मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १६ वा| श्लोक २८ ते ३१ अध्याय १६ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३८ श्लोक ३९ ते ४३ श्लोक ४४ ते ४७ श्लोक ४८ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६७ अध्याय १६ वा - श्लोक २८ ते ३१ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २८ ते ३१ Translation - भाषांतर यद्यच्छिरो न नमतेंऽग शतैकशीर्ष्णस्तत्तन्ममर्द खरदंडधरोंऽध्रिपातैः ।क्षीणायुषो भ्रमत उल्बणमास्यतोऽसङ्नस्तो वमन् परमकश्मलमाप नागः ॥२८॥शतैक फणांचें जुंबाड । ऐसा कालिय मोठें धूड । हरिपदविन्यास पडतां दृढ । झालें अवघड त्यालगीं ॥४८॥क्षीण झाली विक्रमशक्ति । प्राणप्रवाहीं विकळ गति । ऐसा क्षीणायु दुर्मति । पुढती पुढती उफाळे ॥४९॥अद्यापिही सर्पजाति । मारूनि टाकिल्याही क्षितीं । वायु पिऊनि पुन्हां उठती । वैर चित्तीं स्मरोनी ॥३५०॥यालागीं मारितां भुजंगम । मौळकुट्टन मुख्य वर्म । हें जाणोनि मेघश्याम । दावी संभ्रम नृत्याचा ॥५१॥कालियफणांचें कुट्टन । संगीतसंमत नाट्यनतन । ऐसें अघटित ज्याचें घटन । यास्तव सुरगण ओळघती ॥५२॥भक्त सद्भावें सेविती चरण । तेणें त्यांचें मदापहरन । विमुख दुर्मदें दुर्जन । ते श्रीचरण न भजती ॥५३॥त्यांचे उद्धरणीं तत्पर । तो कृष्ण खळदंडधर । निजांघ्रिभजनीं करी तत्पर । पदव्यापारनर्तनें ॥५४॥क्रोध दावूनि भीषण । इच्छूनि शिशूचें कल्याण । औषध देतां करी ताडन । तैसें कुट्टन फणांचें ॥३५५॥सात्त्विक क्षमस्वी प्रेमळ । राजस विरहें ध्यानशील । तामस द्वेषें पोटीं कुटिळ । तारी गोपाळ विरोधें ॥५६॥क्षीणायुषही झालिया सर्प । तरी न सांडी स्वजातिदर्प । एवढा मांडल्या प्राणकल्प । फणा अल्प न नमवी ॥५७॥जो जो नम्र नव्हे माथा । त्यावरी नाचे मन्मथजनिता । पादप्रहाराच्या निघाता । वज्रपातासम ओपी ॥५८॥नृत्यच्छळें भुलवी सुरां । पदीं लववी सर्पशिरां । तेव्हां सर्वांगीं भेदरा । झाला घाबरा फणिवर्य ॥५९॥फणावरी पडतां पादप्रहार । कालिय वदनें वमी रुधिर । नाकीं सुटले रक्तपाझर । दुःख दुर्धर पावला ॥३६०॥परम वैक्लव्य पावला नाग । अनावर क्रोधोमींचा वेग । तेणें पुन्हा उत्तमांग । उचली सवेग झोंबावया ॥६१॥तस्याक्षिभिर्गरलमुद्वमतः शिरःसु यद्यत्समुन्नमति निश्वसतो रुषोच्चैः ।नृत्यन्पदाऽनुनमयन् दमयांबभूव पुष्पैः प्रपूजित इवेह पुमान् पुराणः ॥२९॥उच्छ्वासोनि रोषावेशें । नेत्रद्वारें वमित विषें । भग्नपराक्रमाचेनि शोषें । ज्वाला मुखें सांडित ॥६२॥जीं जीं ऊर्ध्व उभारी मौळें । त्यांच्या ठायीं नर्तनच्छळें । पादप्रहाराच्या सुताळें । बळें गोपाळें नमविलीं ॥६३॥निजकारणीं संघटे मीठ । तेव्हां काठिन्याचा धरी वीट । तैसा विश्वकारण वैकुंठ । करी सपाट फणिदर्प ॥६४॥पदीं ठेंचूनि सर्पमुखें । स्वेच्छा नाचतां आदिपुरुषें । तेव्हां सुरगणीं संतोषें । अर्चाविशेषें पूजिला ॥३६५॥यमुना पयोब्धिसमान । कालियमाथां श्रीभगवान । आदिपुरुष शेषासम । जाणोनि सुरगण तोषले ॥६६॥आदिपुरुष शेषावरी । तैसा यशोदातनय हरि । देवीं जाणोनि निजकैवारी । सर्वोपचारीं पूजिला ॥६७॥कीं गंधर्वादि निर्जरवरीं । पूजिला पुष्पादि दिव्योपचारीं । वृद्ध पुराण गोपनिकरीं । पुरुषापरी लक्षिला ॥६८॥गर्गवाक्याच्या संस्मरणें । आदिपुरुष अंतःकरणें । देखोनि स्वानंदभरित करणें । पूजोपकरणें अर्चिला ॥६९॥नाना वाद्यांचे करूनि गजर । पुष्पें वर्षती सुरवर । आपादमाळा दिव्योपहार । सुरीं श्रीधर अर्चिला ॥३७०॥ऐसा अर्चिलियाचेच परी । प्रसन्न होत्साता श्रीहरि । सर्पदमनें सर्वां परी । होय हितकारी सर्वात्मा ॥७१॥तच्चित्रतांडवविरुग्णफणातपत्रो रक्तं मुखैरुरु वमन्नृप भग्नगात्रः ।स्मृत्वा चराचरगुरुं पुरुषं पुराणं नारायणं तमरणं मनसा जगाम ॥३०॥थरक चाचरी भवरी तिरप । खांडव वोडव गिरडी झंप । विचित्र तांडवाचें रूप । मन्मथबाप दावितां ॥७२॥तया चित्रतांडवेंकरून । फणातपत्रें झालीं विशीर्ण । मूर्च्छा पावे जैसें रुग्ण । तैसा क्षीण फणी झाला ॥७३॥भग्न झालीं सकळ गात्रें । रुधिरें वमिती अवघीं वक्त्रें । विसंज्ञ पडतां सुकृततंत्रें । स्मरणसूत्रें योजिला ॥७४॥योनिसंकटापासूनि सुटे । विसंज्ञ गाढ मूर्च्छा दाटे । सोऽहंस्मरण पूर्वील आटे । कोऽहं उमटे ज्यापरी ॥३७५॥तैशी हरीच्या पादप्रहारीं । तमोयोनीची दुर्दर्प लहरि । भंगोनि पडिला विकलगात्रीं । मूर्च्छा शरीरीं प्राणांत ॥७६॥मूर्च्छेमाजींही दैवागळा । म्हणोनि सुकृतें आलीं फळां । तेणें स्मरणाचा जिव्हाळा । उदया आला ते काळीं ॥७७॥कीं हरीचा श्रीपादमहिमा । तेणें छेदून रजस्तमा । पात्र करूनि स्मरणधर्मा । पुरुषोत्तमा स्मरविलें ॥७८॥जेथूनि जन्म स्थिरजंगमा । चराचरगुरु जो चिदात्मा । तो आठवला भुजंगमा । स्मरणधर्मामाजिवडा ॥७९॥स्मरोनि आदिपुरुष पुराण । चराचरगुरु नारायण । कालिय जाता झाला शरण । मनेंकरून ते काळीं ॥३८०॥नेत्रीं मूर्च्छेची झांपडी । अनुघडी मुद्रा पडिली तोंडीं । वळली देहाची मुरकुंडी । विसंज्ञ तांडीं करणांचीं ॥८१॥लिंगदेहीं श्रीभगवान । स्मरोनि जाता झाला शरण । देखोनि येसणें निर्वाण । नागिणीगण घाबिरला ॥८२॥कृष्णस्य गर्भजगतोऽतिभरावसन्नं पार्ष्णिप्रहारपरिरुग्ण फणातपत्रम् ।दृष्ट्वाहिमाद्यमुपसेदुरमुष्य पत्न्य आर्ताः श्लथद्वसनभूषणकेशबंधाः ॥३१॥ज्याचे उदरीं अवघें जग । त्याचे गरिष्ठ पार्ष्णिभाग । लागतां सर्पाचें उत्तमांग । झालें सर्वांग विशीर्ण ॥८३॥आतपत्रप्राय फणी । वरी नाचतां चक्रपाणि गुरुतर टांचांच्या कुट्टनीं । प्राणहानि ओढवली ॥८४॥ऐशिया मूर्च्छिता सर्पातें । देखोनि त्याचिया पत्न्या तेथें । आश्रयिती श्रीकृष्णातें । आर्तचित्तें विह्वळा ॥३८५॥देखोनि पतीचें निर्वाण । मूर्च्छातग विकलप्राण । तेणें झाला कंपायमान । गेली उतरोन तनुपुष्टि ॥८६॥वस्त्रें भूषणें झालीं शिथिल । गळालें आंगींचें धैर्यबळ । पुष्पग्रथित होतें मौळ । तेंही केवळ विखुरलें ॥८७॥देखोनि पतीची निर्वाण व्यथा । ऐशिया उद्विग्न नागवनिता । आदिपुरुषा श्रीकृष्णनाथा । शरण जात्या जाहल्या ॥८८॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP