मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १६ वा| श्लोक २१ ते २४ अध्याय १६ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३८ श्लोक ३९ ते ४३ श्लोक ४४ ते ४७ श्लोक ४८ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६७ अध्याय १६ वा - श्लोक २१ ते २४ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २४ Translation - भाषांतर ताः कृष्णमातरमपत्यमनुप्रविष्टां तुल्यव्यथां समनुगृह्य शुचः स्रवंत्यः ।तास्ता व्रजप्रियकथाः कथयंत्य आसन् कृष्णाननेऽर्पितदृशो मृतकप्रतीकाः ॥२१॥जननिया कृष्णाच्या स्नेहाळा । वत्सप होऊनि जैं केली लीला । तैं जयांचें स्तन्य प्याला । त्या त्या सकळा समदुःखी ॥५६॥आणि व्रजींच्या अवघ्या नारी । ज्यांचे कुमार पुलिनावरी । मूर्च्छित पडिले प्रेतापरी । यशोदे सरी त्या रडती ॥५७॥यशोदा कृष्णातें लक्षून । दुःखें करी आक्रंदन । गोपी तीतें अनुसरोन । करिती रुदन समदुःख ॥५८॥माता पुत्रमोहें रडती । विरहें गोपी चरफडती । न हालतां नेत्रपातीं । मुख लक्षिती कृष्णाचें ॥५९॥स्तन पाझरती मातृमोहें । शोकें नेत्रीं बाष्प वाहे । कृष्णवियोगें दुःखें देहे । फुटती लाहेसारिखे ॥२६०॥जन्मापासूनि कृष्णलीला । ज्या ज्या प्रियकर गोपिकांला । त्या त्या स्मरोनि तिये वेळां । ऐकीमेकींला सांगती ॥६१॥कृष्ण राहिला जैंहूनि पोटीं । तैंहूनि मी सभाग्य मोठी । झालें एकसरी करंटी । रेखा खोटी निवडली ॥६२॥कृष्णासारिखें लेंकरूं । निर्मूं न शके ईश्वरू । कोंवळें कृष्णाचें अंतर । आजि निष्ठुर पैं झाला ॥६३॥कृष्णासि आवडे मिष्ठान्न । कृष्णासि आवडे पयःपान । कृष्णासि आवडे माखण । हय्यंगवीन स्वादिष्ट ॥६४॥कृष्ण नाना आळी करी । मथन करितां पदरीं धरी । चंद्र देखोनि जळांतरीं । मागे करीं खेळावया ॥२६५॥कृष्णासि आवडे काहाणी । सांगतां ऐके मन ठेवूनी । चिमणीं मुलें मेळवूनी । बोबड्या वचनीं त्यां सांगे ॥६६॥कृष्ण उमाणी सर्व जाणे । कृष्ण मंजुळ गाय गाणें । सप्तवरीं तानमानें । लास्यनर्तनें संगीत ॥६७॥कृष्ण सांवळा डोळस । कृष्ण नागर गोपवेश । कृष्णेंवीण विश्व ओस । वाटे उदास भणभणा ॥६८॥ऐसे अनेक विलाप करून । आठविती श्रीकृष्णेंवीण । कृष्णवदनीं जडले नयन । प्रेतासमान तटस्थ ॥६९॥कृष्णचि केवळ प्राण ज्यांतें । नंदादिकां त्यां गोपांतें । ह्रदीं प्रवेशतां रोहिणीसुतें । धरूनि वारिलें तें ऐका ॥२७०॥कृष्णप्राणान्निर्विशतो नंदादीन्वीक्ष्य तं ह्रदम् । प्रत्यषेधत्स भगवान् रामः कृष्णानुभाववित् ॥२२॥तंव नंदादि गोपवृद्ध । कृष्ण देखोनि सर्पें बद्ध । मोहें अवघेचि झाले मुग्ध । म्हणती ह्रद प्रवेशों ॥७१॥झणें कृष्ण सोडील प्राण । देखों न शकों हें निर्वाण । कृष्णाआधीं आमुचे प्राण । जातां सगुण त्यापरिस ॥७२॥ऐसें दुःखें रिघती डोहीं । संकर्षण त्यां धरूनि बाहीं । मागें लोटी हातीं दोहीं । सांगे कांहीं हरिलीला ॥७३॥म्हणे गर्गाचें ज्योतिष । कोठें तरी झालें फोस । तेणें कथिलें भविष्य । धरा विश्वास ते ठायीं ॥७४॥षड्गुणैश्वर्याचा पति । तो बलराम ईश्वरमूर्ति । तेणें वारितां गोपांप्रति । तटस्थवृत्ति राहिले ॥२७५॥तंव परीक्षिति म्हणे मुनि । कालियविषाच्या पवनें वनीं । स्थावरजंगमां आहळणी । वांचले कैसेनि व्रजवासी ॥७६॥ऐकोनि हांसिला योगिराव । म्हणे शंकेसि नसोनि ठाव । कोमल श्रोत्यांचा जाणोनि भाव । प्रश्न अपूर्व तो केला ॥७७॥तरी गाई गोपाळ ह्रदींचें पाणी । पिऊनि पावले प्राणहानि । ते कृपादृष्टीं अवलोकनीं । अमृत वर्षोनि जो जीववी ॥७८॥आणि वत्सें वत्सप अघापोटीं । भस्म झाले ते कृपादृष्टीं । अवलोकूनियां जगजेठी । सजीव सृष्टीं जो काढी ॥७९॥कदंबा भावी कृष्णचिंतन । यास्तव गरळें न जळे जाण । तो ह्रदीं असतां प्रत्यक्ष कृष्ण । केंवि व्रजजन जळतील ॥२८०॥कृष्णविरहें रिघते डोहीं । तरी त्यां विषभय न बाधी कांहीं । कृष्णवियोगें मूर्च्छा देहीं । भरोनि पाहीं वश झाले ॥८१॥इत्थं स्वगोकुलमनन्यगतिं निरीक्ष्य सस्त्रीकुमारमतिदुःखितमात्महेतोः । आज्ञाय मर्त्यपदवीमनुवर्तमानः स्थित्वा मुहूर्तमुदतिष्ठदुरंगबंधात् ॥२३॥व्रजौकसांची हे अवस्था । कळों सरली श्रीकृष्णनाथा । पाहोनि गोगोपां तटस्थां । हृदयीं व्यथा जाणवली ॥८२॥ऐसें आपुलें गोकुळ । स्त्रिया पुरुष सहितबाळ । देखोनि आपणाविण व्याकुळ । हृदयीं गोपाळ कळवळिला ॥८३॥मीच ज्यांसि परमगति । मजविण आन न जाणती । ग्रस्त देखोनियां मजप्रति । दुःखी होती मजसाठीं ॥८४॥जेणें धरिली मर्त्यपदवी । तो मनुष्यापरी वर्तोनि दावी । एरव्हीं चराचरगोसांवी । गोष्टी ठावी अवघी त्या ॥२८५॥मनुष्यांपरी रडे पडे । मनुष्यापरी भेणें दडे । डोहीं सप्रें घालितां वेढे । निश्चेष्ट पडे नावेक ॥८६॥तंव व्रजौकसें समस्तें आपणा निमित्त झालीं प्रेतें । अत्यंत जाणोनि श्रीअनंतें । करुणावंतें कळवळूनी ॥८७॥मुहूर्तमात्र संपादणी । संपादिली मनुष्यपणीं । आप्तांसाठीं अंतःकरणीं । चक्रपाणी कळवळिला ॥८८॥मग त्या उरगबंधांतून । प्रतापें निघाला श्रीभगवान । जैसा सजळाभ्र लंघून । अमृतकिरण प्रकाशे ॥८९॥काळियाचा उकलूनि फांसा । उभा ठाकला श्रीकृष्ण कैसा । त्या दोघाम्चा प्रताप जैसा । वर्तला तैसा परियेसीं ॥२९०॥तत्प्रथ्यमानवपुषा व्यथितात्मभोगस्त्यक्त्वोन्नमय्य कुपितः स्वफणान् भुजंगः ।तस्थौ श्वसन् श्वसनरंध्रविषांबरीषस्तब्धेक्षणोल्मुकमुखो हरिमीक्षमाणः ॥२४॥वज्रसारहरिशरीर । कालियवपु रज्ज्वाकार । गुंडूनि कर्षिलें दृढतर । वैक्लव्यपर होवया ॥९१॥तंव तूष्णींभूत राहोनि कृष्ण । झाला तद्व्यथासहिष्ण । मूहूर्तमात्रें सर्पप्राण । पडिले क्षीण निश्चेष्ट ॥९२॥अंगप्रौढी विशाळ तरु । लववी जैसा बलिष्ठ नरू । परी तैसाच चिरकाळ होतां स्थिर । भंगें धीर मुहूर्तें ॥९३॥कीं मनुष्य जळामाजीं बुडी । देऊनि निग्रहें श्वास कोंडी । शक्तीहूनि अधिक घडी । भरतां सोडी प्राणांतें ॥९४॥तेंवि कालियें अवघें बळ । वेंचूनि कर्षिला गोपाळ । मुहूर्तपर्यंत निश्चळ । मग व्याकुळ अहि झाला ॥२९५॥मग उकलूनि आंगींचे वेढे । शतशः उभारी विशाळ फडे । प्रपंच क्रोधें हृदयीं कढे । ज्वाळा तोंडें वमीतसे ॥९६॥जितुक्या फणा तितुकीं वक्त्रें । तद्द्विगुणित नासारंध्रें । गरळाग्नीच्या प्रलयधूम्रें । संपूर्ण भरे स्थळ जळ ॥९७॥कराल गरल सक्रोध कडके । नासारंध्रें निघती भडके । यमुनाकल्लोळ साहती खडकें । तैसे धडके हरी सोसी ॥९८॥मांदे करिती ज्या सुरगणी । उबडी ठेविती त्या रांधणी । तैशा संतप्त नेत्रश्रेणी । पाहे क्षोभोनि सक्रोध ॥९९॥मुखें प्रदीप्त उल्मुकाकार । हिंस्र अशांत विखार । नेत्र सरोष एकाग्र । नंदकुमार अवलोकी ॥३००॥परंतु कृष्णावरी तवकें । झोंबोनि दंश करूं न शके । तटस्थ गरळा वमिती मुखें । नेत्रीं देखे प्रज्वलित ॥१॥जैसा स्वधर्मसंपन्न शूर । आधीं पराचे सोसी प्रहार । मग आपण परम धीर । करी प्रहार त्यावरी ॥२॥तैसा कालियाचा यांवा । कृष्णें साहिला आघवा । आतां दावी स्वा दुर्भावा । तो कौरव्या परियेसीं ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP