मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता| विठ्ठल भगवंत लेंभे गाणी व कविता कृष्णाजी नारायण आठल्ये अहिराणी काव्य आम्बराई नव कवी प्रल्हाद केशव अत्रे बहिणाबाई चौधरी बालकवी कवी बांदरकर कवी बी बा.भ.बोरकर ग. दि. माडगूळकर राम गणेश गडकरी श्रीराम विठ्ठल गायकवाड गोपाळ गोडसे शाहीर हैबती अनंत काणेकर केशव दत्त केशवसुत नाट्यसंगीत श्री कृष्णदासांची कविता कुसुमाग्रज माधव ज्युलियन मध्वमुनीश्वरांची कविता मंदार मंजिरी शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर मोरोपंत नागोशीकृत सीतास्वयंवर नरहरि निरंजन माधव ग.ह.पाटील अनंत फंदी शब्द फुलोरा शाहीर प्रभाकर रघुनाथ पंडित रामजोशी श्रीरंगनाथस्वामी सगनभाऊ साने गुरूजी विनायक दामोदर सावरकर केशवस्वामींची कविता स्फुट कविता संग्रह भा. रा. तांबे वामन पंडित वेदान्त काव्यलहरी श्री विष्णुदासांची कविता शब्दाचें असे कारण । शब्दु... निघे दंडका राम कोदंडपाणी;... भरत जवळि नाहीं; मातुलगराम... कृष्ण म्हणे पार्था हा आला... भला जन्म हा तुला लाधला खु... कोठें गेले थोर पृथ्वीपती ... विठ्ठल भगवंत लेंभे सवाई दु:ख पुरे रमणीय पाह... पद प्रसन्न फुलल्या फुलां... ढगापाठीमागें ढग जमुनि हे ... सागराची बाव । पहाडाची धाव... कृष्णाजी नारायण आठल्ये धन्य ! धन्य ! आज धरा धवलर... दत्तात्रय कोंडो घाटे गणेश हरि पाटिल भवानीशंकर पंडित दा. अ. कारे शंकर बळवंत चव्हाण दिवस सुगीचे सुरू जाहले ओल... गिरीश तळहातीं शिर घेउनिया दख्खन... अरविंद धडधडा झडे चौघडा, गडावर चढ... नारायण वामन टिळक जाहली घाई सांग ना, सुचत न... कांटेरी वेलीचें जाळें रठ्... कोंडुनि नभभांडारीं पडली, ... करवंदीच्या जाळींत घोस लो... हृदयींच्या अंधारांत लाविय... विठ्ठल भगवंत लेंभे मराठी शब्दसंपत्ति Tags : marathipoemकवितामराठी शोकावर्त Translation - भाषांतर गुलाब फ़ुलले पहा वनलता लवूं लागल्या,सुगंध सुखदायिनी कुमदिनी वनीं शोभल्या;सुधांशु कुसुमावरी अमृतबिंदु सोडी करें.वनस्थल करी जणो धवल दुग्धधाराभरें !असा धवल चंद्रमा सुखद जाहला चक्षुला,तुझ्या सुविमला यशा परम मित्र हा शोभला;गभीर गुरुघोष ये दुरुनि नर्मदेचा तया,मृदंगरव हा मिळेम श्रवणयुग्म तर्पावया !उडे गगनमंडळीं मदनसारिका स्वैरिणीसुमंजुरव दे जिचा सुखचि कर्णरन्ध्रां झणींप्रसन्न मन हें सखे ! क्षणभरी अहा ! जाहलेंकळे न मज दु:ख कीं अहह ! यापुढें वाढिलें !अनर्थ बहु जाहले वरिवरी धनाच्या भ्रमेंजनां गुणगणांहुनी तरिहि थोर लक्ष्मी गमेउदारहृदये ! तुवां पडुनि निर्धनाच्या करींसुखें सदनिं सेविल्या निवल कोरड्या भाकरीअसेही दिन ते बरे म्हणविती अहा ! या क्षणीं, गमे सुखचि तैं तिच्या प्रणयभारलोलेक्षणीं !श्रमाउपरि भाकरी अमृततुल्य त्या लागल्या,सुहास्यवदनें तिनें निजकरेंचि ज्या वाढिल्या.सदैव हुरडा मिळे मधुर कोंवळा भाजला,तसा हरभरा हुळा मधुर फ़ार हो ! लागला;तशीं मधुरशीं नवीं विपुल हो ! मिळालीं फ़लें,अहो ! सुख मना दिलें विमल ओढियाच्या जलें.सुखास अमुच्या तदा अहह ! अल्प सीम असेकदान्न धड वस्त्र यावरि न लेह्स आशा वसेगुरुत्व, धन, ही नसे म्हणुनि गर्वतृष्णा नसेपरार्ह्तहरणीं न धी मग कशास चिंता डसे ?अहो ! गहिंवरोनि ये हृदय, अश्रु हे लोटतीअहो ! दशदिशा कशा मजसि शून्यशा वाटाती ?अहो ! त्रिजग ढांसळे कडकडोनि माझ्यावरीअहो ! परि कठोर हें हृदय राहिलें भूवरी. जणों दुरुनि ये शिरे प्रखर बाण हो अंतरीं,जणों हृदय हें जपें चरचरा चिरी हो सुरी;न शोकभर आंवरे कळवले अहा ! जीव हा,बलाढ्य भवितव्यता छळितसे अझोनी पहा.नको भुवन हें जिथें अदय काय ये पाहुणा,नको भुवन हें मला तिळ न सौख्य जेथें मना.नको मन विटे, नको मजसि दु:खदा संसृति,न दे मजसि जया स्थळीं गुनवतीसतीसंगति.दया करि वसुंधरे ! सकल तीर्थ हो ! हे रवे !विशाल विभुचक्षु तूं बघसि विश्व हें गौरवें;दयार्द्र पवना सख्या ? गहनशा नभोमंडला !पहा निवविली प्रिया - अहह ! कंठ हा दाटला !दिसे सदन शून्य हो ! सुमनवाटिका शून्य हो !लतासदन शून्य हो ! रसयुता कथा शून्य हो !वनस्थलहि शून्य हो ! सकल विश्व हें शून्य हो !मदीय तनु शून्य हो ! हृदय शून्य हो ! शून्य हो ! N/A References : N/A Last Updated : January 22, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP