मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १६ वा| श्लोक १६ ते २० अध्याय १६ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३८ श्लोक ३९ ते ४३ श्लोक ४४ ते ४७ श्लोक ४८ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६७ अध्याय १६ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर तांस्तथा कातरान् वीक्ष्य भगवान्माधवो बलः । प्रहस्य किम्चिन्नोवाच प्रभावज्ञोऽनुजस्य सः ॥१६॥मधुवंशज संकर्षण । म्हणोनि माधव हें अभिधान । स्वस्थचित्तें हास्यवदन । जाणे महिमान अनुजाचें ॥२०५॥कृष्णविरहें दुःखाभिभूतें । राम देखोनि समस्तांतें । कृष्णप्रभाव जाणें चित्तें । परी कोणातें प्रकटीना ॥६॥मनुजाकृति नटले पूर्ण । षड्गुणैश्वर्यें संपन्न । परस्परें ते प्रभावज्ञ । परी रहस्यकथन न करिती ॥७॥तेऽन्वेषमाणा दयितं कृष्णं सूचितया पदैः । भगवल्लक्षणैर्जग्मुः पदव्या यमुनातटम् ॥१७॥जो कां जीवाचें जीवन । मनादिकरणांचा जो प्रान । सर्वां प्रियतम चैतन्यघन । तो आत्मा श्रीकृष्ण पढियंता ॥८॥त्या प्राणप्रिया श्रीकृष्णातें । विरहें व्रजौकसें दुःखितें । सैरा काननीं हुडकित । मोहभ्रांतें चालिलीं ॥९॥एथें कृष्णें चारिल्या गायी । कृष्ण बैसला इये सायीं । कृष्ण क्रीडला इये भोयीं । देहुडा पायीं ठाकला ॥२१०॥कृष्णें एथें वाहिला वेणु । त्याची अद्यापि पहा खूण । गोधनीं न सेविलें हें तृण । परी भूमीसि चरण उमटलें ॥११॥व्याघ्रवृकादि हिंस्र जाति । त्यांचे चरण उमटले क्षिती । वेणुवेधें त्यां बाणली शांति । निसर्गवृत्ति उपरमे ॥१२॥ऐसें पाहती स्थळोस्थळीं । स्नेहसशोक जाती विकळीं । भुली मोहाची आगळी । कीं वनमाळी आळविती ॥१३॥एथें पुष्पें तुरंबिलीं । एथें कृष्णें फळें वेचिलीं । एथें कृष्णें निद्रा केली । तृणें दडपलीं तद्व्याजें ॥१४॥जें जें पुढें दृश्य दिसे । तें तें कृष्णचि त्यांतें भासे । कृष्णवेधें झाले पिसे । दीर्घघोषें आळविती ॥२१५॥कृष्ण पुसती तुरगाउरगा । शशका मशका नागा नगा । भृंगा कुरंगा विहंगा । म्हणती श्रीरंगा देखिलें ॥१६॥गुल्म लता तृणें वल्ली । लागलीं कृष्णाच्या पाउलीं । तेणें रंगें सुरंग झालीं । कृष्णचालीप्रसंगें ॥१७॥भोंवता गोपाळांचा थवा । आणि पशूंचा मेळावा । माजीं कृष्णाचा मागोवा । देखोनि धांवा धांवती ॥१८॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । तो हा श्रीकृष्णभगवान । त्याच्या पदाचें जाणोनि चिह्न । गौळी सज्ञान धांवती ॥१९॥जिहीं चिह्नीं भगवत्पदें । ओळखोनि गोपवृंदें । धांवती तीं चिह्नें विशदें । मार्गीं मुग्धें लक्षिती ॥२२०॥तिहीं चिह्नीं दाविली वाट । तेणें मार्गें घडघडाट । अवघे पातले यमुनातट । ह्रदानिकट मिळाले ॥२१॥एथें म्हणसी कुरुमंडना । समानवयस्कां गोवळगणा । माजीं कृष्णाच्या चरणचिह्ना । कैशिया खुणा चोजविलें ॥२२॥ते तत्र तत्राब्जयवांकुशाशनिध्वजोपपन्नानि पदानि विश्पतेः ।मार्गे गवामन्यपदांतरांतरे निरीक्षमाणा ययुरंग सत्वराः ॥१८॥तरी जैसे कां योगिजन । अप्रमत्तत्वें सावधान । अतद्व्यावृत्ती करून । ब्रह्म निर्गुण गिंवसिती ॥२३॥तैशीं मार्गीं धेनुपदें । त्यांमाजी गोपाळांचीं विशदें । त्या सर्वांच्या अतद्वादें । श्रीकृष्णपदें गिंवसिती ॥२४॥कृष्णांघ्रीची ओळखण । ध्वजांकुशोर्ध्वरेखापूर्ण । पद्मयवादि चिह्नीं जाण । भगवच्चरण प्रकाशती ॥२२५॥धेनुमार्गें रानोरानीं । अन्यपदांच्या निराकरणीं । भगवत्पद विलोकूनी । आले धांवोनि सत्वरा ॥२६॥परीक्षितीतें अंगशब्दीं । बादरायणि स्वसंपादीं । संबोधूनि विशाळबुद्धि । म्हणे त्रिशुद्धि अवधारीं ॥२७॥अंतर्ह्रदे भुजगभोगपरीतमारात्कृष्णं निरीहमुपलभ्य जलाशयांते ।गोपांश्च मूढधिषणान् परितः पशूंश्च संक्रंदतः परमकश्मलमातुरार्ताः ॥१९॥येऊनि पाहती ह्रदाकडे । तंव कृष्णा आंगीं सर्पवेढें । निश्चेष्ट पडला जैसें मडें । तैसा निवाडें देखती ॥२८॥कृष्ण सांपडला म्हणती गजरीं । परंतु अगाध जलांतरीं । दुर्विषाच्या उडती लहरी । यालागीं करीं अप्राप्य ॥२९॥जावों न शकती कोणी आंत । कालियनाग गरळ वमित । अगाध डोहो विषें कढत । तीरीं तटस्थ जन झाले ॥२३०॥मग पाहती ह्रदाभंवतें । तंव गोपाळ पडिले जैशीं प्रेतें । धेनु आक्रंदती तेथें । महादुःखातें पावले ॥३१॥अंतःकरणें विकळ झालीं । हाहाकारें धैर्यें गेलीं । दीनें अनाथें होऊनि ठेलीं । मूर्छित पडलीं नावेक ॥३२॥ऐशी व्रजौकसांची दशा । गोपी प्रेमळा मुग्धवयसा । कोटिमन्मथलावण्यठसा । साभिलाषा श्रीकृष्णीं ॥३३॥गोप्योऽनुरक्तमनसो भगवत्यनंते तत्सौहृदस्मितविलोकगिरः स्मरंत्यः । ग्रस्तेऽहिना प्रियतमे भृशदुःखतप्ताः शून्यं प्रियव्यतिहृतं ददृशुस्त्रिलोकम् ॥२०॥अनंतैश्वर्यप्रतापी । जो परमात्मा विश्वव्यापी । त्या कृष्णाचे लावण्यरूपीं । स्वमनें गोपी अनुरक्ता ॥३४॥दृढनिश्चय त्यांचे मनीं । दुसरा समर्थ कृष्णाहूनी । नाहीं ब्रह्मांडभुवनीं । लावण्यगुणीं तुळी ऐसा ॥२३५॥कृष्ण विधिहरांचा शास्ता । कृष्ण काळाचा नियंता । ऐसा दैवें लाभे भर्ता । तैं समर्था श्रीहूनी ॥३६॥तें विपरीत झालें कैसें । कृष्ण कर्षिला काळपाशें । खान घालूनि आमुचे आशे । दिलें संतोषें अंतर ॥३७॥कृष्णा ऐसे सुहृद सृष्टीं । न मिळे पाहतां ब्रह्मांडकोटि । श्रीकृष्णाच्या स्मरोनि गोष्टी । पडती भूतटीं मूर्च्छितां ॥३८॥श्रीकृष्णाचें हास्यवदन । स्निग्ध अपांगनिरीक्षण । पहतां ब्रह्मानंद गौण । उपमा गौण त्या मुखा ॥३९॥श्रीकृष्णाचें मधुर बोल । ऐकोनि येती स्वानंदडोल । कोटिब्रह्मपदांचें मोल । तुळितां अतुल पडिपाडें ॥२४०॥प्रियतम सर्पें ग्रासिला बाई । आतां भूभार जिणें काई । दुःखें पेटली हृदयखाई । पडती ठायीं मूर्च्छिता ॥४१॥पुन्हा होतां लब्धस्मृति । गोपी दुःखें आक्रंदती । श्रीकृष्णाची मन्मथमूर्ति । भरली चित्तीं तद्विरहें ॥४२॥बालसूर्याचें आरक्तपण । रातोत्पलदलमॄदुलचरण । शयनीं घेऊनि पहुडों कृष्ण । तैं करूं मर्दन उरोजीं ॥४३॥काम शत्रु जो असाध्य । येणें साधनें करूं साध्य । म्हणतां आम्हीच झालों वंध्य । स्मर अवंध्य उरला कीं ॥४४॥श्रीकृष्णाचें अधरामृत । प्राशूनि जिंकूं इच्छिला मृत्य । तें आजि विफळ झालें कृत्य । मृत्य त्वरित पातला ॥२४५॥श्रीकृष्णाच्या आलिंगना । लाहतां न बाधी काळकलना । कृष्ण डंखूनि काळियाणा । आमुच्या प्राणा घेतलें गे ॥४६॥चंद्रकाश्मीरचंदनउटी । देऊं कृष्णातें गोमटी । ऐशी इच्छा होती पोटीं । परी अदृष्टीं नाहीं कीं ॥४७॥श्रीकृष्णाचे उभय चरण । कुरळ केशीं झाडूं पूर्ण । ऐसें इच्छित होतें मन । परी दैवहीन निवडलें ॥४८॥ होऊं कृष्णाच्या किंकरी । कृष्ण सेवूं निरंतरी । इच्छा होती हे अंतरीं । ते ईश्वरी पुरवीना ॥४९॥कृष्णवियोगें ऐशिया । गोपी विलपती अवघिया । म्हणती चांडाळ काळिया । आमुच्या प्रळया उदेला ॥२५०॥भरलें असतांही त्रिभुवन । कृष्णविरहें देखती शून्य । कृष्णप्रेमें तनु मन प्राण । ठेलें वेधून तद्रूपीं ॥५१॥त्या गोपींची विरहकथा । कथी ऐसा कैंचा वक्ता । तथापि भृशदुःखें संतप्ता । त्या श्लोकार्था अनुसरलों ॥५२॥विरहिणीं कां उपासकाम । कीं अनन्यभावें सद्गुरुभजकां । एवं विरह का ठाउका । येरां मायिका काहणी हे ॥५३॥ऐशी गोपिकांची कथा । आतां जननीची अवस्था । शुक निवेदी अवनिनाथा । तेही श्रोतां परिसावी ॥५४॥व्यथित कृष्णातें अनुलक्षून । यशोदेतें करितां रुदन । गोपिका तीतें अनुसरोन । कथिती हरिगुण समदुःखी ॥२५५॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP