मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १६ वा| श्लोक ५६ ते ६१ अध्याय १६ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३८ श्लोक ३९ ते ४३ श्लोक ४४ ते ४७ श्लोक ४८ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६७ अध्याय १६ वा - श्लोक ५६ ते ६१ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५६ ते ६१ Translation - भाषांतर वयं खलाः सहोत्पत्त्या तामसा दीर्घमन्यवः । स्वभावो दुस्त्यजो नाथ लोकानां यदसद्ग्रहः ॥५६॥मग म्हणे जी तमालश्यामा । विश्वविदिता आत्मयारामा । चेष्टविता तूं भूतग्रामा । वृथा आम्हां दूषण ॥५७॥उत्पत्तीपासूनि आम्ही खळ । तामसयोनि क्रोधबहळ । करुणाहीन द्वेषशीळ । हा स्वभाव केवळ आमुचा ॥५८॥सकळ लोकांसि दुष्टग्रह । नैसर्गिकचि आमुचा देह । म्हणोनि सर्व प्राणिसमूह । करी द्रोह आमुचा ॥५९॥ते नेणती मूढमति । योनिभेदें देहाकृति । निसर्गवैराचे संप्राप्ति । जे दूषिती तें उचित ॥६६०॥तो तूं स्वामि सर्ववेत्ता । आम्हां स्वभवपरतंत्रता । वर्तवूनि आमुचे माथां । सांगे कोणता अन्याय ॥६१॥श्वानें सांडूनि विटाळ । केंवि हों शकती निर्मळ । कां वायस आचारशीळ । होईल केवळ द्विजवर्य ॥६२॥करावया उदकंशीं सोयरिक । शीतळ हों पाहे पावक । परी तें आंगींचें दाहक । टाकणें अटक तयातें ॥६३॥तैसा दुस्त्यज स्वभाव । तामसयोनीं प्रादुर्भाव । तुवांचि निर्मिला हा समुदाव । मायालाघवप्रसंगें ॥६४॥त्वया सृष्टमिदं विश्वं धातर्गुणविसर्जनम् । नानास्वभाववीर्यौजोयोनिबीजाशयाकृति ॥५७॥प्रभो तुवां हे सृजिलें । तेव्हांचि गुणभेद विविध केले । तदनुरूप सर्जन झालें । तें पालटिलें नव जाये ॥६६५॥अश्व श्वान खंडेराव । खांडा म्हाळसा आभरणें सर्व । एक सुवर्ण असतां ठाव । भरला गांव भेदाचा ॥६६॥तेथ कोरितां ठसा प्रथम । कोठें होय तें रूप नाम । मग त्या ठसां वेढितां हेम । उमटे समसाम्य अवघेंची ॥६७॥तैसे अवघे योनिभेद । करावया तूंचि कोविद । प्रवृत्तिव्यवहारविभाग । विविध बोधूनि विशद वेगळा ॥६८॥गुणानुसार कर्में विचित्र । कर्मास्तव प्रारब्धतंत्र । नानास्वभाव पृथगाकार । वीर्यशौर्यप्रतापें ॥६९॥वेगळाल्या मतिशक्ति । योनिभेद देहाकृति । वैरें मित्रें कर्मप्रवृत्ति । पृथगाकृति पसरिल्या ॥६७०॥परस्परें जातिवैरें । कर्मतंत्रें पृथगाकारें । भूतें चेष्टती संस्कारें । परी तूं अंतरें वसविसी ॥७१॥मणि माळेचे भिन्नभिन्न । सूत्रामाजि ते अभिन्न । तैसा जगीं तूं जगज्जीवन । सर्वीं सर्वज्ञ सर्वात्मा ॥७२॥कुतरें उबगोनि कुतरेपणा । टाकावया करितां यत्ना । खंडेरायपदवी जाणा । त्यासि कोण देववे ॥७३॥एरवीं असे एक्याचि मानें । खंडेरायाशीं काय तें उणें । निर्मिलीं एकाच सुवर्णें । सर्वाभरणें समवेत ॥७४॥वयं च तत्र भगवन् जातुरुमन्यवः । कथं त्यजामस्त्वन्मायां दुस्त्यजां मोहिताः स्वयम् ॥५८॥अनंतअचिंत्यगुणपरिपूर्णा । निखिलैश्वर्यसंपन्ना । श्रीभगवंता तुजवीण कोणा । आमुची करुणा उपजेल ॥६७५॥तुवां निर्मिलें चराचर । त्यामाजि सर्पयोनि घोर । शीघ्रकोपी आम्ही विखार । भयंकर सर्वांसी ॥७६॥त्या आमुच्या घोरपणां । टाकूं न शकों जी सर्वज्ञा । तुझे मायेच्या मोहना । तुजविण कोणा निरसवे ॥७७॥मायामोहें मोहून आम्हां । योजिलें निसर्गजनितधर्मा । टाकों न शकों उग्रकर्मा । हा दुस्त्यज महिमा मायेचा ॥७८॥भाग्यें लाधलों तव पदपांसु । तेणें उजळला ज्ञानदिवसु । जेणें तव कृपेचा अमृतलेशु । वांछूं विशेषु या देहीं ॥७९॥एरवीं आम्ही तामसयोनि । पडिलों मायेच्या बंधनीं । आतां जाणों तुजवांचोनी । माया कोणी निरसीना ॥६८०॥भवान् हि कारणं तत्र सर्वज्ञो जगदीश्वरः । अनुग्रहं निग्रहं वा मन्यसे तद्विधेहि नः ॥५९॥तूं मायेचें कारण । मायानियंता सर्वज्ञ । जगदुत्पत्तिस्थितिनिदान । करणें जाण तुज अवघें ॥८१॥उग्रस्वभाव दुस्त्यज आम्हां । परी तूं स्वसत्ता परमात्मा । पालटूनि सौम्यधर्मा । लावीं नियमा अनुग्रहें ॥८२॥अनुग्रह निग्रह करूनि बळें । जातीमाजूनि वेगळें । आम्हां आणूनि सौम्यमाळे । सत्ता स्वलीले चेष्टवीं ॥८३॥निग्रह अनुग्रह हे दोन्ही । यांमाजि रुचे अंतःकरणीं । तेंचि करूनि चक्रपाणि । स्वदासगणीं मज लेखीं ॥८४॥ऐसी करुणा भाकितां फणी । कृपे द्रवला चक्रपाणि । काय बोलिला मधुरवाणी । तें नृपाकर्णीं शुक घाली ॥६८५॥श्रीशुक उवाच - इत्याकर्ण्य वचः प्राह भगवान् कार्यमानुषः । नात्र स्थेयं त्वया सर्प समुद्रं याहि मा चिरम् ॥६०॥देवकार्यार्थ मनुष्यपणा । जो निजांगीं लेइला जाणा । तेणें ऐकोनि कालियवचना । केली आज्ञा ते ऐका ॥८६॥म्हणे रे सर्पा क्रूरमति । यमुनाह्रदीं त्वां न कीजे वसति । शीघ्र जावें समुद्राप्रति । आज्ञा निश्चिती माझी हे ॥८७॥स्वज्ञात्यपत्यदाराढ्यो गोनृभिर्भुज्यते नदी । य एतत्संस्मरेन्मर्त्यस्तुभ्यं मदनुशासनम् ।कीर्तयन्नुभयोः संध्योर्न युष्मद्भयमाप्नुयात् ॥६१॥आपुले स्वजन सुहृदज्ञाति । घेऊनि कलत्रें संतति । शीघ्र जावें समुद्राप्रति । एथें वसति न करावी ॥८८॥तुज येथूनि गेलिया पाठीं । गाई मनुष्यें जीवकोटि । स्वेच्छा क्रीडती यमुनेपोटीं । भयाची गोठी न धरूनी ॥८९॥आणिक ऐकें आज्ञापन । तुजकारणें अनुशासन । जें म्यां केलें त्याचें पठन । करिती पूर्ण सद्भावें ॥६९०॥प्रथम करूनि निग्रह । पुढतीं केला अनुग्रह । नागपत्न्यांचा स्तवनोत्साह । एतत्समूहपूर्वक ॥९१॥सायं प्रातरुभयकाळीं । नित्य नियमें वदनकमळीं । जे जे पढती पुण्यशाली । त्यां निजमौळीं वंदिजे ॥९२॥तुम्हीं माझिये आज्ञेवरून । त्यांचें करावें संरक्षण । भय नेदावें अणुप्रमाण । अनुशासन चालविजे ॥९३॥ऐसा करूनि आज्ञानियम । पुन्हा वर दे पुरुषोत्तम । जेणें हरे संसारश्रम । उपाय सुगम तो ऐका ॥९४॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP