मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १६ वा| श्लोक ८ ते १० अध्याय १६ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३८ श्लोक ३९ ते ४३ श्लोक ४४ ते ४७ श्लोक ४८ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६७ अध्याय १६ वा - श्लोक ८ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ८ ते १० Translation - भाषांतर तस्मिन् ह्रदे विहरतो भुजदंडधूर्णवार्घोषमंगवरवारणविक्रमस्य । आश्रुत्य तत्स्वसदनाभिभवं निरीक्ष्य चक्षुःश्रवाः समसरत्तदमृष्यमाणः ॥८॥जैसा क्षीराब्धीच्या मथनीं । मंदराचळाचे संघर्षणीं । ऐरावत डहुळी पाणी । चक्रपाणि तेवीं ह्रदीं ॥४॥वरवारणविक्रम हरि । तया महाह्रदामाझारीं । स्वेच्छें विचरे बाहुप्रहारीं । क्षोभवी वारि प्रतापें ॥१०५॥प्रचंड बाहूचीं ताडणें । जळ आंदोळे ह्रदींच तेणें । शंखमथनीं वेदोद्धरणें । सिंधु डहुळणें ज्यापरी ॥६॥दधि शोधूनि भरिलें भांड । मथनीं कालवे भाण्डीं मंड । तेवीं बाहुताडनें प्रचंड । ह्रद उदंड डहुळला ॥७॥कुक्षीं खबाडीं सखोल चोढें । तेथ आदळती प्रचंड । जेंवि मेरूचे खचती कडे । तेणें पाडें जळ आदळे ॥८॥तळील रेंदा बहु जुनाट । डहुळोनि डोहीं झाला बरट । हेलावतां जळाचे लोट । ह्रदाचे कांठ ढांसळले ॥९॥तेणें पाणी झालें समळ । माजीं सर्पांचें दुःसह गरळ । गगनगर्भीं उठती ज्वाळ । ग्रहमंडळपर्यंत ॥११०॥काळे निळे हिरवे पिंवळे । ज्वाळा भासती नभपोकले । चंद्रमंदळ जाहलें काळें । संतापलें रविवलय ॥११॥ऐसा श्रीकृष्ण महाबाहो । बाहुताडनें क्षोभवी डोहो । तेणें खवळला सर्पसमूह । आणि दुःसह कालिया ॥१२॥बाहुताडनें प्रचंड ध्वनि । चक्षुःश्रवा ऐकोनि नयनीं । विघ्न उदेलें आपुले भुवनीं । ऐसें देखोनि क्षोभला ॥१३॥तामसयोनि सर्पयाति । विषोल्बण सक्रोधवृत्ति । केवळ असहिष्णुतेची मूर्ति । दुर्लभ शांति जयातें ॥१४॥दारुयंत्रीं अग्नि भेटे । भडका उठे कडकडाटें । परोत्कर्षासरिसा नेटें । तेंवि फुंपाटे स्वभावें ॥११५॥कृष्णबाहूच्या प्रचंडप्रवाहें । जल ताडितां घोषगर्जरें । तें न साहोनिया सत्वरें । क्षोभें थोरें खवळला ॥१६॥आपुला सांडुनिया ठाव । कृष्णावरी घातले एकव । जैशी विद्युल्लतेची धांव । सक्रोध जव त्याहूनी ॥१७॥लवणार्णवाचें शोषण । करावया श्रीरामबाण । तैसा क्रोधें प्रज्वळोन । आला धांवोन कालिया ॥१८॥ज्याचे वाफे ग्रहमंडळें । करपती ऐसे प्रदीप्त डोळे । फूत्काराच्या प्रळयानळें । गगनीं उसळें ह्रदवारि ॥१९॥प्रावॄट्कुहूमाजि चपळा । दाऊनि लपवी दिग्मंडळा । निमेषोन्मेष तैसे डोळां । दावी काळा अहि डोहीं ॥१२०॥विषकदर्में समळ जळ । विशेष प्रचंड काळा व्याळ । तथापि नेत्रांचे बंबाळ । प्रळयानळ उजळिती ॥२१॥तं प्रेक्षणीयसुकुमारघनावदातं श्रीवत्सपीतवसनं स्मितसुंदरास्यम् ।क्रीडंतमप्रतिभयं कमलोदरांघ्रिं संदश्य मर्मसु रुषा भुजया चछाद ॥९॥ऐसा कालियाचा यांवा । येऊनि कवळी वासुदेवा । तये मूर्तीच्या अवयवां । कुरुपुंगवा परियेसीं ॥२२॥कृष्ण प्रेक्षणीय म्हणाल कैसा । ज्याच्या दृष्टींत भरल्या ठसा । पुन्हा न देखे विश्वाभासा । पावे समरसा हरिरूपीं ॥२३॥चक्षुहूनि मृदुलपणें । विश्वनयनीं ज्या नांदणें । परंतु कोणा खुपों नेणे । सुकुमारपणें श्रीकृष्ण ॥२४॥व्योमगर्भींचें पोकळपण । त्यामाजीं नांदे जो कां सघन । तेणें रंगे जो चिद्घन । सुखनिधान सन्मूर्ति ॥१२५॥ज्ञानशक्तीचें सोज्वळपण । तेंचि हृदयीं श्रीवत्सचिह्न । भूतदयेचें पीतवसन । शोभायमान सर्वत्र ॥२६॥आनंदाचें अधिष्ठान । श्रीकृष्णाचें स्मितानन । सर्वात्मकत्वें निर्भय पूर्ण । ज्याचें क्रीडन अभेदें ॥२७॥प्रेमळाचें हृदयकमळ । त्याच्या उदराहूनि कोमळ । श्रीकृष्णाचें चरणतळ । जेथ अळिउळ सनकादिक ॥२८॥जेथींचा आमोद आस्वादितां । उडोनि जाती चारी अवस्था । पुन्हा भेद नुघवी माथा । एकात्मता सहजेंची ॥२९॥ऐसा लावण्याचा राशि । पाहों आवडे डोळ्यांसी । मेघश्याम सुंदरवेशी । कोमलांगेंशीं सुकुमार ॥१३०॥मेघश्याम राजीवनेत्र । वक्षीं श्रीवत्सचिह्न पवित्र । कांसे मिरवे पीतांबर । स्मितसुंदर मुखकमळ ॥३१॥आजानुबाहु मृदुल चरण । कमलगर्भींचें सकुमारपण । कृष्णचरणांतें देखोन । तेंही लाजोन राहिलें ॥३२॥सुरवारण मंदाकिनी - । माजीं क्रीडे पंकजवनीं । डोहीं तैसा चक्रपाणि । निर्भयपणीं क्रीडतसे ॥३३॥अप्रतिमल्ल श्रीकृष्ण एक । तो कोणाचा वाहेल धाक । ऐशियातें कृष्णपन्नक । वर्मीं सम्यक झोंबला ॥३४॥कंठनाळीं हृदयकमळीं । अंगुष्ठसंधीं बाहुमूळीं । नाभिदेशीं पादयुगळीं । डंखी तत्काळीं सक्रोधें ॥१३५॥क्षोभे ऐसा शतशा वक्त्रीं । कृष्ण डंखिला सर्व गात्रीं । मथनीं मंथा गुंडिती सूत्रीं । कृष्ण त्यापरी अहिभोगें ॥३६॥भयांगुष्ठापासूनि कंठ - । पर्यंत गुंडिला कंबुकंठ । कालियशरीर तें कर्कोट । तेणें उद्भट कर्षिला ॥३७॥तया अगाध ह्रदाकाशीं । विश्वाह्लादक कृष्णशशी । कालियराहु बळें ग्रासी । वदनकलेसि उरलासे ॥३८॥तं नागभोगपरिवीतमदृष्टचेष्टमालोक्य तत्प्रियसखाः पशुपा भृशार्ताः ।कृष्णेऽर्पितात्मसुहृदर्थकलत्रकामा दुःखानुशोकभयमूढधियो निपेतुः ॥१०॥नागभोगें वेष्टिलें गात्र । निश्चेष्टित दिसे वक्त्र । विवर्ण न हालती नेत्र । देखोनि मित्र गजवजिले ॥३९॥देखोनि कृष्णातें अचेष्ट । प्राणप्रिय जे पशुप इष्ट । त्यांसि झाले परम कष्ट । ते न स्पष्ट बोलवती ॥१४०॥तो श्रीकृष्ण करूनि सखा । जे विटले विषयसुखा । कृष्णविरहें त्यांचिया दुःखा । आकल्प लेखा न करवे ॥४१॥कृष्णीं होऊनि आत्मार्पण । सुहृद्भावें भजले कृष्ण । कृष्णा वेगळा अर्थ कोण । अणुप्रमाण नेणती ॥४२॥कृष्णीं मिनले कलत्रभावें । जें कां आत्मनिवेदन नववें । पात्र झाले ते ये सेवे । काम आघवे हरिरूपीं ॥४३॥पशु म्हणिजे इंद्रियगण । जे रक्षिती सांवरून । कृष्णविरहें ते पशुप जाण । विगतप्राण जाहले ॥४४॥आत्महानि येसणें दुःख । तदनुलक्षें करोती शोक । पोटीं भयाचा भरला धाक । धाकें विवेक हारपला ॥१४५॥अविवेकें ग्रासिली बुद्धि । नोहे आपुली आपणा शुद्धि । भुलोनि स्वविसरें उपाधि । गाढमूढ जाहले ॥४६॥स्मृतिभ्रंशें गाढमूढ । अवघे होऊनि पडिले दगड । अग्नि कोळसोनि होय गूढ । तैसे रूढ शव जाले ॥४७॥संवगड्यांची हे अवस्था । व्रजीं कथावी कोणें वार्ता । आतां गोधनाची कैशी कथा । ते नृपनाथा ॥४८॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP