मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १६ वा| श्लोक ५ ते ७ अध्याय १६ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३८ श्लोक ३९ ते ४३ श्लोक ४४ ते ४७ श्लोक ४८ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६७ अध्याय १६ वा - श्लोक ५ ते ७ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५ ते ७ Translation - भाषांतर विप्रुष्मता विषोदार्मिमारुतेनाभिमर्शिताः । म्रियंते तीरगा यस्य प्राणिनः स्थिरजंगमाः ॥५॥विषोदकाचे तरंग । स्पर्शोनि पसरे मारुतवेग । त्याच्या स्पर्शें भवंते दांग । पावे भंग आहळोनी ॥६३॥वृक्ष वल्ली लता गुल्म । जंतु श्वापदें विविधनाम । पवनस्पर्शें होती भस्म । मही निर्लोम या हेतु ॥६४॥यमुने न वाहे कां कालिया । निरूपिलें या अभिप्राया । विष न जाळी तीरवासियां । हेंही राया निवेदिलें ॥६५॥ह्रदासभोंवते जीव । स्थावर जंगम जंतु सर्व । जळोनि पडती हें अपूर्व । विषवैभव तुज कथिलें ॥६६॥त्यातें कैसा निग्रह कृष्ण । ऐसा केला जो त्वां प्रश्न । तेंचि आतां निरूपण । सावधान परियेसीं ॥६७॥तं चंडवेगविषवीर्यमवेक्ष्य तेन दुष्टां नदीं च खलसंयमनावतारः ।कृष्णः कदंबमधिरुह्य ततोऽतितुंगमास्फोट्य गाढरसनो न्यपतद्विषोदे ॥६॥गाई वत्सें आणि गोप । पिऊनि ह्रदींचें सविष आप । प्रेतें पडलीं त्यां सकृप । पूतनागरप वांचवी ॥६८॥सामान्य सर्प झोंबे चरणीं । दों चौं घटिका व्यापी मूर्ध्निं । तैसा नोहे कालियफणी । धांवे गगनीं विषवेग ॥६९॥चंडकिरण रवीचें नांव । चंडधन्वा श्रीराघव । चंडविषवेग हा काद्रव । वीर्यगौरव हें ज्याचें ॥७०॥चंडवेग जो विषाचा । तोचि वीर्यप्रताप ज्याचा । तेणें सदोष कालिंदीचा । प्रवाह कृष्णें देखिला ॥७१॥खळांचा करावया निग्रह । ज्याचा एथ प्रादुर्भाव । तो मी कृष्ण यदूद्वह । निःसंदेह अवतरलों ॥७२॥कालियाचें निग्रहण । त्यासि ओपूनि अभयदान । रमणकद्वीपा प्रति गमन । यमुनाजीवन सुसेव्य ॥७३॥इतुकीं कार्यें वक्ष्यमाण । लक्षूनियां श्रीभगवान । चंडावेश अवलंबून । वेंघे आपण कदंबीं ॥७४॥परम उच्च कदंबावरी । स्वयें वेंघोनि श्रीमुरारि । कटिमेखळा दृढ सांवरी । पीतांबरीं गोऊनी ॥७५॥डावा बाहु उजव्या करें । ठोकूनि गर्जना केली निकरें । विषोदकीं आवेशें थोरें । उडी सत्वर टाकिली ॥७६॥सर्पह्रदः पुरुषसारनिपातवेगसंक्षोभितोरगविषोच्छ्वसितांबुराशिः । पर्यक्प्लुतो विषकषायबिभीषणोर्मिर्धावन्धनुःशतमनंतबलस्य किं तत् ॥७॥अनंत ब्रह्मांडें रोमविवरीं । ज्याचे तो हा श्रीमुरारि । अखिलगरिष्ठतेची सामग्री । गोपशरीरीं जयाचे ॥७७॥तो पुरुषसारात्मा श्रीकृष्ण । सर्पह्रदीं पडतां जाण । निपातवेगें आंदोळण । झालें संपूर्णह्रदाचें ॥७८॥डोहीं पडतां पुरुषश्रेष्ठ । शब्द उठिला कडकडाट । प्रलयमेघाचा बोभाट । तैसा अचाट भीकर ॥७९॥तेणें दणाणिलीं पर्वतशिखरें । दर्या दरकुटें गिरिकंदरें । वनें अटव्यें कांतारें । भूचरें खेचरें बुझालीं ॥८०॥गाधोदकीं पाषाण पडे । तेणें तें डहुळे चहूकडे । कालियह्रद तेणेंचि पाडें । दुर्जरक्ष्वेडें कालवला ॥८१॥अगाध ह्रदींचें सगर वारि । माजी पडतां कैटभारि । कढों लागलें तैला परी । तळींचें वरी कालवलें ॥८२॥असंख्य सर्प होते जळीं । विषउल्बण जे महाबळी । ते क्षोभले तये काळीं । विषकल्लोळ वर्षती ॥८३॥उडी पडतां हेलावले । सर्प संक्षोभें उचंबळले । गरळ तापें उतों आले । जळ पसरलें सभोंवतें ॥८४॥काळे निळे हिरवे पिवळे । विचित्र विषोर्मि उमाळे । भोंवते धांवती रानोमाळें । उचंबळे ह्रद तेव्हां ॥८५॥शतधनुष्यें भवंतें वारि । तीरीं धांविलें पडतां हरि । नवल नव्हे कीं हें भारी । विश्वशरीरिपडिपाडें ॥८६॥सुरनरांसि दुर्जर प्रबळ । परी श्रीकृष्ण तो अनंतबळ । तेथ कायसा कालिय खळ । केउतें गरळ त्यापुढें ॥८७॥इतुकें करूनि निरूपण । श्रोतयांचें जाणोनि मन । सिंहावलोकनें शंकाहरण । करी सज्ञान शुकवक्ता ॥८८॥ह्रदासभोंवतीं गरळें । स्थावरजंगमें जळालीं समूळें । कदंब केंवि ह्रदा जवळे । वांचला म्हणाल तरी ऐका ॥८९॥महापुरीं लंघूनि पुलिन । ह्रदीं कालवे यमुनाजीवन । तैं गरळप्रवाहीं तीरींए जन । काय म्हणोन वांचती ॥९०॥तरी सिंधुगर्भीं वडवानळ । विझवूं न शके समुद्रजळ । मारुति केवळ गोळांगुळ । परी त्या काळ नाकळी ॥९१॥नळाहातेंचि तरल्या शिळा । ते काय वानरा आंगींची कळा । जें जें करणें विश्वपाळा । त्या त्या खेळा विस्तारी ॥९२॥तैसा कालियमथनासाठीं । कृष्ण अवतरेल जगजेठी । यास्तव अमृतरूप यमुनेकांठीं । रची परमेष्ठी कदंब ॥९३॥दुष्ट सर्पांच्या विषापहरणीं । जैसे निर्मिले अमोघ मणि । तमा नागवे जैसा तरणि । प्रकटे किरणीं तम नाशे ॥९४॥ह्रदासमीप कदंब तैसा । असोनि नागवे कालियविषा । प्रवाहमिश्रित विषदोषा । पवनस्पर्शें निवारी ॥९५॥तप्ततैलीं मलयागर । पडतां होय तें शीतलतर । तैसें प्रवाहमिश्रित गर । कदंबसमीरसंस्पर्शें ॥९६॥तेणें यमुनातीरींचे जन । निर्भय विषबाधेपासून । कां भावी कृष्णस्पर्शन । हें दृढ चिंतन कदंबा ॥९७॥कृष्णचिंतन जागे हृदयीं । तरी विषबाधा ते बाधील कायी । कालसर्पाची बाधा नाहीं । तेथ कालिय कायी सामान्य ॥९८॥आणिक इतिहासपुराणीं । गरुडें अमृत स्वर्गींहूनी । आणितां बैसला कदंबमूर्ध्निं । तैं सुधा द्रवोनि वरि पडिली ॥९९॥आणि गरुडाचें सन्निधान । तेणें धर्में भिजला पूर्ण । यालागीं विषाग्नीपासून । निर्भय जाण कदंब ॥१००॥ऐशिया योगाची सामग्री । कदंबा आंगीं होती पुरी । त्यावरी कित्येक काळांतरीं । ह्रदाभीतरीं फणी आला ॥१॥प्रवाह निर्विष कदंबवातें । निर्विष न करी कां ह्रदातें । तरी नित्य नूतन गरल तेथें । उत्पन्न होत म्हणूं नोहे ॥२॥ऐसें शंकानिरसन केलें । पुढें व्याख्यान आदरिलें । कृष्णप्रतापें उचंबळलें । शतधनुष्यें जळ भंवतें ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP