मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संकीर्ण वाड्मय साहित्य| चरित्र संकीर्ण वाड्मय साहित्य चरित्र मराठी जंगनामा बालवीर कासीमचा पराक्रम एक स्त्रीरत्नाचा पराक्रम कूट अभंग कानडी रिवायत उर्दु रिवायत गोधडी दास कविकृत सखु चरित्र मालिका ज्ञानराज माउली आर्याबद्ध शकुनवंती विप्र गोविंदकृत शिल्पशास्त्र माधवेंद्रकृत अनुभयोदय दामा कोंडदेवकृत सिद्धांतसार मतिप्रकाश गंगाबाईचें सिद्धान्न नाथगोपाळाचे सुलतान श्री. ना. गो. चापेकरकृत कांहीं गाणीं तुका विप्रकृत कांहीं कविता भक्तीपर श्लोक अथ भानुदास - चरित्र संकीर्ण वाड्मय साहित्य. Tags : marathisahityaभानुदासमराठीसाहित्य अथ भानुदास - चरित्र Translation - भाषांतर ॥ अथ भानुदास - चरित्र ॥पंधरीची यात्रा मिळाली अपार । नाहीं दीनोद्धार पांडुरंग ॥१॥म्हणती सज्जन काय जालें देवा । पडिला संदेह सकळिकां ॥२॥कां रे उपेक्षिलें कृपाळु अनंता । भेट देईं संतां आपुलीयां ॥३॥विद्यानगरासि गेला पंढरीराव । कळला अभिप्राय सकळ जनां ॥४॥ऐसा कोणी नाहीं भक्त पराक्रमी । रुक्मिणीचा स्वामी आणी येथें ॥५॥ऐकूनियां मात कोणीच न बोले । म्हणती उपेक्षीलें पांडुरंगा ॥६॥बोले भानुदास आणितों मी देवा । केंवी पंढरीराव जाऊं पाहे ॥७॥भानुदासें केलें सकळिकां नमन । आज्ञा तो घेऊन निघालासे ॥८॥विद्यानगरासि आला भानुदास । पंढरीनिवास पाहावया ॥९॥दुंदुभी वाजती वाजंत्र्यांचा ध्वनि । परि चक्रपाणि नये दृष्टी ॥१०॥प्रातःकाळीं पूजा करुनि रामरायें । आणिका न होये दर्शन तेथें ॥११॥कवाडा अर्गळा कुलुपें सात द्वारा । बंधन केला वारा न जाय तेथें ॥१२॥देखुनी कौतुक बोले भानुदास । भला बैसलास देवा येथें ॥१३॥भाग्यवंत देवा जालासी तूं येथें । दुर्बळ अनाथा कोण पुसे ॥१४॥तंव जाली रात्री पडिला अंधार । जोडुनीयां कर विनवीतसे ॥१५॥आतां देवा तुम्हीं चलावें येथूनी । नाहीं तरी बरे आम्ही नव्हे ॥१६॥सोन्याचे कडीं - तोडे गळां मोहनमाळ । भुललासि विठ्ठला देखोनियां ॥१७॥आम्हां वांचुनीयां नाहीं तुम्हां गती । न करीं फजिती जनांमध्यें ॥१८॥करुणावचन ऐकुनीयां देव । केलासें उपाय भानुदासें ॥१९॥आम्हांसि सोडूनि बैसलासि येथें । पाठीच्या पोरासी कोण पुसे ॥२०॥कुलुप बंधनें कवाडें उघडती । देखिली ती मूर्ति विठोबाचीं ॥२१॥देवळाभीतरीं गेला भानुदास । साष्टांग चरणांस नमन केलें ॥२२॥सद्गदित जाली भक्ता - देवा भेटी । आनंद तो पोटीं न समाये ॥२३॥देवा कां रे तुवां पंढरी सोडिली । गोडी तुज लागली भूषणाची ॥२४॥पंढरींत काय दुष्काळ पडला । म्हणूनि येथें आलां धांवोनीयां ॥२५॥म्हणे पांडुरंग बंदीं मी पडिलों । भीमा अंतरलों चंद्रभागा ॥२६॥कोथें चंद्रभागा कोठें गरुडपार । नामाचा गजर कोठें येथें ॥२७॥कोठें साधुसंत वैष्णव ते जाण । हरिनामकीर्तन कोठें आहें ॥२८॥हार काढूनियां घातलासे कंठीं । म्हणे द्यावी भेटी प्रातःकाळीं ॥२९॥देऊळाबाहेरी आला भानुदास । कुलुप कवाडा बंधन जालें ॥३०॥प्रातःकाळीं स्नान करुनि भानुदास । आठवी हरीस हृदयामाजि ॥३१॥घालुनी आसन बैसला ध्यानस्थ । देऊनियां चित्त पांडुरंगीं ॥३२॥रामराव पूजा करावया आला । हार नदेखीला नवरत्नांचा ॥३३॥कोणी नेला हार केलासे बोभाट । ताडीले उत्कंठ पुजार्याचे ॥३४॥चोर पाहावया धांवती दाही वाटे । तंव हार कंठीं भानुदासा ॥३५॥देखुनी तयाची ताडिताती शीघ्र । म्हणती हाचि चोर मेंद पूका ॥३६॥भानुदासा नेलें धरुनि रायापासी । घालावें म्हणती यासी शूळीं ॥३७॥शूळ तामुनीयां खांद्यावरी दिल्हा । मग चालवीला भानुदास ॥३८॥भानुदास म्हणे ऐकावें वचन । भेट मी घेईन विठोबाची ॥३९॥आला भानुदास देवा नमन केलें । शिक्षेसी लाविलें म्हणे आतां ॥४०॥आतां देवा तुम्हीं लोभ असूं द्यावा । आठव धरावा हृदयामाजि ॥४१॥केली युक्ति तुवां कळली ती आम्हां । शतसहस्र जन्मा न सोडीं मी ॥४२॥तुज - मज वियोग केवि होय देवा । न सोडीं केशवा चरण तुझे ॥४३॥शूळ नेवोनियां रोविलां वेशीसी । म्हणती आतां त्यासी घाला शूळीं ॥४४॥तंव तो भानुदास आठवी विठ्ठला । म्हणती शीघ्र घाला शूळावरीं ॥४५॥भक्ताचा कळवळा पांडुरंगा आला । कंठ तो दाटला सद्गदित ॥४६॥नेत्रीं अश्रुधारा कांपे थरथरां । भक्ताच्या कैवारा धांविन्नला ॥४७॥शूळा अकस्मात् पल्लव फुटले । फल - पुष्पीं दाटला वृक्ष तेव्हां ॥४८॥शूळ वृक्ष जाला सांगती रायाला । विस्मय वाटला सकळिकांसी ॥४९॥भानुदासा नमन केलें रामरायें । म्हणे हा अन्याय केला मोठा ॥५०॥पांडुरंगापासी आले दोघे भक्त । प्रेमें सद्गदित जाला कंठ ॥५१॥कोणें रे गांजिलें माझीये पाडसा । सांग भानुदासा काय जालें ॥५२॥आमुचा कैवारी कृपाळु श्रीहरी । असे शिरावरी कोण गांजी ॥५३॥आतां देवा तुम्हीं बैसावें खांद्यासी । नेईन पंढरीसी वेगीं आतां ॥५४॥रामराव म्हणे मज उपेक्षूनी । जातां चक्रपाणि येथुनीयां ॥५५॥आपुलें वचन साच केलें आम्हीं । आतां लोभ तुम्हीं असों द्यावा ॥५६॥घेउनि खांद्यावरी देव बैसवीला । पंढरीसी आला भानुदास ॥५७॥संत सकळ जन देखुनी धांवतीं । बैसविली मूर्ति निज स्थानीं ॥५८॥जालीसे दाटणी करिती नमस्कार । लीळाविश्वंभर पाहताती ॥५९॥राही - रुक्मिणी घेउनी आरती । वोवाळी श्रीपति पांडुरंग ॥६०॥सकळ वैष्णव नाचती आनंदें । करिती जयजयकार महाद्वारीं ॥६१॥भानुदासें देव आणिला पंढरीसी । तुका म्हणे तयाची धन्य धन्य ॥६२॥ N/A References : N/A Last Updated : March 26, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP