मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १६ वा| श्लोक ३२ ते ३५ अध्याय १६ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३८ श्लोक ३९ ते ४३ श्लोक ४४ ते ४७ श्लोक ४८ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६७ अध्याय १६ वा - श्लोक ३२ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३२ ते ३५ Translation - भाषांतर तास्तं सुविग्नमनसोऽथ पुरस्कृतार्भाः कायं निधाय भुवि भूतपतिं प्रणेमुः ।साध्व्यः कृतांजलिपुटाः शमलस्य भर्तुर्मोक्षेप्सवः शरणदं शरणं प्रपन्नाः ॥३२॥मग त्या कृष्णातें समस्ता । भर्तृदुःखें व्याकुळचित्ता । शरण रिघाल्या होत्सात्या । नमिती तत्त्वतां तें ऐका ॥८९॥सौभाग्यमानससरोजिनी । भर्तृवेक्लव्यवडवाग्नि । तेणें पावतां अहाळणी । विषण्णमानसा जालिया ॥३९०॥अकारपूर्वकपतिव्रता । त्या नेणती ऐशी व्यथा । तैशा नव्हती नागवनिता । अतिसंतप्ता वरदुःखें ॥९१॥धन्य साध्व्या नागपत्न्या । प्राप्तसंकटीं करिती यत्ना । पुढें करूनि पुत्रकन्या । पतिमोक्षणा प्रवर्तल्या ॥९२॥भर्तृदुःखें ज्यां संकट । मुखम्लानता ग्लानि प्रकट । करूनि वंदिती वैकुंठ । अंजलिपुट जोडुनि ॥९३॥मूर्च्छा दाटतां शरीरीं । प्रेता ऐसा उदकावरी । कालिय देखोनि सवेग तीरीं । सर्पसुंदरी पातल्या ॥९४॥मग भूमीवरी दंडप्राय । नागिणी पसरूनि आपुले काय । नमस्कारिती भूतमय । भूताश्रय भूतात्मा ॥३९५॥अनाश्रितां जो आश्रयप्रद । वंदकां वंद्य शरणां सुखद । दंडप्राय नागिणिवृंद । तो गोविंद अभिवंदिती ॥९६॥निसर्गदुर्मतीपासून । होआवया पतीचें मोक्षण । दुरात्मयाचें दुष्टाचरण । तें क्षमापन करावया ॥९७॥पापमतीस्तव जे जे सर्पें । अपराध केले जे जे दर्पें । ते ते क्षमूनि कंदर्पबापें । पति सुकृपें सोडावा ॥९८॥ऐसें इच्छूनि अभ्यंतरीं । श्रीकृष्णातें सर्पनारी । नमित्या झाल्या दंडापरी । यमुनेबाहेरी येऊनी ॥९९॥देखोनि सकोप श्रीपति । तत्तोषार्थ प्रथम स्तुति । कृतपराध आपुला पति । नागिणी म्हणती दंडार्ह ॥४००॥नागपत्न्य ऊचु :- न्याय्यो हि दंडः कृतकिल्बिषेऽस्मिंस्तवावतारः खलनिग्रहाय । रिपोः सुतानामपि तुल्यदृष्टेर्धत्से दमं खलमेवानुशंसन् ॥३३॥पक्षिपन्नगादि कित्येक योनि । सहज नैसर्गिक ज्ञानी । पुण्यात्मका या नागिणी । सिद्धयोगिनी निष्पाणा ॥१॥ब्रह्मादिदेवां दुर्लभ हरि । त्या तोषविती स्तवनोत्तरीं । साम पंचविधा कुसरी । सर्पसुंदरी सभाग्या ॥२॥हरीवरी न ठेवूनि शब्द । साहा श्लोकीं दंडानुमोद । त्यामाजीं साम पंचविध । करूनि विशद बोलती ॥३॥तयापुढें श्लोकदशकें । स्तवित्या झाल्या नमनात्मकें । त्यानंतर पांचां श्लोकें । करिती स्वमुखें प्रार्थना ॥४॥एवं अवघे एकवीस श्लोक । वदल्या नागिणी सम्यक । तोषवूनि यदुनायक । तिहीं पन्नग सोडविला ॥४०५॥दंडानुमोद तेथ प्रथम । पंचलक्षण जें कां साम । तत्पूर्वक पुरुषोत्तम । स्तविती सप्रेम पद्मिनी ॥६॥संबंध लाभ आणि उपकृति । चौथी अभेद स्नेहाभिव्यक्ति । पांचवी बोलिजे गुणकीर्ति । साम म्हणती पंचधा ॥७॥प्रथम त्यामाजि संबंध । म्हणती कालिय सापराध । दंडा योग्य हा प्रसिद्ध । सहसा विरुद्ध न मानूं ॥८॥खलनिग्रहणाचि कारणें । स्वामी तुझें अवतार धरणें । खलक्रियानिसर्गाचरणें । दंडाकारणें योग्य हा ॥९॥दंड्य देखोनि दंड न करी । तरी तो कैसा दंडधारी । नैसर्गिक खलाचारी । म्हणोनि श्रीहरि हा दंड्य ॥४१०॥न्याय्य संबंध दंड्यदंडक । परी तूं परम कारुणिक । खलत्व झाडूनि निष्टंक । सर्वात्मक सुखदानी ॥११॥शत्रु अथवा औरस प्रजा । खलत्व दंडूनि गरुडध्वजा । समान ओपिसी निजगुजा । ऐसा तुझा निजमहिमा ॥१२॥खलत्वाचेंचि प्रशंसन । करिसी करूनियां दंडन । तुल्यदृष्टि हें अभिधान । एरव्हीं जाण तुज साजे ॥१३॥शत्रुपुत्रां समान पाहणें । खलत्व पाहोनि दंड धरणें । माउलीहूनि स्नेहाळपणें । संरक्षणें कारुण्यें ॥१४॥तेथ विषम मानिती मूर्ख । खलत्व निरसूनि निःशेष । तुवां ओपिलें परम सुख । जें निर्दोष अक्षय्य ॥४१५॥अनुग्रहोऽयं कृतो हि नो दंडोऽसतो ते खलु कल्मषापहः । यद्दंदशूकत्वममुष्य देहिनः क्रोधोऽपि तेऽनुग्रह एव संमतः ॥३४॥दंड्यदंडकसंबंध कथिला । ना तो केवळ अनुग्रह केला । दैवें दुर्लभ लाभ झाला । क्रोध दाविला कृपेनें ॥१६॥आतां निग्रह नव्हे हा सहसा । पूर्णानुग्रह श्रीपरेशा । म्हणसी प्राणांत मांडल्या कैसा । निग्रह ऐसा न मनावा ॥१७॥तरी कां दंड न वटे आम्हां । तें तूं ऐकें मेघश्यामा । सर्पयोनि ते पापात्मा । परी पुण्यात्मा सर्प हा ॥१८॥दुष्टांलागीं कल्मषनाशा । तूं दंडिसी हृषीकेशा । वरिवरी वाटे क्रोध ऐसा । परी संतोषा प्रापक ॥१९॥तुवां सर्पासि केला दंड । तेणें झाला दुष्कृतखंड । दंदशूकत्व दिसे उघड । जे जड मूढ तमोयोनि ॥४२०॥इतुकें मात्र कल्मषमूळ । चरणस्पर्शें तें निर्मळ । करूनि दिधला तोष बहळ । चरणकमलप्राप्तीचा ॥२१॥ऐसा दुर्लभ लाभ झाला । आम्हां तामसां सर्पकुळां । सुकृतसंग्रह काय याला । पूर्वी घडला हें न कळे ॥२२॥तपः सुतप्तं किमनेन पूर्वं निरस्तमानेन च मानदेन ।धर्मोऽथवा सर्वजनानुकंपया यतो भवांस्तुष्यति सर्वजीवः ॥३५॥प्राप्त असतां सर्पदेह । तेथ हा महदनुग्रह । कोण पूर्वपुण्याचा समूह । जेणें पुण्याह उगवला ॥२३॥तें कालियाचें पूर्वपुण्य । अभिनंदिती प्रशंसून । दुष्करतपोमय गहन । कीं दुजें जाण धर्ममय ॥२४॥पूर्वीं येणें निरभिमान । होऊनि केलें तपश्चरण । देऊनि सर्वांसि सन्मान । जगजीवन तोषविला ॥४२५॥तपश्चरणीं अहंता उठे । तो तें करी मग उफराटें । सुकृत म्हणतां दुष्कृत भेटे । निःशेष आटे सुखलाभ ॥२६॥होऊनि निरभिमान चित्तीं । मान देऊनि सर्वभूतीं । ऐसी तपश्चर्या जे जे करिती । ते ते होती हरिप्रिय ॥२७॥तस्मात येणें निरभिमानें । सर्व भूतांच्या सन्मानें । संपादिलीं तपश्चरणें । हरितोषणें सुष्ठुत्वें ॥२८॥तप्तकृच्छ्रें सांतपनें । विष्णुपंचकें चांद्रायणें । मासोपवासादि अनशनें । जलशीतोष्ण साहोनी ॥२९॥अथवा धर्मामाजीं परम । अहिंसाधर्म उत्तमोत्तम । सर्वभूतीं आत्माराम । जाणोनि सौम्य वर्तनें ॥४३०॥भूतमात्रीं सदयपणें । केवीं आचरों शकिजे कोणें । एथें गुंतती शहाणे । विहिताचरणें भ्रमोनी ॥३१॥गाईसाठीं कापितां तृण । ब्राह्मणासाठीं कांडितां कण । शुद्ध्यर्थ करितां संमार्जन । सदयपण केविं राहे ॥३२॥तरी येथींचें इतुकें वर्म । सांडूनि देहबुद्धीचा भ्रम । सर्वभूतीं आत्माराम । पाहतां सुगम अहिंसा ॥३३॥देह नहोनि जें जें करणें । तें तें प्रारब्धें चेष्टणें । घडे केवळ निरभिमानें । सदयपणें सर्वत्र ॥३४॥कृपा करूनि सर्वभूतीं । सोडिली तनूची अहंमति । जैसें प्रेषोच्चारीं यति । अभय ओपिती सर्वांतें ॥४३५॥देहीं मरोनि ज्याचें जिणें । सर्वभूतीं आत्मपणें । भगवत्प्रेमें जें वर्तणें । तो धर्म म्हणे अहिंसक ॥३६॥ऐसा मनोजयें श्रीहरि । तोषविला पैं जन्मांतरीं । तया पुण्याची सामग्री । होती पदरीं गमतसे ॥३७॥असो ऐसें सुकृत काये । हें वितर्कें लक्षा नये । परंतु लाभला तुझे पाये । भाग्यें न माये ब्रह्मांडीं ॥३८॥ऐशी लाभा करूनि व्यक्ति । यावरी तिसरी उपकृति । नागपत्न्या निरूपिती । तेही श्रोतीं परिसावी ॥३९॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP