मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
नारायण वामन टिळक

नारायण वामन टिळक

मराठी शब्दसंपत्ति


( मंदारमाला )
सृष्टी तुला वाहुनी धन्य माते अशी रूपसंपन्न तूं निस्तुला !
तूं कामधेनू ! खरी कल्पवल्ली सदा लोभला लोक सारा तुला;
ह्या वैभवाला तुझ्या पाहुनीयां मला स्फूर्ति नृत्यार्थ होई जरी
सामर्थ्य नामीं तुझ्या आर्यभूमी, तसें पाहिलें मीं न कोठें तरी !     १   
माते ! महात्मे तुझे, तत्ववेत्ते तुझे, शूर योद्धे तुझे, सत्कवी,
श्रेणी ययांची सदा माझिया गे मना आपुल्या पूजनीं वांकवी;
यांचीं यशें ज्या नव्या सद्गुणांना मला अर्पिती ध्येय ते गे जरी
सामर्थ्य नामीं तुझ्या आर्यभूमी तसें पाहिलें मीं न कोठें तरी !     २
तुझ्या महोदार सारस्वताच्या महासागरींचा जरी मीन मी !
झालों, तरी गे तृषा मन्मनाची कधींही कधींही न होणें कमी !
माते ! गुरुस्थान अंतीं जगाचें तुझें यांत शंका न कांहीं जरी,
सामर्थ्य नामीं तुझ्या आर्यभूमी तसें पाहिलें मीं न कोठें तरी ?      ३
वारा तुझ्या स्पर्शनें शुद्ध झाला मला लाधला भाग्य हें केवढें !
माते स्वयें देशि जें अन्नपाणी सुधा बापुडी कायशी त्यापुढें !
तूं बाळगीशी मला स्कंधिं अंकीं सुखाची खरी हीच सीमा जरी,
सामर्थ्य नामीं तुझ्या आर्यभूमी तसें पाहिलें मीं न कोठें तरी !      ४

N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP