श्री. ना. गो. चापेकरकृत कांहीं गाणीं

संकीर्ण वाड्मय साहित्य.


( श्री. ना. गो. चापेकर )

गाणें १ लें - गण
गण मी नमितों माता पिता ॥ चुकली बुद्धि दे भगवंता ॥
गण हा सर्व गणांचा दाता ॥ पाताळी शेष थरार ॥
गणांनीं शिणगारा सारा केला ॥ गणाचा उंदीर घोडा झाला ॥
गण घोड्यावर स्वार झाला ॥ गण इंद्र सभेला गेला ॥
गणांनीं नांच मांडिला ॥ चंद्र पाहुनी हंसला त्याला ॥
चंद्राला सराप तो दिला ॥१॥

गाणें २ रें गौळण
गौळण सांगे गौळणीला ॥ पुत्र झाला येश्वदेला ॥
एक धावी एकी पुढें ॥ एक वाटी सुंठावडे ॥
वाण घेउनी ताठी ॥ भरी येश्वदेची ओटी ॥
गोकुळांत गडबड झाली ॥ दाशी जनीं हेल घाली ॥
हरी विजयाची ॥ कथा सांगती सभत बसुनी ॥
कृष्णदेवाचा जन्म पहिला ॥ आठव्या अवतारी कृष्ण जलमला ॥
माहित सर्वांला ॥ वासुदेव देवकी होते बंदी शाळला ॥
सात बाळाला वधिला कंसानीं ॥ आणा विध्यानाला ॥
कंसा शिपाई होतां रावण ॥ होता बंदीशाळला ॥
वायुदेवांनीं उचलूनशानी ॥ घेतला बगलला ॥
खेळत खेळत भेऊनशानी ॥ गेलास गोकुलाला ॥
शेष मुरुचा करुनी ताजवी ॥ बसलास हालवीत ॥
चार नगरच्या नारी मिळुनशानी ॥ आल्या बाळ पाहाण्याला ॥
शक्ति मग उचलून नेली बंदीशाळला ॥ नरानी पुत्र दाहिला हर्षा मनाला ॥
त्याही बाळाला चुंबन देई मनाला ॥ आठव्या अवतारी माहित सर्वांला ॥
बारा आमलामंदी कृष्ण जलमला ॥ हा पहा कृष्ण जनमला ॥
तड तड तड तड विजा तुटल्या ॥ त्याच वेळला ॥४॥

गण - गाणें ३
तुजला मी म्हणत म्हणत माझ्या राईच्या गवळणी गा ॥ नको जा मथुर बाजारीगा ॥ पुढें आडवा झाला येश्वदेचा काना गा ॥ आतां होऊ दे माझ्या धयाचा विकरा गा ॥ आहो त्यानी टाकिला माझ्या छातीवर ॥ हात गा ॥ आतां तोडिला माझा नवरत्नाचा हार गा ॥

गाणें ४
कानु काय राजांनीं ॥ राजानीं डाव मांडिला ॥ कानु काय राजांनीं डाव मांडिला ॥ डाव काय मांडिला ॥ मांडिला गोठणीवर ॥ डाव काय मांडिला गोठणीवर ॥ डाव काय मांडिला गोठणीवर ॥ चेंडु काय झुगारिला ॥ झुगारीला कलंबावरी ॥ चेंडु काय झुगारिला कळंबावरी ॥ चेंडु काय अडकला ॥ अडकला कलंबावरी ॥ चेंडु काय अडकला कलंबावरी ॥ कानु काय चडला कलंबावरी ॥ कानु काय चडला कलंबावरी ॥ कानुला चावला कालीया नाग ॥ कानुला चावला कालिया नाग ॥ कानु काय पडला ॥ पडला धरणीवर ॥१॥

गाणें ५
पारबती बोले शिवशंकरा ॥ आशी माझी विनंती तुलारे देवा ॥ माझी विनंती तुला गा ॥ आहो गा गा म्हणतां गाया सांगतां ॥ आतां वचन कोणाचें मोडावें ॥ वचन कोणाचें मोडावे ॥ आहो आम्हीं आज्ञन तुम्हीं सुज्ञान ॥ आतां वचन कोणाचे मोडावे ॥ पाण्यामंदी पिंड टाकले भेद नाहीं ॥ तीथे मुंगीला र ॥ भेद नाहीं मुंगीला ॥ काई पींडावे नांव शाईरा ॥ आता सांग मला चतुरा ॥ सांग मला तुम्ही चतुरा ॥ चतुरा ॥३॥

गाणें ६
कपटी रावण वेश धरून सिता नेली चोरुन गा ॥ सिता नेली चोरुन गा ॥ राम ते बोले वाली - सूताला ॥ जावे सीता शोधाला गा ॥ नदीतीरी विचार करी ॥ कसा करू उडाण गा ॥ उडाण केला गगना गेला ॥ पलिकड उतरला गा ॥ कशीमुलारी(?) बोलती त्याला ॥ लंका राहिली बाजूला गा ॥

गाणें ७
बाटुन दे बंगला ॥ साहेबा बाटुन दे बंगला ॥ हा चुन्यानी सारंगला ॥ वरती कळस सोन्याचा ॥ वरती कळस सोन्याचा ॥ आंत काय पलंग सायाचा ॥ त्यावर मंडम लोळत ॥ त्यावर मंडम लोळत ॥

गाणें ८
तान्ह्या बाळानी छंद घेतला ॥ मोत्या पोवळ्याचा छंद घेतला ॥ मोत्या पवळ्याचा छंद घेतला ॥ मोते नाही बा आपल्या सापडला ॥ काळ्य़ा दर्‍याला पाऊस पडतो गा ॥ मोत्या बाजती त्याही पाण्याला गा ॥ मोत्या बाजती त्याही पाण्याला गा ॥ असे मोठे बा सावकार गा ॥ त्यानी सोडली झाजु तारंगा ॥ त्याने सोडले झाजू तारंगा ॥ झाजु चालली काळ्या दर्‍याला ॥ काळ्या दर्‍याला जाऊन पोहचली ॥ झांजु भरली मोत्या - पवळ्यानी गा ॥ झाजु चालली आपल्या नगराला ॥ आपल्या नगराला जाऊन पोहचली गा ॥ झांजु लागली माहाडाच्या बंदराला गा ॥ त्यांत त्या घेऊन मोत्या पवळ्याला गा ॥ मग बोलविले दोन सूतार गा ॥ असे चंदन साथ मग पाडाव येईन साप गा ॥ त्या सापाच्या फळ्या पाडाव्या गा ॥ त्या फळ्य़ाचा पाट बनवावा ॥ मग फळ्याचा पाट बनवावा ॥ आतां बोलवी दोन सोनार गा ॥ त्या मोत्याची बाळी बनवी ॥ त्या मोत्याची बाळी बनवी ॥ त्या पाटावर बाळा बसविला गा ॥ मग बाळाचा कान टोचिला ॥ मग बाळाचा कान टोचला ॥

गाणें ९
अहो तारी तारी रामराया ॥ गेला गेला जन्म वाया ॥ आहो नाही केली काशीतीर्थ ॥ नाही केली पापपुण्य ॥ आहो नाहि नाही केली गंधपुजना ॥ आहो तारि तारी रामराया ॥

गाणें १०
आहो तुम्ही कंसू मरागिरा ॥ आहो तुम्हीं कंसू मरागिरा ॥ आहो तुम्ही गाइला वासरू सोडा ॥ आहो तुम्ही गाइला वासरू सोडा ।

गाणें ११
शिपाई चाकरमान्या रे दादा ॥ तुझा झोलना कोठे राहिलाय रे ॥ गेलो होतो बडोदे शहरा रे दादा ॥ तीथ झोलना माझा राहिलाय रे ॥ आरे काय करू रे ॥ झोलना कोठे राहिलाय रे ॥ शिपाई० ॥ गेलो होतो मुंबई शहरा रे दादा ॥ तीथ झोलना माझा राहिलायरे ॥ पृ. ५५

N/A

References : N/A
Last Updated : March 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP