मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता| अरविंद गाणी व कविता कृष्णाजी नारायण आठल्ये अहिराणी काव्य आम्बराई नव कवी प्रल्हाद केशव अत्रे बहिणाबाई चौधरी बालकवी कवी बांदरकर कवी बी बा.भ.बोरकर ग. दि. माडगूळकर राम गणेश गडकरी श्रीराम विठ्ठल गायकवाड गोपाळ गोडसे शाहीर हैबती अनंत काणेकर केशव दत्त केशवसुत नाट्यसंगीत श्री कृष्णदासांची कविता कुसुमाग्रज माधव ज्युलियन मध्वमुनीश्वरांची कविता मंदार मंजिरी शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर मोरोपंत नागोशीकृत सीतास्वयंवर नरहरि निरंजन माधव ग.ह.पाटील अनंत फंदी शब्द फुलोरा शाहीर प्रभाकर रघुनाथ पंडित रामजोशी श्रीरंगनाथस्वामी सगनभाऊ साने गुरूजी विनायक दामोदर सावरकर केशवस्वामींची कविता स्फुट कविता संग्रह भा. रा. तांबे वामन पंडित वेदान्त काव्यलहरी श्री विष्णुदासांची कविता शब्दाचें असे कारण । शब्दु... निघे दंडका राम कोदंडपाणी;... भरत जवळि नाहीं; मातुलगराम... कृष्ण म्हणे पार्था हा आला... भला जन्म हा तुला लाधला खु... कोठें गेले थोर पृथ्वीपती ... विठ्ठल भगवंत लेंभे सवाई दु:ख पुरे रमणीय पाह... पद प्रसन्न फुलल्या फुलां... ढगापाठीमागें ढग जमुनि हे ... सागराची बाव । पहाडाची धाव... कृष्णाजी नारायण आठल्ये धन्य ! धन्य ! आज धरा धवलर... दत्तात्रय कोंडो घाटे गणेश हरि पाटिल भवानीशंकर पंडित दा. अ. कारे शंकर बळवंत चव्हाण दिवस सुगीचे सुरू जाहले ओल... गिरीश तळहातीं शिर घेउनिया दख्खन... अरविंद धडधडा झडे चौघडा, गडावर चढ... नारायण वामन टिळक जाहली घाई सांग ना, सुचत न... कांटेरी वेलीचें जाळें रठ्... कोंडुनि नभभांडारीं पडली, ... करवंदीच्या जाळींत घोस लो... हृदयींच्या अंधारांत लाविय... अरविंद मराठी शब्दसंपत्ति Tags : marathipoemकवितामराठी कृष्णाघोडी Translation - भाषांतर ( चाल - पोवाड्याची )महाराष्ट्राच्या मैदानावर नाच पुन्हां , कृष्णे !तुझ्या माथिंचा चंद्र झळकुं दे झोंकदार रत्ने ! १कडेकपारीं सह्याद्रीच्या वाजूं दे टाप उतर झिंगल्या महाराष्ट्राच्या दास्याचा कैफ ! २शिवनेरीच्या शिवरायानें दिल्या दिलासालाअमीन टांचा छत्रपतीच्या दे महाराष्ट्राला ! ३फुरफुरुनी तूं उडीव धुरळा दूर परवशतेचाठेंच खुरांनीं बारबार तूं साप फितूरीचा ! ४पायगुणी तूं रायगडींच्या दौलतिची खाणीतुझ्यामुळें गे अम्हां गवसला तो स्वराज्य - सुमणि ! ५तुझ्या बळावर महाराष्ट्राचा कोट उभा झाल दौलतजादी ! म्हणुनि एकदां वाजिव टापांला ! ६शिवनेरीच्या करवंदींतुन सुटून बेछूतसिंहगडाच्या सिंहा उठवुनि रायगडा भेट ! ७धनी मिळाला धन्य तुला तो घेउनि ये तेथूनमावळचीं तीं रत्नें काढा महाराष्ट्र मंथून ! ८घेउनि चंद्रा जगास सुखवी जशी कृष्ण रात्र,आणुनि कृष्णे ! शिवा भूषवी तसें महाराष्ट्र ! ९तुझ्या गळ्यांतिल खळाळुं दे ती पुतळ्यांची माळत्या नादानें वीरश्रीचे पुतळे हलतील ! १०हलतां पुतळे परवशतेचें धावें हदरेलवाजिव टापा ! - स्वातंत्र्याचे कान उघडतील ! ११सह्याद्रीच्या माथ्यावर तट टापांचे नालगडस्वरूपें उमटुनि गेले, बुझले ना समुळ ! १२टाक एकदां टाप तयावर ठळक ठसठशीत कड्याकड्यांतिल पाउलवाटा फिरून उजळीत ! १३चतुष्पादिं तव चतुर्वर्ग जणुं होता वसलेलाचतुर्वर्ण तो म्हणून तेव्हां एकदिलें लढला ! १४ते पुण्यवंत तव पाय । शत्रुनाशाय । दास्यहरणाय ।लाविं तूं महाराष्ट्रालाफिर त्यांवर सह्याद्रीलाजागीव तदात्मा निजला; -पडतिल त्यांतुनि बाहिर भाले दडले अणिदार --हां हां म्हणतां स्वदेशभूची फिरेल तखदीर ! १५( २ )फिरव तुझी ती स्वातंत्र्याची नजर पाणिदारदास्य - सुदुर्बल देशिं होत तें पाणि जोमदार ! १६तेजस्वी तव नेत्र तयांतिल तेजोमय झोतओत एकदां दास्यलुब्ध - जड स्वदेशनिष्ठेंत ! १७गतासु ! निष्ठा - एकी रडते घेउनि शव तीचें,अन्यायांचे भुंकति भालू, दुहि हर्षें नाचे ! १८दौडत येई राष्ट्राविरचिनी ? तव कानोशानेंदडतिल भालू - दुहीहि, राहिल एकीचें रडणें ! १९नकोच गिळुं तो गळता तुझिया तोंडीचा फेंस,मृत निष्ठेला दे, कीं त्यांतचि संजीवनि वास ! २०घाबरें न, कीं कठीण येथें कापुस बोंडाचा !तुडीव तो बिन्धोक ! लाभ तुज होइल सरकीचा ! ! २१घाबरें न, कीं पडले असती निखार पर - तेचेजळतिल तेणें खूर आपुले खालीं सत्तेचे ! भाजतील निज खूर म्हणोनी घेइं न माघार -रक्तवदन परपुष्ट मत्कुणा हरि नखिंचा धूर ! २२म्हणशिल मनिं कीं आजि काम केलिस तूं विनति,केलि तशी कीं “ स्वदेशभक्ता दु:खांची न क्षिती ! ” २३उमगाया अससि समर्थ । यांतला अर्थ । देशकार्यार्थ ।तूं दौडत येई खालींविपरीत अशा या कालीं,जमवीत कांबळी काळीशिवनेरीहुनि, खालीं जाई रायगडावरती,भगवा झेंडा धरिल तेथें लगाम तव हातीं ! २४दौलतजादि ! महाराष्ट्राचे सुयश - धर्म - खाणी !अरविंदाची ऐक विनंती उभारल्या कानीं ! ! २५ N/A References : N/A Last Updated : January 22, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP