भक्त । करावे गणित कैसें हो ॥८॥
सकळसिष्यांचा सिरोमणी । आपुली च प्रतिमा मानी गुरुधणी । तो कल्याणस्वामी विख्यात जनीं । ऐकाल चरित्र स्वल्प त्याचें ॥९॥
हें स्वभक्ताचें वानऊं चरित्र । कृपा केली श्रीभुमिजावर । उत्तीर्णता तया होऊं अणुमात्र । नसे स्वतंत्र कांहीं च ॥११०॥
यद्यपी मना समजावण । आरुषवाणीचें कीजे स्तवन । संतसज्जनीं कृपा करुन । सानकूळ व्हावें श्रवणासी ॥११॥

॥अभंग॥ श्रीराम राघवा दाता देवदेवा । लीळा वानावया साह्य होई ॥१॥
लीळा मम तप नेम व्रत जप । सद्रूप तद्रूप मल लीळा ॥२॥
लीळा चि विश्राम मोक्ष सौख्यधाम । तूं ही आत्माराम लीळारुपी ॥३॥

॥वोवी॥ चौंपाद ॥ जय जया जी श्रीरघुनंदना । सीतावल्लभा श्रमतापहरणा । कमळदळाक्षा सुहास्यवदना । इनकुळभूषणा नमोस्तुते ॥१२॥
कंसल्यात्मजा दशरथपुत्रा । अयोध्याधीशा श्रीहरमित्रा । देवाधिदेवा स्तवनरत्नपात्रा । कोमळा गात्रा सच्चीद्धना ॥१३॥
मघवादिवंदिता मखरक्षका । मनमोहना मुनिजनतोषका । जगज्जीवना जगत्पोषका । निजभक्तसखा भक्तिप्रिया ॥१४॥
जनकजाबाई जगदानंदा । अद्वय अक्रिया आनंदकंदा । जे स्मरती तुझिया पादारविंदा । जन्ममृत्यबाधा न होय तया ॥१५॥
जय पुरुषोत्तमा पूर्णकामा । नेणवे तव लीळा पार सीमा । दीनजनपोषका दिव्यनामा । कल्याणधामा नमोनम: ॥१६॥
देवां दानवां वाळीतु वाळी । नावरे कोणा ही ह्मणवी बळी । पाडून तयाला रणमंडळीं । पदकमळीं ठाव दिधला ॥१७॥
न वर्णवे तुझीया नाममहिमान । वाल्हा कोळी तो जाला पावन । शेषादि वानिती तारकाख्यान । तरले पाषाण उदकावरी ॥१८॥
राक्षस दुष्टांचा करुनि वध । भक्तासि दिधलें कीं अक्षयपद । जाला सुरनरां मोठा आनंद । लीळा अगाध दिव्यतर ॥१९॥
पुरविले सकळांचे मनोरथ । दासाभिमानी रे पुरवी हेत । दासलीळा हे सेवटपरियंत । लिहीवी बा युक्त अर्थसह ॥१२०॥
गुंफण जालिया हे जाप्यमाळा । घालीन दृढतरा तुमचा च गळा । जे लक्षून पाहतां संतसाधूला । उल्हास आगळा होत जावें ॥२१॥
जय जया जी श्रीरामचंद्रा । सद्गुरुनाथा करुणासमुद्रा । लावण्यखाणी गुणगंभिरा । जय परात्परा वेदवंद्या ॥२२॥
सर्व नियंता मायातीता । सर्वातरस्छा त्रिपुटीरहिता । अनन्यभावें तुजला ध्यातां । नुरविसी भिन्नता स्वरुपाहुनी ॥२३॥
सगुणनिर्गुणा पूर्णकामा । अच्युत अनंता आत्मयारामा । नित्य निरंजना निज अपारमहिमा अगणिता ॥२४॥
हें तोषोन स्तवनीं मदमोहन । देवभक्तपणीं दाऊं अभिन्न । स्वयें चि जाला समर्थसज्जन । स्वलीळा स्वयें वदवीतु ॥२५॥
निमित्यास हें केलें वंदन । तरि स्वभावें चि तें करील स्तवन । समरसोन पक्वान्नीं जेवी लवण । दावि रुचि भिन्न परिऐक्य ॥२६॥

॥वोवी नेमक॥ जसजया जी समर्था । भवहारका विख्याता । दीससी कर्ता अकर्ता । निरोपमा ॥१॥२७॥
दिसोनिया देहधारी । लीळा केली नानापरी । वससी निर्विकारीं । निरंजना ॥२८॥
कृपालया भक्तसखा । शरण्यासि उत्धारका । षड्रिपु जे देती धोका । वारिसी त्या ॥२९॥
ब्रह्मानंदा सौख्यदाता । अनाम्या अनाथ नाथा । तुज ऐसा भोळा दाता । नाहीं कहीं ॥१३०॥
दास रामदास कवी । जिंदा फकिर निस्पृही । बंद कमीन गोसावी भक्तगाण ॥३१॥
रामसेवक सज्जन । पावन अनन्य धन्य । महायोगी सर्वमान्य । देवदास ॥३२॥
मुक्तिदायक विरक्त । शांतमूर्ति ध्यानी मुक्त । ऐसीं नामें जे विख्यात । शोभताती ॥३३॥
प्रेमभावें घेता नाम । तत:क्षणीं नाशे भ्रम । अजिंक जो नष्ट काम । पाया लागे ॥३४॥
दास्य करितां सर्वदा । न होय ते मायाबाधा । न पडे विपटकदा । स्वरुपासी ॥३५॥
चालतां संयुक्त क्रम । पंथ तो होय सुगम । पावोनिया मोक्षधाम । विश्रामावें ॥३६॥
सेविता हे स्तौत्यरस । फळ लाभे अविनाश । वान्नरेश जानकीश । साह्य होती ॥३७॥
हातां चढे शुत्धबोध । दृष्टीस न पडे भेद । संसारिका खेदबाध्य । न होय ची ॥३८॥
केसरीचे सान बाळ । न देती च पशुसळ । गुरुभक्त जो प्रेमळ । सदा सुखीं ॥३९॥१३॥

॥वोवी लाहन॥ ऐकोन स्तवन । तुष्टले सज्जन । नाहीं भवभान । हो कदा ॥१॥१४०॥
उपजतां हेतु । लाभे मनोरथु । माया अंतवंतु । दिसे हो ॥४१॥
ज्ञानध्यान फळे । अहंभाव गळे । स्वरुपीं निवळे । तें मन ॥४२॥
होय कार्यसिद्धि । मिळे योगबुत्धी । हारपे उपाधी । समूळ ॥४३॥
आत्मारामकृपा । होय पंथ सोपा । त्यांत थोर नफा । उपास्य ॥४४॥

॥वोवी॥ ऐका यकदा यक गृहस्थ । ऐकोनि सर्वांतरीं मी दास मातें । गडाखालोनि बाहतां तयातें । वो वो देऊनि केलें सुखी ॥४५॥
यकानि राणीं संकटांत । बाहतां सुख वोपूं पातले तेथें । नांव ठेऊनि येकानि सुपुत्रातें । पुसतां प्रबोधिलें केलें सुखी ॥४६॥
सर्वातरीं मी सर्वा व्यापक । ऐसें दासाचें प्रसादवाक्य । बहुत भाविकाला जालें ठाउक । धन्य समर्थ सुखदाये ॥४७॥
याहो याहो या पंथासि लागा । माईकपणाचा हव्यास त्यागा । उडवा सुधैर्य दुर्वेध कागा । स्वात्मसौख्य भोगा दासकृपें ॥४८॥

॥अभंग॥ माहराजाचे घरीं जालों मी आदित्य । क्रमूं नभपंथ सर्वकाळीं ॥१॥
नामाचें उष्णानें पावो कोणी क्लेष । मानो कां संतोष चाड नाहीं ॥२॥
प्रभूच्या आज्ञेनें चालतां संभ्रम । नासे भ्रमतप अपसया ॥३॥
खोळो मजवरी मनउडुपती । काय त्याची कांती प्रज्वलेल ॥४॥
मित्र जे भाविती हृदयकमळ । फाके अळिकुळ वृत्ति थारो ॥५॥
फिरतो हा वाटे जेथिला तेथ मी । कष्टक्लेषऊर्मी नेणो कांहीं ॥६॥
ब्रह्मसनातन देव आत्माराम । केला हो संभ्रम अंशामाजीं ॥७॥

॥वोवी। दासविश्रामधाम उच । काज नाहीं दिनरात्रीच । सौख्य भोगाया स्वात्मसुखाच । सद्भक्तमेळा पातला ॥४९॥
इति श्री श्रीरामकृपा । तारकपरमार्थ सोपा । रामपरब्रह्म । महिमान । समाधींतून बुद्धिवाद कवन लिहिवणें । कीर्तन चिन्ह सांगणें । गुरुवास प्रसाद प्राप्त । माईक गे गेले । गंगाधरबावा महंत जाला । धन्य वंशिक संस्थानबंधान । जगदोद्धारक शिष्यनाम । रामस्तवन दासस्तवन । कथनोनाम । पटळ । येकसेहे चौदा ॥११४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP